गोविंदा आहे.....म्हणूनच

वेल्लाभट जे न देखे रवी...
श्रीकृष्ण आमचा देव आहे दहीहंडी संस्कृतीची ठेव आहे आज तरुणाईला चेव आहे म्हणूनच आयोजकांचा धंदा आहे सामान्यांचा वांदा आहे वर चढणारा गोविंदा आहे म्हणूनच जोश थोडा मनात आहे उसन्या नशेची साथ आहे ही संस्कृतीवर मात आहे म्हणूनच टीशर्टवर कृष्णाची आकृती आहे ट्रकमधून ओसंडते विकृती आहे ही मुळी न आपली संस्कृती आहे म्हणूनच डीजेचा ठणाणा आहे गोविंदांचा धिंगाणा आहे आयोजकांचा ताठ बाणा आहे म्हणूनच थरावर लावायचा थर आहे समोर पैशाचा डोंगर आहे वाट बघणारं घर आहे म्हणूनच ही आयोजकांची स्पर्धा आहे गोविंदांची त्रेधा आहे बघ्यांचा जीव अर्धा आहे म्हणूनच स्पर्धा आहे आता, केवळ खोडी नाही नशा आहे आता, केवळ गोडी नाही काळजी आहे तुमची, तीही थोडी नाही म्हणूनच नाही असं कोण म्हणतंय? कुणी म्हटलं तरी कोण ऐकतंय? 'सांभाळून!' इतकंच सांगावं वाटतंय म्हणूनच - अपूर्व ओक
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

13 टिप्पण्या 2,651 दृश्ये

Comments

माम्लेदारचा पन्खा नवीन

संस्कृतीच्या नावावर गल्लोगल्ली धटिंगण माजलेत गोविंदाच्या भविष्याचे मात्र बारा वाजलेत जे काल थरावर होते तेच आज फोटोत जाउन बसलेत म्हणूनच….

सुहास.. नवीन

वेल्लाबद ..आवदली क्विता ;) (हा डॉल्बी डि़जीटल चा शोध कोणी लावला रे , मला भेटला तर मी मारुन टाकेन.... मायचा भोपळा त्याच्या )

मदनबाण नवीन

कविता आवडली. बेवडे आणि मुजोर पोर आणि गोविंदा ? साला बाईक वरुन जाताना हॉर्नचा कर्कश्य आवज करुन जातात ही मवाली मुले आणि हे गोविंदा म्हणुन फिरतात म्हणे, त्यांच्या बरोबर माजलेले सांड नेते सुद्धा तेव्हढेच जवाबदार आहेत या विकॄतीकरणाला. ठाण्यातले पोलीस बहुतेक कोमात असावेत कारण कारवाईची भाषा करत होते त्याचा अजुन काही पत्ता लागला नाही.बहुधा त्यांना "सघर्ष" टाळावा असे वाटले असावे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

सुधीर नवीन

कैक वर्षांपूर्वी गिरणगावतल्या कामगारांचा तो एक मर्दानी खेळ होता. काही संघ अस्सल व्यायामपटूंचे होते. ते थर रचणं अजूनही खूप थरारक वाटतं. हळूहळू सणाचा इव्हेंट झाला, जी काही थोडीफार शिस्त निवडक संघांमध्ये होती, ती ही कुठे दिसेनाशी झाली. आजकाल दिसणारं विद्रुपिकरण तुमच्या कवितेत पुरेपुर उतरले आहे.