आदरणीय डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र” सादर केले आहे, ज्यात जमेल तिथे विदेशी अर्थपुरवठा वापरून पण त्याच्या कुबड्या न बनवता भारतीय अर्थपुरवठा व भारतीय साधनसामुग्री वापरून श्रेष्ठ भारत, सशक्त भारत आणि दृढ भारत बनवण्यासाठी पक्षाने धोरण सुनिश्चित केले आहे.
ध्येय(Goals): एक भारत, श्रेष्ठ भारत, सुशासन, सर्वसमावेशक सर्वस्पर्शी व सर्वदेशी विकास
आव्हाने(Challenge): भ्रष्टाचार, महागाई, रोजगार, आर्थिक विषमता, देशाचा इतर पक्ष्यांच्या कार्यकाळात गेल्या ६१ वर्षांत झालेला अल्पसा विकास, वित्तीय नुकसान(CAD), रुपयाचे झालेले अवमूल्यन, परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असलेली भारतीय अर्थव्यवस्था, देशातील अंतर्गत बाजारपेठेत चीन व इतर देशांनी काबीज केलेला मोठा वाटा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भारतीय निर्यातीचा घटलेला वाटा.
मुख्य कार्यवाही केंद्र(Focus for Action): महिला सबलीकरण व संरक्षण, शेतकरी, कामगार, विद्ध्यार्थी, रोजगार निर्माण करणारे छोटे व्यावसायिक यांना हव्या त्या सुविधा स्वस्तात पुरविणे, लहान लहान खेड्यांपर्यंत रस्ते व मुलभूत साधनसुविधा उपलब्ध करणे, औद्योगिक उत्पादने, जल व उर्जा स्वतंत्रता, रस्ते-जहाज व नवीन गोदी बांधणी, शिक्षण, स्वास्थ्य व संशोधन यात अग्रेसर होणे, सिंचनाचे आधुनिक मार्ग अवलंबणे, नवीन मार्ग शोधणे व जरूर पडल्यास नदीजोड प्रकल्प उभरणे, पर्यटन व निर्यात यात मुलभूत सुधारणा, आर्थिक क्षेत्रासाठी व प्रामुख्याने NBFC साठी चांगले नियंत्रक उभे करणे व भारताला आर्थिक महासत्ता बनविणे.
काश्मीर व राममंदिरासारख्या मुद्द्याला भारतीय घटनेला अनुसरूनच कार्यवाही केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे-
- काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करणार. कठोर उपाययोजना करणार.
- कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिराची उभारणी करणार.
- विदेशातील बॅंकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात आणण्याला प्राथमिकता.
- ज्या क्षेत्रांमध्ये रोजगार आणि संपत्तीच्या वाढीसाठी थेट विदेशी गुंतवणुकीची गरज आहे, तेथेच एफडीआयला परवानगी देणार.
- नाशवंत शेतीमालाचा इतर भागांमध्ये पुरवठा करण्यासाठी अॅग्री रेल नेटवर्क उभारणार.
- हायस्पिड ट्रेन नेटवर्कसाठी डायमंड क्वॉड्रिलॅटरल प्रकल्प सुरू करणार.
- महागाई रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.
- शिक्षण आणि उद्योगात अल्पसंख्याकांना अधिक संधी देणार.
- केंद्र आणि राज्य सरकार या मधील संबंध सुधारण्यावर भर देणार.
- ज्युडिशिअल रिफॉर्म, इलेक्ट्रोल रिफॉर्मला प्राथमिकता देणार.
- नवीन आरोग्य धोरण आणले जाईल.
- ग्रामीण भागात वाय-फाय झोन उभारणार.
- महिला सबलीकरणासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड.
- टॅक्स व्यवस्था आणि बॅंकांची आर्थिक स्थिती सुधारण्यावर विशेष भर.
- प्रत्येक राज्याच्या राजधानीत एम्स उभारले जाईल.
- नॅशनल ई-वाचनालय सुरू केले जाईल. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल.
