नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द
In reply to छान आहे. by आदिजोशी
In reply to छान आहे. by आदिजोशी
तूनळी - youtube थोबाडपुस्तक - facebook चोप्य-पस्त - copy pasteहे अतिउत्साही लोकांचे उपद्व्याप आहेत. ही सारी उदाहरणे "विशेषनामे" आहेत. विशेषनामांचे शब्दशः भाषांतर होत नाही. त्यामुळे इंग्रजीतील "युटयुब" हा शब्द असलेले वाक्य इतर भाषांमध्ये भाषांतरीत होतात "युटयुब" असेच राहायला हवे.
In reply to मला फेसबुक साठी 'मुखप्रुष्ठ' by अत्रुप्त आत्मा
In reply to मला 'मुखप्रुष्ठ' ऐवजी by प्रचेतस
In reply to "फेसबुक" हे इतर भाषांमध्ये by धन्या
अत्रुप्त आत्म्याने ताकाचे भांडे लपवलेवाक्य कितीही बरोबर असले तरी प्रत्यक्षात अत्रुत आत्मा भांडे लपवित नसून 'भांडे का लपविता' असे विचारीत असतो
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
In reply to ते अत्रुप्त आत्मा असल्यानं by प्यारे१
In reply to अत्रुप्त आणि अतृप्त तसेच by धन्या
In reply to संस्कृतमधील ऋ या स्वराचा by बॅटमॅन
In reply to किंवा अजून सोपे उदा. by बॅटमॅन
किंवा अजून सोपे उदा. "बहुत प्यार करते हैं, तुमको सनम"आम्हाला आमच्या बाई/मास्तरांनी अश्या साध्या सोप्या सरळ पद्धतीने समजावले असते तर आमचे पण व्याकरण थोडेफार सुधारले असते. ;)
In reply to _/\_... दंडवत घ्या मालक... by शिद
In reply to _/\_... दंडवत घ्या मालक... by शिद
In reply to _/\_... दंडवत घ्या मालक... by शिद
In reply to किंवा अजून सोपे उदा. by बॅटमॅन
In reply to किंवा अजून सोपे उदा. by बॅटमॅन
In reply to आता वाळिंब्यांनी असली उदाहरणे by जातवेद
In reply to किंवा अजून सोपे उदा. by बॅटमॅन
"बहुत प्यार करते हैं, तुमको सनम"
या गाण्यात "करते" हा शब्द, त्यातही "र" हे अक्षर लांबवलेले आहे. तो र चा उच्चार म्हणजेच संस्कृतचा ऋ म्हटला तरी चालेल.
अशी उदाहरणे देऊन मराठी शिकवायला सुरुवात केली तर "मराठी भाषेचा वापर कमी होत चालला आहे" किंवा "मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने लिहिली/बोलली जाते" ही भिती कमी व्हायला मदत होईल ! :) In reply to "फेसबुक" हे इतर भाषांमध्ये by धन्या
In reply to "फेसबुक" हे इतर भाषांमध्ये by धन्या
In reply to मला 'मुखप्रुष्ठ' ऐवजी by प्रचेतस
In reply to गरज नाही ! by वेल्लाभट
In reply to गरज नाही ! by वेल्लाभट
In reply to म्हणणे अन बोलणे यातला फरकही by बॅटमॅन
मी चहा पिलो / प्यायलो / पिली / प्यायली (?) तो चहा/ती चहा (?)सद्या मी "मी चहा प्यायलो" असेच म्हणतो/बोलतो. मी ठाण्याचा रहिवासी/रहिवाशी आहे.
