"देव आहे की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही.
हे जग "देव आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "देव नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे...
जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते. हे दोन सरळसोट स्पष्ट गट नसून काळा आणि पांढरा या रंगांच्यामध्ये असलेल्या असंख्य करड्या रंगाच्या वर्णपटाप्रमाणेच आस्तिक-नास्तिकतेचा वर्णपट (स्पेक्ट्रम) समाजात असतो असेच दिसते. खरे किंवा प्रामाणिक आस्तिक आणि खरे किंवा प्रामाणिक नास्तिक ही त्या वर्णपटाची केवळ दोन टोके आहेत.
चला तर मग ही टोके आणि त्यांमधील वर्णपटाचे केलेले ढोबळ गट पाहूया...
प्रामाणिक आस्तिक
१. या लोकांचा देव आहे या "संकल्पनेवर" दृढ आणि "प्रामाणिक" "विश्वास" असतो. २. त्यांचा हा विश्वास लहानमोठ्या स्वार्थासाठी नसतो अथवा असाहाय्यतेने किंवा सोयीचा म्हणून घेतलेला पवित्रा नसतो. ३. त्यांचा हा विश्वास त्यांच्यावर वाढत्या वयात झालेल्या कौटुंबिक अथवा सामाजिक परिस्थितीचा परिणाम असू शकतो. चालू असलेल्या संशोधनांत या विश्वासामागे त्या व्यक्तींच्या मेंदूची जडणघडण कारणीभूत असल्याचे शास्त्रीय पुरावे मिळत आहेत. ४. हे लोक: (अ) "माझा विश्वास आहे (I believe)" असे म्हणून डोळे मिटून धर्माने सांगितलेले आचरण करतात आणि / किंवा (आ) परम ज्ञानाच्या उपासनेच्या मार्गाने ज्ञानी होण्याचा प्रयत्न करतात आणि / किंवा (इ) पूजाअर्चा, नामस्मरण, कर्मकांडे इ मार्गांनी देव शोधण्याचा प्रयत्न करतात आणि / किंवा (ई) धर्माच्या मार्गाने ज्ञानी झालो की मुक्ती मिळून परमात्म्यात विलीन होणार असा विश्वास ठेवतात. म्हणजे एकूण या जगात असेपर्यंत आपण अज्ञानीच राहणार हेच एका अर्थाने कबूल करतात. ५. हे लोक देव ही "पुराव्याने सिद्ध झालेली गोष्ट" नसून "ज्यावर विश्वास आहे अशी गोष्ट" आहे असे कबूल करून आणि त्या देवावर बेतलेल्या धर्माला "विश्वास (belief)" असे संबोधून अवधानाने किंवा अनवधानाने "देव म्हणजे नक्की काय?" हे माहीत नाही असेच कबूल करतात. ६. शास्त्रात एक फार महत्त्वाचा दंडक आहे, तो म्हणजे : "एकाच गोष्टीला सिद्ध करण्यासाठी अनेक मान्य (सर्वमान्य नव्हे) सिद्धांत असणे हे ती गोष्ट नक्की कोणालाच माहीत नसल्याचे निदर्शक असते." म्हणजेच त्याबाबतीत आपल्याला कामचलाऊ ज्ञान असले तरी खर्या दृष्टीने आपण अज्ञानीच असतो. देव आणि धर्म ह्या दोन्हीहीबद्दलचे वैविध्यपूर्ण सिद्धांत या नियमात चपखल बसतात आणि मानव जात "देव" या संकल्पनेबद्दल अजूनही अज्ञानी आहे हेच सिद्ध करतात. ७. प्रामाणिक आस्तिक लोकांची संख्या किती हे सांगणं कठीण आहे... पण खूप कमी असते हे नक्की. थोडक्यात : प्रामाणिक आस्तिक लोक "अल्पसंख्य", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात.प्रामाणिक नास्तिक
या गटातिल लोकांचे गुणधर्म खालिलप्रमाणे असतातः १. या लोकांचा देव आहे या "संकल्पनेवर" दृढ आणि "खरोखरच प्रामाणिक" "अविश्वास" असतो. २. त्यांचा हा अविश्वास लहानमोठ्या स्वार्थासाठी अथवा असाहाय्यतेने अथवा सोयीचा म्हणून घेतलेला पवित्रा नसतो. ३. त्यांचा हा अविश्वास त्यांच्यावर वाढत्या वयात झालेला कौटुंबिक अथवा सामाजिक परिस्थितीचा परिणाम असू शकतो. चालू असलेल्या संशोधनांत या अविश्वासामागे त्या व्यक्तींच्या मेंदूची जडणघडण कारणीभूत असल्याचे शास्त्रीय पुरावे मिळत आहेत. ४. हे लोक: (अ) "माझा अविश्वास आहे (I do not believe)" असे म्हणत आस्तिक लोकांच्या म्हणण्याचे खंडन करत असतात. (आ) "देव आहे याचा शास्त्रीय पुरावा नाही" इतकेच त्यांना आपले म्हणणे खरे आहे हे म्हणण्यासाठी पुरेसे वाटते. त्यांचे म्हणणे शास्त्रीय आहे असे म्हणत असतानाच ते म्हणणे शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करायला "देव नाही याचा शास्त्रीय