मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बिघडलीये काच!

नीधप · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
खिडकीची काच बिघडलीये. दोन प्रतिबिंबं दिसतात हल्ली. एक साधंच एक डोळे वटारणारं. चोरून आणलेल्या चांदीच्या देवाच्या डोळ्यांसारखे माझेच डोळे काचेत बसून रहातात. मी आक्रसत रहाते स्वतःला. त्याचा फोन.. एखादी धुंद आठवण.. एक गम्मतनाच.. जुनेपाने कपडे घालून वावर.. देहामनाची तगमग... सगळं सगळं त्या डोळ्यात टिपलं जातं. मी आक्रसत रहाते.. चांदीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात खरंच बिघडलीये ही काच बदलली पाहिजे! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

वाचने 6713 वाचनखूण प्रतिक्रिया 29

नीधप Wed, 10/15/2008 - 22:54
मला नाही वाटत. प्रतिबिंब हा पण चुकीचा शब्द नाहीये. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

बेसनलाडू Wed, 10/15/2008 - 22:58
आरशातली ती प्रतिमा आणि पाण्यातले, तळ्यातले इ. ते प्रतिबिंब असे (माझे) भाबडे शास्त्रीय सामान्यज्ञान; त्यामुळे प्रतिबिंब हे मिस्नोमर् वाटले. असो. तुम्हांला काय पटते त्यानुसार होणारे लेखनच महत्त्वाचे. (सुस्पष्ट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/16/2008 - 14:57
'बिंब' आणि 'प्रतिबिंब' म्हणजे 'मुळ रुप' आणि त्याचे, तस्सेच, 'भ्रामक रुप'. त्यामुळे 'बिंबाच्या' कुठल्याही (पाण्यातील किंवा आरशातील) 'भ्रामक रूपाला' प्रतिबिंब म्हणता येईल. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

मुक्तसुनीत Wed, 10/15/2008 - 22:56
कविता आवडली. तुमच्या आधीच्या वाचलेल्या कवितेसारखीच , मनस्वी. "चोरून आणलेल्या चांदीच्या देवाच्या डोळ्यांसारखे" ही शब्दयोजना विलक्षण वाटली - अनेक अर्थांच्या शक्यता असणारी. "काच बदलली पाहिजे" या अनुभवाची जातकुळी एका जुन्या वाचलेल्या कवितेसारखी वाटली - "आताशा मी नसतेच इकडे , माझी ये जा असते तरी". दोन्हीतील शब्द साधे - अगदी म्याटर ऑफ फॅक्ट - आहेत , पण त्यात तीव्रतेने वाटलेला अनुभव साठवला आहे.

चतुरंग Wed, 10/15/2008 - 23:12
चोरून आणलेल्या चांदीच्या देवाच्या डोळ्यांसारखे ही एकदमच वेगळी कल्पना! टोकदार अनुभव शब्दबद्ध करण्याची हातोटी आवडली. चतुरंग

नीधप गुरुवार, 10/16/2008 - 00:20
एक कविता आहे ज्यात देवळातल्या देवाआडच्या कारभारांच्या संदर्भात वर्णन होतं. त्यात चांदिचे देवाचे डोळे चोरण्याचं रूपक संपूर्ण वापरलं होतं. इथे मला माझेच डोळे ते वटारून बघणारे थंड चांदीचे आणि दयामाया नसलेले वाटायला लागले.. म्हणून ते तसं आलंय. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

प्राजु गुरुवार, 10/16/2008 - 00:27
एकदम वेगळी आहे कविता.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मुक्तसुनीत गुरुवार, 10/16/2008 - 01:37
The Window pane is damaged. Lately there appear to be two reflections. One is the normal one the other, with eyes protruding. Like the stolen eyes of a silver idol. My own eyes sit in the glass. I keep diminishing myself. His phone call .. An intoxicated memory A fun jig Wandering in old rags The anxiety of the mind-body Those eyes absorb everything. I keep diminishing The silvery eyes keep protruding Really The Window pane is damaged. Should replace it !

In reply to by मुक्तसुनीत

नीधप गुरुवार, 10/16/2008 - 15:17
चांगलंय पण काही शब्द खटकले. म्हणजे जे मी लिहिलंय तोच अर्थ भाषांतरात येत नाहीये म्हणून हं. सिल्व्हर आयडॉल म्हणजे चांदीची मूर्ती नाही तर दगडाच्या मूर्तीवर बसवलेले चांदीचे डोळे. वॉन्डरींग इन ओल्ड रॅग्ज.. वॉन्डर जमत नाहीये अस वाटतं. घरात एकटे असताना आपण कसेही नी कुठलेही कपडे घालून मोकळेपणाने वावरतो.. तो हा वावर आहे. असो.. जे तुम्हाला पटलं ते तुम्ही लिहिलंत. आणि त्याबद्दल मी काही म्हणू शकत नाही. तेव्हा पटलं नाही तर सोडून द्या. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

मुक्तसुनीत गुरुवार, 10/16/2008 - 19:20
अलिकडेच मिपावर गाजलेल्या जिब्रानच्या कवितेच्या भाषेत बोलायचे तर "तुमची कविता ही तुमची नसते" :-) प्रत्येक वाचकाच्या मनात ती त्याचे/तिचे संदर्भ लेऊन नवा जन्म घेते ... तुमची कविता मला अमुक एका रीतीने "दिसली". कुणाला ती अजूनही कशी दिसेल. त्यामुळे पटणे- न पटणे हा भाग थोडा गैरलागू होतो. बाकी मी भाषांतर करत असतानाच हा एक "प्रमाद" आहे याची जाणीव ठेवून केले आहे. काहीही झाले तरी मूळ कवीचे इंटरप्रिटेशन सर्वाधिक महत्त्वाचे ; याची मला जाणीव आहे.