In reply to असो by llपुण्याचे पेशवेll
In reply to असो by llपुण्याचे पेशवेll
In reply to भाषा सतत बदलत असते. विभक्ती by मारकुटे
In reply to बरं by llपुण्याचे पेशवेll
In reply to पैसे भेटले हा प्रयोग by बॅटमॅन
In reply to गल्लत by llपुण्याचे पेशवेll
In reply to विभक्तीच्या मुद्यावर सहमती by बॅटमॅन
In reply to पैसे नाय भेटले by पैसा
In reply to सहमत. गावणे हाही शब्द आहेच. by बॅटमॅन
पूर्ण सहमत!!!!!!! खच्चून निषेध केल्या गेला आहे.
बर्याच मालिकांत ऐकू येते - मी काय म्हणली, तू काय म्हणला, ते काय म्हणले....
In reply to भाषाप्रभू मग हे काय आहे.... by सुहासदवन
In reply to केल्या गेला आहे इ.इ. ही by बॅटमॅन
In reply to बरं by llपुण्याचे पेशवेll
In reply to >>>भाषाभिमान नसल्यामुळे by मारकुटे
In reply to बदलती भाषा by राही
In reply to बदलती भाषा by राही
In reply to भाषेतील बदल by प्रदीप
In reply to स्रोत by राही
In reply to >>>मराठी साहित्याचा उगम स्रोत by मारकुटे
गेली दोन हजार वर्षे ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले त्यांच्या हातात आता मराठी आहे.....
हे टाळीवाक्य इथे (म्हणजे सदर उपधाग्याच्या संदर्भात) अगदी गैरलागू आहे. माझा प्रतिसाद नीट वाचलात तर आपल्या लक्षात यावे की माझा आ़क्षेप कुठल्याही मराठी बोलीभाषेला नाहीच. उलट संस्कृताळलेले 'शासकीय मराठी' व हिंदीच्या अतिप्रभावातून आलेल्या बदलांविषयी मी लिहीले आहे. तेव्हा पुणेमुंबई, गावकुसाबाहेरील माणसे इ. इ. ह्या उपधाग्यावर गैरलागू.
In reply to बदलती भाषा by राही
In reply to एक प्रमाण भाषा असणे आवश्यक by सुबोध खरे
In reply to एक प्रमाण भाषा असणे आवश्यक by सुबोध खरे
In reply to >>>आपल्याला मराठी चांगली by मारकुटे
In reply to मारकुटे साहेब, by सुबोध खरे
In reply to मारकुटे साहेब, by सुबोध खरे
In reply to सर्कारदर्बारची भाषा अन by बॅटमॅन
कायदेशीर मान्यता आणि व्याकरणाची शुद्धता यांचा संबंध नाहीनक्की शुद्धताच का?? की प्रमाणता.. यावर किती किस पाडु तेवढा कमी आहे.. शुद्ध-अशुद्ध, प्रमाण-प्रमाणेतर, चांगले-वाईट या सगळ्या संज्ञा सापेक्ष (मराठीत - relative terms) आहेत एवढच म्हणू शकतो .. इथे जरा "भावना पोचल्या की झालं" हा नियम लावून पहा !!
In reply to कायदेशीर मान्यता आणि by बाळ सप्रे
In reply to होय शुद्धताच. by बॅटमॅन
In reply to म्हणजे व्याकरणाचे नियम न by बाळ सप्रे
In reply to मान्यता नसलेली बोली फक्त by बॅटमॅन
शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहे
व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्धवरील दोन्ही विधाने परस्परविरोधी आहेत.. मला दुसरे विधान पटते.. त्याप्रमाणे.. 'त्याची मदत केली' - अशुद्ध 'त्याला मदत केली' - शुद्ध का इथे बोलीभाषेचा संदर्भ लावून प्रमाणेतर म्हणणार?? व्याकरणाप्रमाणे अशुद्ध म्हटल्यास व्याकरणाचे 'अज्ञान' हे कारण स्वीकारण्यास हरकत नसावी.. इथे 'सामाजिक अभिसरणामुळे झालेले बदल अज्ञानातून होतात हे म्हणणे अज्ञानमूलक आहे' ही पळवाट आहे.. काही लोकं व्याकरणाच्या/ भाषेच्या 'अज्ञानामुळे' अशुद्ध बोलतात हे मान्य न करता.. भाषेचा प्रवाहीपणा, सामाजिक अभिसरण वगैरे मुद्दे सांगुन सरसकटपणे पाठराखण होउ नये इतकेच!!
