भीमाशंकरच्या देवराईत मिपाकर – भाग २.
भीमाशंकरच्या देवराईत मिपाकर – भाग १
इथे भीमा नदीचा उगम होतो. १९८४ साली इथल्या १३० चौ.मी. दाट जंगल परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आणि हा परिसर संरक्षित केला गेला. ‘निमसदाहरित विषुववृत्तीय पावसाळरान’ (semi-evergreen tropical rain forest) या प्रकारात हे जंगल मोडतं. अधूनमधून जंगलतोड झाली आहे, पण देवरायांमुळे जंगल टिकूनही राहिलं आहे. काही ठिकाणी तर सूर्यप्रकाश जमिनीवर जेमतेम पोहोचेल इतकी दाट झाडी आहे. या दाट जंगलात दोन दिवस-रात्र मस्त भटकंती केली.
जांभळ्या सुंदर फुलांचा अंजन (स्थानिक नाव – करप), वारस, आंबा, माकडलिंबू, शेंदरी, अशा खास या मातीतल्या अनेक वृक्षांनी हे जंगल समृद्ध आहे.
जंगलात गेल्यावर प्राणी दिसणं तसं दुर्मीळच. (प्राणी बघायचे असतील, तर प्राणिसंग्रहालयात जावं.) पण प्राण्यांच्या अस्तित्वाच्या विविध खुणा मात्र जागोजागी दिसतात.
बिबट्याची विष्ठा - यात भेकर/रामगाय यासारख्या प्राण्याच्या मांडीचं हाड स्पष्ट दिसत आहे. (यावरून भक्ष्य आणि भक्षक या दोघांचंही अस्तित्व लक्षात येतं.)
शेकरू (Giant Indian Squirrel, Ratufa Indica Elphinstony) हा इथला मुख्य प्राणी. महाराष्ट्राचा राज्यप्राणी. शेकरू खूप लाजाळू असल्यामुळे ते पटकन दिसत नाही. उंच वृक्षांच्या शेंड्यांवर ते वाळक्या पानांची तीन-चार घरटी बांधतं आणि आपली पिल्लं आळीपाळीने या घरट्यामध्ये ठेवतं.
इथे राणी पाकोळी (Blue Mormon) हे भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं फुलपाखरू खूप सापडतं, पण त्याचा फोटो काढता आला नाही. मात्र क्र.२च्या (लेसर ग्रास ब्लू) या चिमुकल्या फुलपाखराचा फोटो घेता आला. आणि हे फनेल स्पायडरचं जाळं.
आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कीटक इथे सापडला – सिकाडा (मराठीत झिल्ली) नर. (नर कशावरून?) त्याच्या छातीच्या दोन्ही बाजूंना हवेच्या पिशव्या दिसताहेत. त्यात हवा भरून तो कर्रर्र कर्रर्र आवाज काढतो. अंड्यातून बाहेर पडलेलं पिलू आधी मातीखाली आणि नंतर खोडाच्या सालीखाली सुप्तावस्थेत राहून झाडाच्या रसावर जगतं. ही सुप्तावस्था काही जातींमध्ये सतरा वर्षं इतकी असते. मग प्रौढ नर/मादी कीटक बाहेर पडतो, जोडीदाराबरोबर मिलन होतं आणि काही दिवसांतच कीटकाचा मृत्यू होतो. (मादीला मात्र आवाज करता येत नाही. म्हणूनच एका इंग्लिश कवीने म्हटलं आहे – ‘Happy the cicada lives, They have voiceless wives.’ ते असोच.)
आमचं जंगलप्रेम पाहून तिथल्या वनरक्षकांनी रात्री पाणथळीवर जायचा बेत आखला. अंधार पडतापडताच आम्ही वीर तळं नावाच्या पाणथळीवर जाऊन पोहोचलो. थोडासा प्रकाश होता. सन्नाटा अंगावर काटा आणत होता. थोड्या वेळाने मोराचं एक जोडपं सावधपणे पावलं टाकत आलं आणि शेजारच्या झाडीत निघून गेलं. पुन्हा निरव शांतता. मग एक भेकर हळूहळू येताना दिसलं. आमच्या अगदी जवळ आलं, आणि... आम्ही त्याच्या दृष्टीस पडलो. त्याबरोबर ‘भॉऽक’ असा घुमावदार आवाज काढून क्षणार्धात दिसेनासं झालं. थोड्याच वेळात मागच्या झाडीतून खसफस ऐकू आली. एक हुप्प्या नर आमच्यावर इतका वेळ नजर ठेवून होता, आणि आम्हाला त्याचा पत्ताच नव्हता. त्याने खकर्रर्र असा खर्जातला आवाज काढला आणि आम्ही तिथून उठलो. धोक्याच्या या दोन इशाऱ्यांनंतर निदान एक तासभरतरी कोणताही प्राणी इकडे फिरकणार नाही, याची खातरी होती.
