मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुळीच नाही

वेल्लाभट · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मुळीच नाही शहाणेच सर्व जितके, तितका मुळीच नाही वेडा असून तुमच्या इतका मुळीच नाही सच्चा न मी तरीही, लुच्चा मुळीच नाही माझे न जे तयाची, इच्छा मुळीच नाही तत्वास जे न जपती, जपती कसे स्वतःला स्वतःवरीच ज्यांची, निष्ठा मुळीच नाही किती वेगळाच आहे, हा हर्ष तुझ्या डोळी परका जरी न असला, सख्खा मुळीच नाही त्या विठ्ठलास जातो भेटावयास जेंव्हा माझ्या शिवाय तेथे दुसरा मुळीच नाही पुढती कुणी कुणाच्या, मागे कुणी पडे माझ्या समोर असली चर्चा मुळीच नाही इच्छा मनात यावी, लावून वेड जावी मग कोण काय म्हणतो, पर्वा मुळीच नाही हा कोण रे समोरी, आहे अपूर्व माझ्या या आरशात माझी, प्रतिमा मुळीच नाही - अपूर्व ओक

वाचन 2676 प्रतिक्रिया 0