पुरावा" सुद्धा जरूर आहे हा शास्त्रीय नियम ते सहजपणे विसरतात. आस्तिकांनी देवाच्या नावाने दिलेल्या आणि शास्त्रीय पद्धतीने उकल न होऊ शकणार्या सर्व गोष्टींना ते "अंधश्रद्धा" किंवा "याची भविष्यात शास्त्रीय कारणे मिळतील" असे म्हणून झटकून टाकतात. म्हणजे एकूण आपण देवाच्या बाबतीत पूर्णणे ज्ञानी नसल्याचे (पर्यायाने अज्ञानी असल्याचे) कबूल करतात. ५. हे लोक देव ही "पुराव्याने सिद्ध न झालेली गोष्ट" नसून "ज्यावर विश्वास नाही अशी गोष्ट" आहे असे कबूल करून आणि ते स्वत:ला "विश्वास नसणारे (non-believers)" असे संबोधून अवधानाने किंवा अनवधानाने "देव नाही हे नक्की माहीत नाही" असेच कबूल करतात. ६. प्रामाणिक आस्तिक लोकांची संख्या किती हे सांगणं कठीण आहे... पण खूप कमी असते हे नक्की. थोडक्यात : प्रामाणिक नास्तिक लोक "अल्पसंख्य", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात. आतापर्यंत आपण पाहिलेला वर्णपट आणि त्याची दोन टोके खालच्या आकृतीत दाखवली आहेत...
आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०१
धूर्त आस्तिक
या लोकांचे वर्णपटातले स्थान आस्तिक लोकांच्या टोकाजवळ असते. त्यांचे मूळ गुणधर्म असे: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. परंतू देव या संकल्पनेचा पाठपुरावा करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात. तसे करण्यामुळे त्यांना होणारा फायदा खालील एक किंवा अनेक प्रकारचा असू शकतो: (अ) चरितार्थ चालणे (आ) आर्थिक फायदा (इ) सामाजिक फायदा (ई) राजकीय फायदा, इ. आणि हे हितसंबद्ध त्यांच्यासाठी सर्वोच्च असतात, देवाची भलावण हे केवळ एक साधन असते. ३. या लोकांमध्ये, देव ही संकल्पना (अगदी देवा-धर्माशी संबंध नसलेलाही) स्वार्थ साधण्याचे फार प्रभावी साधन म्हणून वापरण्याची विलक्षण हातोटी असते. मग तसे करताना 'देव', 'धर्म' आणि 'त्या देवा-धर्माची तत्त्वे' यांना चलाखीने हरताळ फासणे आणि वर त्या कृतीचे चलाखीने समर्थन करणे या गोष्टी हे लोक मोठ्या चलाखिने करतात... शिवाय तसे करताना भल्याबुर्या मार्गांचा अवलंब करून लोकमताचा पाठिंबा मिळविण्याचे कसब या लोकांत असते. ४. धर्मा-धर्मातल्या फरकांचाच नव्हे तर एकाच धर्मातल्या विविधतेचा फायदा हे लोक मोठ्या चलाखीने घेताना दिसतात... उदा. हल्लीच्या काळात शिवमंदिर बांधण्या ऐवजी साईबाबा मंदिर अथवा बालाजी मंदिर बांधणे हा जास्त फायदेशीर व्यवहार आहे हे त्यांना बरोबर कळते. ५. त्यांच्या वर नमूद केलेल्या गुणधर्मांमुळे, अर्थातच, हे लोक आर्थिक सुस्थितीत आणि सामाजिक व राजकीय सत्ताकेंद्रात अथवा सत्ताकेंद्राजवळ असल्यास आश्चर्य नाही. ६. यांची लोकसंख्या प्रामाणिक आस्तिकांपेक्षा जास्त असली तरी ती तितकीशी मोठीही असू शकत नाही... कारण त्यांचे इतके सगळे गुणधर्म एका व्यक्तित असणे तितकेसे सामान्य नसते ! थोडक्यात : धूर्त आस्तिक लोक "अल्पसंख्य नसलेले पण बहुसंख्यही नसलेले", "धूर्त " आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात.धूर्त नास्तिक
या लोकांचे वर्णपटातले स्थान नास्तिक लोकांच्या टोकाजवळ असते. त्यांचे मूळ गुणधर्म असे: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. परंतू देव या संकल्पनेचा विरोध करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात. तसे करण्यामुळे त्यांना होणारा फायदा खालील एक किंवा अनेक प्रकारचा असू शकतो: (अ) चरितार्थ चालणे (आ) आर्थिक फायदा (इ) सामाजिक फायदा (ई) राजकीय फायदा, (उ) देव-धर्माचा बदला घेतल्याचे वैयक्तिक समाधान इ. आणि हे हितसंबद्ध त्यांच्यासाठी सर्वोच्च असतात, देवाचा विरोध हे केवळ एक साधन असते. यातल्या शेवटच्या प्रकारात; देवाची खूप विनवणी करूनही झालेल्या प्रेमभंगामुळे आलेला देवाचा तिटकारा, प्रेम असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न