रविवारी सकाळी गुप्त भीमाशंकरच्या रानवाटेवर शेकरू अगदी अचानक दिसलं. त्याचा फोटो/व्हिडिओ काढता आला नाही, मात्र शेवटचा दिस गोड झाला! मग न्याहारी करून निघालो.
जेवणाची सुरुवात करायला आपला मराठमोळा ‘स्टार्टर’ – नाचणी पापड.
इथली खासियत म्हणजे पिठलं आणि मेथी-लसूण भाजी, झणझणीत लाल ठेचा आणि खुरासणी, शेंगदाणा आणि जवस या तीन चटण्या (तेलासहित). पिठल्याबरोबर गरम गरम भाकरीही हवीच! याच्या जोडीला कारलं, अळूवडी आणि व्हेज कोल्हापुरी असा फक्कड बेत जमला.
मिपाकरांची खवय्येगिरी बघून मालकांनी घरची कैरी चिरून त्यावर तिखट-मीठ लावून पेश केली.
पिठलं तर इतक उत्कृष्ट होतं की त्याचं जागतिक पेटंट घ्या असं त्यांना सुचवलं! नुसत्या आठवणीने तोंडाला पाणी सुटलं बघा!
वनभटकंती
भीमाशंकर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं, तसंच पर्यावरणदृष्ट्याही अतिशय महत्त्वाचं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये निसर्गाला देवाशी अनेकविध मार्गांनी जोडलेलं आहे, त्यापैकी एक म्हणजे ‘देवराई’ (देवासाठी राखून ठेवलेलं रान). देवराईमध्ये कोणीही शिकार अथवा वृक्षतोड करत नाही. त्यामुळे तिथल्या स्थलविशिष्ट (endemic) वनस्पतींचं आणि प्राणिसृष्टीचं संरक्षण आणि संवर्धन होतं. महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेलं ‘शेकरू’ म्हणूनच इथे तग धरून आहे. कोकणात देवराया पाहायला मिळतात, तशाच इथेही.
इथे भीमा नदीचा उगम होतो. १९८४ साली इथल्या १३० चौ.मी. दाट जंगल परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आणि हा परिसर संरक्षित केला गेला. ‘निमसदाहरित विषुववृत्तीय पावसाळरान’ (semi-evergreen tropical rain forest) या प्रकारात हे जंगल मोडतं. अधूनमधून जंगलतोड झाली आहे, पण देवरायांमुळे जंगल टिकूनही राहिलं आहे. काही ठिकाणी तर सूर्यप्रकाश जमिनीवर जेमतेम पोहोचेल इतकी दाट झाडी आहे. या दाट जंगलात दोन दिवस-रात्र मस्त भटकंती केली.
वनभ्रमणाला निघालेले मिपाकर
जांभळ्या सुंदर फुलांचा अंजन (स्थानिक नाव – करप), वारस, आंबा, माकडलिंबू, शेंदरी, अशा खास या मातीतल्या अनेक वृक्षांनी हे जंगल समृद्ध आहे.
जंगलात गेल्यावर प्राणी दिसणं तसं दुर्मीळच. (प्राणी बघायचे असतील, तर प्राणिसंग्रहालयात जावं.) पण प्राण्यांच्या अस्तित्वाच्या विविध खुणा मात्र जागोजागी दिसतात.
बिबट्याची विष्ठा - यात भेकर/रामगाय यासारख्या प्राण्याच्या मांडीचं हाड स्पष्ट दिसत आहे. (यावरून भक्ष्य आणि भक्षक या दोघांचंही अस्तित्व लक्षात येतं.)
शेकरू (Giant Indian Squirrel, Ratufa Indica Elphinstony) हा इथला मुख्य प्राणी. महाराष्ट्राचा राज्यप्राणी. शेकरू खूप लाजाळू असल्यामुळे ते पटकन दिसत नाही. उंच वृक्षांच्या शेंड्यांवर ते वाळक्या पानांची तीन-चार घरटी बांधतं आणि आपली पिल्लं आळीपाळीने या घरट्यामध्ये ठेवतं.