In reply to शुद्ध आणि अशुद्ध असे by बाळ सप्रे
काही लोकं व्याकरणाच्या/ भाषेच्या 'अज्ञानामुळे' अशुद्ध बोलतात हे मान्य न करता.. भाषेचा प्रवाहीपणा, सामाजिक अभिसरण वगैरे मुद्दे सांगुन सरसकटपणे पाठराखण होउ नये इतकेच!!हे असलं तरी वेगळ्या बोलींना रेकग्निशन देणे हे कधी होणारच नाही. प्रमाणभाषेपुरते ठीक आहे, बाकी वेगळ्या बोलीचं असू नये असं. व्याकरण ही गोष्ट फक्त प्रमाणबोलीपुरती मर्यादित नाही. थोड्या फरकांसहित पाहिले तर साधारणपणे व्याकरणाचा एकच नियम बर्याच बोलींना लागू पडतो म्हणून तो शुद्धतेचा मुद्दा काढला इतकेच. ऑब्जेक्टिव्हलि शुद्ध म्हणून जे काही अस्तित्वात असते अथवा असू शकते ते एका प्रमाण बोलीशी निगडित नसते अथवा नसावे इतकाच मुद्दा आहे.
In reply to विभक्तिप्रत्यय by राही
तृतीयेचा 'ने' हा एकवचनी प्रत्यय सध्या अदृश्य होऊ लागला आहे. त्याऐवजी 'नी' च वापरला जातोय.एक छोटीशी दुरुस्ती: 'ने' हा प्रत्यय प्रत्यक्ष बोलण्यात कधीच नव्हता, फक्त लेखनात होता. अन नी ऐवजी नं हा जास्त ऐकला आहे.
In reply to विभक्तिप्रत्यय by राही
In reply to प्रत्ययाबाबत मुद्दा लक्षातच by llपुण्याचे पेशवेll
In reply to फुसकी कारणे? by राही
In reply to विभक्तिप्रत्यय by राही
In reply to भाषा प्रवाही असते.. नवीन शब्द by बाळ सप्रे
In reply to प्रमाण भाषा इ. by राही
लुगडी-पातळे-साड्या-धोतरे-पंचे हे निर्या काढून 'नेसायचे' असत. आता पँट-शर्ट-जीन्स-सल्वारकमीज् 'घालतात'. वेणी 'घालायची' असे, आज केस 'बांधतात'इथे सामाजिक बदलांना अनुसरुन भाषा बदल अपेक्षितच आहे.. पण म्हणून साडी 'घातली' हे अशुद्धच!! तेवढच म्हणायचय मला.. प्रत्येक भाषिक अशुद्धतेची प्रवाहीपणा/समृद्धी याकारणासाठी पाठराखण होउ नये इतकच!! 'त्याला मदत करणे ' हे सुट्सुटित वाक्यरचनेचे रूप माहित नाही म्हणून जास्त हिंदी कानावर पडण्यामुळे 'त्याची मदत करणे' असे केले जाते. इथे सामजिक बदल अथवा कुठल्याही प्रकारची अपरीहार्यता हे कारण नसून अज्ञान आहे हे कारण आहे हे मान्य करायला हरकत नसावी.