न होऊ शकल्याने आलेला त्या व्यक्तीच्या देवा-धर्माचा तिटकारा, इ अनेक उपप्रकार असू शकतात... यातल्या काही केसेस तात्कालीक असतात व बसलेल्या धक्क्यातून सावरल्यावर काही कालाने सुधारतात तर इतर काही कायम स्वरूपी असू शकतात. ३. या लोकांमध्ये, देव या संकल्पनेला विरोध करणे हे (अगदी देवा-धर्माशी संबंध नसलेलाही) स्वार्थ साधण्याचे फार प्रभावी साधन म्हणून वापरण्याची विलक्षण हातोटी असते. मग तसे करताना असंबद्ध / अतार्किक / उपहासपूर्ण वाद घालणे यात यांचा हातखंडा असतो. मुद्दा उलटवल्यावर तो भरकटवून भलतीकडे नेण्यात यांचा हात धरणे कठीण असते. कारण आपला मुद्दा जिंकणे हाच त्यांच्या लेखी मुख्य मुद्दा असतो... सत्य, सारासारविवेक वगैरे इतर सर्व गोष्टी त्यापुढे दुय्यम असतात. ४. धर्मा-धर्मातल्या फरकांचाच नव्हे तर हिंदू धर्मासारख्या एकाच धर्मातल्या विविधतेचा फायदा हे लोक मोठ्या चलाखीने घेताना दिसतात... एखाद्या धर्मातील उणीव (सर्व धर्मात असे काही ना काही असतेच) हेरून त्याचा फायदा घेण्यात हे लोक पटाईत असतात. मात्र असे करताना सोईस्कर नसणार्या वस्तुस्थितीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात यांचा हातखंडा असतो. ५. अर्थातच, हे लोक सामाजिक आणि राजकीय सत्ताकेंद्रात अथवा सत्ताकेंद्राजवळ असल्यास आश्चर्य नाही... किंबहुना आर्थिक फायदा, पदभार, मानसन्मान यांची खैरात करत अश्या प्रकारच्या तथाकथित विचारवंतांची फौज पदरी बाळगणे ही सत्ताकेंद्रांची एक महत्त्वपूर्ण गरज असते. ६. यांची लोकसंख्या प्रामाणिक नास्तिकांपेक्षा जास्त असली तरी ती तितकीशी मोठीही असू शकत नाही... कारण त्यांचे इतके सगळे गुणधर्म एका व्यक्तित असणे तितकेसे सामान्य नसते ! थोडक्यात : धूर्त नास्तिक लोक "अल्पसंख्य नसलेले पण बहुसंख्यही नसलेले", "धूर्त " आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात. आतापर्यंत आपण पाहिलेले गट सामील करून तयार झालेला वर्णपट खालच्या आकृतीत दाखवला आहे...
आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०२
धोका प्रबंधक
उरलेल्या बहुसंख्य लोकसमूहातील बहुतेक लोक "धोका प्रबंधक" या वर्गवारीत मोडतात. हे का ? याचे उत्तर त्यांच्या खालील गुणधर्मात सापडेल. १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना ठाऊक असते किंवा कमीत कमी देव या संकल्पनेबद्दल त्यांच्या मनात खात्री नसते. २. परंतू त्याचबरोबर हे सत्य उघडपणे मानणे सामाजिक अथवा राजकीय दृष्टीने फायद्याचे / सोयीचे नाही हे त्यांना पुरेपूर ठाऊक असते. त्याशिवाय आपले मत उघडपणे व्यक्त करण्यामुळे होणारे दुष्परिणाम भोगण्याची त्यांची तयारी नसते. ३. वरच्या १ व २ मधील वस्तुस्थितीमुळे हे लोक "त्यांच्या आजूबाजूच्या सर्वसाधारण सामाजिक-राजकीय प्रवाहाबरोबर वाहणे" हा कमीत कमी धोकादायक पर्याय स्वीकारतात. असे लोक कडक कम्युनिस्ट राजवटीत निधर्मी असल्यासारखे तर कडक धार्मिक राजवटीत कर्मठ धार्मिक असल्यासारखे "वागतात". ४. अर्थातच हे लोक सत्ताकेंद्रातले नसून त्यांच्या धार्मिक-सामाजिक-राजकीय सत्ताकेंद्राने ठरवलेल्या नियमांचे पालन करणारी आणि आपले नेहमीचे जीवन शक्य तेवढे निर्धोक ठेवण्याच्या प्रयत्नात असलेली सामान्य जनता असते. ५. जर देव खरोखरच असला तर आपलाही दंडवत त्याच्या नावे असावा, झाला तर फायदाच होईल असाही एक व्यावहारीक धार्मिक विचार यांच्या मनात असतो... हे सुद्धा त्यांचे एक प्रकारचे धोका प्रबंधनच असते ! ६. वरच्या सर्व वस्तुस्थितीमुळे आपले मत अथवा चेहरा नसलेल्या या बहुसंख्य अगतिक गटाला "धोका प्रबंधक" हेच नाव योग्य आहे. थोडक्यात : धोका प्रबंधक लोक "बहुसंख्य", "परिस्थितीशी जुळवून घेण्यात चलाख" आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात. आतापर्यंत आपला वर्णपट खालच्या आकृतीत दाखवला आहे तसा झाला आहे...
