यापूर्वीचे लेखन
भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक
भाग २: क्रिटिकल मास
भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश
भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक
भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान
भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ
भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, माढा, मावळ, पुणे,सांगली, सातारा, शिर्डी, शिरूर आणि सोलापूर या १२ लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो.
अहमदनगर: २००९ मध्ये अहमदनगरमधून भाजपचे दिलीप गांधी निवडून आले.त्यावेळी आमदार राजीव राजळे यांनी बंडखोरी केली आणि राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांची मते फोडली त्याचा फायदा दिलीप गांधींना झाला. यावेळी राजीव राजळे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर भाजपकडून दिलीप गांधी आहेत. या मतदारसंघातून आघाडीच्या मतांमध्ये फूट पडली तर भाजपला संधी मिळते अन्यथा आघाडीला हरविणे कठिण आहे.यावेळी तशी फूट आघाडीच्या मतांमध्ये पाडायला कोणी तगडा उमेदवार नाही.तेव्हा अहमदनगरमधून राष्ट्रवादी नक्की.
बारामती: राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे नक्की.
हातकणंगले: या मतदारसंघात महायुतीकडून स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी तर कॉंग्रेसकडून ज्येष्ठ नेते कलाप्पा आवाडे आहेत.आवाडे रिंगणात आल्यामुळे राजू शेट्टींना निवडणुक २००९ इतकी सोपी नक्कीच जाणार नाही.तरी त्यांचा पराभव होईल असे वाटत नाही. तेव्हा हातकणंगलेमधून स्वाभिमानी पक्ष.
कोल्हापूर: या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक, शिवसेनेकडून सदाशिवराव मंडलीक यांचे चिरंजीव संजय मंडलीक तर शेकापकडून संपतराव पवार उभे आहेत.या मतदारसंघात शिवसेनेची ताकद स्वबळावर निवडून यायला पुरेशी नाही.आयात केलेला उमेदवार असला तर शिवसेना चांगली टक्कर देते अन्यथा २०% च्या आसपास मते शिवसेनेला मिळतात.यावेळी सदाशिवराव मंडलीक त्यांची ताकद मुलामागे लावणार हे नक्की. २००९ मध्ये सदाशिवराव मंडलीक अपक्ष म्हणून स्वबळावर निवडून गेले होते. त्यामुळे लढत अगदी चुरशीची होईल.त्यातून मतदारसंघात शेतकऱ्यांची स्वाभिमानी पक्षाची मते शिवसेनेलाच मिळतील.राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक सुध्दा तगडेच उमेदवार आहेत.तरीही शिवसेनेची कोल्हापूर शहरातील मते, सदाशिवराव मंडलीकांची साथ आणि स्वाभिमानी पक्ष या जोरावर संजय मंडलीक निवडून आले तरी आश्चर्य वाटू नये.तेव्हा कोल्हापूरमध्ये शिवसेना.
माढा:या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, त्यांच्याविरूध्द त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील तर महायुतीकडून स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत उभे आहेत.सदाभाऊ खोतांना उमेदवारी देऊन महायुतीने या मतदारसंघात थोडी तरी लढत द्यायचा प्रयत्न केला आहे.तरीही मुख्य लढत मोहिते पाटील बंधूंमध्ये होईल असे वाटते. विजयसिंह मोहिते पाटील हे नक्कीच मोठे प्रस्थ आहे.त्यांच्या पराभव करणे तसे कठिणच आहे.तेव्हा माढामधून राष्ट्रवादी.
मावळ: या मतदारसंघातून शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेले राहुल नार्वेकर राष्ट्रवादीकडून, शिवसेनेकडून गजानन बाबर तर शेकापकडून लक्ष्मण जगताप निवडणुक लढवत आहेत. २००९ मध्ये शेकापचे शिवसेनेला समर्थन होते त्यामुळे शिवसेनेच्या गजानन बाबर यांना विजय मिळवता आला.हा मतदारसंघ अर्धा कोकणात (उरण, पनवेल आणि कर्जत) तर अर्धा पश्चिम महाराष्ट्रात (मावळ, चिंचवड आणि पिंपरी) आहे.शेकापने सोडलेली साथ शिवसेनेला महागात पडेल हे नक्की.यावेळी शेकाप कोकणातून शिवसेनेची मते फोडणार हे नक्की.यावेळी या मतदारसंघातून राष्ट्रवादी बाजी मारणार असे दिसते.