In reply to लुगडी-पातळे-साड्या-धोतरे-पंचे by बाळ सप्रे
In reply to घालणे by राही
In reply to साड्या वापरातून जायच्या by बाळ सप्रे
In reply to खरे तर by राही
In reply to >>> खरे तर साड्या वापरातून by प्यारे१
In reply to अज्ञान? by राही
In reply to १००००००००००००% सहमत. नवीन by बॅटमॅन
In reply to अज्ञान? by राही
मराठी बिघडत नाहीय आणि मराठीची अधोगती होत नाहीय हे मात्र नक्कीहे मान्य.. पण बरेच शब्दप्रयोग डोक्यात जातात हे मात्र खरं.. पण शुद्ध आणि अशुद्ध हा फरक राहाणारच.. प्रत्येक जण आपल्याला वाटेल तसेच बोलणार .. पण त्यात चूक दाखवल्यास वाईट वाटून घेउ नये.. 'शुद्ध आणि अशुद्ध असं काहिच भाषेत नसतं' असं म्हणणं हे देखिल आत्मवंचना करणेच ठरेल.
In reply to मराठी बिघडत नाहीय आणि मराठीची by बाळ सप्रे
In reply to शुद्ध आणि अशुद्ध ऐवजी प्रमाण by बॅटमॅन
In reply to भाषेबाबत जास्त आग्रही असणार् by बाळ सप्रे
In reply to शुद्ध आणि अशुद्ध असे by बॅटमॅन
शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहेभाषाशास्त्र असेदेखिल ऑब्जेक्टीव्ह काही नसते (कारण प्रमाण काय आणि प्रमाणेतर काय यावरदेखिल वाद होउ शकतात) .. मुद्दा एवढाच.. अशुद्ध भाषा म्हटल्यावर राग येउ शकतो.. प्रमाणेतर म्हटल्यास ती शक्यता कमी.. म्हणूनच म्हटलं "प्रमाण - प्रमाणेतर" ला सर्वसंमती मिळू शकेल.. पण हे डावंउजवं राहायचचं..
In reply to शुद्ध आणि अशुद्ध असे by बाळ सप्रे
भाषाशास्त्र असेदेखिल ऑब्जेक्टीव्ह काही नसतेपिशी अबोलीबै, ऐकताहात का ;) एनीवेज, हे विधान चूक आहे. ऑब्जेक्टिव्ह कंटेंट भाषाशास्त्रात खच्चून भरला आहे. ते न पाहता प्रमाण भाषेलाच शुद्ध म्हणण्याचा आग्रह रोचक वाटला.
In reply to शुद्ध आणि अशुद्ध ऐवजी प्रमाण by बॅटमॅन
In reply to अज्ञान? by राही
सध्या हिंदीवर बॉलिवुडी प्रभाव नाही असे आपल्याला वाटते का? वाट लग गयी, श्यानपन, कानपट्टी, सुमडी, नक्को (दखनी) हे शब्द कुठून आले? हे शब्द तर पाकिस्तानी उर्दूतही शिरले आहेत. पाकिस्तानी उर्दूबद्दल माहिती नाही. हिंदी चित्रपटांत हे शब्द सर्रास येत असल्याने, व पाकिस्तानीही ते बर्यापैकी बघत असावेत, त्यामुळे अशा एका शब्दाचा मीच अलिकडे येथील एका पाकिस्तान्याशी बोलतांना वापर केला आणि मला काय म्हणायचे आहे ते त्याला अगदी झटकन समजले. पण हा anecdotal evidence झाला. ह्यापुढे प्रत्यक्ष आपापसात बोलतांना हे लोक असे, मराठीतून हिंदी चित्रपटांपुरते गेलेले शब्द वापरतात का, ह्याबद्दल काही माहिती नाही.
पण हे शब्द आता सर्रास हिंदी भाषेत गेले आहेत व हिंदीभाषिक जनताही ते नियमीत वापरते, ह्याविषयी मात्र मी साशंक आहे. पुन्हा माझा anecdotal evidence तरी मला हे दर्शवत नाही.