आस्तिक-नास्तिक वर्णपट : ३
अज्ञेयवादी
आपल्या या वर्णपटात बरोबर मध्यभागी बसणार्या या गटाचे गुणधर्म खालीलप्रमाणे असतात: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. आपले हे अज्ञान उघडपणे व्यक्त करायला या लोकांना भिती अथवा लाज वाटत नाही आणि त्यामुळे होऊ शकणार्या धोक्याला सामोरे जाण्याची त्यांची तयारी असते. ३. "देव आहे" आणि "देव नाही" या दोन्ही दाव्यांबद्दलचे आपले अज्ञान उघडपणे मान्य करण्याबरोबरच आस्तिक आणि नास्तिक या दोन्हीं गटांचे दावे शास्त्रिय कसोटीवर जोखून त्यातले योग्य ते सत्य / अर्धसत्य "आहे तसे" स्वीकारण्याची त्यांची तयारी असते. त्याचबरोबर भविष्यात मिळणारे नवीन सबळ पुरावे स्वीकारून आपले मत त्याप्रमाणे बदलत राहणे त्यांना गैरसोयीचे अथवा मानहानीचे वाटत नाही. ४. सत्य आणि शास्त्र यांच्यावर श्रद्धा असणारे हे लोक शात्रज्ञ म्हणून यशस्वी होत असले तरी त्याच कारणामुळे राजकारणाशी त्यांचे जमणे कठीण असते. त्यामुळे कर्मठ नास्तिक (उदा. कम्युनिस्ट), धूर्त आस्तिक, धूर्त नास्तिक, मिथ्या-धर्मनिरपेक्ष किंवा कर्मठ धार्मिक प्रकारच्या राजसत्तांशी त्यांचा संघर्ष होऊ शकतो. ५. "देव या संकल्पनेबद्दल मला सत्य माहीत नाही... मी अज्ञानी आहे" हे सत्य उघडपणे मानत असल्याने यांना अज्ञेयवादी (agnostic) म्हटले जाते. ६. अर्थातच अश्या गुणधर्मांचे लोक समाजात फारच थोड्या संख्येने असणे आश्चर्यकारक नाही. थोडक्यात : अज्ञेयवादी लोक "अल्पसंख्य", "आपल्या मतांसाठी परिस्थितीशी टक्कर देण्यासाठी तयार असणारे", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात आणि तसे उघडपणे कबूल करतात. या गटाबरोबरच आपला वर्णपट पुरा होतो. पूर्ण वर्णपट खालच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसतो:
आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०४
सारांश
हे वरचे विश्लेषण खालील तक्त्यात सारांशाने दाखवले आहे.
आस्तिक-नास्तिक वर्णपट : गुणधर्म सारांश
वाचने
68351
प्रतिक्रिया
220
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला... बाकी नंतर! =))
छान वर्गवारी आहे. पहील्या
हम्म्म! पास.
पास!
In reply to हम्म्म! पास. by प्यारे१
सर्वांनाच सोयीची कल्पना
प्रामाणिक नास्तिक मधल्या चुका
जर हे विश्लेषण १००% जनतेसाठी
देव आहे असे शास्त्रिय
In reply to जर हे विश्लेषण १००% जनतेसाठी by भृशुंडी
देव आहे असे शास्त्रिय
In reply to देव आहे असे शास्त्रिय by डॉ सुहास म्हात्रे
तुमचे म्हणणे थोडक्यात असे आहे
In reply to देव आहे असे शास्त्रिय by भृशुंडी
@देव आहे असे शास्त्रिय
In reply to देव आहे असे शास्त्रिय by डॉ सुहास म्हात्रे
हे घ्या. कुर्ट गोडेल नामक
In reply to देव आहे असे शास्त्रिय by डॉ सुहास म्हात्रे
हेच सांगायला आलो होतो .
