कट्टा: दादर पूर्व ऋषी हॅाटेल
व्हेज प्लॅटर येतेय तोवर बेसनलाडू यांचे आगमन झाले. नंतर त्यांच्याशी गप्पा रंगल्या. मिपाचे जुने सदस्य असल्याने 'तेव्हाचं मिपा आणि आताचं मिपा' ही नेहमीचीच चर्चा पुन्हा नव्याने झाली. योगी९०० यांनी हॉटेलसमोर कट्टेकर्यांची वाट बघताना झालेल्या काही गमती सांगितल्या.
गप्पांत गुंग प्रास, योगी९०० व बेसनलाडू (डावीकडून उजवीकडे)
थोड्याच वेळात विमेकाकांचे आगमन झाले. त्यांचे आगमन झाल्यानंतर पुर्वीचं ऋषी आताचं ऋषी यावर थोडी चर्चा झाली. दादरमध्ये हिंदीत बोलणार्या वेटरशी लोक मराठीत न बिचकता बोलतात याचं अपार कौतुक अर्थातच मला वाटलं मग इथे मराठीतच बोलतो, बोलत नाही काथ्याकूट होऊ पाहत होता पण तो काही फार काळ तग धरु शकला नाही.
प्रास, योगी९००, बेसनलाडू, विमे व किसन शिंदे (डावीकडून उजवीकडे)
'असारे खलु संसारे नास्ति श्वशुरमंदिरसमसुखम्' या उक्तीचा प्रत्यय यावा की काय अशा ढंगात किसन शिंदे यांनी काही अपरिहार्य कारणास्तव कट्टेकर्यांचा जरा लवकर निरोप घेतला.
त्यानंतर मेन कोर्स आला. त्यात मग रोटी/ पोळी/ फुलके डावीकडे आणि भाजी उजवीकडे अशी का वाढतात यावर सुरु झालेली चर्चा डावं-उजवं पान कसं आणि का वाढतात इथवर पोचून थोडी थांबली. लोक मन लावून जेवू लागले, पण काहीच काळ!! पुन्हा काही ना काही गप्पा सुरु होत्याच. आयपीएल, मोदी, राजकारण असे विषय निघत होते. मध्येच कोणीतरी मिपावर जगप्रसिद्ध असलेल्या रानडे रोडची आठवण काढली.
प्रास, योगी९००, बेसनलाडू, विमे व सूड (डावीकडून उजवीकडे)
जेवण उरकून बाहेर आईस्क्रीमचा एकेक स्कूप हादडला गेला. आमच्या गप्पा चालूच होत्या, तेवढ्यात योगी९०० यांनी निरोप घेतला. शेवटी मी, विमे आणि प्रास यांनी दादरच्या रस्त्यांवर शतपावली करत करत शेवटी माटुंगा स्थानकापाशी एकमेकांचा निरोप घेऊन मार्गस्थ झालो.
तळटीपः कट्टेकर्यांनी आपले चार शब्द लिहून धाग्याची शोभा वाढवावी ही विनंती.In reply to व्वा व्वा... मज्जा करा by सुहास झेले
In reply to झेलेआण्णा आपल्याला तर एकच by llपुण्याचे पेशवेll
In reply to ह्या चार मधल्या एका ग्रूपात by सूड
In reply to अरे योगी बाबा कसे आहात ? by मदनबाण
In reply to म.बा.. by योगी९००
In reply to कट्टा झकास... by योगी९००
एक वयस्कर सद्गॄहस्थ माझ्यासारखीच कोणाची वाट पहात आहे. थोडे हायसे वाटले आणि त्यांच्याकडे गेलो अणि डायरेक्ट "मिसळपाव?". असे विचारले. ते दचकून मागे सरकत म्हणाले " नको नको मला नको...".=)) =)) कहर झाला बाकी वृतान्तही झकास , धमाल केलीत मस्त
In reply to हाहा by स्पा
In reply to कट्टा झकास... by योगी९००
In reply to कट्टा झकास... by योगी९००
In reply to कट्टा झकास... by योगी९००
In reply to कट्ट्यासाठीच काय पण कुठल्याही by राजेश घासकडवी
In reply to हम्मम् by योगी९००
In reply to हम्मम् by योगी९००
त्यामुळे माऊ आहे असे वाटून बरेचसे बोकोबा व्यनी करायचे आणि मी एक ढाणा वाघ आहे हे समजल्यावर शिव्या घालायचे.हा हा हा... *biggrin* बाकी वृत्तांत मस्तच.
In reply to हम्मम् by योगी९००
माझे पुर्वी खादाडमाऊ हे मिपानाव होते. त्यामुळे माऊ आहे असे वाटून बरेचसे बोकोबा व्यनी करायचे आणि मी एक ढाणा वाघ आहे हे समजल्यावर शिव्या घालायचे.हा हा हा... या बोकोबांचे किस्से येऊ द्यात थोडे. त्यांनी कशा मिशांना ताव देऊन नजरेत मार्दव आणून पाहिलं.... त्यांच्यावर डरकाळी फोडल्यावर कसे शेपटी घालून पळून गेले वगैरे वगैरे जरा मसाल्यासकट टाका की.
In reply to माझे पुर्वी खादाडमाऊ हे by राजेश घासकडवी
In reply to कट्ट्यासाठीच काय पण कुठल्याही by राजेश घासकडवी
In reply to छान! by दिनेश सायगल
In reply to मस्तच झाला की कट्टा. by धन्या
In reply to >> यात आमच्या ओळखीचा एक by सूड
In reply to >> यात आमच्या ओळखीचा एक by सूड
In reply to या निमित्ताने आमच्या by विश्वनाथ मेहेंदळे
मी