तुम्ही कोण म्हणून काय पुसता ?... तुम्ही असा... आस्तिक?... नास्तिक? ...???
प्रामाणिक आस्तिक
१. या लोकांचा देव आहे या "संकल्पनेवर" दृढ आणि "प्रामाणिक" "विश्वास" असतो. २. त्यांचा हा विश्वास लहानमोठ्या स्वार्थासाठी नसतो अथवा असाहाय्यतेने किंवा सोयीचा म्हणून घेतलेला पवित्रा नसतो. ३. त्यांचा हा विश्वास त्यांच्यावर वाढत्या वयात झालेल्या कौटुंबिक अथवा सामाजिक परिस्थितीचा परिणाम असू शकतो. चालू असलेल्या संशोधनांत या विश्वासामागे त्या व्यक्तींच्या मेंदूची जडणघडण कारणीभूत असल्याचे शास्त्रीय पुरावे मिळत आहेत. ४. हे लोक: (अ) "माझा विश्वास आहे (I believe)" असे म्हणून डोळे मिटून धर्माने सांगितलेले आचरण करतात आणि / किंवा (आ) परम ज्ञानाच्या उपासनेच्या मार्गाने ज्ञानी होण्याचा प्रयत्न करतात आणि / किंवा (इ) पूजाअर्चा, नामस्मरण, कर्मकांडे इ मार्गांनी देव शोधण्याचा प्रयत्न करतात आणि / किंवा (ई) धर्माच्या मार्गाने ज्ञानी झालो की मुक्ती मिळून परमात्म्यात विलीन होणार असा विश्वास ठेवतात. म्हणजे एकूण या जगात असेपर्यंत आपण अज्ञानीच राहणार हेच एका अर्थाने कबूल करतात. ५. हे लोक देव ही "पुराव्याने सिद्ध झालेली गोष्ट" नसून "ज्यावर विश्वास आहे अशी गोष्ट" आहे असे कबूल करून आणि त्या देवावर बेतलेल्या धर्माला "विश्वास (belief)" असे संबोधून अवधानाने किंवा अनवधानाने "देव म्हणजे नक्की काय?" हे माहीत नाही असेच कबूल करतात. ६. शास्त्रात एक फार महत्त्वाचा दंडक आहे, तो म्हणजे : "एकाच गोष्टीला सिद्ध करण्यासाठी अनेक मान्य (सर्वमान्य नव्हे) सिद्धांत असणे हे ती गोष्ट नक्की कोणालाच माहीत नसल्याचे निदर्शक असते." म्हणजेच त्याबाबतीत आपल्याला कामचलाऊ ज्ञान असले तरी खर्या दृष्टीने आपण अज्ञानीच असतो. देव आणि धर्म ह्या दोन्हीहीबद्दलचे वैविध्यपूर्ण सिद्धांत या नियमात चपखल बसतात आणि मानव जात "देव" या संकल्पनेबद्दल अजूनही अज्ञानी आहे हेच सिद्ध करतात. ७. प्रामाणिक आस्तिक लोकांची संख्या किती हे सांगणं कठीण आहे... पण खूप कमी असते हे नक्की. थोडक्यात : प्रामाणिक आस्तिक लोक "अल्पसंख्य", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात.प्रामाणिक नास्तिक
या गटातिल लोकांचे गुणधर्म खालिलप्रमाणे असतातः १. या लोकांचा देव आहे या "संकल्पनेवर" दृढ आणि "खरोखरच प्रामाणिक" "अविश्वास" असतो. २. त्यांचा हा अविश्वास लहानमोठ्या स्वार्थासाठी अथवा असाहाय्यतेने अथवा सोयीचा म्हणून घेतलेला पवित्रा नसतो. ३. त्यांचा हा अविश्वास त्यांच्यावर वाढत्या वयात झालेला कौटुंबिक अथवा सामाजिक परिस्थितीचा परिणाम असू शकतो. चालू असलेल्या संशोधनांत या अविश्वासामागे त्या व्यक्तींच्या मेंदूची जडणघडण कारणीभूत असल्याचे शास्त्रीय पुरावे मिळत आहेत. ४. हे लोक: (अ) "माझा अविश्वास आहे (I do not believe)" असे म्हणत आस्तिक लोकांच्या म्हणण्याचे खंडन करत असतात. (आ) "देव आहे याचा शास्त्रीय पुरावा नाही" इतकेच त्यांना आपले म्हणणे खरे आहे हे म्हणण्यासाठी पुरेसे वाटते. त्यांचे म्हणणे शास्त्रीय आहे असे म्हणत असतानाच ते म्हणणे शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करायला "देव नाही याचा शास्त्रीय पुरावा" सुद्धा जरूर आहे हा शास्त्रीय नियम ते सहजपणे विसरतात. आस्तिकांनी देवाच्या नावाने दिलेल्या आणि शास्त्रीय पद्धतीने उकल न होऊ शकणार्या सर्व गोष्टींना ते "अंधश्रद्धा" किंवा "याची भविष्यात शास्त्रीय कारणे मिळतील" असे म्हणून झटकून टाकतात. म्हणजे एकूण आपण देवाच्या बाबतीत पूर्णणे ज्ञानी नसल्याचे (पर्यायाने अज्ञानी असल्याचे) कबूल करतात. ५. हे लोक देव ही "पुराव्याने सिद्ध न झालेली गोष्ट" नसून "ज्यावर विश्वास नाही अशी गोष्ट" आहे असे कबूल करून आणि ते स्वत:ला "विश्वास नसणारे (non-believers)" असे संबोधून अवधानाने किंवा अनवधानाने "देव नाही हे नक्की माहीत नाही" असेच कबूल करतात. ६. प्रामाणिक आस्तिक लोकांची संख्या किती हे सांगणं कठीण आहे... पण खूप कमी असते हे नक्की. थोडक्यात : प्रामाणिक नास्तिक लोक "अल्पसंख्य", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात. आतापर्यंत आपण पाहिलेला वर्णपट आणि त्याची दोन टोके खालच्या आकृतीत दाखवली आहेत...
आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०१
धूर्त आस्तिक
या लोकांचे वर्णपटातले स्थान आस्तिक लोकांच्या टोकाजवळ असते. त्यांचे मूळ गुणधर्म असे: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. परंतू देव या संकल्पनेचा पाठपुरावा करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात. तसे करण्यामुळे त्यांना होणारा फायदा खालील एक किंवा अनेक प्रकारचा असू शकतो: (अ) चरितार्थ चालणे (आ) आर्थिक फायदा (इ) सामाजिक फायदा (ई) राजकीय फायदा, इ. आणि हे हितसंबद्ध त्यांच्यासाठी सर्वोच्च असतात, देवाची भलावण हे केवळ एक साधन असते. ३. या लोकांमध्ये, देव ही संकल्पना (अगदी देवा-धर्माशी संबंध नसलेलाही) स्वार्थ साधण्याचे फार प्रभावी साधन म्हणून वापरण्याची विलक्षण हातोटी असते. मग तसे करताना 'देव', 'धर्म' आणि 'त्या देवा-धर्माची तत्त्वे' यांना चलाखीने हरताळ फासणे आणि वर त्या कृतीचे चलाखीने समर्थन करणे या गोष्टी हे लोक मोठ्या चलाखिने करतात... शिवाय तसे करताना भल्याबुर्या मार्गांचा अवलंब करून लोकमताचा पाठिंबा मिळविण्याचे कसब या लोकांत असते. ४. धर्मा-धर्मातल्या फरकांचाच नव्हे तर एकाच धर्मातल्या विविधतेचा फायदा हे लोक मोठ्या चलाखीने घेताना दिसतात... उदा. हल्लीच्या काळात शिवमंदिर बांधण्या ऐवजी साईबाबा मंदिर अथवा बालाजी मंदिर बांधणे हा जास्त फायदेशीर व्यवहार आहे हे त्यांना बरोबर कळते. ५. त्यांच्या वर नमूद केलेल्या गुणधर्मांमुळे, अर्थातच, हे लोक आर्थिक सुस्थितीत आणि सामाजिक व राजकीय सत्ताकेंद्रात अथवा सत्ताकेंद्राजवळ असल्यास आश्चर्य नाही. ६. यांची लोकसंख्या प्रामाणिक आस्तिकांपेक्षा जास्त असली तरी ती तितकीशी मोठीही असू शकत नाही... कारण त्यांचे इतके सगळे गुणधर्म एका व्यक्तित असणे तितकेसे सामान्य नसते ! थोडक्यात : धूर्त आस्तिक लोक "अल्पसंख्य नसलेले पण बहुसंख्यही नसलेले", "धूर्त " आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात.धूर्त नास्तिक
या लोकांचे वर्णपटातले स्थान नास्तिक लोकांच्या टोकाजवळ असते. त्यांचे मूळ गुणधर्म असे: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. परंतू देव या संकल्पनेचा विरोध करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात. तसे करण्यामुळे त्यांना होणारा फायदा खालील एक किंवा अनेक प्रकारचा असू शकतो: (अ) चरितार्थ चालणे (आ) आर्थिक फायदा (इ) सामाजिक फायदा (ई) राजकीय फायदा, (उ) देव-धर्माचा बदला घेतल्याचे वैयक्तिक समाधान इ. आणि हे हितसंबद्ध त्यांच्यासाठी सर्वोच्च असतात, देवाचा विरोध हे केवळ एक साधन असते. यातल्या शेवटच्या प्रकारात; देवाची खूप विनवणी करूनही झालेल्या प्रेमभंगामुळे आलेला देवाचा तिटकारा, प्रेम असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न न होऊ शकल्याने आलेला त्या व्यक्तीच्या देवा-धर्माचा तिटकारा, इ अनेक उपप्रकार असू शकतात... यातल्या काही केसेस तात्कालीक असतात व बसलेल्या धक्क्यातून सावरल्यावर काही कालाने सुधारतात तर इतर काही कायम स्वरूपी असू शकतात. ३. या लोकांमध्ये, देव या संकल्पनेला विरोध करणे हे (अगदी देवा-धर्माशी संबंध नसलेलाही) स्वार्थ साधण्याचे फार प्रभावी साधन म्हणून वापरण्याची विलक्षण हातोटी असते. मग तसे करताना असंबद्ध / अतार्किक / उपहासपूर्ण