In reply to हे घ्या. कुर्ट गोडेल नामक by बॅटमॅन
बरं झालं तुम्ही हे उघड केलंत
In reply to हे घ्या. कुर्ट गोडेल नामक by बॅटमॅन
शितावरुन भाताची परिक्षा?
देव नको पण मोबाईल आवर..
In reply to शितावरुन भाताची परिक्षा? by आयुर्हित
@आस्तिक म्हणजे सिम असलेले
In reply to शितावरुन भाताची परिक्षा? by आयुर्हित
>>> एक्काकाकांच्या या
In reply to @आस्तिक म्हणजे सिम असलेले by अत्रुप्त आत्मा
@गाजराची पुंगी, वाजली तर
In reply to >>> एक्काकाकांच्या या by प्यारे१
@आदूबाळ
In reply to >>> एक्काकाकांच्या या by प्यारे१
आस्तिक म्हणजे सिम असलेले
In reply to शितावरुन भाताची परिक्षा? by आयुर्हित
आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट.मोबाईल शास्त्रिय तत्वांवर चालतो हे माहीत होते पण आस्तिक आणि नास्तिक हे मोबाईल तत्वांवर चालतात हे माहित नव्हते =))आस्तिक म्हणजे सिम असलेले
In reply to शितावरुन भाताची परिक्षा? by आयुर्हित
आस्तिक म्हणजे सिम असलेले
In reply to शितावरुन भाताची परिक्षा? by आयुर्हित
+१
In reply to आस्तिक म्हणजे सिम असलेले by धन्या
प्रामाणिक नास्तिक मधल्या चुका
प्रामाणिक नास्तिक मधल्या चुका...प्रामाणिक नास्तिक जर शास्त्रिय विचार करत नाहीत. ते कसे याचे उत्तर "प्रामाणिक नास्तिक" या विभागातील मुद्दा क्रमांक ४ आणि ५ मध्ये आहे. आजवर "देव आहे" आणि "देव नाही" या दोन्ही गोष्टींना शास्त्रिय प्रमाण मिळालेले नाही आणि देव असणे ही विश्वास ठेवण्याची गोष्ट समजली जाते. म्हणजे प्रामाणिक आस्तिक आणि प्रामाणिक नास्तिक हे दोन्ही प्रामाणिक असले तरी त्यां दोघांचेही मत केवळ वैयक्तीक विश्वासावर आधारलेले असते... शास्त्रिय पुराव्यांवर नाही. देवाबाबत आजपर्यंतची शास्त्रिय समज म्हणजे "अज्ञान आहे याचे ज्ञान" आणि "देव या संकल्पनेच्या बाजूच्या आणि विरोधी सर्व प्रकारच्या पुराव्यांचा पूर्वग्रह न बाळगता शास्त्रिय विचार करण्याची तयारी ठेवणे" इतकीच आहे. यावरून "देव नाही" असे प्रामाणिक मत असलेल्या नास्तिकाला प्रामाणिक म्हणता येते पण त्याच्या मताला शास्त्रिय म्हणता येत नाही. नास्तिक जर शास्त्रिय पद्धतिने विचार करू लागला तर त्याचा "देव नाही" हा आग्रह थांबेल आणि त्याची गणना आपोआपच अज्ञेयवादी म्हणुन होईल.हा प्रतिसाद @ अत्रुप्त आत्मा
In reply to प्रामाणिक नास्तिक मधल्या चुका by डॉ सुहास म्हात्रे
http://misalpav.com/comment
In reply to हा प्रतिसाद @ अत्रुप्त आत्मा by डॉ सुहास म्हात्रे
मला वाटते आहे की तुम्ही
In reply to http://misalpav.com/comment by अत्रुप्त आत्मा
इंटरेस्टींग लेखन आहे. थोडी
चर्चा विषय म्हणून मांडलेला असला तरी विवेचन विस्तृत आहे
अस्तिक म्हणजे ..
एक नास्तिकी शंका
मूद्दयात राम आहे!
In reply to एक नास्तिकी शंका by हुप्प्या
नास्तिकाला नको ते प्रश्न नको
In reply to मूद्दयात राम आहे! by आयुर्हित
एक्का काकांना पण TRP ची भुल
हे आले प्रामाणिक आस्तिक.
In reply to एक्का काकांना पण TRP ची भुल by स्पा
अगदी अगदी...
In reply to हे आले प्रामाणिक आस्तिक. by प्रचेतस
धन्यवाद :-)
In reply to हे आले प्रामाणिक आस्तिक. by प्रचेतस
हेच म्हणतो...