इथे राणी पाकोळी (Blue Mormon) हे भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं फुलपाखरू खूप सापडतं, पण त्याचा फोटो काढता आला नाही. मात्र क्र.२च्या (लेसर ग्रास ब्लू) या चिमुकल्या फुलपाखराचा फोटो घेता आला. आणि हे फनेल स्पायडरचं जाळं.
आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कीटक इथे सापडला – सिकाडा (मराठीत झिल्ली) नर. (नर कशावरून?) त्याच्या छातीच्या दोन्ही बाजूंना हवेच्या पिशव्या दिसताहेत. त्यात हवा भरून तो कर्रर्र कर्रर्र आवाज काढतो. अंड्यातून बाहेर पडलेलं पिलू आधी मातीखाली आणि नंतर खोडाच्या सालीखाली सुप्तावस्थेत राहून झाडाच्या रसावर जगतं. ही सुप्तावस्था काही जातींमध्ये सतरा वर्षं इतकी असते. मग प्रौढ नर/मादी कीटक बाहेर पडतो, जोडीदाराबरोबर मिलन होतं आणि काही दिवसांतच कीटकाचा मृत्यू होतो. (मादीला मात्र आवाज करता येत नाही. म्हणूनच एका इंग्लिश कवीने म्हटलं आहे – ‘Happy the cicada lives, They have voiceless wives.’ ते असोच.)
आमचं जंगलप्रेम पाहून तिथल्या वनरक्षकांनी रात्री पाणथळीवर जायचा बेत आखला. अंधार पडतापडताच आम्ही वीर तळं नावाच्या पाणथळीवर जाऊन पोहोचलो. थोडासा प्रकाश होता. सन्नाटा अंगावर काटा आणत होता. थोड्या वेळाने मोराचं एक जोडपं सावधपणे पावलं टाकत आलं आणि शेजारच्या झाडीत निघून गेलं. पुन्हा निरव शांतता. मग एक भेकर हळूहळू येताना दिसलं. आमच्या अगदी जवळ आलं, आणि... आम्ही त्याच्या दृष्टीस पडलो. त्याबरोबर ‘भॉऽक’ असा घुमावदार आवाज काढून क्षणार्धात दिसेनासं झालं. थोड्याच वेळात मागच्या झाडीतून खसफस ऐकू आली. एक हुप्प्या नर आमच्यावर इतका वेळ नजर ठेवून होता, आणि आम्हाला त्याचा पत्ताच नव्हता. त्याने खकर्रर्र असा खर्जातला आवाज काढला आणि आम्ही तिथून उठलो. धोक्याच्या या दोन इशाऱ्यांनंतर निदान एक तासभरतरी कोणताही प्राणी इकडे फिरकणार नाही, याची खातरी होती.
रविवारी सकाळी गुप्त भीमाशंकरच्या रानवाटेवर शेकरू अगदी अचानक दिसलं. त्याचा फोटो/व्हिडिओ काढता आला नाही, मात्र शेवटचा दिस गोड झाला! मग न्याहारी करून निघालो.
परतीच्या प्रवासातली खादाडी
पहिल्या दिवशी ज्या हॉटेलमध्ये जेवलो होतो, तिथेच जेवायचा बेत होता. पुणे-नाशिक महामार्गावरच नारायणगावजवळ हे हॉटेल आहे. आई-बाबा, त्यांची दोन मुलं आणि मुलांच्या बायका असं सगळ कुटुंब मिळून ते चालवतात. हॉटेल प्रशस्त, हवेशीर आहे.
जेवणाची सुरुवात करायला आपला मराठमोळा ‘स्टार्टर’ – नाचणी पापड.
इथली खासियत म्हणजे पिठलं आणि मेथी-लसूण भाजी, झणझणीत लाल ठेचा आणि खुरासणी, शेंगदाणा आणि जवस या तीन चटण्या (तेलासहित). पिठल्याबरोबर गरम गरम भाकरीही हवीच! याच्या जोडीला कारलं, अळूवडी आणि व्हेज कोल्हापुरी असा फक्कड बेत जमला.
मिपाकरांची खवय्येगिरी बघून मालकांनी घरची कैरी चिरून त्यावर तिखट-मीठ लावून पेश केली.
पिठलं तर इतक उत्कृष्ट होतं की त्याचं जागतिक पेटंट घ्या असं त्यांना सुचवलं! नुसत्या आठवणीने तोंडाला पाणी सुटलं बघा!