वाद घालणे यात यांचा हातखंडा असतो. मुद्दा उलटवल्यावर तो भरकटवून भलतीकडे नेण्यात यांचा हात धरणे कठीण असते. कारण आपला मुद्दा जिंकणे हाच त्यांच्या लेखी मुख्य मुद्दा असतो... सत्य, सारासारविवेक वगैरे इतर सर्व गोष्टी त्यापुढे दुय्यम असतात. ४. धर्मा-धर्मातल्या फरकांचाच नव्हे तर हिंदू धर्मासारख्या एकाच धर्मातल्या विविधतेचा फायदा हे लोक मोठ्या चलाखीने घेताना दिसतात... एखाद्या धर्मातील उणीव (सर्व धर्मात असे काही ना काही असतेच) हेरून त्याचा फायदा घेण्यात हे लोक पटाईत असतात. मात्र असे करताना सोईस्कर नसणार्या वस्तुस्थितीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात यांचा हातखंडा असतो. ५. अर्थातच, हे लोक सामाजिक आणि राजकीय सत्ताकेंद्रात अथवा सत्ताकेंद्राजवळ असल्यास आश्चर्य नाही... किंबहुना आर्थिक फायदा, पदभार, मानसन्मान यांची खैरात करत अश्या प्रकारच्या तथाकथित विचारवंतांची फौज पदरी बाळगणे ही सत्ताकेंद्रांची एक महत्त्वपूर्ण गरज असते. ६. यांची लोकसंख्या प्रामाणिक नास्तिकांपेक्षा जास्त असली तरी ती तितकीशी मोठीही असू शकत नाही... कारण त्यांचे इतके सगळे गुणधर्म एका व्यक्तित असणे तितकेसे सामान्य नसते ! थोडक्यात : धूर्त नास्तिक लोक "अल्पसंख्य नसलेले पण बहुसंख्यही नसलेले", "धूर्त " आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात. आतापर्यंत आपण पाहिलेले गट सामील करून तयार झालेला वर्णपट खालच्या आकृतीत दाखवला आहे...
आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०२
धोका प्रबंधक
उरलेल्या बहुसंख्य लोकसमूहातील बहुतेक लोक "धोका प्रबंधक" या वर्गवारीत मोडतात. हे का ? याचे उत्तर त्यांच्या खालील गुणधर्मात सापडेल. १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना ठाऊक असते किंवा कमीत कमी देव या संकल्पनेबद्दल त्यांच्या मनात खात्री नसते. २. परंतू त्याचबरोबर हे सत्य उघडपणे मानणे सामाजिक अथवा राजकीय दृष्टीने फायद्याचे / सोयीचे नाही हे त्यांना पुरेपूर ठाऊक असते. त्याशिवाय आपले मत उघडपणे व्यक्त करण्यामुळे होणारे दुष्परिणाम भोगण्याची त्यांची तयारी नसते. ३. वरच्या १ व २ मधील वस्तुस्थितीमुळे हे लोक "त्यांच्या आजूबाजूच्या सर्वसाधारण सामाजिक-राजकीय प्रवाहाबरोबर वाहणे" हा कमीत कमी धोकादायक पर्याय स्वीकारतात. असे लोक कडक कम्युनिस्ट राजवटीत निधर्मी असल्यासारखे तर कडक धार्मिक राजवटीत कर्मठ धार्मिक असल्यासारखे "वागतात". ४. अर्थातच हे लोक सत्ताकेंद्रातले नसून त्यांच्या धार्मिक-सामाजिक-राजकीय सत्ताकेंद्राने ठरवलेल्या नियमांचे पालन करणारी आणि आपले नेहमीचे जीवन शक्य तेवढे निर्धोक ठेवण्याच्या प्रयत्नात असलेली सामान्य जनता असते. ५. जर देव खरोखरच असला तर आपलाही दंडवत त्याच्या नावे असावा, झाला तर फायदाच होईल असाही एक व्यावहारीक धार्मिक विचार यांच्या मनात असतो... हे सुद्धा त्यांचे एक प्रकारचे धोका प्रबंधनच असते ! ६. वरच्या सर्व वस्तुस्थितीमुळे आपले मत अथवा चेहरा नसलेल्या या बहुसंख्य अगतिक गटाला "धोका प्रबंधक" हेच नाव योग्य आहे. थोडक्यात : धोका प्रबंधक लोक "बहुसंख्य", "परिस्थितीशी जुळवून घेण्यात चलाख" आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात. आतापर्यंत आपला वर्णपट खालच्या आकृतीत दाखवला आहे तसा झाला आहे...
