सुरेsssssssssशं...(अण्णा!)..यिड्ली-वाला!
लेखाचं..हे शीर्षक म्हणजे,आमच्या मद्राशी पुरोहितांपैकी एका बड्या प्रस्थाची त्या सुरेश-यिड्लीवाल्याला मारलेली हाक आहे. ती हाक तशी नुसती लिहून ऐकवता येणार नाही,ती ऐकवूनच लिहायला पाहिजे,अशी आहे.हा आमचा मद्राशी शास्त्री...तिथून आपला (बालाजी-सारखा)भारदस्त देह घेऊन जाता..जाता त्याला नेहमी ती हाक मारतो.सुरेsssssssssशं..,यंडगुंडो गुलिकुंद्डो??? मग तो सुरे..शं'ही त्याला तसल्याच वेड्यावाकड्या जिल्ब्यां-मधे काहितरी उत्तर देतो.मग आमचा हा तामिळ डॉन ( *biggrin* ) मद्राशी-शास्त्री आपला तो बालाजी-देह घेऊन,सुरेश'च्या गाडी मागे पाण्याच्या पिंपाजवळ उभा र्हातो,आणि सुरेशं त्याला "शा...स्त्री,यंडौड्गोड्गुडो...यिड्ली!" असं म्हणून त्याच्या हतात,गरमा-गरम यिड्ली-सांबारची डिश ठेवतो. मग आमच्या या मद्राशी-शास्त्री'चे मनसोक्त 'होई'पर्यंत त्या दोघांच्या गप्पा त्या रम्य तामिळीत चालतात.(आणि त्या तिथे ऐकायला अजूनच रम्य-मज्जा येते.) मग जरावेळानी मद्राशी-शास्त्री'ची 'नजर' माझ्याकडे पडते.आणि बशीतल्या यिड्लीला-सांबारात चमच्याने मौत-देत तो मला विचारतो...
मद्राशी-शास्त्री:-आंsssssss,शाsssस्त्री..यिदर कैसे आज?'स्लॅक' है क्या??? (दुष्ष्ष्ट! :-/ )
मी:-नै जी!..आज सुबे का काम खतम हो गया,अब दिनभर रिकामा है।
मद्राशी-शास्त्री:-आ..आ..आ..आ...(हा त्याच्या हसण्याचा आवाज बरं का! तामिळ्यांच्या भाषेतच काय?पण हसण्याच्या उच्चारी आवाजात सुद्धा काही स्वराक्षरव्यंजनं,अस्तित्वातच नाहीयेत!म्हणूच त्यांचा ह्हा..ह्हा..ह्हा..ह्हा..! -हा हसण्याचा आवाजसुद्धा, आ..आ..आ..आ..! असा..घश्यात काडी अडकल्यासारखाच येतो.) आणि मग मी 'मोकळा-सापडल्याच्या' आनंदात मला तो दुपारच्या कामाची ऑफर देतो...बिज्जी नै ए..तो चलो दोपर को अमारे सात..वानव्डी मे नव्ग्र का जप और हवन ए! बओत पैसा मिलेगा...आते क्या? (ही मद्राश्यांची 'शेवटाला-गाजर' दाखवण्याची सवय,आपण जसा 'पहिल्यांदा'च-मुळा' दाखवतो..तश्शीच आहे!)
मी:-तुम्हारे बहोत पैसे मे,आज कितना रुपैय्या मिलने वाला है!!!? (है..य्या! =)) जय भवानी! जय शिवाजी! =)) )
मद्राशी-शास्त्री:-(परत)..आ..आ..आ..आ..,तुम बओत अ(ह)रामी है साला..चलो,देंगा तुमको..जित्ना चाईये उत्ना! दोपर को,रैट्ट २ बजे मेरे गर को आव!