- राष्ट्रीय मदरसा विकास कार्यक्रम राबविला जाईल. उर्दू भाषेचे संरक्षण आणि प्रसार केला जाईल.
- एससी, एसटी प्रवर्गातील नागरिकांना सामाजिक न्याय आणि सबलिकरण करण्यावर भर.
- शहरी आणि ग्रामीण भारतातील दरी दूर करणार.
- प्रत्येक भारतीयाला पक्क्या घराचे आश्वासन.
सर्व वर्ग, प्रांतिय व धर्मियांना सुख, शांती, समाधान, सुरक्षा, विकास व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देशाची विक्रयमूल्य (ब्रांड व्हॅल्यू) वाढविण्यासाठी गुजराथचे सलग तीन वेळेला निवडून आलेले व प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले “माननीय श्री नरेंद्र भाई मोदी” व “भारतीय जनता पक्ष व इतर मित्र पक्षांचे खासदार पदासाठीचे इतर अधिकृत उमेदवार” यांनाच निवडून आणावे, ही विनंती माननीय श्री लाल कृष्ण अडवाणी व श्री राजनाथ सिंग यांनी केलेला आहे.
प्रथमदर्शनी अशक्य भासणारे परंतु तितकेच महत्वाचे मुद्दे ऐकून माझे कान टवकारले गेले व हातातील कामे सोडून मी टीवीवर नजर खिळवून बसलो. देशहिताला प्रथम व पूर्ण प्राधान्य देवून भाजप व मित्र पक्षांनी निवडणूक जिंकल्यावर काय चांगले होवू शकते यावर केलेला विचार मनाला पूर्ण भावून गेला. निवडणुकीला सामोरे जातांनाच अगदी पहिल्या पायरीवरच या तऱ्हेने बारीकसारीक गोष्टींचा पूर्ण विचार करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे व पक्षाची देशाप्रती असणारी एकूण तळमळ (प्रतीबद्धता) या “संकल्प पत्रा” द्वारे व्यक्त केली गेली आहे असेच वाटले.
चांगला मुद्दा हाती नसल्यामुळे, अगदी निवडणूक सुरु होण्याच्या मुहूर्तावरच हे प्रकाशन झाले आहे, यावरच बऱ्याच पक्षांनी टीका केली आहे. इतर सर्व पक्षांनी निव्वळ कागदी प्रकाशनाची औपचारिकता दाखवून केवळ मतदारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत असेच वाटते. त्यातही काहींनी मागासलेल्यांना तर काहींनी पुढारलेल्यांना आरक्षण अशी सवंग व स्वस्त जाहिरात करून आरक्षणाचे शिळे झालेले तेच गाजर पुढे केलेले आहे. या आरक्षणामुळे फक्त वरवर लेप लावून खालची जखम तशीच भळभळत ठेवण्यासारखेच आहे, हे आजवर कोणाच्याही लक्षात कसे आलेले नाही?
नुसती खोटी प्रलोभने देत व मोठमोठे घोटाळ्यांचे विश्वविक्रम रचलेल्या कॉंग्रेसने गेल्या १० वर्षात जेमतेम सव्वा लाख रोजगार निर्माण केला आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात तर पुढच्या एका वर्षात १० लाख रोजगार निर्माण करू अशी पोकळ आश्वासने दिली आहेत, ज्यावर कोणा मतदाराचा विश्वास बसेल का?
गरिबांच्या रोजच्या खर्चावरचे चमत्कारिक व अवास्तव गणित करून कोंग्रेसच्या नियोजनमंत्र्यांनी त्यांच्या तोंडावर चपराक मारलेली आहे, हे कोणी विसरेल का?