पुणे: या मतदारसंघातून भाजपकडून अनील शिरोळे, कॉंग्रेसचे विश्वजीत कदम, मनसेकडून दिपक पायगुडे आणि आआपकडून सुभाष वारे निवडणुक लढवत आहेत.या मतदारसंघात अनील शिरोळेंचे काम आणि जनसंपर्क दोन्ही चांगले आहेत.तसेच कलमाडींच्या कृत्यांमुळे कॉंग्रेसला रोषाचा सामना करावा लागेल हे नक्की.तसेच विश्वजीत कदम हे बाहेरचे उमेदवार आहेत.२००९ मध्ये भाजपची मते मनसेने खाल्लीच.त्याचबरोबर बसपाकडून विख्यात बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी रिंगणात होते.त्यांनीही युतीच्या समर्थकवर्गातील काही मते नक्कीच घेतली.यावेळी ते रिंगणात नाहीत.मनसेची ताकद २००९ च्या तुलनेत कमी आहे हे नक्कीच. तेव्हा या मतदारसंघातून भाजपला विजय मिळवायला जड जाऊ नये.मतदारयादीतून नावे वगळली गेली ती नक्की किती आणि कुठली हे समजल्याशिवाय या प्रकाराचा निकालावर किती परिणाम होईल हे सांगता येणार नाही.तेव्हा पुण्यातून भाजप
सांगली: या मतदारसंघातून कॉंग्रेसकडून वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील रिंगणात आहेत.त्यांच्याविरूध्द भाजपचे संजय पाटील आहेत.तरीही सांगलीत वसंतदादांच्या पुण्याईवर त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही पराभव करणे कठिणच आहे.तेव्हा सांगलीतून कॉंग्रेस.
सातारा: या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उदयनराजेंचा पराभव करणे कठिणच आहे.तेव्हा साताऱ्यातून राष्ट्रवादी.
शिर्डी: या मतदारसंघात २००९ मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झालेले भाऊसाहेब वाकचौरे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत.त्यांनी रामदास आठवलेंचा पराभव केला होता आणि त्याचा दोष आठवलेंनी कॉंग्रेसला दिला होता. शिवसेनेचे उमेदवार म्हणून सदाशिव लोखंडे आहेत.शिर्डीमधून यावेळी कॉंग्रेसला हरविणे कठिणच वाटते. तेव्हा शिर्डीमधून कॉंग्रेस.
शिरूर: या मतदारसंघात शिवसेनेकडून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर राष्ट्रवादीकडून देवदत्त निकम रिंगणात आहेत.या मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काम आणि जनसंपर्क चांगला आहे.तसेच पुण्याचे भाग असलेल्या भोसरी आणि हडपसरमधून त्यांना ’मोदी लाटेमुळे’ नक्कीच फायदा मिळेल.जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी आणि शिरूरमधून त्यांना स्वत:च्या कामाचा नक्कीच फायदा होईल.त्यातून राष्ट्रवादीने खूप तगडा उमेदवार दिलेला नाही.त्यामुळे यावेळी शिरूरमधून आढळराव पाटील हॅट-ट्रीक करणार असे वाटते.तेव्हा शिरूरमधून शिवसेना.
सोलापूर: या मतदारसंघातून कॉंग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करता येणे कठिणच.तेव्हा सोलापूरमधून कॉंग्रेस.
तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात पुढील परिस्थिती असेल असे वाटते:
एकूण जागा: १२
आघाडी: ८
महायुती: ४
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, दिंडोरी आणि नाशिक या सहा मतदारसंघांचा समावेश आहे.
