मद्दान
“शाळा नाही आज, मतदान आहे,” आय म्हन्ली.
त्ये काय असतंय बगाया लगी साळत.
पोलिसमामाबी व्हते.
राती आमच्यातच आल्ते जेवाया. हसले; जा म्हन्ले आत.
मोटी मान्सं येकेक आत यणार. मंग म्हाडिक गुर्जी कागुद बग्णार.
मोहिते गुर्जी शै लावनार; येक कागुद देणार त्यास्नी.
मान्सं गपचिप खोक्यात कागुद टाकून जाणार.. ठप्प करत.
आण्णा बसलेले छातीला बिल्ला लावून.
म्या म्हन्लं, “मलाबी कागुद; शै; बिल्ला.”
आण्णा म्हन्ले, “जा घरी.”
बापूकाका आले. म्या बोल्ली “शै.”
बापूकाका आण्णांना म्हन्ले, “बाळ्याच्या मेल्या म्हातारीचं नावं आहे यादीत मास्तर. होऊन जाऊ द्या पोरीचीबी हौस!”
आण्णा लटलट कापत व्हते.
मला वराडले, “जा मुकाट घरी."
आण्णांना बापूकाकांचं भ्यावं वाटलं?
मद्दान लई वंगाळ.
* शतशब्दकथा
वाचने
21108
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
सहीये! अचूक. अगदी असंच होतही
सहीये! अचूक. अगदी असंच होतही असणार.
वेगळाच अनुभव
मस्त!!! सुपर्ब!!!
:D खरच लई वंगाळ वो
म्तदान. खिक्क.
आन्जी इज ब्याक!
आन्जी इज ब्याक!
कोणी प्रकाशकाने आन्जी-कथांचं एक कॉफी टेबल बुक काढावं. दोन पानांवर एक कथा. डाव्या पानावर कथेची रेखाचित्रं, उजव्या पानावर डोकावून बघणार्या खट्याळ डोळ्यांच्या झिपर्या आन्जीचा वॉटरमार्क आणि त्यावर इंपोज केलेली शतशब्दकथा. शक्यतोवर शाळकरी हस्ताक्षरात.
मजा आ जायेगा.
मी पहिला कष्टंबर.
In reply to आन्जी इज ब्याक! by आदूबाळ
ओ आदूबाळ, मागे लैनीत जावा.
ओ आदूबाळ, मागे लैनीत जावा. :D
In reply to ओ आदूबाळ, मागे लैनीत जावा. by यशोधरा
मी ऐड्या दिली ना, मग मी पयला
मी ऐड्या दिली ना, मग मी पयला ;)
In reply to मी ऐड्या दिली ना, मग मी पयला by आदूबाळ
मस्तच आहे कल्पना!
मस्तच आहे कल्पना! आन्जी रॉक्स!
In reply to आन्जी इज ब्याक! by आदूबाळ
हे एक सुंदर स्वप्न रंगवलं आहे
हे एक सुंदर स्वप्न रंगवलं आहे तुम्ही आदूबाळ :-)
चित्र अगदी डोळ्यांसमोर उभं केलंत.
कधी ते वास्तवात येऊ शकलं तर ही तुमची आयडिया नक्की वापरेन.
अर्थात तुम्हाला श्रेय देऊन ...
(शोधायला सोयीचं जावं म्हणून हा प्रतिसाद माझ्या ब्लॉगवर नेऊन ठेवावा म्हणतेय - अर्थात तुमची हरकत नसेल तरच!)
In reply to हे एक सुंदर स्वप्न रंगवलं आहे by आतिवास
ये हुई ना बात!!! आदूबाळ
ये हुई ना बात!!! आदूबाळ यांचेही कौतुक अन आपले स्वप्न साकार होवो ही शुभकामना. :)
In reply to हे एक सुंदर स्वप्न रंगवलं आहे by आतिवास
अगदी जरूर ठेवा.
अगदी जरूर ठेवा.
अशी स्वप्नं बघत रहायला हवीत ....
In reply to आन्जी इज ब्याक! by आदूबाळ
१०० नंबरी आयड्या !
१०० नंबरी आयड्या !
मस्तं !
मस्तं !
प्रसंग समोर उभा केलात!. . .
प्रसंग समोर उभा केलात!. . . :)
मस्त ! आदुबाळ चि आयडीया
मस्त ! आदुबाळ चि आयडीया चान्गली आहे.
आवडली
आन्जी च्या इतर कथांप्रमाणेच हीसुद्धा आवडली.
सरसच.ह्या कथा वाचताना मला मलयाली लेखिका पी. मानसी यांच्या अ
ह्या कथा वाचताना मला मलयाली लेखिका पी. मानसी यांच्या लघुकथा आठवल्या. त्यात अर्थात मिस्किल आंजी नाही. पण मिताक्षरी आणि अर्थबहुल.