In reply to by मुक्तसुनीत

नीधप गुरुवार, 10/16/2008 - 19:40
प्रमाद मुळीच नाही.. सन्मान आहे. शक्यता अनेक आहेत. मी माझ्या डोक्यातले अर्थ सांगितले. तुम्हाला ते कसे दिसले हे वेगळंच ना.. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

धम्मकलाडू गुरुवार, 10/16/2008 - 14:03
मला ही कविता फार काही कळली नाही. त्यामुळे लगेच ती पहिल्या दर्जाची असल्यावर शिक्कामोर्तब झाले. पण शब्दांचा आणि प्रतिमांचा हा गंमतनाच उच्च आहे. आपण काही तरी भारी वाचतो आहोत असे सारखे वाटत असल्यामुळे ही कविता केवळ पहिल्या दर्जाची न राहता अगदी महत्त्वाची झाली. एकंदर काय जी कविता मला कळत नाही तरी भारी वाटते ती पहिल्या दर्जाची आणि महत्त्वाची! धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

मुक्तसुनीत गुरुवार, 10/16/2008 - 19:24
>>> मला ही कविता फार काही कळली नाही. त्यामुळे लगेच ती पहिल्या दर्जाची असल्यावर शिक्कामोर्तब झाले. पण शब्दांचा आणि प्रतिमांचा हा गंमतनाच उच्च आहे. आपण काही तरी भारी वाचतो आहोत असे सारखे वाटत असल्यामुळे ही कविता केवळ पहिल्या दर्जाची न राहता अगदी महत्त्वाची झाली. >>>एकंदर काय जी कविता मला कळत नाही तरी भारी वाटते ती पहिल्या दर्जाची आणि महत्त्वाची! >>>"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" >>>"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?" चला , या निमित्ताने कुठेतरी कवितेचा ओनामा घडायला सुरवात तर झाली :-) हेही नसे थोडके. मिसळपाववर थोडे रमायला झाले तर कुणास ठावे, कविता-बिविता (आणि इतरही काही गोष्टींच्या बाबतीत) काहीतरी पदरात पडून जाईल ! आणि कुणी सांगावे , मूळचा कडवटपणा आणि उपहासही कमी होईल.

In reply to by मुक्तसुनीत

धम्मकलाडू गुरुवार, 10/16/2008 - 19:34
चला , या निमित्ताने कुठेतरी कवितेचा ओनामा घडायला सुरवात तर झाली Smile हेही नसे थोडके. मिसळपाववर थोडे रमायला झाले तर कुणास ठावे, कविता-बिविता (आणि इतरही काही गोष्टींच्या बाबतीत) काहीतरी पदरात पडून जाईल ! आणि कुणी सांगावे , मूळचा कडवटपणा आणि उपहासही कमी होईल.
हाहाहाहा.. तुमच्यासारखी विचक्षण व्यासंगाचे भारूड टाकणारी मंडळी इथे असल्यावर अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही.Smile "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by मुक्तसुनीत

धम्मकलाडू गुरुवार, 10/16/2008 - 19:43
चालायचेच. तो शतकी प्रतिसाद तेवढा बदलून टाकायला सांग. आमचा तुमच्याविषयीचा आदर तसूभरही कमी झालेला नाही. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

मुक्तसुनीत गुरुवार, 10/16/2008 - 19:45
आदरणीय धम्मकलाडू :-) तुम्हाला कुठला प्रतिसाद इतका बोचतो तर तुम्हीच सांगा की उडवायला! आपण पाहतोच आहोत कुणाचे प्रतिसाद उडताहेत इथून ते :-) कसे म्हणता ?

In reply to by मुक्तसुनीत

धम्मकलाडू गुरुवार, 10/16/2008 - 19:53
आम्हाला कशाला बोचणार! आमचे तर मनोरंजन होते आहे तो वाचून. अहो पडतो कधी कधी व्यासंग कमी. होतात चुका. पण त्या वेळीच झाकायला निस्तरायला नकोत का? म्हणून आम्ही तो शतकी प्रतिसाद उडवायला नाही बदलायला सांगितले. नव्हे सुचवले. चला टाटा! "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

लिखाळ गुरुवार, 10/16/2008 - 16:42
कविता आवडली. देवाचे चांदिचे डोळे तर फार मस्त ! --लिखाळ.

नीधप गुरुवार, 10/16/2008 - 18:45
प्रतिक्रिया देणार्‍यांचे, भाषांतर वा विडंबन करणार्‍यांचे सगळ्यांचेच आभार. :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

कोलबेर गुरुवार, 10/16/2008 - 21:04
वेगळी कविता आवडली. चांदीच्या देवाच्या डोळ्यांसारखेहेच देवाच्या चांदीच्या डोळ्यांसारखे असं लिहीलं असतं तर बरचसं कन्फ्युजन टळलं असतं असं वाटतं. मला देखिल पहिल्यांदा वाचताना (फक्त डोळे नसुन) संपूर्ण देवच चांदीचा आहे असं वाटलं.