मी केलेली आणखी काही पेन्सिल शेडिंग्ज

बबन ताम्बे जनातलं, मनातलं
thakre
बाळासाहेब ठाकरे
shammi
शम्मी कपूर
pran
प्राण
dev
देव आनंद
rajesh
राजेश खन्ना
वर्गीकरण
लेखनप्रकार

78 टिप्पण्या 47,532 दृश्ये

Comments

एस नवीन

प्राणसाहेब आणि शम्मी कपूर यांची रेखाटने आवडली. राजेश खन्ना व देव आनंद यांची थोडी अजून चांगली करता आली असती.

बबन ताम्बे नवीन

In reply to by एस

राजेश खन्ना आणि देव आनंद ही माझी स्टार्टींग फेज होती. त्यामुळे तितकीशी सफाई नाही आली.

तुमचा अभिषेक नवीन

In reply to by एस

प्राण आणि शम्मी ... मस्तच जमलेत त्या पार्श्वभूमीवर देवानंद आणि काका मग आणखी फिके वाटले. आव्हान म्हणून त्या दोघांना पुन्हा रेखाटू शकता, हवे असल्यास वेगळे फोटो घ्या ..

बबन ताम्बे नवीन

संपादक मंडळांस विनंती. क्रुपया कलादालन या विभागात हा धागा हलवणे. सध्या कलादालन या विभागात नवीन काही टाकताना एरर येत आहेत. प्रॉब्लेम असेल तर क्रुपया दुरुस्त करणे. -बबन तांबे

ज्ञानोबाचे पैजार नवीन

प्राण चे चित्र हुबेहुब जमले आहे. पहिल्या भागातली मधुबालाही दिलके तार छेड गयी थी. बाळासाहेबांचे पण चित्र बरेच चांगले झाले आहे पण बाळासाहेबांच्या डोळ्यातच खरी मजा आहे आणि ते डोळेच या चित्रात निट जमलेले दिसत नाहीत. पैजारबुवा,

बॅटमॅन नवीन

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अगदी असेच म्हणतो. शम्मी अन प्राण लैच जबर्‍या जमलेत. बाळासाहेबही मस्तच, फक्त डोळ्यांना तितका वाव मिळालेला नाही दिसत.

पैसा नवीन

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बाळासाहेबांच्या चित्रातले बाकी तपशील चांगलेच जमले आहेत पण डोळ्यांमुळे जरा रसभंग होतो आहे. मूळ फोटो अस्पष्ट असल्याने तसं झालं असेल पण डोळ्यांमुळे प्रचंड फरक पडतो. मधुबालाच्या चित्रात डोळ्यांपुढे इतर बारीक उणीवेकडे लक्षही जात नाही.

बबन ताम्बे नवीन

In reply to by पैसा

सुधारणेस नक्की वाव आहे. पुढील रेखाटनात सुचना अवश्य लक्षात ठेवीन.

राजेंद्र मेहेंदळे नवीन

विशेषतः शम्मी, प्राण आवडले

प्रभाकर पेठकर नवीन

In reply to by बबन ताम्बे

हं...! तुमच्या हाती कला आहेच, त्या बद्दल मनापासून अभिनंदन. थोडाफार सराव गरजेचा आहे असे वाटते आहे. चित्रगुप्त साहेबांचे मार्गदर्शन लाभेलच.

राजेंद्र मेहेंदळे नवीन

काय हो? कोणालाही मारता येईल...वाकड्या रेषा मारायलाच कसब लागते :)

कानडाऊ योगेशु नवीन

पहीली तीन चित्रे सुरेख जमली आहेत. देवसाहेबांचे चित्र त्यांच्या उतारवयातील फोटोवरुन काढले आहे असे वाटते.(चित्राबद्दल आक्षेप नाही पण देवानंदला पाहावे ते त्याच्या उमेदीच्या काळातल्या चित्रपटातच.)

प्रचेतस नवीन

छान आहेत. प्राणसाहेबांचे सर्वात जास्त आवडले.