मी:- हां जी..आता है जी! ( *biggrin* )
मद्राशी-शास्त्री:- चलो..अब तंबाकू निकालो! (हलकट मेला!!! *biggrin* )
असला काहिसा संवाद होतो,आणि माझी गाडी परत सुरेशच्या गाडीकडे वळते.मग मी नेहेमीप्रमाणे पहिलं, १ डब्बल यिड्ली (हवं तेव्हढं) सांबार घेऊन संपवतो.आणि नंतर तिथला माझा अत्यंत अवडता बट्टाट्टावडा घेऊन तेव्हढ्याच सांबारात परत उडवतो. आणखि जागा र्हायली असेल तर मुखशुद्धीसाठी डाळवडा/चटणी! मग पुढच्या एका पेश्शल ठिकाणी "चाsss!",किंवा मूड आला तर पूर्वीच्या भवानी केटरर्स्स कडची काssssपी! (२ वर्षापूर्वी ती चांगली मद्रासी मेस तिथनं गेली राव! :( ) आणि अत्ताच्या त्याच्या समोर असलेल्या दुसर्या एका तसल्याच मेसवरची काssssपी! नंतर कँम्पातलं बर्फावरचं थंडग्गार पान(आपल्या समोर बर्फावर ठेऊन लावलेलं!) मग जरावेळ ते हिमालयी पान नीट चघळून..."झालं!" ( ;) ) ...की तसाच पुढे शिवाजीमार्केटातला इराणी चहा,आणि त्याच्यावर एक कडक डबलबार लावला..की कँम्पातनं घरापर्यंत कसं...फुलपाखरासारखं तरंगत..तरंगत..यायला मिळतं.हा सगळा कार्यक्रम ज्या आमच्या मन-पसंत यिड्ली,आणि प्रामुख्यानी सांबारा'मुळे होतो,त्या सुरेsssssssssशं च्या या येकनंबरी यिड्ली-सांबारच्यागाडीची आणि तिथल्या पदार्थांची,आधी...ही एक नुसती फोटोरूपी झलक पाहू.
१) यात 'रंगीत छत्री' पासून पुढे वाढलेलं जे भक्तगणांचं कोंडाळं दिस्तय ना..ती सुरेsssssssssशं च्या गाडीची जागा!
२) ही सुरे...शं'ची गाडी! फक्त यात दिसतोय तो सुरेश नाही,त्याचा हेल्पर आहे.सुरेशंचा या फोटोत फक्त-हात आहे! ;)
३)यातही पाटिआड दिसतोय..तो सुरेशंचा भाऊ आहे.आता खुद्द सुरेश हा दुसरा हायफाय श्टॉल चालवत असल्यानी या मूळपीठावर कदिमदीच दिसतो.पण कधी गेलात तर सहज ओळखाल! बघताक्षणीच कळतं,हा अण्णा आहे. कुरळे(मॅगीनुडल्स)केस,कानात सोन्याच्या रिंगा,कपाळाला त्यांच्या श्टाइलचं गंध (आणि घामही! ;) )
४) आणि ही'च ती भट्टी! *biggrin* सांबार रटारटा तापवणारी!
एक कॅन-'खाली'...एक कॅन-'वर'..।
पिण्यापूर्वी जमिनीत..पिल्यानंतर-वर॥ *dance4*
५)ह्ये आमचं लाडकं सुरेssssssशकडचं यिड्ली सांबार! *yahoo*
६)आनी ह्यो त्याच सांबारातला बट्टाट्टावडा...वरनं निस्तेज वाटला,तरी आतल्या आलं/लसूणाच्या (आता..क्वचितच मिळणार्या) मसाल्या मुळे-दणका उडवणारा!
७) हे आमचं बर्फा-वरचं *biggrin* पान!!!
८) ह्यो शिवाजीमार्केटातला श्टाइल-सह-इराणी चहा!
९) णंतरच्या डबलबार तंबाखूचा फोटू..काहि अ परिहार्य कारनास्तव क्याण्सल करनेत आला आहे!
