पाऊस नेहेमीच असा अवेळी यावा ...!!
लेखनविषय:
काव्यरस
थंड वाऱ्याची झुळूक यावी,
हलक्याश्या स्पर्शान सरकलेला पदरही,
लाजेची सीमा पार करायला घाबरावा !
तुझा तो स्पर्श,
तुझ्या ओठांनी भिजवलेला शहारा,
शहार्यावर जणू तुझ्या नजरेचाच पहारा बसावा !
मी मुग्ध व्हावी, तू धुंद व्हावा
आणि मग हलकीशी पावसाची सुरुवात व्हावी ..
त्या भिजलेल्या सरी, तू ओंजळीत घ्याव्यास !!
नाजूक फुंकर, ओंजळीतल्या पाण्यावर मारावीस
अन क्षणभर ओठांचा स्पर्श करत,
ते पाणी माझ्या चेहेर्यावर उडवावस !
तो थंड स्पर्श, ती ओलाव्याची खूण
सारेच माझ्या विरुद्ध, कारस्थान रचत असावेत बहुदा,
कारण तुझ्या मिठीत येण्याशिवाय, मला काही पर्यायच न उरावा !
मी पुन्हा पुन्हा येवून बिलगावी,
आणि तुही त्याच आवेगानं
माझ्यावर श्वासांची बरसात करावी,
गारव्यातही श्वासांची उबदार मिठी, तुला दूर करणं जमेनाच
मग झोकून द्यावं स्वताहाला,
तुझ्या मिठीत, तुझ्या श्वासांशी एकरूप होण्यासाठी .
बघता बघता पाउसही ओलाचिंब व्हावा,
बघता बघता आपल्यासोबत थोडा पाउसही भिजावा !
भिजलेल्या पावसानं भिजवाव्यात सरी ,
ओठांचीही इच्छा अलगद व्हावी पुरी
सामावून जाव्यात पाकळ्या ,कडांच्या निशब्ध बंधनात !
कुठेतरी जमीनीवर तळं साठलेलं असावं
शहारालेलं माझ अंग तुझ्या मिठीत असावं
पाऊस नेहेमीच असा अवेळी यावा,
तुझ्या माझ्या श्वासांशी खेळत बसावा !
नाजूक हळवे थेंब माझ्या ओठांवर बरसावे,
थेंबांना त्या तुझ्या ओठांचा स्पर्श व्हावा,
पाऊस नेहेमीच असा अवेळी यावा !
पाऊस नेहेमीच असा अवेळी यावा !!
वाचने
4895
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
कविता आवडली.
रच्याकने सध्या नेमका कुठला महिना सुरु आहे????
In reply to कविता आवडली. by प्यारे१
छान कविता !
रच्याकने सध्या नेमका कुठला महिना सुरु आहे???? य्वढं खोच्क काय विचार्ताय? हा वळवाचा पाउस नसू शकतो का? किवा गेल्या वर्षीच्या जुलैचा पाउसही नसू शकतो का? ऑं? ;) आजून आप्शन हैत. पन गुलदस्त्यात ठेव्लेत. :)
In reply to कविता आवडली. by प्यारे१
यू नॉट्टी काका.. तुम्हाला काय श्रावणानंतर्चा वाटला काय?? :))
In reply to यू नॉट्टी काका.. तुम्हाला काय by यसवायजी
यसवायजी =)) =))
अहो ते मानवकुळाबद्दल चाललंय, सारमेयकुळाबद्दल नै कै =))
In reply to यसवायजी =)) by बॅटमॅन
*ROFL* *lol* *ROFL*
In reply to यू नॉट्टी काका.. तुम्हाला काय by यसवायजी
अहो महामहिम एसवायजी, पावसाची कविता वाचली.
तीव्र उन्हाचा मे महिनाच सुरु आहे ना असं विचारायचं होतं हो! आता कुठं हुंगाहुंग सुरु करताय तुम्ही ;) ?
काही वर्षपुर्वि केलेली"म्रुदुगंध उमटला आले म्रुगनक्षत्र , चालली अवेळी ओली ती अपरात्र, वाकली जरासी पिळताना ओला पदर ,आतुन जरासे हलले अर्धे दार" आठवले.
बायदवे लातुरात आज पाऊस पडल्यामुळे आवडल.
मस्तं!
तो थंड स्पर्श, ती ओलाव्याची खूण सारेच माझ्या विरुद्ध, कारस्थान रचत असावेत बहुदा, कारण तुझ्या मिठीत येण्याशिवाय, मला काही पर्यायच न उरावा !या ओळी खासच...
नाजूक हळवे थेंब माझ्या ओठांवर बरसावे,
थेंबांना त्या तुझ्या ओठांचा स्पर्श व्हावा,
पाऊस नेहेमीच असा अवेळी यावा !
वळवाचा पाउस पडणार तर !
कविता आवडली.
जेनी रोक्स.
लै रोमँटिक. गुलाबी कविता.
In reply to वॉव! by पैसा
पाळणा हलतोअय का पैसाक्काच्या घरला या वरसाला? ;)
In reply to पाळणा हलतोअय का पैसाक्काच्या by स्पंदना
चावट अपर्णा आज्जी,,, ;) =))
लगे रहो :)
-दिलीप बिरुटे
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
आत्मुस छत्रीत एकटेच काय बागडताय?
जेनी तिन्टिम्बे पहा कश्या मुद्दाम साडी बीडी नेसुन....
जाऊ दे ! साल! आताश्या पाऊस म्हंटल की पडसं आठवत.
जेनी तीन्टिम्बे रेषा धुसर असतात लक्षात घ्या.
In reply to आत्मुस छत्रीत एकटेच काय by स्पंदना
*lol*
कित्ती गोड ... कित्ती गुलाबी .. . !!!
जेनी तैंचा मधुचंद्र संपत नाही ...
In reply to कित्ती गोड ... कित्ती गुलाबी by मनीषा
*new_russian* \m/ \M/
In reply to (No subject) by मनीषा
*give_rose* @}->-- @}-:-- @>}--,-`--- (F) (f) @}->--
ही बरोबर आहे. *biggrin*
कविता बाकी आवडलीच.
पुरुष विभाग स्पेषल सुरू झाला का?
In reply to पुरुष विभाग स्पेशल by दिनेश सायगल
पुरुष विभाग स्पेषल झाला तर त्या विभागात कवयित्रीना 'अलोउड' असणार काय?
उगाच महा जनांच्या कविता व्हायच्या नैतर ;)
In reply to पुरुष विभाग स्पेषल झाला तर by प्यारे१
पुरुष विभाग स्पेषल झाला तर त्या विभागात कवयित्रीना 'अलोउड' असणार काय?अॅट लीस्ट वन ऑफ अस शुड हॅव अॅन ओपन माइंड ;) (काडी टाकली पळा पळा)
In reply to पुरुष विभाग स्पेषल झाला तर by बॅटमॅन
>>>अॅट लीस्ट वन ऑफ अस शुड हॅव अॅन ओपन माइंड
आणि पुरुषांच्या मणांवर वैट्ट परिणाम झाले म्हन्जे????? ;)
In reply to >>>अॅट लीस्ट वन ऑफ अस शुड by प्यारे१
सच्चाई तरी कळेल! आणि मग अर्थातच "जन्ता माफ नै करेगी" =))
In reply to सच्चाई तरी कळेल! आणि मग by बॅटमॅन
@सच्चाई तरी कळेल!>>> 
कविता आवडली.