आस्तिक-नास्तिक वर्णपट : ३
अज्ञेयवादी
आपल्या या वर्णपटात बरोबर मध्यभागी बसणार्या या गटाचे गुणधर्म खालीलप्रमाणे असतात: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. आपले हे अज्ञान उघडपणे व्यक्त करायला या लोकांना भिती अथवा लाज वाटत नाही आणि त्यामुळे होऊ शकणार्या धोक्याला सामोरे जाण्याची त्यांची तयारी असते. ३. "देव आहे" आणि "देव नाही" या दोन्ही दाव्यांबद्दलचे आपले अज्ञान उघडपणे मान्य करण्याबरोबरच आस्तिक आणि नास्तिक या दोन्हीं गटांचे दावे शास्त्रिय कसोटीवर जोखून त्यातले योग्य ते सत्य / अर्धसत्य "आहे तसे" स्वीकारण्याची त्यांची तयारी असते. त्याचबरोबर भविष्यात मिळणारे नवीन सबळ पुरावे स्वीकारून आपले मत त्याप्रमाणे बदलत राहणे त्यांना गैरसोयीचे अथवा मानहानीचे वाटत नाही. ४. सत्य आणि शास्त्र यांच्यावर श्रद्धा असणारे हे लोक शात्रज्ञ म्हणून यशस्वी होत असले तरी त्याच कारणामुळे राजकारणाशी त्यांचे जमणे कठीण असते. त्यामुळे कर्मठ नास्तिक (उदा. कम्युनिस्ट), धूर्त आस्तिक, धूर्त नास्तिक, मिथ्या-धर्मनिरपेक्ष किंवा कर्मठ धार्मिक प्रकारच्या राजसत्तांशी त्यांचा संघर्ष होऊ शकतो. ५. "देव या संकल्पनेबद्दल मला सत्य माहीत नाही... मी अज्ञानी आहे" हे सत्य उघडपणे मानत असल्याने यांना अज्ञेयवादी (agnostic) म्हटले जाते. ६. अर्थातच अश्या गुणधर्मांचे लोक समाजात फारच थोड्या संख्येने असणे आश्चर्यकारक नाही. थोडक्यात : अज्ञेयवादी लोक "अल्पसंख्य", "आपल्या मतांसाठी परिस्थितीशी टक्कर देण्यासाठी तयार असणारे", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात आणि तसे उघडपणे कबूल करतात. या गटाबरोबरच आपला वर्णपट पुरा होतो. पूर्ण वर्णपट खालच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसतो:
आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०४
सारांश
हे वरचे विश्लेषण खालील तक्त्यात सारांशाने दाखवले आहे.
आस्तिक-नास्तिक वर्णपट : गुणधर्म सारांश
In reply to हम्म्म! पास. by प्यारे१
In reply to जर हे विश्लेषण १००% जनतेसाठी by भृशुंडी
In reply to देव आहे असे शास्त्रिय by डॉ सुहास म्हात्रे
देव आहे असे शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करणारा माणूस दाखवू शकाल काय?नाही. असे कोणी केलेले ऐकीवात नाही. त्याच धर्तीवर युनिकॉर्न, तीन तोंडाचा नाग, येती, उडत्या तबकड्या वगैरे गोष्टीदेखील शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झालेल्या नाहीत. पण अशा गोष्टींकडे लोक हेटाळणीच्या दृष्टीने एक भाकडकथा म्हणून बघतात. मग देवानेच काय घोडं मारलंय? 'देव' ही अशीच एक अशास्त्रीय अटकळ म्हणून सोडून द्यायला हवी, नाही का? अथवा मग लोकांचे "युनिकॉर्न" संबंधी युस्तिक्/न्युस्तिक वगैरे केलेले गटही तितकेच वैध ठरावेत.
In reply to देव आहे असे शास्त्रिय by भृशुंडी
In reply to देव आहे असे शास्त्रिय by डॉ सुहास म्हात्रे
In reply to देव आहे असे शास्त्रिय by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हे घ्या. कुर्ट गोडेल नामक by बॅटमॅन
In reply to हे घ्या. कुर्ट गोडेल नामक by बॅटमॅन
In reply to शितावरुन भाताची परिक्षा? by आयुर्हित
In reply to शितावरुन भाताची परिक्षा? by आयुर्हित
In reply to @आस्तिक म्हणजे सिम असलेले by अत्रुप्त आत्मा
In reply to >>> एक्काकाकांच्या या by प्यारे१
In reply to >>> एक्काकाकांच्या या by प्यारे१
In reply to शितावरुन भाताची परिक्षा? by आयुर्हित
आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट.