=)) ... =)) ... =))
अपोलो टॉकिजकडून (रास्तापेठ) के.ई.एम.हॉस्पिटलकडे जाणर्या रस्त्यावर उजव्या बाजुच्या..पहिल्याच गल्लीत-आत,हा आमचा सुरेsssssssssशं-यिड्लिवाला असतो. तो २/३ गल्ल्यांचा सगळा भागच त्यांचा आहे. आणि त्या गल्लीच्या एका टोकापासून ते अय्यप्पा देवीच्या पुढे..चौकापर्यंत अनेक इडली-सांबार-वडा सांबार विकणारे स्थिरावलेले आहेत.त्यांच्यापैकी ७५ ट्क्के गाड्या शुद्धमराठी-माणसांच्या आहेत.पण जशी त्यांची कॉफी(उच्चारी-काsssपी!) आपल्याला जमत नाही,तसेच त्यांचे काहीच आपल्याला जमत नाही,हे या सगळ्या गाड्या सिद्ध करतात.एव्हढच कशाला? उरलेल्या २५ टक्क तामिळ्यांपैकी सुद्धा ह्यो आमचा सुरेsssssssssशं सोडला तर एकाकडेही सांबाराची ती अस्सल चव आता (अस्तित्वातच) उरलेली नाही,हे ही खरं आहे. इतकच काय? इडलीलाही त्यांन्नी,महागाईच्या नावाखाली गेल्या १५ वर्षात भरपूर 'सोडा'...मारलेला आहे.अश्यात हा आमचा सुरेsssssssssशं म्हणजे क्या केहेने!!!? त्याच्या कडचं सगळ्यात काही अस्सल असेल,तर त्यानी आजतागायत जशीच्यातशी ठेवलेली त्यांच्या पदार्थांची चव आणि भाव! महागाई..महागाई..कित्तीही जरी असली,तरी मूलभूत गोष्टींमधे फरक करायचा नाही,म्हणजे दुष्काळातही आपलं गिर्हाइक ठाम रहातं. हे खर्या अर्थशास्त्राचं गणित त्याच्या रक्तापेक्षा मला वाटतं,त्याच्या स्वभावधर्मामधे असावं.(तिथल्या त्याच्या'च जातभाइंनी हे सिद्धही केलेलं आहे!)माझी आणि त्याची तोंडओळख सुद्धा नाही.किंवा मी त्याचं रोजच गिर्हाइक सुद्धा नाही. मी कधिही म्हणजे..अगदी त्या भागातून गेलो,तरी सुद्धा "---तिकडे गेलो की ---तिथे जायला(च) पाहिजे" असलं श्रद्धाळू गणितही ठेवलेलं नाही.
मला सुरेशच्या कडच्या सांबाराची अचानक तहान लागते,हेच माझं तिथे जाण्याचं खरं कारण आहे. माझ्यालेखी त्याच्याकडे मिळणार्या सांबारच्या चवीची तूलना ही एखाद्या नि'रव शांतता देणार्या देवालयासारखी आहे. तिथे जसं तो भगवंत आणि आपण हे श्रद्धेचं निस्सिम अधिष्ठान काम करून जातं,तसं या सुरेsssssssssशंच्या गाडीवरचं सांबार आणि मी ..त्याच्या बरोबरीच्या इडली आणि वड्यांबरोबर डायरेक स्वर्गात जातो.अश्यावेळी इहलोक..हे स्वर्गात जाण्याचं (काहि क्षण का होई ना!? ;) ) साधन आहे,या (खर्या-आध्यात्मिक :D ) सत्यावर माझा विश्वास बसतो.
ते गरम..गरम सांबार पिताना काय काय होतं म्हणून सांगू??? आहाहाहाहाहा...!!! एकदा का ती बशी तोंडाला लागली आणि हळूहळू (परंतू नॉनश्टॉप ) ते सांबार प्यायला लागलो..की डोक्यावरची केसंपण त्याच गतीनी हळूहळू उगवणार्या गवतासारखी वर...वर..येऊ लागतात! आणि..मस्ताकातून थंड पाण्याचा प्रवाह अंतर्मनापर्यंत जात असल्याचा भास होतो. ब्रम्हचर्य..नावाच्या निरर्थक वाळवंटातून नाइलाजास्तव मार्ग-क्रमणा करणार्या युवकास,अचानक एखादी....(जाऊ द्या..लोक हो,अनुभव-शून्य जातकास,त्या प्रांतातील-सत्याची,सम्यक भाषाSप्रचीती येइलच..असे नाही!..नाही का?) ................................................असो!!!
त्या सांबारात तो काय वापरतो? आणि काय नाही? हे विचारायच्या भानगडीत मी आजपर्यंत पडलेलोही नाही,आणि पडणारंही नाही.फक्त ती गाडी ४० वर्ष जुनी आहे,अशी माहिती मला तिथेच एकदा कानावर आली होती.