पिलीयन रायडर नवीन

आता उगाच काही तरी सांगायचं म्हणुन मी पण सांगितलं असतं की ते तेवढे बाळासाहेबांचे डोळे... पण तेवढ्यात स्वत:ची चित्रकला आठवली..!! ते ही एक असोच.. पण तुमच्या हातात उत्तम कला आहेत हे मात्र खरं.. जलरंगात काम करायला हे उपयोगी ठरेल - http://www.maayboli.com/node/47426

बबन ताम्बे नवीन

In reply to by पिलीयन रायडर

तुम्ही दिलेला जलरंग माहीतीचा धागा अतिशय सुंदर आणि माहीतीपुर्ण आहे. त्याबद्द्ल आभारी आहे.

प्यारे१ नवीन

एक काम करा, मा. बाळासाहेब गॉगल घालायचे बर्‍याचदा. चष्म्याची फ्रेम थोडी मोठी करुन काचा काळ्या करा. झाला गॉगल. गेट अप भारी येईल. :) राजेश खन्ना सोडून इतर चित्रे आवडली.

गणपा नवीन

In reply to by प्यारे१

गुस्ताखी मुआफ तांबे साहेब..  आपली सगळीच चित्र आवडली. व्यक्ती ओळखता आली की ते माझ्या लेखी उत्तम चित्रं.

बबन ताम्बे नवीन

In reply to by गणपा

तुम्ही तर कमालच केलीत . :-) एकदम बाळासाहेबांचा गेट अपच बदलून टाकलात ! आता परफेक्ट बाळासाहेब वाटतात. व्हेरी गुड.

चित्रगुप्त नवीन

बुरा ना मानो बबनजी... चित्रकलेत यापुढली वाटचाल करायची असेल, तर फोटो बघून चित्रे काढणे बंद करणे आवश्यक. १९६८ साली मी जेंव्हा आर्ट्स्कूलला प्रवेश घेण्यासाठी गेलो, तेंव्हा साधना, मुमताज वगैरेंची मी काढलेली (तेंव्हा माझ्यामते अप्रतिम कलाकृती होत्या त्या) चित्रे घेऊन गेलो होतो, आणि आपल्याला उत्तम चित्रे काढता येतात, काय थोडेबहुत आर्ट्स्कुलात शिकवत असतील, तेही बघून येऊ, असे समजून गेलो होतो. पहिल्याच दिवशी प्रिन्सिपाल किरकिरे सर यांनी आता यापुढे चित्रे वा फोटो बघून चित्रे काढणे बंद करा, असे सांगितले, आणि मी ते त्याच दिवसापासून पाळले. त्यानंतर अनेक वर्षे चित्रकलेतले एकाहून एक अद्भुत असे अनुभव गाठीशी जोडत गेलो.... .... तुमची इछा असेल, तर मी मार्गदर्शन करू शकेन.

प्रभाकर पेठकर नवीन

In reply to by चित्रगुप्त

>>>>तुमची इछा असेल, तर मी मार्गदर्शन करू शकेन. गंडा बांधून घ्या बबन ताम्बे साहेब. फायद्यात राहाल.

