कुंथुनी .. काय घेता??? मोकळे होता..मिळे स्वर्ग!
In reply to आमचे संदर्भ ते, तुमचे आणखी by प्यारे१
In reply to कबुलीबद्दल धन्यवाद. by बॅटमॅन
In reply to अहो डोळे उघडून बघण्याचा by प्यारे१
घरात कमी असेल पण असतो. (केराची बादली) पण म्हणून उकीरडा झाकायचा की उघडा पाडायचा हे सत्यान्वेषणाच्या नादात समजणं किंवा उमजणं हे जास्त उपयुक्त.चला, उकिरडा आहे हे कबूल केलंत हेही नसे थोडके. आता उकिरडा झाकण्याने कुणाचा नक्की काय फायदा होतो म्हणे? घरात कचरा साठला असेल तर तो कार्पेटखाली किती दिवस सारणार? त्याचा मोठा ढिगारा होऊन असह्य वास मारून, अळ्या-किडे होईपर्यंत वाट पाहणार की थोडासा कचरा असताना तो साफ करायला शिकवणार हे समजणं महत्त्वाचं. साफसफाईचं शिक्षण दिल्यास उकिरडा स्वच्छ होईल आणि त्यावर आधारलेले दुकान नष्ट होईल असं वाटत असेल तर एक व्यावसायिक भावना (काँपिटिशनचा तिरस्कार इ.इ.) म्हणून त्याला मी समजू शकतो, मात्र 'चिंता करितो विश्वाची' छाप आव असलेल्यांना त्यानं फरक का पडावा हे समजत नाही.
In reply to घरात कमी असेल पण असतो. by बॅटमॅन
In reply to अॅनालॉजी नावाचा एक प्रकार by प्यारे१
अॅनालॉजी नावाचा एक प्रकार असतो. त्याला जास्त ताणून चालत नाही.दिलेली अॅनॉलॉजी उलटली की असा सोयीस्कर बचाव सुरू होतो, पण तेवढा रडीचा डाव चालायचाच.
पण कचरा काढायच्या नादात सगळंच गुंडाळा नि फेकून द्या ह्या गोष्टीला विरोध होता, आहे नि राहील.ज्योतिषादि कचर्याला हात घातल्याने हिंदूधर्माचा सगळाच गुंडाळा फेकायला निघालोत हा तुफ्फान विनोदी जावईशोध लावल्याबद्दल प्रथम अभिनंदन. स्वच्छतेचा मनापासून कंटाळा असला, की एक कपटा उचलला तरी नको नको चा धोशा सुरू होतो.
त्याउप्पर आज जी गोष्ट कचरा म्हणून वाटत आहे ती गोष्ट पूर्वी कधीतरी उपयुक्त होती नि ती वापरात होती, तिला आजच्या काळानुसार मोजून मापून कचरा म्हणून तिचा कचरा करणं कधीच शहाणपणा ठरणार नाही.सर्व समाजसुधारकांनी याप्रमाणे आचरण केले असते तर सतीप्रथा, बालविवाह, विधवांचे केशवपन, जातिभेद -एक ना अनेक प्रथा आजही चालू राहिल्या असत्या. सगळे समाजसुधारक किंवा लिखाणातून मूर्खपणावर कोरडे ओढणारे तुमचे लाडके संतही या बाबतीत मग शहाणे ठरणारच नाहीत. 'नवसे पोरे होती तरी कासया लागे पती' म्हणणारे तुकोबा नैतर 'तीर्थी धोंडापाणी, देव रोकडा सज्जनी' असे रोखठोकपणे सांगणारे गाडगेबाबाही तुमच्या लेखी मूर्खच असतील, नै? जराही बदलायची नावड हेच या प्रतिसादाचे मूळ आहे. समाजाच्या आळशी आणि झापडं लावून बसलेल्या मनोवृत्तीची उत्तम झलक तुमच्या प्रतिसादातून आयतीच दाखवल्याबद्दल धन्यवाद. :)
In reply to अॅनालॉजी नावाचा एक प्रकार by बॅटमॅन
In reply to गोळ्या झाडायला हरकत नाही. by प्यारे१
In reply to मंत्रसामर्थ्य आणि by बॅटमॅन
In reply to मंत्रसामर्थ्य आणि by बॅटमॅन
In reply to मंत्र सामर्थ्य आहेच. by प्यारे१
इन्क्रिमेण्ट झाली का?उकिरडा दाखवल्याबद्दल धन्यवाद. :) कमरेखालच्या प्रवासाला शुभेच्छा!
In reply to मंत्र सामर्थ्य आहेच. by प्यारे१
In reply to मंत्र सामर्थ्य आहेच. by प्यारे१
In reply to @मंत्र सामर्थ्य आहेच.>>> होय by अत्रुप्त आत्मा
In reply to घरात कमी असेल पण असतो. by बॅटमॅन
In reply to हेच म्हणतो... by धन्या
जेव्हढया लवकर साफसफाई होईल तेव्हढं उत्तम.ह्यावरुन एक श्लोक आठवला ! पाटातील तुंब निघेना | तरी मग पाणीच चलेना | तैसे जनांचिये मना | कळले पाहिजे || -दासबोध समास २७ दशक १७ श्लोक ३३३ अर्र्रे, परत एकदा रेफरन्स चुकला :ड
In reply to 'हे तो प्रचितीचे बोलणे' या by बॅटमॅन
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to +२ by प्रसाद गोडबोले
In reply to आजही हापिसात काम नाही वाटतं!! by अत्रुप्त आत्मा
In reply to अरे काय चल्लय काय! by पैसा
In reply to मिपा काथ्याकुट by प्रसाद गोडबोले
In reply to बुवांच्या इतक्या गंभीर by सूड
कबुलीबद्दल धन्यवाद.