विदेशी अर्थपुरवठ्याशिवाय विकास शक्य नाही असेच इतर सर्व विरोधी पक्षांना वाटत असतांना, आजपर्यंत असा आमुलाग्र बदल घडवण्याचा “१८०अंश विरुद्ध” विचार कोणत्याही पक्षाला करणे जमलेले नाही. पण काळाची हीच खरी गरज आहे, ज्यामुळे मरगळलेली भारतीय मने निश्चितच जागरूक होऊन भारत एक आर्थिक महासत्ता बनेल अशी खात्री वाटू लागते. व त्याचा परिणाम कि काय गेल्या १० वर्षात रुपयाचे मूल्य ४० वरून ६८रुपये प्रती डॉलर एवढे घसरलेले असतांना नुसते “मोदीच निवडून येतील असा मतदारांचा आशावाद” दोन महिन्यात ५९ रुपया प्रती डॉलर पर्यंत मूल्यवर्धन करू शकतो, याचा अर्थ मोदी निवडून येण्याबद्दल किती उत्सुकता व विश्वास आहे हेच दिसून येते.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो!
एक आवाहन: मेरा देश लंगडा हो गया है|आप देशको उठाकर चला दिजीये|
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
57532
प्रतिक्रिया
219
मिसळपाव
प्रतिक्रिया
हर एक को अपनी अपनी पड़ी है!
लोकसत्ता
"आळसाधीपती अज्ञानपरायण" संपादक
In reply to लोकसत्ता by विकास
कॉंग्रेसने गेल्या १० वर्षात
हे वाचा: India lost 5 million jobs
In reply to कॉंग्रेसने गेल्या १० वर्षात by राजेश घासकडवी
अहो हेडलाइन काहीही असेल, २००५
In reply to हे वाचा: India lost 5 million jobs by आयुर्हित
फक्त माहितीचे तंत्रज्ञानविषयी:
In reply to अहो हेडलाइन काहीही असेल, २००५ by राजेश घासकडवी
सुमारे दोन लाख लोकांचा सुटला रोजगार
In reply to अहो हेडलाइन काहीही असेल, २००५ by राजेश घासकडवी
५० लाख लोक या घटकेला
जाहीरनामा हा केवळ उपचार असतो.
जनतेने आतातरी लक्ष घालावे
In reply to जाहीरनामा हा केवळ उपचार असतो. by श्रीगुरुजी
हा वचननामा आहे कि जाहिरनामा?
भारतीय जनता पार्टी घोषणापत्र 2014
In reply to हा वचननामा आहे कि जाहिरनामा? by प्रकाश घाटपांडे
हा जाहीरनामाच. शिवसेनेचा
In reply to हा वचननामा आहे कि जाहिरनामा? by प्रकाश घाटपांडे
१.
सार्वत्रिक निवडणूक आणि मुस्लिमांची भूमिका
10 करोड नोकर्यांचे खोटे आमिष
Confederation of Indian Industry welcomes BJP manifesto
!
कायद्याच्या चौकटीत राहून राम
धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या
In reply to कायद्याच्या चौकटीत राहून राम by मदनबाण
कट्टरता अजून हिंदूत पुरेशी
In reply to धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या by ऋषिकेश
कट्टर हिंदु होणे म्हणजे काय?
In reply to कट्टरता अजून हिंदूत पुरेशी by मदनबाण
कारण ख्रिस्तीकरण तर फार जोरात
In reply to कट्टरता अजून हिंदूत पुरेशी by मदनबाण
@सावरकर सहा सोनेरी पानांत
In reply to कारण ख्रिस्तीकरण तर फार जोरात by ऋषिकेश
मुळात हे विधान प्रत्यक्ष
In reply to कारण ख्रिस्तीकरण तर फार जोरात by ऋषिकेश
वाटलेच होते, म्हणूनच
In reply to मुळात हे विधान प्रत्यक्ष by मदनबाण
सध्या तरी हाताशी वेळ नसल्याने
In reply to वाटलेच होते, म्हणूनच by ऋषिकेश
बाणाशी सहमत आहे. उलट "तेव्हा
In reply to सध्या तरी हाताशी वेळ नसल्याने by मदनबाण
ात्र भारतात येऊन कित्येक शतके
In reply to धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या by ऋषिकेश
बाप्रे! काय हा प्रतिसाद!