नंदूरबार: या मतदारसंघातून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत तर भाजपकडून विजयकुमार गावितांची कन्या हिना गावीत उमेदवार आहेत.मला वाटते की माणिकराव गावीत यांचा पराभव करता येणे थोडे कठिणच आहे.तेव्हा नंदूरबारमधून कॉंग्रेस.
धुळे: धुळ्यात भाजपकडून सुभाष भामरे, कॉंग्रेसकडून अमरिष पटेल तर आआपकडून हारून अन्सारी उमेदवार आहेत.२००९ मध्ये अनील गोटे आणि निहाल अहमद यांनी चांगली मते घेतली.यावेळी निहाल अहमद रिंगणात नाहीत.मालेगावमधून आआप चांगली मते घेईल तरीही निहाल अहमद यांच्याइतकी मते घेईल असे वाटत नाही.तेव्हा धुळ्यात लढत चुरशीची होईल.पण देशातील वातावरण लक्षात घेता धुळ्यात भाजप असे वाटते.
जळगाव आणि रावेर: या मतदारसंघांमधून भाजप नक्कीच जिंकेल असे वाटते. जळगाव जिल्ह्यात भाजप बऱ्यापैकी बळकट आहे.यावेळी खूप फरक पडावा असे वाटत नाही.
दिंडोरी: या मतदारसंघातील आदिवासी भागांमधून कम्युनिस्ट पक्ष चांगली मते घेतो.त्यातून मतविभागणी होऊन भाजपला फायदा होईल असे वाटते. तेव्हा दिंडोरीमधून भाजप.
नाशिक: या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, शिवसेनेकडून हेमंत गोडसे, आआपकडून विजय पांढरे तर मनसेकडून प्रदीप पवार रिंगणात आहेत.यावेळी राष्ट्रवादीकडून भुजबळांसारखा तगडा उमेदवार आहे.तसेच मनसे मतविभागणी करायला आहेच.तेव्हा नाशिकमधून राष्ट्रवादी नक्की.
मला मराठवाडा आणि विदर्भातील मतदारसंघनिहाय माहिती नाही.त्यामुळे एकूण अंदाज लिहित आहे.
मराठवाड्यात हिंगोली, नांदेड,परभणी,जालना, औरंगाबाद, बीड,उस्मानाबाद आणि लातूर हे ८ मतदारसंघ आहेत. मला वाटते की नांदेड (अशोक चव्हाण) मधून कॉंग्रेस नक्की.बाकी ७ ठिकाणी महायुतीला जिंकायला हरकत नसावी.
विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम हे १० मतदारसंघ आहेत. यापैकी नागपूर मतदारसंघात लक्षवेधी निवडणुक आहे.भाजपकडून नितीन गडकरी, कॉंग्रेसकडून विलास मुत्तेमवार आणि आआपकडून अंजली दमानिया उमेदवार आहेत. इथून अंजली दमानिया गडकरीविरोधी मते फोडतील.या मतदारसंघातून भाजप एकदाच (१९९६) मध्ये यशस्वी झाला आहे आणि तोही बनवारीलाल पुरोहित या मुळच्या कॉंग्रेस नेत्याला उभे करून.यावेळी नितीन गडकरी रिंगणात आहेत.तसेच शहरी भागातील नरेन्द्र मोदी लाटेचा गडकरींना नक्कीच फायदा होईल.तेव्हा नागपूरमधून भाजप. भंडारा-गोंदियामधून राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेलांना जिंकायला हरकत नसावी.गडचिरोली-चिमूरमधूनही कॉंग्रेसला जिंकायला हरकत नसावी. चंद्रपूरमधून भाजपचे हंसराज अहिर यांना निवडून यायला हरकत नसावी. तेव्हा विदर्भातील १० पैकी ८ जागा महायुतीला तर २ जागा आघाडीला असे मानतो.