बबन ताम्बे नवीन

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्तजी, तुमच्या बहुमोल सल्ल्याबद्द्ल आभारी आहे. वाईट बिलकुल वाटले नाही. उलट तुमचे मार्गदर्शन मिळाले तर मला हवेच आहे. मी केलेल्या पेन्सिल स्केचेस बद्द्ल - आमच्या ऑफीसमधे मला सहका-यांनी एक छानसे स्केच बूक भेट दिले होते. त्यावर काय काढावे असा विचार करत होतो. त्याचवेळी सुपरस्टार राजेश खन्ना यांचे निधन झाले होते. माझे ते आवडते कलाकार होते. त्यांना श्रद्धांजली म्हणून मी त्यांचे महाराष्ट्र टाईम्समधील फोटोवरून पेन्सिल शेडींग केले. त्यानंतर देव आनंद, प्राण, शम्मी कपूर , बाळासाहेब ठाकरे यांचे पण निधन झाले. मग मी विचार केला की आपल्या आवडत्या व्यक्तीमत्वांना श्रद्धांजली म्हणून त्यांची चित्रे या स्केच बूक मधे काढू या. अशा रीतीने ही सिरीज सुरू झाली. केवळ आनंदासाठी मी फोटोवरून कॉपी करून शेडींग चित्रे काढतो. पण तुमचा मुद्दा बरोबर आहे. कॉपी करणे म्हणजे कलाकारी नव्हे. स्वत:चे काहीतरी असावे म्हणून मी दुस-या एका स्केच बुक मधे काळ्या जेल पेनने काही निसर्ग चित्रे काढली आहेत. आमच्याजवळ लोहगावजवळ अजून थोडाफार निसर्ग टिकून आहे. तिकडे बसून मी ग्रामिण घरे, झाडे, डोंगर चित्रबद्ध केली आहेत. मिपावर कधीतरी टाकीनच. जलरंगाच्या क्लासला देखील मी जात होतो. पण त्यात मला अजून मार्गदर्शनाची गरज आहे. अजुन एव्ह्ढे काही जमत नाही. ऑइल पेन्टींग, अ‍ॅक्रॅलिक पेंटींग पण शिकायची इच्छा आहे. तुम्हाला मी भेटु इच्छीतो. मी पुण्यात असतो. आपला फोन नंबर मिळेल काय ? - बबन तांबे

चित्रगुप्त नवीन

In reply to by बबन ताम्बे

तुम्हाला मी भेटु इच्छीतो. मी पुण्यात असतो. आपला फोन नंबर मिळेल काय ?
अवश्य. परंतु सध्या मी अमेरिकेत आहे, नोव्हेंबरमधे भारतात परतेन. मी दिल्ली आणि इन्दौर मधे रहातो. सध्या सर्व फोन बंद करून ठेवलेले आहेत. बाकी मिपाच्या मार्फत चित्रकलेचे कसे करता येईल हे बघतो. या दरम्यान तुम्ही तुमची लोहगाव वगैरेंची चित्रे टाका. माझे यापूर्वीचे चित्रकलेवरील लेख वाचले आहेत का? माझे मिपावरील लेखनः http://www.misalpav.com/user/9160/authored

हुकुमीएक्का नवीन

सर्व पेन्सिल शेडिग्स अतिशय सुंदर आहेत.

इन्दुसुता नवीन

चित्रे आवडली. अवांतर : चित्रगुप्त खरेच गंडा बांधणार असतिल तर आम्हीही दोन्ही पायांवर तयार आहोत !!

सुबोध खरे नवीन

In reply to by इन्दुसुता

चित्रगुप्त साहेब आणि बबन तांबे साहेबाना एक विनंती चित्र कसे बघावे आणि समजावे( आस्वाद आणि आनंद कसा घ्यावा) याचे धडे दिलेत तर उपकृत होऊ. ( या जन्मी तरी चित्रकला जमण्यातली नाही -उजवा मेंदू अधू असल्याने). जसे वृक्ष पाने फुले कशी पहावी याचे प्राथमिक धडे नूलकर साहेबांनी दिले तसे

प्रभाकर पेठकर नवीन

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे साहेब, अज्ञानात सुख असते. आज मी चित्रे पाहतो आणि वाखाणतो कारण मी चोखंदळ अभ्यासक नाही. एकदा ते ज्ञान आले तर किती कलाकृतींमधून मी आनंद मिळवू शकेन शंकाच वाटते. ह्या साठी अजून एक उदाहरण देईन ते असे की 'मला कांही सांगायचे आहे' नाटकात नायिकेला रक्ताचा कर्करोग होतो. आई डॉक्टर असल्याकारणाने तिला ते समजतं शिवाय आपली मुलगी हळू हळू मृत्यूसमीप जाते आहे हेही जाणवतं. त्या मानाने कुटुंबातील बाकीच्या माणसांना वैद्यकिय ज्ञान नसल्याकारणाने ते नॉर्मल असतात, आई सर्वात जास्त दु:खी असते. तेंव्हा आईच्या तोंडी एक वाक्य आहे. 'ज्ञानाने माणूस कमकुवत होतो.' असो. तुम्ही व्यक्त केलेली इच्छा आणि वरील प्रसंगाचा कांही संबंध नसेलही. नुसतेच प्रत्येक चित्राला वाहवा करण्यापेक्षा त्यातील खाचाखोचा माहिती असतील तर कदाचित उत्तम कलाकृती, जाणकाराला, जास्त आनंद देऊन जाईल. तरीपण, रसिकापेक्षा परिक्षकाला मान जास्त आणि आनंद कमी मिळत असावा.