मोबाईल शास्त्रिय तत्वांवर चालतो हे माहीत होते पण आस्तिक आणि नास्तिक हे मोबाईल तत्वांवर चालतात हे माहित नव्हते =))In reply to शितावरुन भाताची परिक्षा? by आयुर्हित
आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.हेच्च ते... सगळं शास्त्रीय दृष्टीकोनातून माहिती असल्याचा भोळाभाबडा विश्वास असणे. (थोडक्यात चौथी क्याटेगरी) :) अहो इथे तुम्ही दोन्ही हँडसेट एकाच प्रकारचे आहेत असा विश्वास ठेवला आहे. पण जर आस्तिक आणि नास्तिक ही दोन टोके असतील तर हँडसेट पण दोन टोकावरच्या टेक्नॉलॉजीचे घ्या ना. सिमवाल्या GSM हँडसेटना जगाशी वेल कनेक्ट वगैरे व्हायला सिम लागतेच. पण बिगरसिमवाले CDMA हँडसेट असतात आणि ते सुद्धा कायम जगाशी कनेक्टेड असतात की!
In reply to शितावरुन भाताची परिक्षा? by आयुर्हित
आस्तिक म्हणजे सिम असलेले मोबाईल हॅण्डसेट व नास्तिक म्हणजे सिम नसलेले मोबाईल हॅण्डसेट. थोडक्यात आस्तिक स्वत: सर्व जगाशी वेल कनेक्टेड असतात व स्वछंदी जीवन जगतात तर नास्तिक स्वत:ला आवश्यकता असुनही जगाशी कनेक्ट करता येत नाही व आतल्या आत तडफडतात.इतकं विनोदी वाक्य मिपावर ना याआधी कुणी लिहिलंय आणि ना यानंतर कुणी लिहील. :)
In reply to आस्तिक म्हणजे सिम असलेले by धन्या
प्रामाणिक नास्तिक मधल्या चुका...
प्रामाणिक नास्तिक जर शास्त्रिय विचार करत नाहीत. ते कसे याचे उत्तर "प्रामाणिक नास्तिक" या विभागातील मुद्दा क्रमांक ४ आणि ५ मध्ये आहे.
आजवर "देव आहे" आणि "देव नाही" या दोन्ही गोष्टींना शास्त्रिय प्रमाण मिळालेले नाही आणि देव असणे ही विश्वास ठेवण्याची गोष्ट समजली जाते. म्हणजे प्रामाणिक आस्तिक आणि प्रामाणिक नास्तिक हे दोन्ही प्रामाणिक असले तरी त्यां दोघांचेही मत केवळ वैयक्तीक विश्वासावर आधारलेले असते... शास्त्रिय पुराव्यांवर नाही.
देवाबाबत आजपर्यंतची शास्त्रिय समज म्हणजे "अज्ञान आहे याचे ज्ञान" आणि "देव या संकल्पनेच्या बाजूच्या आणि विरोधी सर्व प्रकारच्या पुराव्यांचा पूर्वग्रह न बाळगता शास्त्रिय विचार करण्याची तयारी ठेवणे" इतकीच आहे.
यावरून "देव नाही" असे प्रामाणिक मत असलेल्या नास्तिकाला प्रामाणिक म्हणता येते पण त्याच्या मताला शास्त्रिय म्हणता येत नाही.
नास्तिक जर शास्त्रिय पद्धतिने विचार करू लागला तर त्याचा "देव नाही" हा आग्रह थांबेल आणि त्याची गणना आपोआपच अज्ञेयवादी म्हणुन होईल.In reply to प्रामाणिक नास्तिक मधल्या चुका by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हा प्रतिसाद @ अत्रुप्त आत्मा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to http://misalpav.com/comment by अत्रुप्त आत्मा
In reply to एक नास्तिकी शंका by हुप्प्या
In reply to मूद्दयात राम आहे! by आयुर्हित
In reply to एक्का काकांना पण TRP ची भुल by स्पा
In reply to हे आले प्रामाणिक आस्तिक. by प्रचेतस
In reply to हे आले प्रामाणिक आस्तिक. by प्रचेतस
In reply to हे आले प्रामाणिक आस्तिक. by प्रचेतस
In reply to हेच म्हणतो... by धन्या
In reply to कैच्या कै by स्पा
रिकाम्चोतनविन शब्द =))
In reply to हेच म्हणतो... by धन्या
In reply to तु प्रामाणिक आस्तिक काय रे? by मृत्युन्जय
In reply to तो 'विवेकवादी' ह्या वेगळ्याच by प्रचेतस
In reply to अच्छा तो विवेकानंदांवर वाद by मृत्युन्जय
In reply to सध्या आम्ही नुसतेच वादी आहोत. by धन्या
सध्या आम्ही नुसतेच वादी आहोत. वेळ जात नसला की वाद घालत बसतो. सध्या "देव नाही" या बाजूचे असलो तरी गरज पडल्यास "देव आहे" या बाजूनेही वाद घालू शकतो.धन्या मित्रा , तुला मी आधीच सांगितलय की तु "पोहचला" आहेस :ड ... हे बघ ह्या अर्थाचा कबीराचा एक दोहा :
हद हद जाए हर कोई, अनहद जाए ना कोय , हद अनहद के बीच में रहा कबीरा सोय.
