तसे आपण अनेक नवीन जुने पदार्थ करून खातोच पण मला काही पदार्थ एकाबरोबर एक आवडतात...
त्यांना विशिष्ट काही नावे नाहीत ....कदाचित तुम्ही हे करून खात असाल...तसे असेल तर फारच उत्तम ....पण नसाल तर खाऊन बघा आवडतात का आणि तुम्ही पण असे काही करत असाल तर सांगा...
१. उत्तम बासमती तांदुळाचा भात + मेतकुट + तूप +साय+ दुध ...त्यावर दह्याची मोठी खाप + एक उकडलेला बटाटा +किंचित मीठ
२. दही, दुध भाताला उत्तमपैकी तूप जिर्याची आणि लाल तिखटाची फोडणी बरोबर पाव भाजीची भाजी
३. पाव भाजीचा अतिबटर लावून भाजलेला पाव + चहा
४. माणिक पैंजण + गोड ताक + ताज्या कैरीच्या लोणच्याचा खार
५. कुस्करलेली शिळी भाकरी त्याला ज्यास्त तेल मोहोरिची फोडणी बा SSSS रिक चिरलेला कांदा
६. ४ अंडी + अर्धा कप दुध + मीठ / मिरपूड एकत्र फेटून तूप/बटर वर खरपूस लाल फ्राय केलेले आम्लेट
७. चितळ्यांची बाकरवडी कुस्करून त्यावर घुसळलेले सायीचे दही किंवा टाक
८. उकडून जाडसर कुस्करलेला बटाटा + भाजलेल्या दाण्याचे कुट + तिखट मीठ;+ तूप जिर्याची फोडणी.
९. माफक उकडलेली बारीक चिरलेली फरसबी + दही + जिरेपूड + मिठाची कणी
-----------सगळ्यात डेडली ---- आता मी खात नाही पण ---तरीही
उत्तम प्रतीचे श्रीखंड त्यावर पातळ केलेले भरपूर तूप आणि वर चमचाभर पेरलेली बारीक पिठीसाखर .......
इत्यलम
वाचने
30257
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुठलाही गोड पदार्थ+ आईस्क्रीम
तूप मेतकूट भात + मोठा चमचा
पावभाजी परिभाषेत..
In reply to तूप मेतकूट भात + मोठा चमचा by रेवती
मसाला पाव
In reply to पावभाजी परिभाषेत.. by प्रभाकर पेठकर
असतात.
In reply to मसाला पाव by सानिकास्वप्निल
हो गं
आमची खाद्यमिश्रणे...
हे "माणिक पैंजण" काय आहे?
In reply to आमची खाद्यमिश्रणे... by मुक्त विहारि
पेठकर साहेब, मग ही खालची पाककृती अगदीच वेगळी दिसते आहे!
In reply to हे "माणिक पैंजण" काय आहे? by प्रभाकर पेठकर
माणिक पैंजण
In reply to पेठकर साहेब, मग ही खालची पाककृती अगदीच वेगळी दिसते आहे! by बहुगुणी
माझ्या आईने
In reply to माणिक पैंजण by अत्रन्गि पाउस
मलाही तोच प्रश्न पडला म्हणून शोध घेतला
In reply to आमची खाद्यमिश्रणे... by मुक्त विहारि
हे ही करून पहा !
In reply to आमची खाद्यमिश्रणे... by मुक्त विहारि
ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की असेल
In reply to आमची खाद्यमिश्रणे... by मुक्त विहारि
काही अनवट, काही नेहमीचेच...
अनंत खाद्य मिश्रणे...
पुरणपोळी + ताक. ताकात बुडवून
शंकरपाळे + चहा. चहात डूबु़क
मलाही सेम टू सेम अशीच सवय आहे
In reply to शंकरपाळे + चहा. चहात डूबु़क by यशोधरा
मी पण
In reply to शंकरपाळे + चहा. चहात डूबु़क by यशोधरा
मला मेथीचा लाडू चहात बुडवून
आमरस
हे आता
In reply to आमरस by चित्रगुप्त
वर्षभर थांबायची गरज नाही.
In reply to हे आता by अत्रन्गि पाउस
पण तो दाट लच्छेदार नसतो ना?
In reply to वर्षभर थांबायची गरज नाही. by डॉ सुहास म्हात्रे
भडंग + अवाकाडो
बुंदिचा लाडू फोडून त्यात आंबट
पुरणपोळी आणि दुधाची घट्ट साय
फार फार अनवट.
यातले 'भाजी, उसळ वगरै जे असेल
In reply to फार फार अनवट. by अर्धवटराव
क्रमांक १ चा काला आपला पण
In reply to फार फार अनवट. by अर्धवटराव
माझीही भर,
पाव
मलईपाव
In reply to पाव by तिमा
पाया पाव पण मिळतो त्या बाजूला
In reply to मलईपाव by राजेंद्र मेहेंदळे
येस्स
In reply to पाया पाव पण मिळतो त्या बाजूला by स्पा
पावभाजी
१)पुरणपोळी ताटात ठेवून त्यावर
आमच्याकडचे काही वेगळे प्रकार!
कुठलाही खादयपदार्थ + चवीपुरतं
१. कुठल्याही चिवडा/फरसाण
बेक्ड अॅप्पल + मध +
शिळी बाजरीची भाकरी वर
वरती काहींसारखेच
रस्सा + रस
सैनविजमध्ये १)चना चोर गरम /२
विषय अतिशय रोचक आहे
मला
In reply to विषय अतिशय रोचक आहे by दिपक.कुवेत
साठेंचच कशाला ?
In reply to मला by अदि
माझे आवडते प्रकार.
मेथीची पाने खुडुन त्यात बारीक
In reply to माझे आवडते प्रकार. by Mrunalini
>>६. मेथीची पाने खुडुन त्यात
In reply to माझे आवडते प्रकार. by Mrunalini
Aha methicha same combination
In reply to माझे आवडते प्रकार. by Mrunalini
१. चहा / कॉफी + फरसाण / शेव
१. मॅगी टॉपड विथ शेंगदाणा
नं १ मध्ये बासमती तांदुळाऐवजी आंबे मोहर तांदुळाचा भात...
तोंडाला पाणी सुटले वाचुन !
थंडगार निरशा दुधात बुडवून
>>चहात चकलीचे तुकडे बुडवुन
In reply to थंडगार निरशा दुधात बुडवून by बाळ सप्रे
साधं वरण + कढी + तुप + भात
रात्रीची पावभाजी पावात भरुन
माझी आवड जरा weird वाटेल पण
....