बाप्रे! काय हा प्रतिसाद!
In reply to बाप्रे! काय हा प्रतिसाद! by संजय क्षीरसागर
@ तुम्हाला ठावुक आहे का की
In reply to बाप्रे! काय हा प्रतिसाद! by मदनबाण
धर्मांधता सोडणं हे सगळ्यांच्याच हिताचं आहे
In reply to माझ्या वरील प्रतिसादात चूक by मदनबाण
धर्मांधता सोडणं हे
In reply to धर्मांधता सोडणं हे सगळ्यांच्याच हिताचं आहे by संजय क्षीरसागर
तुमच्याशी या बाबतीत सहमत होताना आनंद झाला!
In reply to धर्मांधता सोडणं हे by मदनबाण
जय हिंद! जय भारत!!
In reply to तुमच्याशी या बाबतीत सहमत होताना आनंद झाला! by संजय क्षीरसागर
सार्वजनिक स्वछत्ताग्रुहन्मध्ये सुधरणा करण्यास
खासदारांच्या निवडणुकीत काय महत्त्वाचे?
In reply to सार्वजनिक स्वछत्ताग्रुहन्मध्ये सुधरणा करण्यास by हवालदार
थोडासा असहमत
In reply to खासदारांच्या निवडणुकीत काय महत्त्वाचे? by आयुर्हित
पाण्याची कमतरता
In reply to थोडासा असहमत by हवालदार
दुवा द्यवा
In reply to पाण्याची कमतरता by आयुर्हित
गायकवाड इस्टेट कि महान परंपरा
In reply to दुवा द्यवा by हवालदार
हे वचननामे / जाहीरनामे वगैरे
असं काहीही नसतं हो.....
In reply to हे वचननामे / जाहीरनामे वगैरे by आदूबाळ
>>शी ह्या नेत्यांची निदान पाच
In reply to असं काहीही नसतं हो..... by सुहासदवन
सध्या चालू असणारी ही appraisal process खचितच नव्हे.....
In reply to >>शी ह्या नेत्यांची निदान पाच by नितिन थत्ते
मिपाकरांनी पुढाकार घेऊन एक दबावगट निर्माण करावा!
In reply to सध्या चालू असणारी ही appraisal process खचितच नव्हे..... by सुहासदवन
दबाव गटाची गरज नाही
In reply to मिपाकरांनी पुढाकार घेऊन एक दबावगट निर्माण करावा! by आयुर्हित
धार्मिक अजेंडा राबवून मतविभागणी कोण करतंय?
In reply to दबाव गटाची गरज नाही by संजय क्षीरसागर
काँग्रेस आणि बिजेपी दोन्ही सारखेच आहेत!
In reply to धार्मिक अजेंडा राबवून मतविभागणी कोण करतंय? by आयुर्हित
हो का! मग सभेच्या वेळेला बांग
In reply to काँग्रेस आणि बिजेपी दोन्ही सारखेच आहेत! by संजय क्षीरसागर
अत्यंत विद्वत्तापूर्ण प्रतिसाद!
In reply to हो का! मग सभेच्या वेळेला बांग by llपुण्याचे पेशवेll
वाह! तुम्हाला स्वतःच्या अगाध
In reply to अत्यंत विद्वत्तापूर्ण प्रतिसाद! by संजय क्षीरसागर
With All Due Respect...
In reply to काँग्रेस आणि बिजेपी दोन्ही सारखेच आहेत! by संजय क्षीरसागर
>>> कायद्याच्या चौकटीत राहून
कायद्याची चौकट म्हणजे `नक्की काय ?'
In reply to >>> कायद्याच्या चौकटीत राहून by श्रीगुरुजी
अँड बिफोर यू से समथिंग, नोट धिस ऑल्सो
In reply to कायद्याची चौकट म्हणजे `नक्की काय ?' by संजय क्षीरसागर
बिजेपीचा `खरा अजेंडा'
In reply to अँड बिफोर यू से समथिंग, नोट धिस ऑल्सो by संजय क्षीरसागर
करेक्ट!