In reply to सध्या आम्ही नुसतेच वादी आहोत. by धन्या
लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई झाली की चार गोष्टी नव्याने कळतात, लोकांबद्दल आणि स्वतःबद्दलही.हे वाक्य चेपुवर स्टेटस ठेवायला परवानगी द्या धनाजीराव!! ;)
In reply to लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई by सूड
In reply to परवानगी दिली. :) by धन्या
In reply to वादीदादा, मलापण द्या ना by यशोधरा
In reply to ढापा :) by धन्या
In reply to तु प्रामाणिक आस्तिक काय रे? by मृत्युन्जय
In reply to मुळात आधी त्यांना स्वतालाच by स्पा
In reply to हेच का ते चडफडणे? =)) by प्रचेतस
In reply to एक भोळा प्रश्न : स्पावड्या by प्रसाद गोडबोले
In reply to हेच का ते चडफडणे? =)) by प्रचेतस
In reply to हेच का ते चडफडणे? =)) by प्रचेतस
In reply to होय, हेच ते चडफडणे by स्पा
In reply to अरेरे यह कॉन्वर्सेशन तर by मृत्युन्जय
In reply to होय, हेच ते चडफडणे by स्पा
आणि ह्याची जळली , त्याची जळली असे प्रतिसाद देत सुटतात अशा लोकांना कितपत गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे असोआम्हाला लो़कांनी गांभिर्याने किंवा अजून कसं घ्यावं किंवा न घ्यावं अशी आमची कुठलीच अपेक्षा नाही. :)
In reply to आणि ह्याची जळली , त्याची जळली by धन्या
In reply to भलतेच 'पोचलेले' आहात हो धनाजी by हाडक्या
लोकांशी थोडीशी शाब्दिक लढाई झाली की चार गोष्टी नव्याने कळतात, लोकांबद्दल आणि स्वतःबद्दलही. :)या म्हणण्याचं प्रत्यंतर मला याच धाग्यात आलं. मी इथे स्पांडूरंगशास्त्रींवर हल्ला केला आणि त्यांनी तितक्याच निकराने प्रतिहल्ला केला. इथे मला हे लक्षात आलं की वैयक्तिक हल्ले टाळायला हवेत. त्यामुळे विषयाचं गांभिर्य निघून जातं. :)
In reply to तुमच्या मनात कोणती दिशा आहे by धन्या
In reply to आपल्या त्या प्रतिक्रियेशी by हाडक्या
आता या गोष्टींची वर्तुळे झाल्यासारखे आहे, तिथे-तिथेच फिरणार चर्चा.या म्हणण्याशी प्रचंड सहमत आहे. या विषयावर इथून पुढे अगदी मुळीच चर्चा नाही झाली तरी चालण्यासारखे आहे. पण होतं काय, एकदा हा विषय बोर्डावर आला की हात प्रतिसाद दयायला हात शिवशिवतात. मानवी स्वभाव. :)
In reply to आता या गोष्टींची वर्तुळे by धन्या
In reply to >>> मानवी स्वभाव. by प्यारे१
In reply to आपल्या त्या प्रतिक्रियेशी by हाडक्या
In reply to वर्तुळे तर होणारच. प्रिथ्वीच by यशोधरा
In reply to * गोष्टींची by यशोधरा
In reply to हेच का ते चडफडणे? =)) by प्रचेतस
In reply to =)) by बॅटमॅन
In reply to आणखी एक गट ? by चित्रगुप्त
In reply to आणखी एक गट ? by चित्रगुप्त
माझे १८९६ मधे जन्मलेले वडीलही असेच होतेतुमचे आत्ता वय कीती हा प्रश्न मला पडला आहे?
In reply to माझे १८९६ मधे जन्मलेले वडीलही by प्रसाद१९७१
In reply to आणखी एक गट ? by चित्रगुप्त
In reply to अज्ञानवादी by तिमा
अशा लोकांचा 'अज्ञानवादी' असा गट करावा.ज्यांना काही घेणे-देणेच नाही, कसल्याही वादात पडायचेच नाही, त्यांनापण 'वादी' ही उपाधी कशाला?
परंतू देव या संकल्पनेचा विरोध करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात.देव संकल्पनेला विरोध करुन कोणाचा आर्थिक फायदा झालाय किंवा चरितार्थ चाललाय??
In reply to वर्गीकरण पटत नाही. by बाळ सप्रे
In reply to १. कम्युनिस्ट by डॉ सुहास म्हात्रे
In reply to विश्लेषणाचा प्रयत्न चांगला by आतिवास
In reply to विश्लेषणाचा प्रयत्न चांगला by आतिवास
झालं रतीब मिळाला आता या धाग्याचं येळ्ळुर होणार.