In reply to हे आले प्रामाणिक आस्तिक. by प्रचेतस
कैच्या कै
In reply to हेच म्हणतो... by धन्या
रिकाम्चोत नविन शब्द
In reply to कैच्या कै by स्पा
तु प्रामाणिक आस्तिक काय रे?
In reply to हेच म्हणतो... by धन्या
तो 'विवेकवादी' ह्या वेगळ्याच
In reply to तु प्रामाणिक आस्तिक काय रे? by मृत्युन्जय
अच्छा तो विवेकानंदांवर वाद
In reply to तो 'विवेकवादी' ह्या वेगळ्याच by प्रचेतस
सध्या आम्ही नुसतेच वादी आहोत.
In reply to अच्छा तो विवेकानंदांवर वाद by मृत्युन्जय
धन्या
In reply to सध्या आम्ही नुसतेच वादी आहोत. by धन्या
हद हद जाए हर कोई, अनहद जाए ना कोय , हद अनहद के बीच में रहा कबीरा सोय.
लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई
In reply to सध्या आम्ही नुसतेच वादी आहोत. by धन्या
परवानगी दिली. :)
In reply to लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई by सूड
वादीदादा, मलापण द्या ना
In reply to परवानगी दिली. :) by धन्या
ढापा :)
In reply to वादीदादा, मलापण द्या ना by यशोधरा
फुकटात हवेय! :D
In reply to ढापा :) by धन्या
मुळात आधी त्यांना स्वतालाच
In reply to तु प्रामाणिक आस्तिक काय रे? by मृत्युन्जय
हेच का ते चडफडणे? =))
In reply to मुळात आधी त्यांना स्वतालाच by स्पा
एक भोळा प्रश्न : स्पावड्या
In reply to हेच का ते चडफडणे? =)) by प्रचेतस
ते वरच सांगितले ना. स्पा हे
In reply to एक भोळा प्रश्न : स्पावड्या by प्रसाद गोडबोले
हो हो...
In reply to हेच का ते चडफडणे? =)) by प्रचेतस
होय, हेच ते चडफडणे
In reply to हेच का ते चडफडणे? =)) by प्रचेतस
अरेरे यह कॉन्वर्सेशन तर
In reply to होय, हेच ते चडफडणे by स्पा
नै शिरेस काही नाही ओ यात :)
In reply to अरेरे यह कॉन्वर्सेशन तर by मृत्युन्जय
आणि ह्याची जळली , त्याची जळली
In reply to होय, हेच ते चडफडणे by स्पा
भलतेच 'पोचलेले' आहात हो धनाजी
In reply to आणि ह्याची जळली , त्याची जळली by धन्या
तुमच्या मनात कोणती दिशा आहे
In reply to भलतेच 'पोचलेले' आहात हो धनाजी by हाडक्या
आपल्या त्या प्रतिक्रियेशी
In reply to तुमच्या मनात कोणती दिशा आहे by धन्या
आता या गोष्टींची वर्तुळे
In reply to आपल्या त्या प्रतिक्रियेशी by हाडक्या
>>> मानवी स्वभाव.
In reply to आता या गोष्टींची वर्तुळे by धन्या
तुमचे म्हणणे अंशतः बरोबर आहे.
In reply to >>> मानवी स्वभाव. by प्यारे१
वर्तुळे तर होणारच. प्रिथ्वीच
In reply to आपल्या त्या प्रतिक्रियेशी by हाडक्या
* गोष्टींची
In reply to वर्तुळे तर होणारच. प्रिथ्वीच by यशोधरा
ह्म्म.. मग आता
In reply to * गोष्टींची by यशोधरा
=))
In reply to हेच का ते चडफडणे? =)) by प्रचेतस
मूळ कवी अर्थातच अआ.
In reply to =)) by बॅटमॅन
आणखी एक गट ?
तुम्हाला देवाबद्दल उघड आकर्षण
In reply to आणखी एक गट ? by चित्रगुप्त
माझे १८९६ मधे जन्मलेले वडीलही
In reply to आणखी एक गट ? by चित्रगुप्त
माझे वय
In reply to माझे १८९६ मधे जन्मलेले वडीलही by प्रसाद१९७१
अज्ञानवादी
In reply to आणखी एक गट ? by चित्रगुप्त
त्यातही 'वादी' कशाला?
In reply to अज्ञानवादी by तिमा
हुम्म्म
लेख वाचण्याआधी एक जोक सांगते;
दिल्लीतल्या सरकारी
वर्गीकरण पटत नाही.
१. कम्युनिस्ट
In reply to वर्गीकरण पटत नाही. by बाळ सप्रे
कै च्या कै
In reply to १. कम्युनिस्ट by डॉ सुहास म्हात्रे
विश्लेषणाचा प्रयत्न चांगला
+MH-05-73
In reply to विश्लेषणाचा प्रयत्न चांगला by आतिवास
म्हणुन तर हा वर्णपट आहे...