एक मात्र खरं त्याच्या गाडीवर त्या एरियातलं सगळं पब्लिक अगदी रतीब लावल्यासारखं येतं. सगळं म्हणायचं,कारण तो एरिया ख्रिश्चन/मोमिनांपासून..ते (हल्लीचे) भय्ये/मराठी लोकांपर्यंतचा,असा सर्वांचा आहे. नाश्टा काय करावा? किंवा अमकाच रोज करावा का? या बाबतीत,आपणा मराठीजनांचं वैशिष्ठ्य म्हणावं असं फारसं काहि नाही,पण उरलेल्या समाजांचं ते-तसं (आजही) आहे. एरवी ते तसे दुसर्यांच्या कोणत्याच ठिकाणांवर वारंवार हजेरी लावत नाहीत,पण सुरेशकडची चव त्यांना खेचून अणत असावी,असं आपलं 'मला मात्र' खात्रीनी वाटतं. नाहितर त्या एरियात 'त्यांची हॉटेलं' मुबलक असताना,त्यांच्यातलेच अ नेक-इन्सान सुरेश'ची चव चाखायला आलेच कशाला असते? अहो.. हा चविचा खेळ आहे हो,त्याला वरतून मुद्दाम तयार केलेली..ती.."वेगळेपणाची-भेळ"..फार काळ दूर ठेऊ शकत नाही! शेवटी आध्यात्मिक सत्य ही सार्वत्रिक चव नसली,तरी "चव" हे सार्वत्रिक आध्यात्मिक सत्य आहेच आहे! ते नाकारून बदलता येणार नाही...स्विकारल्यामुळे हलकं करता येइल..इतकच काय ते!!! ;)
असो!
======================
मंडळी...पुन्हा (लवकरच) भेटू अश्याच एका अव्वल-खादाडीच्या ठिकाणावर! तो पर्यंत.... राम राम!
कळावे...
आपलाच इहलोकीचा अत्रुप्त..आणि..काहि क्षणांचा स्वर्ग-वासी...आत्मा!

वाचने
19805
वाचनखूण
प्रतिक्रिया
85
य्ये मी पहिला
टिपीकल
In reply to टिपीकल by आत्मशून्य
T.P.-कल
In reply to T.P.-कल by अत्रुप्त आत्मा
माताय, पुण्याचे साधे कौतुक
In reply to माताय, पुण्याचे साधे कौतुक by आत्मशून्य
बाकि कै म्हणा विडंबन सही सही
जबरदस्त! हे ठिकाण माहीत
मस्त चटपटीत लेख आणि फोटो !
आम्ही ते भाग्यवंत. लाभले
बुवा
वाडिया कालेजमागची अण्णाची
In reply to वाडिया कालेजमागची अण्णाची by प्रचेतस
वाडिया कोलेज मागचा अण्णा...
In reply to वाडिया कोलेज मागचा अण्णा... by बागेश्री
धन्यवाद बागेश्री.
In reply to वाडिया कोलेज मागचा अण्णा... by बागेश्री
त्या अण्णाच्या गाळ्याचं नाव
In reply to त्या अण्णाच्या गाळ्याचं नाव by डॉ सुहास म्हात्रे
तेव्हा साईनाथ का साईकृपा असं
In reply to तेव्हा साईनाथ का साईकृपा असं by प्रचेतस
धन्स अ लॉट !
In reply to धन्स अ लॉट ! by डॉ सुहास म्हात्रे
तुमचं 'माहेरपण' जोरात सुरु
In reply to तुमचं 'माहेरपण' जोरात सुरु by प्यारे१
(No subject)
ईडली-सांबार, डोसा, उत्तपा व
In reply to ईडली-सांबार, डोसा, उत्तपा व by शिद
अगदी +++१
एक णंबर रे वुव्या, सही लिवलय
पुडल्या मयनाखेर पुन्यात हाय.
सांबाराची तहान लागली च्यायला.
In reply to सांबाराची तहान लागली च्यायला. by बॅटमॅन
दक्षिणायन बोगस होतं बे.
In reply to दक्षिणायन बोगस होतं बे. by प्रचेतस
किंमतीच्या मानाने
In reply to किंमतीच्या मानाने by बॅटमॅन
चव पण आवडली नव्हती बे.
In reply to चव पण आवडली नव्हती बे. by प्रचेतस
-१
In reply to -१ by बॅटमॅन
अरे वा!! बंद झालं का
In reply to अरे वा!! बंद झालं का by सूड
हॅ हॅ हॅ. बाकी चालू द्या.
In reply to हॅ हॅ हॅ. बाकी चालू द्या. by बॅटमॅन
सूडक्याशी मात्र सहमत हो.
In reply to दक्षिणायन बोगस होतं बे. by प्रचेतस
+१ टू वल्ली..