In reply to मी कदाचित प्रामाणिक आस्तिक by मृत्युन्जय
In reply to मी कदाचित प्रामाणिक आस्तिक by मृत्युन्जय
In reply to मी कदाचित प्रामाणिक आस्तिक by मृत्युन्जय
एका सुताराचा मुलगा त्याला विचारतो की देव आहे याला पुरावा काय? सुतार म्हणतो काहिच नाही. मुलगा म्हणतो तर मग माझे म्हणणे आहे की देवच नाही, सुतार काहिच प्रतिवाद करत नाही. त्या रात्री तो रात्रभर जागुन बैलगाडीसाठी अतिशय कुशलतेने एक अतिशय सुंदर चाक बनवतो. सकाळी मुलगा विचारतो की हे चाक कोणी बनवले. त्यावर सुतार म्हणतो की कोणीच नाही ते आपोआप बनले. मुलगा अविश्वासाने म्हणतो की असे होणे शक्य नाही. इतके सुंदर चाक कोणीतरी बनवलेच असणार. आपोआप तर नाही बनणार ते. सुतार म्हणतो अगदी तसेच इतकी सुंदर सृष्टी सुद्धा आपोआप तयार नाही झाली आणि ती आपोआप चालतही नाही. ती तयार करण्यामागे आणि चालवण्यामागे एक शक्ती नक्कीच आहे. कोण ते आपल्याला माहिती नाही, जसे हे चाक कोणी तयार केले याबद्दल तु अंदाज बांधु शकतोस पण नक्की कोणी तयार केले हे तुला माहिती नाही.जर सुंदर चाक आपोआप बनू शकत नाही, सुंदर सृष्टी आपोआप बनू शकत नाही तर मग हे सारं निर्माण करणारा देव तरी आपोआप कसा बनेल? त्यालाही कुणीतरी बनवले असेलच की? किंवा याच्या उलट तुम्ही जर म्हटलंत की देव स्वयंभू आहे तर मग ही सुंदर सृष्टीही स्वयंभू असू शकते. तिला तरी निर्माता कशाला हवा?
In reply to एका सुताराचा मुलगा त्याला by धन्या
Rx
http://en.wikipedia.org/wiki/Nasadiya_Sukta#Nasadiya_Sukta_with_English_translation :डIn reply to धन्या by प्रसाद गोडबोले
In reply to जबर्या by बॅटमॅन
In reply to धन्या by प्रसाद गोडबोले
In reply to एका सुताराचा मुलगा त्याला by धन्या
In reply to यग्झॅक्टली. हा विरोधाभास आहे by मृत्युन्जय
In reply to एका सुताराचा मुलगा त्याला by धन्या
In reply to अगदी समजा ही सृष्टी देवाने by बाळ सप्रे
In reply to एका सुताराचा मुलगा त्याला by धन्या
In reply to भोळसटपणा by हुप्प्या
In reply to अगदी अगदी. by धन्या
In reply to पण मी तर असे पण ऐकले होते की by मृत्युन्जय
In reply to पण मी तर असे पण ऐकले होते की by मृत्युन्जय
In reply to विज्ञानवादी काहीही म्हणू दयात by धन्या
In reply to कदाचित ती शक्तीही तो बॅलॅन्स by मृत्युन्जय
या व्यतिरिक्त काही विचार करणारी देव नावाची शक्ती असु शकत नाही का?
हे नक्की काय आहे हे समजावून घ्यायला आवडेल.In reply to या व्यतिरिक्त काही विचार by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अशी कुणी बॅलन्स साधणारी शक्ती by धन्या
In reply to हा अर्थ काढण्यापुर्वी देव आहे by मृत्युन्जय
In reply to तुझी जी काय मते आहेत त्या by धन्या
In reply to वोक्के. फुलस्टॉप. by मृत्युन्जय
In reply to वोक्के. फुलस्टॉप. by मृत्युन्जय
In reply to या व्यतिरिक्त काही विचार by डॉ सुहास म्हात्रे
In reply to झक्कास! by पैसा
मुख्य कॅटेगरीज शिवाय अधले मधले बरेच प्रकार असतात शिवाय चंचल मते असणारे काही असतात.
