शनिवार-रविवार म्हणजे मॉल. मॉल म्हणजे शॉपिंग. मॉल म्हणजे खादाडी, अशी समीकरणं आता रूढ झालेली आहेत. ठाणे-मुंबईसारख्या जागा म्हणजे तर या दृष्टीने मॉलामाल आहेत. मोठेच्या मोठे मॉल्स, त्यातली लखलख, चकचक, ब्रँडेड वस्तूंची दुकानं, दालनं हेच शनिवार-रविवारचं डेस्टिनेशन झालेलं आहे. या मॉल्समधून असंख्य लोक पैसे खर्च करायच्या उदात्त हेतूने ओसंडून वाहत असतात. याची ‘शहरातली जत्रा’ यापेक्षा समर्पक व्याख्या मला करता येत नाही.
याच जत्रेत येणा-या प्रत्येकाला आनंद वाटावा म्हणून पडद्यामागच्या कलाकाराप्रमाणे प्रामाणिक मेहनत घेणारे अनेक लोकही असतात. उदाहरणार्थ, सफाई कामगार किंवा हाउसकीपिंग पीपल. अतिशय तुटपुंज्या पगारावर, नीट सोयी-सुविधांशिवाय काम करणा-या या मंडळींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कौतुकच नव्हे, आदर केला पाहिजे. पण सर्वसाधारणपणे ही मंडळी लोकांच्या डाफरण्याचे, ओरडण्याचे, पाडून बोलण्याचेच धनी होत असतात आणि या गोष्टीचा खरंच राग येतो. ते बघताना आपल्याला राग येतो, तर त्यांना स्वत:ला किती येत असेल आणि तो ते किती आणि कसा गिळत असतील, तेच जाणोत.
पण याच अनुषंगाने एक चांगला प्रसंग काही दिवसांपूर्वी बघितला. एका सहकर्मचा-याबरोबर काही निमित्ताने एका मॉलमध्ये जाणं झालं. त्या वेळी फूड कोर्टमध्ये बसून आम्ही खात होतो. संध्याकाळ होत आली होती आणि गर्दी वाढलेली होती. त्यामुळे फूड कोर्टात बसायलाही जागा नव्हती आणि लोकं रांगा लावून उभे होते. काही जण तर उभ्या उभ्याच खात होते. या सगळ्या गडबडीत सफाई कामगार आपलं काम करत होते. आपण खाऊन झाल्यावर ताटली, ट्रे, ग्लास, हात पुसलेले टिशू हे सगळं टेबलावर तसंच सोडून जाणा-या माजोरडया लोकांची खरकटी काढत होते, टेबल पुसत होते, कचरा कचरापेटीत टाकत होते, ताटल्या पुन्हा रचून एका ट्रॉलीमधे ठेवत होते, तिथे उभं असणा-या लोकांचं ‘जल्दी कर ना.. और ठीक से साफ करना.. ये देख यहां गिरा है.. क्या कर रहा है दिखता नही क्या’ इत्यादी करवादणं सहन करत होते.
हे चालू असताना एक बाई मोबाइलवर काही तरी खेळत आणि एका हातात शीतपेयं व बर्गरने भरलेला ट्रे घेऊन आली आणि एका सफाई कामगाराला धडकली. तिच्या हातातला ट्रे खाली पडला. बर्गर सांडला, शीतपेयं सांडलं. त्या बाईने त्या सफाईवाल्यावर ओरडायला सुरुवात केली. ‘बीचमें खडा रहता है.. अंधा है क्या?’ वगरे वगरे. सभ्यपणे बोलणं म्हणजे भ्याडपणाचं समजलं जातं ना आजकाल, त्यामुळे दुस-याला पागल, अंधा, बेहरा वगरे म्हटलं की आपली बाजू बळकट होते. अशाच काहीशा समजुतीने त्या बाईने त्या सफाईवाल्यावर डाफरणं सुरू ठेवलं. सफाई कामगार मान खाली घालून सांडलेलं उचलत होता. इतक्यात बाजूच्या टेबलवर एकटाच बसलेला एक तरुण उठला. त्या बाईसमोर येऊन शांतपणे म्हणाला, ‘उसको उसका काम ठीकसे पता है मॅडम. आपको उसे बोलनेका हक नही है.’ असं म्हणून त्या तरुणाने खाली पडलेला ट्रे, प्लेट, ग्लास उचलून सफाई कामगाराच्या ट्रॉलीत ठेवले. त्याच्या पाठीवर हलकीशी थाप मारून ‘जाने दे’ असं म्हणून तो तरुण आपल्या टेबलावर जाऊन बसला.