बबन ताम्बे नवीन

In reply to by सुबोध खरे

श्री. सुबोध खरे साहेब, याबाबतीत श्री. चित्रगुप्त साहेब आपल्याला चांगले मार्गदर्शन करू शकतील. मी अजुन या क्षेत्रात अ‍ॅप्रेंटीस आहे. :-) -बबन तांबे (क्रु. मला साहेब संबोधू नये ही विनंती. :-) )

सुधीर नवीन

सुरेख! कला आहे हो तुमच्या बोटात!

मैत्र नवीन

फार छान काढली आहेत चित्रे.. त्यातही प्राण आणि बाळासाहेबांचे जास्त आवडले. या चित्रांमध्ये मधुबालाच्या चित्रापेक्षा जास्त सफाई आहे. आणि मला अवघड वाटणारा एक भाग - डोळ्यांपेक्षाही केस अतिशय क्लिष्ट आणि किचकट असतात पेन्सिल शेडिंग मध्ये ते तुम्ही अतिशय अप्रतिम काढले आहेत. त्यांचा पोत, रंगछटा, वळणे, विरळपणा फार छान जमला आहे. उदा बाळासाहेबांचे केस आणि दाढी, राजेश खन्नाचे केस, मधुबालेचेही छानच आले आहेत. एके काळी हा छंद होता आणि केवळ माधुरीचेच चित्र काढत होतो :) त्यामुळे तुमच्या कष्टांची कल्पना आहे.

बबन ताम्बे नवीन

In reply to by मैत्र

हो, केशरचनेत स्किल्ड झालोय. अजुनही तुम्ही माधुरीचे चित्र काढु शकता. की त्या नेने झाल्यानंतर तुमचा इंटरेस्ट संपला ? *lol*

मैत्र नवीन

In reply to by एस

दोन दोन फुटांची काढलेली माधुरीची तीन चित्रे लोकांनी पळवल्यावर परत काढली नाहीत.. एकदा कॉलेजच्या प्रदर्शनातून चोरले गेले. एकदा एक मित्र घरी दाखवायला घेऊन गेला तिथे गायबले. शेवटी एका जवळच्या मित्राला उत्तम यशाबद्दल भेट दिले तर त्याने ढगळपणा करून हरवले. मग काही परत मूड झाला नाही. नेनेंमुळे काय दु:ख.. सॉलिड देखणा माणूस आहे आणि अजूनही लय भारी दिसतात दोघंही.. हे पहा. या अवांतराबद्दल क्षमस्व.. maadhuri aani dr nene

चिगो नवीन

In reply to by प्रभाकर पेठकर

हम्म्म! माझ्यापेक्षा डिझर्व्हिंग दिसतोय खरा!
ठॉऽऽ ठॉऽऽ ठॉऽऽ.. जबरदस्त काका. =)) अज्ञानात सुख असतं हो, काका.. तिला तुमच्याबद्दल कळलं तर तिची पण "सुझेन" व्हायची.. ;-)

बॅटमॅन नवीन

In reply to by मैत्र

मस्त जोडा ओ. बाकी नेने युरोपियन वाटतोय एकदम. माधुरीबद्दल काय बोलणे????????? सोडाच....

बबन ताम्बे नवीन

In reply to by मैत्र

श्री. मैत्र, अतिशय सुंदर फोटो. सुंदर माणसांचे फोट देखील सुंदरच येणार. आपल्या मराठीत याला लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतात.

बबन ताम्बे नवीन

हुकुमीएक्का, खटपट्या ,अत्रुप्त आत्मा , इन्दुसुता,सुधीर,अधिराज,इस्पीकचा एक्का ,मैत्र , सर्वांना धन्यवाद.

