पाऊस नेहेमीच असा अवेळी यावा ...!!
लेखनविषय:
काव्यरस
थंड वाऱ्याची झुळूक यावी,
हलक्याश्या स्पर्शान सरकलेला पदरही,
लाजेची सीमा पार करायला घाबरावा !
तुझा तो स्पर्श,
तुझ्या ओठांनी भिजवलेला शहारा,
शहार्यावर जणू तुझ्या नजरेचाच पहारा बसावा !
मी मुग्ध व्हावी, तू धुंद व्हावा
आणि मग हलकीशी पावसाची सुरुवात व्हावी ..
त्या भिजलेल्या सरी, तू ओंजळीत घ्याव्यास !!
नाजूक फुंकर, ओंजळीतल्या पाण्यावर मारावीस
अन क्षणभर ओठांचा स्पर्श करत,
ते पाणी माझ्या चेहेर्यावर उडवावस !
तो थंड स्पर्श, ती ओलाव्याची खूण
सारेच माझ्या विरुद्ध, कारस्थान रचत असावेत बहुदा,
कारण तुझ्या मिठीत येण्याशिवाय, मला काही पर्यायच न उरावा !
मी पुन्हा पुन्हा येवून बिलगावी,
आणि तुही त्याच आवेगानं
माझ्यावर श्वासांची बरसात करावी,
गारव्यातही श्वासांची उबदार मिठी, तुला दूर करणं जमेनाच
मग झोकून द्यावं स्वताहाला,
तुझ्या मिठीत, तुझ्या श्वासांशी एकरूप होण्यासाठी .
बघता बघता पाउसही ओलाचिंब व्हावा,
बघता बघता आपल्यासोबत थोडा पाउसही भिजावा !
भिजलेल्या पावसानं भिजवाव्यात सरी ,
ओठांचीही इच्छा अलगद व्हावी पुरी
सामावून जाव्यात पाकळ्या ,कडांच्या निशब्ध बंधनात !
कुठेतरी जमीनीवर तळं साठलेलं असावं
शहारालेलं माझ अंग तुझ्या मिठीत असावं
पाऊस नेहेमीच असा अवेळी यावा,
तुझ्या माझ्या श्वासांशी खेळत बसावा !
नाजूक हळवे थेंब माझ्या ओठांवर बरसावे,
थेंबांना त्या तुझ्या ओठांचा स्पर्श व्हावा,
पाऊस नेहेमीच असा अवेळी यावा !
पाऊस नेहेमीच असा अवेळी यावा !!
वाचने
4889
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
कविता आवडली.
In reply to कविता आवडली. by प्यारे१
छान कविता !
रच्याकने सध्या नेमका कुठला महिना सुरु आहे????य्वढं खोच्क काय विचार्ताय? हा वळवाचा पाउस नसू शकतो का? किवा गेल्या वर्षीच्या जुलैचा पाउसही नसू शकतो का? ऑं? ;) आजून आप्शन हैत. पन गुलदस्त्यात ठेव्लेत. :)In reply to कविता आवडली. by प्यारे१
यू नॉट्टी काका.. तुम्हाला काय
In reply to यू नॉट्टी काका.. तुम्हाला काय by यसवायजी
यसवायजी =))
In reply to यसवायजी =)) by बॅटमॅन
खपलो
In reply to यू नॉट्टी काका.. तुम्हाला काय by यसवायजी
अहो महामहिम एसवायजी, पावसाची
काही वर्षपुर्वि केलेली
मस्तं!
नाजूक हळवे थेंब माझ्या ओठांवर
कविता आवडली.
अप्रतिम.
वॉव!
In reply to वॉव! by पैसा
पाळणा हलतोअय का पैसाक्काच्या
In reply to पाळणा हलतोअय का पैसाक्काच्या by स्पंदना
चावट अपर्णा आज्जी,,,
वळवाचा पाऊस सुरु आहे
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
आत्मुस छत्रीत एकटेच काय
In reply to आत्मुस छत्रीत एकटेच काय by स्पंदना
(No subject)
कित्ती गोड ... कित्ती गुलाबी
In reply to कित्ती गोड ... कित्ती गुलाबी by मनीषा
(No subject)
In reply to (No subject) by मनीषा
सॉरी चुकीच्या स्माईली ..
कविता बाकी आवडलीच.
पुरुष विभाग स्पेशल
In reply to पुरुष विभाग स्पेशल by दिनेश सायगल
पुरुष विभाग स्पेषल झाला तर
In reply to पुरुष विभाग स्पेषल झाला तर by प्यारे१
पुरुष विभाग स्पेषल झाला तर
In reply to पुरुष विभाग स्पेषल झाला तर by बॅटमॅन
>>>अॅट लीस्ट वन ऑफ अस शुड
In reply to >>>अॅट लीस्ट वन ऑफ अस शुड by प्यारे१
सच्चाई तरी कळेल! आणि मग
In reply to सच्चाई तरी कळेल! आणि मग by बॅटमॅन
@सच्चाई तरी कळेल!>>>