In reply to दक्षिणायन बोगस होतं बे. by प्रचेतस
दक्षिणायन बोगस? कुठे फेडशील
In reply to दक्षिणायन बोगस? कुठे फेडशील by मृत्युन्जय
बेडेकर मिसळ ही खरेच बोगस असते
In reply to बेडेकर मिसळ ही खरेच बोगस असते by प्रचेतस
बेडेकर मिसळ ही खरेच बोगस असते
In reply to दक्षिणायन बोगस? कुठे फेडशील by मृत्युन्जय
दक्षिणायन बोगस? कुठे फेडशील
In reply to दक्षिणायन बोगस? कुठे फेडशील by बॅटमॅन
बाकी एक सुमार विडंबन नुकतंच
In reply to बाकी एक सुमार विडंबन नुकतंच by प्रचेतस
ते वाञलं अन हे वायलं
In reply to ते वाञलं अन हे वायलं by बॅटमॅन
हाहाहा.
In reply to सांबाराची तहान लागली च्यायला. by बॅटमॅन
संक्रांत
In reply to संक्रांत by नंदन
आले कोटीभास्कर आले. संक्रांत
In reply to संक्रांत by नंदन
नवकोटनंदन _/\_
आज नेमकी आमची खादाडीची जागा
उद्या ठाण्यातून निघून पुणे
In reply to उद्या ठाण्यातून निघून पुणे by खटपट्या
@ रस्त्यात हे ठिकाण लागेल का?
In reply to @ रस्त्यात हे ठिकाण लागेल का? by अत्रुप्त आत्मा
मग पुण्यात दुपारी हादडायला
In reply to मग पुण्यात दुपारी हादडायला by खटपट्या
शहरात शिरायचे नसल्यास
In reply to शहरात शिरायचे नसल्यास by मृत्युन्जय
टाळावे....
In reply to उद्या ठाण्यातून निघून पुणे by खटपट्या
सातारा रोडनेच जावे लागेल.
छान लिहिलंय!
मस्त स्लर्रर्रर्रर्रप लेख!
मस्त वर्णन...एकदम तोंपासु!
अतिशय वाईट-नीच धागा...
कीती ते बाहेरचे खाणे
In reply to कीती ते बाहेरचे खाणे by स्पा
साय, दूध एखादी गाय हे सगळं
In reply to कीती ते बाहेरचे खाणे by स्पा
@वहीणीच्या हातच्या जेवणाचा
In reply to @वहीणीच्या हातच्या जेवणाचा by अत्रुप्त आत्मा
हे यमक अंमळ वेगळे आहे असे
छान लिहिले आहे
In reply to छान लिहिले आहे by Prajakta२१
येस्स येस्स
In reply to येस्स येस्स by तुषार काळभोर
बाकी
In reply to बाकी by तुषार काळभोर
कल्पना, इन्टर्वल ह्या हुच्च
In reply to कल्पना, इन्टर्वल ह्या हुच्च by प्रचेतस
व्वा वल्लीबुवा जुनी आठवण ताजी
थंडगार पान !!!
मस्त
वणक्कम् (नमस्कार) .
In reply to वणक्कम् (नमस्कार) . by कंजूस
निंगऴ अवनक्कु विट्टील नवग्र
In reply to निंगऴ अवनक्कु विट्टील नवग्र by बॅटमॅन
ननरि स्वाऽमि .
आधार ..
मस्त लेख. जायला हवं इथे एकदा!
बाकी त्या सुरेशपेक्षा
मस्त...
आत्मुस मस्त वर्णन. अगदी लाळ
व्वा! मस्तं लेख...
गुर्जी तुमच्या बरोबर एकदा
In reply to गुर्जी तुमच्या बरोबर एकदा by मृत्युन्जय
१)दिपक.कुवेत
In reply to १)दिपक.कुवेत by अत्रुप्त आत्मा
त्रुप्ती झालेली दिसतेय ओ
In reply to त्रुप्ती झालेली दिसतेय ओ by प्रचेतस
@धागा टाकून आणि प्रतिक्रिया
In reply to @धागा टाकून आणि प्रतिक्रिया by अत्रुप्त आत्मा
हे हत्तीचं पिल्लू जंगल
In reply to @धागा टाकून आणि प्रतिक्रिया by अत्रुप्त आत्मा
मित्रप्रेम बघा कसं उतू
मी काय म्हणतो
जबरी लिवलंय बुवा
मला असले फटू टाकून जळवणारे
यिडली अन सांबाराचा फोटो बघूनच
छान वर्णन व चविष्ट फोटू. हे
नवीन म्हण सुचली
In reply to नवीन म्हण सुचली by अवतार
@एक नूर इडली दस नूर सांबारम!>
सुरूवातीचे संवाद भन्नाट आहेत.