मराठे नवीन

पेन्सिल शेडिंग हा प्रकार शिकायची मला फार इच्छा होती पण अजून जिथे बेसिक शेप काढायचीच मारामार तिथे शेडिंग का कप्पाळ करणार. आम्ही म्हणजे हंस काढायला सुरूवात करून शेवटी बदक म्हणून खपवणार्‍या वर्गातले. कधी कधी तुमच्यासारख्यांची कला पाहून आपणही काहीतरी काढावं म्हणून पेन्सिल हाती घेतो, पण मनासारखं न जमल्यामुळे पुन्हा उत्साह मावळतो.

प्रभाकर पेठकर नवीन

In reply to by मराठे

पुलं स्वतःच्या चित्रकलेविषयी म्हणाले होते, 'शाळेत असताना आम्हाला आमच्या चित्रकलेच्या शिक्षकांनी आंब्याचे चित्र काढायला सांगितले होते. मी पानाच्या मध्यावर एक ठिपका वाटावा असे चित्र काढले. नंतर त्याकडे पाहता मला ते बरेच लहान वाटल्यामुळे मी त्या खाली लिहीले 'बाल्यावस्थेतील आम्रफळ'' ह्या निमित्ताने बबनराव, 'पुलं'चं एक छानसं चित्र काढा अशी विनंती करतो.

बॅटमॅन नवीन

In reply to by प्रभाकर पेठकर

क्या बात. पेठकरकाकांच्या विनंतीला आपलाही दुजोरा! तांबेसाहेब, येऊद्या पुलंचं एक फर्मास चित्र!!

बबन ताम्बे नवीन

In reply to by बॅटमॅन

पु. लं चं चित्र काढणारच आहे.सद्ध्या स्मिता पाटीलचे पोर्ट्रेट काढत आहे. ते झाले की पुल च !

आयुर्हित नवीन

सर्वच फोटो चांगली आलीत पण शम्मी कपूर १नं जमलाय. मेहेनतीला सलाम व पुढिल कार्यास शुभेच्छा!

चौथा कोनाडा नवीन

ताम्बेसाहेब झक्कास चित्रे ! सर्व शेडींग हुबेहुब आलेली आहेत. मलातर शम्मीकपुरचे खुपच आवडले. गणपाभाऊनी पण बाळासाहेब ठाकरे एकदम सहीच टचप केलेत ! तुमाला लेखणी बरोबर कुंचलाही वश झालेला दिसतोय ! आमचीपण फर्माइश आहे. पुजा बेदीचे शेडींग काढा. आम्ही फॅन आहोत पुजाचे !

चित्रगुप्त नवीन

कॉपी करण्यासाठी चित्राची निवड करताना ते कुणाचे आहे, यापेक्षा ते कसे आहे, हे बघितले पाहिजे. उदाहरणार्थ खालील फोटो बघा: .., m असे फोटो निवडण्यातून कॉपी करताना आपले कौशल्य पणाला लावावे लागते, आणि त्यातून जास्त प्रगती होत जाते.

मृत्युन्जय नवीन

उत्तम रेखाटने. आपल्याला चित्रकला अज्याबात जमत नाय. त्यामुळे तुमची चित्रे सुंदरच आहेत असेही म्हणेन. पण तरीही देव आनंदचे चित्र एवढे नीट नाही जमलेले. प्राण बेस्ट.

चौथा कोनाडा नवीन

ताम्बेसाहेब, चित्रगुप्त यांनी दिलेले दुसरे चित्र, ओठांत सिगरेट धरलेला वयस्क ( ब्ल्याकअ‍ॅण्ड्व्हाईट मधले) जबरदस्त आहे. घ्या काढायला, तुम्हाला भन्नाट जमेल. बरं, आपलं पुजा बेदीचं घेतलं की नाही काढायला ?

बबन ताम्बे नवीन

चौ.को. साहेब, नक्की तुम्ही सुचविलेली चित्रे काढणार.

चौथा कोनाडा नवीन

In reply to by बबन ताम्बे

बबन तांबे साहेब, बऱ्याच दिवसात तुमच्या कलाकृती बघण्याचा योग आलेला नाही. नवीन स्केचस असतील तर नक्की पोस्ट करा.