तेव्हा महाराष्ट्रात पुढीलप्रमाणे चित्र उभे राहिल असे वाटते.
| एकूण जागा | महायुती | आघाडी | मनसे | |
| मुंबई+ठाणे | १० | ६ | ३ | १ |
| कोकण | २ | २ | ० | ० |
| पश्चिम महाराष्ट्र | १२ | ४ | ८ | ० |
| उत्तर महाराष्ट्र | ६ | ४ | २ | ० |
| मराठवाडा | ८ | ७ | १ | ० |
| विदर्भ | १० | ८ | २ | ० |
| एकूण | ४८ | ३१ | १६ | १ |
वाचने
33586
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम विश्लेषण.
एका मताने का होईना ...
In reply to उत्तम विश्लेषण. by प्रचेतस
न्हाय र वल्ल्या... यंदा आपल
In reply to उत्तम विश्लेषण. by प्रचेतस
आता कळेलच १६ तारखेला भाऊ का
In reply to न्हाय र वल्ल्या... यंदा आपल by मालोजीराव
शिर्डी
भाऊसाहेब वाकचौरे यांनी
In reply to शिर्डी by धर्मराजमुटके
रोचक अंदाज
तेच म्हणत होतो !
In reply to रोचक अंदाज by श्रीरंग_जोशी
पुण्यामध्ये शिरोळ्यांची मतं
पैशाचा पडलेला पाउस, Faulty
In reply to पुण्यामध्ये शिरोळ्यांची मतं by आदूबाळ
सिध्द झाले!
बारामतीत काही चमत्कार होईल
In reply to सिध्द झाले! by विकास
शक्यता वाटत नाही
In reply to बारामतीत काही चमत्कार होईल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकदम अभ्यासू विश्लेषण...
मावळ, हातकणंगले, कोल्हापुर
तार्किक विश्लेषण
जरा असहमत
In reply to तार्किक विश्लेषण by पैसा
नाही
In reply to जरा असहमत by श्रीरंग_जोशी
सांगलीबद्दल असहमत. प्रतीक
प्रतीक पाटील अन संजय पाटील
In reply to सांगलीबद्दल असहमत. प्रतीक by बॅटमॅन
नाशिक -- not a cake walk
बराचसा सहमत! काही अंदाज
सहमत! काही अंदाज वेगले वाटतात
छान विश्लेषण
मावळ
नेहमीप्रमाणे उत्तम लेख
उदयनमहाराज आणि बाकी नेते...
In reply to नेहमीप्रमाणे उत्तम लेख by विटेकर
तुमच्या सहीमध्येच तुमचे
In reply to उदयनमहाराज आणि बाकी नेते... by raudransh_27
+१
In reply to तुमच्या सहीमध्येच तुमचे by हाडक्या
उदयनराजे निवडून येईपर्यंत
In reply to +१ by श्रीगुरुजी
ह्या लिस्ट मधे हे पण पाहिजेत
In reply to नेहमीप्रमाणे उत्तम लेख by विटेकर
अण्णांना धमकीची पत्रे
In reply to ह्या लिस्ट मधे हे पण पाहिजेत by प्रसाद१९७१
अण्णानां धमकी पत्र जिवनराव
In reply to अण्णांना धमकीची पत्रे by दुश्यन्त
महायुतीला राज्यात ३५ जागा मिळू शकतील.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात
विधानसभेतही महायुतीला फायदा होवू शकतो
मान्य आहे
In reply to विधानसभेतही महायुतीला फायदा होवू शकतो by दुश्यन्त
बरोबर आहे.सत्ताधारी आघाडी
In reply to मान्य आहे by श्रीरंग_जोशी
निवडणुकीचा आता कंटाळा आला आहे
सहमत!
In reply to निवडणुकीचा आता कंटाळा आला आहे by श्रीगुरुजी
रामटेक आणि वर्ध्यामधून पण कॉंग्रेस येईल
मावळ ला यंदा खुप जास्त
चांगला अंदाज
उस्मानाबादमध्ये कडी टक्कर
In reply to चांगला अंदाज by जेपी
क्लिंटनराव,
१६ मे रोजी निकाल आहेत. तुम्ही
In reply to क्लिंटनराव, by श्रीगुरुजी
सर्वांना धन्यवाद
उत्तम
भंडारा गोंदिया