वर आदूबाळ यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखर ह्या कथांचे पुस्तक व्हावे. उषा मेहता यांनी अनुवादलेल्या किचन कवितांप्रमाणे छोटेखानी पण आशयघन. लंपन, गोट्या या व्यक्तिचित्रांप्रमाणे ही आंजी सुद्धा मराठी साहित्यात लाडके व्यक्तिमत्व ठरू शकेल.
In reply to सरसच.ह्या कथा वाचताना मला मलयाली लेखिका पी. मानसी यांच्या अ by राही
अनुमोदन
अनुमोदन
In reply to सरसच.ह्या कथा वाचताना मला मलयाली लेखिका पी. मानसी यांच्या अ by राही
पी. मानसी यांचं लेखन मी
पी. मानसी यांचं लेखन मी अजिबात वाचलेलं नाही - आता मिळवून वाचते! अर्थात आंग्ल अनुवाद - बहुधा साहित्य अकादमीत मिळावीत त्यांची पुस्तकं. वाचायला काहीतरी नवं सुचवल्याबद्दल आभार.
मास्टरनी की मास्टरी को (फिर
मास्टरनी की मास्टरी को (फिर से)सलाम!
मस्त
उत्तम
कथा आवडली.
अप्रतिम!
राही वर म्हणतात त्याप्रमाणे 'मिताक्षरी आणि अर्थबहुल'!
ही आंजी सुद्धा मराठी साहित्यात लाडके व्यक्तिमत्व ठरू शकेल. +१०००मस्तच.
मस्तच.
आदूबाळची कल्पनाही आवडली.
कडमडली पुन्हा आन्जी!
कडमडली पुन्हा आन्जी!
काय मस्त ग अतिवास! अगदी गावाकडची शाळा, ते मतदानाला उभे लोक, सगळ सगळ डोळ्यासमोर आलं.
आदूबाळ __/\__!!
आन्जी च्या सगळ्याच गोश्टी
आन्जी च्या सगळ्याच गोश्टी आवडतात :)
आतिवास पुस्तकाच मनावर घ्याच!!!
झक्कास!!
काय पन ना आन्ना, टाक्लं अस्त यखादं मत आन्जीनं त काय आबाळ कोसळ्ळं अस्तं का. वरून पाश्शेची नोट मिळाली नस्ती का मग.
कॉफी टेबल बूकची उत्सूकता आहे.
आवडेश
आवडेश
╱╱┏╮╱╱╱╱╱╱╱╱╱╱╱╱ ╱╱┃┃╱╱╱┳╱┓┳╭┫┳┓╱ ▉━╯┗━╮╱┃╱┃┣┻╮┣╱╱ ▉┈┈┈┈┃╱┻┛┛┻╱┻┻┛╱
अंजी रॉक्स,
अंजी रॉक्स,
ही पण कथा मस्त जमून आली आहे.
ही पण कथा मस्त जमून आली आहे. आंजी रॉक्स.. खरंच!
मस्त!
केसाच्या झिप्र्या आवरत ,गावभर फिरणारी आंजी दिसली.अगदी सपष्ट!
मस्त
मस्त :)
असो
:( असो
किती छान
मस्त
हा हा हा, एकच नंबर!!!!!!
हा हा हा, एकच नंबर!!!!!!
आदूबाळ म्हंटात ते अगदी खरंय. तसं एखादं बुक्क निघावं अन अखिल म्हाराष्ट्रात पापिलवार होऊन जावं. लै मजा यील तेच्यायला.
हेहेहे. मस्तय मद्दान.
हेहेहे. मस्तय मद्दान.
पन लहान मुले मद्दान नाई केले तरी हौशीनी शाई लावून घेतात आणि मिरवतात, हे मात्र पाहिलय. :)
आभार
सर्व वाचकांचे आभार.
आन्जीच्या मिपावर येण्याला प्रोत्साहन देणा-या सर्व प्रतिसादकांचे आभार.
मस्तय!
म्या पन आज बोटाला शै लावून आली की! लै मज्जा.
In reply to मस्तय! by पैसा
आन्जी रॉक्स!
बोटाला शै लावून आल्याबद्दल आपले आणि व आन्जी चे ही अभिनंदन!
आन्जी रॉक्स!
आन्जी
आन्जे केल्लेस्स गं मद्दान...
आवडेश.....
(होऊन जाऊ द्या पोरीचीबी हौस!” - हे एकदम राष्ट्रवादी स्टाईल वाटते..)..
In reply to आन्जी by योगी९००
राष्ट्रवादी शैली ही (आधीच्या)
राष्ट्रवादी शैली ही (आधीच्या) काँग्रेस शैलीशी मिळतीजुळती आहे ना? का वेगळी आहे बरीच?
ऑल इन वन, छान !
छान ! निरागसपणा, राजकारण, करड्या शिस्तीचे अण्णा : ऑल इन वन ! झकास कथा आवडली !
In reply to ऑल इन वन, छान ! by चौथा कोनाडा
+1
अण्णानचे पात्रही खूप छान आहे.
मद्दान करन्यायेवडी 'शानी'
मद्दान करन्यायेवडी 'शानी' आन्जी कधी हुनार ?