म्हणून तर वर्णपटाची गरज भासते... त्यातले बिंदू / गट केवळ ढोबळ स्थलनिदर्शक (प्लेसहोल्डर्स) असतात... जनता सर्व वर्णपटभर पसरलेली असते.In reply to सगळेच लोक 'अज्ञानी' आहेत होय? by कवितानागेश
In reply to सगळेच लोक 'अज्ञानी' आहेत होय? by कवितानागेश
In reply to असं बघा, by डॉ सुहास म्हात्रे
आता सांगा कोण ज्ञानी आहे या पृथ्वीतलावर ?>>> उत्तर खुपच सोप्पय .... संक्षी ! :ड
In reply to सोप्पय by प्रसाद गोडबोले
In reply to सोप्पय by प्रसाद गोडबोले
In reply to सोप्पय by प्रसाद गोडबोले
In reply to देव आहे की नाही ? by प्रसाद गोडबोले
In reply to एक गंभीर प्रश्न. (मलाच हसू by प्यारे१
हे समष्टी होणं म्हणजे नेमकं काय होणं?खरेतर ह्या विषयावर आम्ही "समष्टीची व्यामिश्रता " असा एक अत्यंत अभ्यासपुर्ण लेख लिहिणार होतो पण आमच्याच एका मिपाकर मित्रांनी आमचे "मटीरियल" ढापल्याने धागा काढण्यात राम राहिला नाही :(
वेद नि वेदप्रामाण्यह्या विषयावर नुकतीच कबड्डी खेळुन झाल्याने यंदा / सध्या पास देत आहे !
In reply to हीच ती by प्रसाद गोडबोले
In reply to >>ह्या विषयावर नुकतीच कबड्डी by सूड
In reply to ठार नास्तिकांना कंच्या by प्रकाश घाटपांडे
In reply to यग्दम उजव्या टॉकाला. by धन्या
In reply to बाकी अनऑफिशियली बेंचवरच्या by प्यारे१
In reply to काही सिरियस लिहावे, आणि खोचक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to "काही सिरियस लिहावे, आणि खोचक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काही सिरियस लिहावे, आणि खोचक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मंत्रजपावर माझा एक पण by लॉरी टांगटूंगकर
In reply to हो हो, मानाच्या गणपतीत वर्दी by सूड
In reply to हो हो, मानाच्या गणपतीत वर्दी by सूड
In reply to हो हो, मानाच्या गणपतीत वर्दी by सूड
In reply to :ड गणपतीत नसलो तरी मिरवणूकीत by लॉरी टांगटूंगकर
In reply to ज्यांना देव असण्याची गरज आहे by अधिराज
माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे.तुमच्या मते जगाचे नियंत्रण करणारी जी शक्ती आहे ती जगाचे नियंत्रण करते म्हणजे नेमकं काय करते? आणि जग म्हणजे फक्त आपली पृथ्वी की आपली पृथ्वी ज्याचा एक अतिशय छोटा भाग आहे ते विराट विश्व? माझा प्रश्न तुमच्या या मताईतकाच प्रामाणिक आहे :)
In reply to माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती by धन्या
In reply to ज्यांना देव असण्याची गरज आहे by अधिराज
माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे.
हे नेहमी ऐकायला मिळते. त्यावेळेला माझ्या अल्पमतीला काही प्रश्न पडतात :
जर,
कोण्या एका सर्वोच्च शक्तीने हे सर्व जग निर्माण केले आहे, तिचे आपल्यावर संपुर्ण नियंत्रण आहे, तिच्या इच्छेशिवाय पृथ्वीवरच्या झाडाचे पानही हलू शकत नाही, ती सर्व जीवांना त्यांच्या कुकर्माचे फळ म्हणून शिक्षा देते;
तर मगः
१. सर्व बरे-वाईट सर्वोच्च शक्तीने निर्माण केले आणि त्या गोष्टी सर्वोच्च शक्तीच्या मनाविरुद्ध काहीही करू शकत नाहीत, असे असताना वाईटपणाचा दोष आणि त्याबद्दलची शिक्षा तोच निर्माता वस्तूंना का देतो? असे करणे म्हणजे एखादी वस्तू दोषपूर्ण (defective product) बनविली गेली तर ती वस्तू तयार करणार्या कंपनीला (manufacturer) दोष देण्याऐवजी त्या वस्तूलाच शिक्षा देणे होत नाही का?
आपला मोबाईल बिघडला तर आपण तो मोबाईल बनवणार्या कंपनीला दोष देतो, मोबाईलला शिक्षा देत नाही... किंबहुना मोबाईलवर राग काढून त्याची आदळआपट करण्याला असंगत, तर्कविरुद्ध, न्यायविरुद्ध कृती म्हणतो, नाही का ?
२. वाईटपणाची सर्वोच्च शक्तीला चीड आहे आणि त्यांबद्दल ती शक्ती शिक्षाही देते. मग अश्या सर्वोच्च शक्तीने जगात दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट माणसे, वाईटपणा हे सर्व का निर्माण केले ? फक्त आपल्याला आवडणार्या सुष्ट प्रवृत्ती, चांगली माणसे, चांगल्या गोष्टी निर्माण करणे सर्वोच्च शक्तीला सहज शक्य असायला हवे होते. मग तसे का केले नाही ?
माझे वरचे प्रश्न केवळ प्रतिवाद म्हणून केलेले नाहीत. ते अत्यंत प्रामाणिक आहेत आणि मी त्यांची उत्तरे शोधत आहे.
मी पयला... बाकी नंतर! =))