In reply to विश्लेषणाचा प्रयत्न चांगला by आतिवास
झालं रतीब मिळाला आता या
झालं रतीब मिळाला आता या धाग्याचं येळ्ळुर होणार.
मी कदाचित प्रामाणिक आस्तिक
वर्णपटातले प्रत्येकाचे स्थान
In reply to मी कदाचित प्रामाणिक आस्तिक by मृत्युन्जय
मस्त प्रतिसाद. आवडला :)
In reply to मी कदाचित प्रामाणिक आस्तिक by मृत्युन्जय
एका सुताराचा मुलगा त्याला
In reply to मी कदाचित प्रामाणिक आस्तिक by मृत्युन्जय
धन्या
In reply to एका सुताराचा मुलगा त्याला by धन्या
Rx
http://en.wikipedia.org/wiki/Nasadiya_Sukta#Nasadiya_Sukta_with_English… :डजबर्या
In reply to धन्या by प्रसाद गोडबोले
अवांतर
In reply to जबर्या by बॅटमॅन
:)
In reply to धन्या by प्रसाद गोडबोले
यग्झॅक्टली. हा विरोधाभास आहे
In reply to एका सुताराचा मुलगा त्याला by धन्या
आपल्या मताचा आदर आहे. :)
In reply to यग्झॅक्टली. हा विरोधाभास आहे by मृत्युन्जय
अगदी समजा ही सृष्टी देवाने
In reply to एका सुताराचा मुलगा त्याला by धन्या
नुसतेच समजण्याने काहीच होणार
In reply to अगदी समजा ही सृष्टी देवाने by बाळ सप्रे
भोळसटपणा
In reply to एका सुताराचा मुलगा त्याला by धन्या
अगदी अगदी.
In reply to भोळसटपणा by हुप्प्या
पण मी तर असे पण ऐकले होते की
In reply to अगदी अगदी. by धन्या
हा "survival of the fittest"
In reply to पण मी तर असे पण ऐकले होते की by मृत्युन्जय
विज्ञानवादी काहीही म्हणू दयात
In reply to पण मी तर असे पण ऐकले होते की by मृत्युन्जय
कदाचित ती शक्तीही तो बॅलॅन्स
In reply to विज्ञानवादी काहीही म्हणू दयात by धन्या
या व्यतिरिक्त काही विचार
In reply to कदाचित ती शक्तीही तो बॅलॅन्स by मृत्युन्जय
या व्यतिरिक्त काही विचार करणारी देव नावाची शक्ती असु शकत नाही का?हे नक्की काय आहे हे समजावून घ्यायला आवडेल.अशी कुणी बॅलन्स साधणारी शक्ती
In reply to या व्यतिरिक्त काही विचार by डॉ सुहास म्हात्रे
हा अर्थ काढण्यापुर्वी देव आहे
In reply to अशी कुणी बॅलन्स साधणारी शक्ती by धन्या
तुझी जी काय मते आहेत त्या
In reply to हा अर्थ काढण्यापुर्वी देव आहे by मृत्युन्जय
वोक्के. फुलस्टॉप.
In reply to तुझी जी काय मते आहेत त्या by धन्या
आज? नाग पंचमीची सुट्टी नाही
In reply to वोक्के. फुलस्टॉप. by मृत्युन्जय
काय घेतलेस मेहतामध्ये?
In reply to वोक्के. फुलस्टॉप. by मृत्युन्जय
देव नावाची जी काय शक्ती आहे
In reply to या व्यतिरिक्त काही विचार by डॉ सुहास म्हात्रे
झक्कास!
मुख्य कॅटेगरीज शिवाय अधले
In reply to झक्कास! by पैसा
मुख्य कॅटेगरीज शिवाय अधले मधले बरेच प्रकार असतात शिवाय चंचल मते असणारे काही असतात.म्हणून तर वर्णपटाची गरज भासते... त्यातले बिंदू / गट केवळ ढोबळ स्थलनिदर्शक (प्लेसहोल्डर्स) असतात... जनता सर्व वर्णपटभर पसरलेली असते.सगळेच लोक 'अज्ञानी' आहेत होय?
मग!
In reply to सगळेच लोक 'अज्ञानी' आहेत होय? by कवितानागेश
असं बघा,
In reply to सगळेच लोक 'अज्ञानी' आहेत होय? by कवितानागेश
सोप्पय
In reply to असं बघा, by डॉ सुहास म्हात्रे
ठ्ठो =))
In reply to सोप्पय by प्रसाद गोडबोले
>>उत्तर खुपच सोप्पय ....
In reply to सोप्पय by प्रसाद गोडबोले
हु च्च!
In reply to सोप्पय by प्रसाद गोडबोले
देव आहे की नाही ?