एक लंबर!
मला वाटलं आन्जीला इसरलात की काय मद्दानाच्या पूर्वतयारीत?
+१ टू आदुबाळ.
मस्त !
मस्त ! :)
ह्या मोठया मान्साईच असंच
ह्या मोठया मान्साईच असंच -ह्यायते. आता हेच बगा थे मोठ मोठे हिरो हिरोइना टीव्हीवर दिन रात ठणाण बोंबलते लोकाईवो मद्दान करा मद्दान करा म्हनुन अन आन्जी करायले गेली तवा अण्णा नाय म्हनाले.
आन्जी सोबत नेहमी असंच होतं. ती बिच्चारी गरीब गाय! तिच्यावर सारेच वरडतात शाळेमंधी गुर्जी अन घरी आण्णा. फक्त एक मोत्याच हाय जो तिचं ऐकतो तिनं काय बी म्हटलं तर झोकात शेपूट हलवतो 'गपचिप'.
In reply to ह्या मोठया मान्साईच असंच by जयनीत
हे बरीक खरं
हे बरीक खरं :-)
मस्त
एकदम कडक
यकटी आन्जीच न्हाय. मलाबी
यकटी आन्जीच न्हाय. मलाबी ल्हान्पनी मद्दान न्हाय करु दिलं. आता साय्बान्नी आयड्या दिली त्या टाय्मापासून्चा सग्ळा अनुशेश भरून काडायला. सायबांचा लईच इजय आसो.
आंजी ...
पुन्हा एकदा मतदान
पुन्हा एकदा आंजी :-)
देश
मस्त!
तुमच्या आंजीच्या सगळ्या कथा एक नंबर आहेत. आंजीची पंखा झाले आहे..
अजून कथांच्या प्रतीक्षेत....
सहीये! अचूक. अगदी असंच होतही
वेगळाच अनुभव
:D खरच लई वंगाळ वो
आन्जी इज ब्याक!
In reply to आन्जी इज ब्याक! by आदूबाळ
ओ आदूबाळ, मागे लैनीत जावा.
In reply to ओ आदूबाळ, मागे लैनीत जावा. by यशोधरा
मी ऐड्या दिली ना, मग मी पयला
In reply to मी ऐड्या दिली ना, मग मी पयला by आदूबाळ
मस्तच आहे कल्पना!
In reply to आन्जी इज ब्याक! by आदूबाळ
हे एक सुंदर स्वप्न रंगवलं आहे
In reply to हे एक सुंदर स्वप्न रंगवलं आहे by आतिवास
ये हुई ना बात!!! आदूबाळ
In reply to हे एक सुंदर स्वप्न रंगवलं आहे by आतिवास
अगदी जरूर ठेवा.
In reply to आन्जी इज ब्याक! by आदूबाळ
१०० नंबरी आयड्या !
मस्तं !
प्रसंग समोर उभा केलात!. . .
मस्त ! आदुबाळ चि आयडीया
आवडली
सरसच.ह्या कथा वाचताना मला मलयाली लेखिका पी. मानसी यांच्या अ
In reply to सरसच.ह्या कथा वाचताना मला मलयाली लेखिका पी. मानसी यांच्या अ by राही
अनुमोदन
In reply to सरसच.ह्या कथा वाचताना मला मलयाली लेखिका पी. मानसी यांच्या अ by राही
पी. मानसी यांचं लेखन मी
मास्टरनी की मास्टरी को (फिर
मस्त
अप्रतिम!
ही आंजी सुद्धा मराठी साहित्यात लाडके व्यक्तिमत्व ठरू शकेल.+१०००मस्तच.
कडमडली पुन्हा आन्जी!
आन्जी च्या सगळ्याच गोश्टी
झक्कास!!
In reply to झक्कास!! by किसन शिंदे
:-)
आवडेश
╱╱┏╮╱╱╱╱╱╱╱╱╱╱╱╱ ╱╱┃┃╱╱╱┳╱┓┳╭┫┳┓╱ ▉━╯┗━╮╱┃╱┃┣┻╮┣╱╱ ▉┈┈┈┈┃╱┻┛┛┻╱┻┻┛╱
अंजी रॉक्स,
ही पण कथा मस्त जमून आली आहे.
मस्त!
मस्त
असो
किती छान
हा हा हा, एकच नंबर!!!!!!
हेहेहे. मस्तय मद्दान.
आभार
मस्तय!
In reply to मस्तय! by पैसा
आन्जी रॉक्स!
आन्जी
In reply to आन्जी by योगी९००
राष्ट्रवादी शैली ही (आधीच्या)
ऑल इन वन, छान !
In reply to ऑल इन वन, छान ! by चौथा कोनाडा
+1
मद्दान करन्यायेवडी 'शानी'
एक लंबर!
मस्त !
ह्या मोठया मान्साईच असंच
In reply to ह्या मोठया मान्साईच असंच by जयनीत
हे बरीक खरं
मस्त
यकटी आन्जीच न्हाय. मलाबी
आंजी ...
मस्त!