In reply to बिजेपीचा `खरा अजेंडा' by आयुर्हित
खरे आहे
In reply to करेक्ट! by संजय क्षीरसागर
मंदिराचा प्रश्न मॅनिफेस्टोतून काढला की बिजेपीकडे राहतंय काय !
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
काय म्हणायचे याला?
In reply to मंदिराचा प्रश्न मॅनिफेस्टोतून काढला की बिजेपीकडे राहतंय काय ! by संजय क्षीरसागर
अरेच्या!
In reply to काय म्हणायचे याला? by आयुर्हित
आपण चुकलो कुठे ह्याचे जरा चिंतन करावे
In reply to अरेच्या! by संजय क्षीरसागर
जाहीरनाम्यातील एक ओळीचा राम
In reply to बिजेपीचा `खरा अजेंडा' by आयुर्हित
नवीन काहीच नाही.
In reply to जाहीरनाम्यातील एक ओळीचा राम by संपत
त्यात नवीन काहीच नाही!
In reply to नवीन काहीच नाही. by विकास
धूळफेक का काय माहीत नाही...
In reply to त्यात नवीन काहीच नाही! by संजय क्षीरसागर
तुमच्या प्रतिसादाचा तुम्हाला अर्थ लागला की कळवा!
In reply to धूळफेक का काय माहीत नाही... by विकास
?
In reply to तुमच्या प्रतिसादाचा तुम्हाला अर्थ लागला की कळवा! by संजय क्षीरसागर
परत तेच? छे, छे, आता तुम्ही आलात लाईनवर!
In reply to ? by विकास
?
In reply to परत तेच? छे, छे, आता तुम्ही आलात लाईनवर! by संजय क्षीरसागर
हिंदूत्वचा अर्थ देखील माहीत आहे का?
In reply to ? by विकास
आय डाऊट...
In reply to ? by विकास
नांवाला साजेलसा प्रतिसाद!
In reply to आय डाऊट... by अर्धवटराव
आश्चर्य नाहि वाटलं.
In reply to नांवाला साजेलसा प्रतिसाद! by संजय क्षीरसागर
राममंदिराचा मुद्दा
In reply to तुमच्या प्रतिसादाचा तुम्हाला अर्थ लागला की कळवा! by संजय क्षीरसागर
त्यात नवीन काहीच नाही.
In reply to नवीन काहीच नाही. by विकास
गप्पा
In reply to त्यात नवीन काहीच नाही. by संपत
यु आर राँग डुड !
In reply to त्यात नवीन काहीच नाही. by संपत
काय लिहीलंय व्वा!
In reply to यु आर राँग डुड ! by अर्धवटराव
ज्यांना कळायचं त्यांना कळलं.
In reply to काय लिहीलंय व्वा! by संजय क्षीरसागर
नो, यु आर राँग बडी !
In reply to यु आर राँग डुड ! by अर्धवटराव
एक्झॅक्ट्ली.
In reply to नो, यु आर राँग बडी ! by संपत
काय कमालीची वैचारिक झेप आहे!
In reply to एक्झॅक्ट्ली. by अर्धवटराव
याला म्हणतात मेंदुला नारु होणं.
In reply to काय कमालीची वैचारिक झेप आहे! by संजय क्षीरसागर
पण भाजपच्या नाड्या संघाच्याच
In reply to एक्झॅक्ट्ली. by अर्धवटराव
संघाच्या आदेशाच्या बाहेर जाण्याची भाजपची प्राज्ञा नाही!
In reply to पण भाजपच्या नाड्या संघाच्याच by संपत
आणि प्रतिसादातल्या क्वोट्सची
In reply to संघाच्या आदेशाच्या बाहेर जाण्याची भाजपची प्राज्ञा नाही! by संजय क्षीरसागर