जेवणात मग्न झालेले मिपाकर
जेवण संपल्यावर भूलोकीचं अमृत - ताक आणि मुखशुद्धी...
असे मिपाकर जेवुनी तृप्त झाले...
भरल्या पोटाने आणि तृप्त मनाने मार्गस्थ झालो. पण खादाडी एवढ्यात संपली, तर ते मिपाकर कसले? स्थानिक गावकरी रानमेवा घेऊन रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यांना न्याय दिला नाही, तर कसं चालेल? मुंबईला पोहोचेपर्यंत या रानमेव्याने तोंडाला काम दिलं.
रात्री मुंबईला सुखरूप पोहोचलो, ते पुढच्या सहलीचा विचार करतच...
शेवटी एक गोष्ट सांगितलीच पाहिजे. खरं तर मिसळपाव हे महाजालावरचं एक संकेतस्थळ, आभासी (व्हर्चुअल). पण जिंदादिल मिपाकरांमुळे ते केवळ आभासी न राहता कट्टे, प्रत्यक्ष भेटी अशा माध्यमातून मिपाकर एकमेकांच्या जवळ आले, हे मला फार अद्भुत वाटतं. म्हणूनच मिपाकरांना मन:पूर्वक सलाम करत पुढच्या सहलीचे बेत आखायला लागतो...
वाचने
15946
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
वाह साहेब सुंदर माहिती.
मस्त!
मस्त !!!
मस्त वृत्तांत.
In reply to मस्त वृत्तांत. by प्रचेतस
गुप्त भीमाशंकरची रानवाट खूप
In reply to गुप्त भीमाशंकरची रानवाट खूप by आत्मशून्य
ज्योतीवंती म्हणतात तीला..
In reply to ज्योतीवंती म्हणतात तीला.. by शैलेन्द्र
ज्योतवंती. खास गोनीदांनी
हाही भाग मस्तच.
सुरेख आणि माहितीपूर्ण
रोकिंग.
काही काही फोटो दिसत का बर
मस्त वृत्तांत..
ह्म्म हे साग्रसंगीत झालं!!
फोटो आणि खादाडी छानच .
मस्त भटकंती, खादाडी आणि लेखन
In reply to मस्त भटकंती, खादाडी आणि लेखन by डॉ सुहास म्हात्रे
+१
शेकरु मी दोनदा पाहिली आहे. अन
मस्त भटकंती आणि खादाडी! सगळे
आमचा हा कट्टा हुकला...
सर्व खायचे पदार्थ पाहून
In reply to सर्व खायचे पदार्थ पाहून by अत्रुप्त आत्मा
मम आत्मा वरंध घाटात भटकायला
In reply to मम आत्मा वरंध घाटात भटकायला by प्रचेतस
"त्या" आत्म्याचं" झाड बहुतेक
In reply to "त्या" आत्म्याचं" झाड बहुतेक by डॉ सुहास म्हात्रे
(No subject)
In reply to "त्या" आत्म्याचं" झाड बहुतेक by डॉ सुहास म्हात्रे
झाड ला पण अवतरण चिन्ह " .."
In reply to "त्या" आत्म्याचं" झाड बहुतेक by डॉ सुहास म्हात्रे
@झाड बहुतेक वरंध घाटात असेल>>
In reply to सर्व खायचे पदार्थ पाहून by अत्रुप्त आत्मा
ही नाचणारी पिवळी सोंगे कुठे
सहीच झालेली दिसतेय भटकंती आणि
मस्त शेवट केलाय..
छान भटकंती
छान भटकंती
झकास!!
आभार, धन्यवाद.
In reply to आभार, धन्यवाद. by सुधांशुनूलकर
मी तर येणारच.
In reply to मी तर येणारच. by प्रचेतस
+१ हेच म्हणनार होतो
In reply to +१ हेच म्हणनार होतो by आत्मशून्य
कोयना अभयारण्य
In reply to आभार, धन्यवाद. by सुधांशुनूलकर
जून २८ को हम तुम्हारे साथ किधर भी आयेंगा...
In reply to जून २८ को हम तुम्हारे साथ किधर भी आयेंगा... by मुक्त विहारि
खरे तर...
---
In reply to --- by mdmagar
हॉटेलचे दर
अतिषय सुंदर माहिती. जेवणाचे
मस्त .. आठवणी जाग्या झाल्या
सुरेख वर्णन आणी मस्त फोटो
लेखन वर काढल्याबद्दल