त्या तरुणाचं कौतुक करावं तितकं कमी. एवढा जरी समंजसपणा आपल्यात असेल तरी ती फार मोठी गोष्ट ठरते. पण दुर्दैवं असं आहे की त्याच्यासारखे तरुण विरळ आहेत आणि त्या बाईसारखी मंडळी अधिक. तेव्हा हा ‘कचरा’ काढण्याच्या कार्यात आपणही आपला वाटा उचलणं, हाच योग्य उपाय असू शकतो.
वरील लेख प्रहार वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता त्याचा हा दुवा http://prahaar.in/collag/234201
वाचने
6156
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लेख
+१
त्या
ह्हा हा.. +१
In reply to त्या by माईसाहेब कुरसूंदीकर
फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच
In reply to ह्हा हा.. +१ by यसवायजी
सहमत.
In reply to फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच by शिद
लाज तर अज्जेब्बात नाही हो.
In reply to फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच by शिद
आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्तयात फक्त मॉलमध्ये फिरणार्या (एसी पब्लिक?) लोकांना शिव्या देण्यात अर्थ नाही. हेच चित्र तुम्हाला सुरुपली बुद्रुक येथल्या टपरीवर पण दिसेल. कल्चर! कल्चर! माझं निरीक्षण थोडं वेगळं आहे. मोठ्या हॉटेलात, परदेशी, आलिशान मॉलमध्ये गेल्यावर का असेना, भारतीय लोक बरेच चांगले वागतात. (कंपेर्ड टू टपरीवरचे वागणे) ऑस्ट्रियात एका तलावाजवळ एक पिझ्झाचा बॉक्स पडला होता. आम्हा चार भारतीय मित्रांकडे विचित्र नजरेने बघत एका गोर्याने तो बॉक्स डस्टबिनमध्ये फेकला. आमची काही चूक नसताना सुद्धा शरमेने मान खाली गेली होती. नावच खराब झालंय च्यामारी :(नावच खराब झालंय च्यामारी :(
In reply to लाज तर अज्जेब्बात नाही हो. by यसवायजी
उगाच अंगावर येण्याची गरज नाही
In reply to लाज तर अज्जेब्बात नाही हो. by यसवायजी
पण फक्त अश्याच ठिकाणी का?
In reply to उगाच अंगावर येण्याची गरज नाही by शिद
हाह ! धुवा बिवायची अपेक्षा
In reply to फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच by शिद
नाहीतरी आपली भारतीय लोकं
In reply to फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच by शिद
लेख आवडला. माईसाहेबांच्या
तो तरूण म्हणजेच वेल्लाभट तर
नव्हे नव्हे !
In reply to तो तरूण म्हणजेच वेल्लाभट तर by सूड
माजोरडेपणा योग्य नाही हे
आपण उरलेले कागद खोकी, कप्स...
In reply to माजोरडेपणा योग्य नाही हे by कवितानागेश
त्यांची नोकरी गेली तर
In reply to आपण उरलेले कागद खोकी, कप्स... by बॅटमॅन
हा युक्तिवाद अतिशय फसवा आणि
In reply to त्यांची नोकरी गेली तर by कवितानागेश
त्यांच्या पिढयांनी हेच करावं
In reply to हा युक्तिवाद अतिशय फसवा आणि by बॅटमॅन
योग्य शंकेला कृपया वितंडवाद
In reply to त्यांच्या पिढयांनी हेच करावं by कवितानागेश
>>पण दुसरीकडे डायव्हर्ट केले
In reply to योग्य शंकेला कृपया वितंडवाद by बॅटमॅन
तुलनेने अजून जरा प्रॉडक्टिव्ह
In reply to >>पण दुसरीकडे डायव्हर्ट केले by सूड
तुलनेने अजून जरा प्रॉडक्टिव्ह
In reply to तुलनेने अजून जरा प्रॉडक्टिव्ह by बॅटमॅन
माझा मुद्दा अजून जरा नीट
In reply to तुलनेने अजून जरा प्रॉडक्टिव्ह by कवितानागेश
हे खरोखरीच आपले विचार आहेत का
In reply to माजोरडेपणा योग्य नाही हे by कवितानागेश
देश तसा वेश...
शीर्षक
In reply to देश तसा वेश... by प्रभाकर पेठकर
सहमत
In reply to देश तसा वेश... by प्रभाकर पेठकर
लेख आवडला
एकीकडे सत्ता-श्रीमंतीचा माज
+७८६
In reply to एकीकडे सत्ता-श्रीमंतीचा माज by शिद
खरंय…