एक गंभीर प्रश्न. (मलाच हसू
In reply to देव आहे की नाही ? by प्रसाद गोडबोले
हीच ती
In reply to एक गंभीर प्रश्न. (मलाच हसू by प्यारे१
>>ह्या विषयावर नुकतीच कबड्डी
In reply to हीच ती by प्रसाद गोडबोले
लेझीमच.
In reply to >>ह्या विषयावर नुकतीच कबड्डी by सूड
अरे देवा !! :D
मस्त वाद आणि विवाद..
ठार नास्तिकांना कंच्या
यग्दम उजव्या टॉकाला.
In reply to ठार नास्तिकांना कंच्या by प्रकाश घाटपांडे
समदी कड उलि उलि!
In reply to यग्दम उजव्या टॉकाला. by धन्या
बाकी अनऑफिशियली बेंचवरच्या
काही सिरियस लिहावे, आणि खोचक
In reply to बाकी अनऑफिशियली बेंचवरच्या by प्यारे१
"काही सिरियस लिहावे, आणि खोचक
In reply to काही सिरियस लिहावे, आणि खोचक by डॉ सुहास म्हात्रे
काही सिरियस लिहावे, आणि खोचक
In reply to "काही सिरियस लिहावे, आणि खोचक by डॉ सुहास म्हात्रे
>>> राम
In reply to काही सिरियस लिहावे, आणि खोचक by डॉ सुहास म्हात्रे
अभिनंदन..!
१०१...!!!
मंत्रजपावर माझा एक पण
हो हो, मानाच्या गणपतीत वर्दी
In reply to मंत्रजपावर माझा एक पण by लॉरी टांगटूंगकर
अगदी अगदी.. या साठीच आमची पन
In reply to हो हो, मानाच्या गणपतीत वर्दी by सूड
मी पण तेवढ्यासाठीच!
In reply to हो हो, मानाच्या गणपतीत वर्दी by सूड
:ड गणपतीत नसलो तरी मिरवणूकीत
In reply to हो हो, मानाच्या गणपतीत वर्दी by सूड
स्मायला मेल्या आहेत राव..
In reply to :ड गणपतीत नसलो तरी मिरवणूकीत by लॉरी टांगटूंगकर
मस्त विश्लेषण!
ज्यांना देव असण्याची गरज आहे
माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती
In reply to ज्यांना देव असण्याची गरज आहे by अधिराज
सौजन्यः तु-नळी.
In reply to माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती by धन्या
माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती
In reply to ज्यांना देव असण्याची गरज आहे by अधिराज
माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे.हे नेहमी ऐकायला मिळते. त्यावेळेला माझ्या अल्पमतीला काही प्रश्न पडतात : जर, कोण्या एका सर्वोच्च शक्तीने हे सर्व जग निर्माण केले आहे, तिचे आपल्यावर संपुर्ण नियंत्रण आहे, तिच्या इच्छेशिवाय पृथ्वीवरच्या झाडाचे पानही हलू शकत नाही, ती सर्व जीवांना त्यांच्या कुकर्माचे फळ म्हणून शिक्षा देते; तर मगः १. सर्व बरे-वाईट सर्वोच्च शक्तीने निर्माण केले आणि त्या गोष्टी सर्वोच्च शक्तीच्या मनाविरुद्ध काहीही करू शकत नाहीत, असे असताना वाईटपणाचा दोष आणि त्याबद्दलची शिक्षा तोच निर्माता वस्तूंना का देतो? असे करणे म्हणजे एखादी वस्तू दोषपूर्ण (defective product) बनविली गेली तर ती वस्तू तयार करणार्या कंपनीला (manufacturer) दोष देण्याऐवजी त्या वस्तूलाच शिक्षा देणे होत नाही का? आपला मोबाईल बिघडला तर आपण तो मोबाईल बनवणार्या कंपनीला दोष देतो, मोबाईलला शिक्षा देत नाही... किंबहुना मोबाईलवर राग काढून त्याची आदळआपट करण्याला असंगत, तर्कविरुद्ध, न्यायविरुद्ध कृती म्हणतो, नाही का ? २. वाईटपणाची सर्वोच्च शक्तीला चीड आहे आणि त्यांबद्दल ती शक्ती शिक्षाही देते. मग अश्या सर्वोच्च शक्तीने जगात दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट माणसे, वाईटपणा हे सर्व का निर्माण केले ? फक्त आपल्याला आवडणार्या सुष्ट प्रवृत्ती, चांगली माणसे, चांगल्या गोष्टी निर्माण करणे सर्वोच्च शक्तीला सहज शक्य असायला हवे होते. मग तसे का केले नाही ? माझे वरचे प्रश्न केवळ प्रतिवाद म्हणून केलेले नाहीत. ते अत्यंत प्रामाणिक आहेत आणि मी त्यांची उत्तरे शोधत आहे.