वास्तविक हिंदी चित्रपटांचा आपल्या सर्वांगीण जीवनावर प्रभाव अगदी चाळीशीच्या दशकापासून आहे. पण गेल्या पंधरा-वीस वर्षातच आपले पुण्या- मुंबईकडील लोक इतके हिंदाळलेले का बोलू लागले, आणि तसेच लिहूही लागले, ह्याचे मात्र मलातरी सखेदाश्चर्य वाटत राहिले आहे. इतर भाषांतून आपण पूर्वापार शब्द स्वीकारत आलेलो आहोत. पण, ती प्रक्रिया इतक्या वेगाने झालेली नाही. तसेच आपल्या अंवतीभोवती जे असते, त्याचा आपल्या बोलण्याचालण्यावर परिणाम होणे साहजिक आहे. पण तरीही आपले म्हणून जे काही असते ते अगदी 'पातळ' करून टाकायचे का, हा प्रश्न आहे. मला वाटते ह्याला थोडी शिस्त, व आपल्याच भाषेचा रास्त अभिमान असणे जरूरीचे आहे. माझा मुलगा वयाच्या आठव्या वर्षापासून परदेशी वाढला,इंटरनॅशनल शाळेत जावयास लागल्यानंतर त्याच्या मराठीत कधीमधी चुकीच्या वाकरचना येऊ लागल्या, उदा. 'तो मला बसवर भेटला'. अशा वेळी त्याला सौम्यपणे 'मराठीत आपण असे म्हणत नाही,' असे सांगून आपण ते मराठीत कसे म्हणतो, हे सांगून सुधारणा करत राहिलो. माझ्याप्रमाणेच आमच्या येथील अनेक मराठी कुटुंबियांतील मुले अगदी नीट मराठी बोलू शकतात, ते बहुधा अशाच शिस्तीमुळे असावे.
इतर भाषेतील विशेषनामे उगाच चमत्कारीक मराठीकरण करून वापरावीत (उदा. 'चेपू', 'तूनळी' इत्यादी) हे मलातरी खुळचटपणाचे वाटते. तसेच ज्या संकल्पनाच परकी आहेत, त्यांना त्या त्या भाषांतील मूळ नावांनीच संबोधावे, ह्याविषयी अजिबात वाद नाही. त्याचबरोबर मराठीतील काही शब्दांना नवे अर्थ देऊन ते वापरणे हेही बेजबाबदारपणाचे वाटते. फार पूर्वीचे सांगत नाही, अगदी ऐशीच्या दशकापर्यंत कुठलाही दर्जेदार कार्यक्रमही 'समाप्त' व्हायचा. (आठवा: "आजचा 'आपली आवड' हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूयात पुढल्या मंगळवारी, रात्रौ दहा वाजता"). आता गल्लीबोळातला कार्यक्रमही 'संपन्न' होतो. (पूर्वी आमची जीवने कुठल्या ना कुठल्या कारणाने संपन्न व्हायची). हीच गोष्ट 'प्रभावित' ची! 'आलेल्या पुराने अमूकेक क्षेत्र 'प्रभावित' झालेले आहे' म्हणे!
तेव्हा भाषेच्या प्रवाही असण्याबद्दल तक्रार नाही. मात्र बेजबाबदार राहून आपण आपली कात भर्र्कन टाकणे कितपत रास्त आहे, ह्याविषयी दुमत आहे.
In reply to बदल by प्रदीप
In reply to प्रतिसाद आवडला by पैसा
गंमत म्हणजे मुंबईत हल्ली सार्वजनिक जागी २ मराठी माणसे भेटली तर हिम्दीत बोलतात असे ऐकून आहे. माझा असाच अनुभव आहे.
एका मुंबईच्या मित्राशी ह्या विषयावर अलिकडेच बोलत होतो. त्याने त्याचा मुंबईच्या आसपासच्या काही गावांतील स्वतःचा अनुभव सांगितला. त्याच्या अनुभवानुसार तिथेही, तेथील स्थानिक गांवकरी, आपण मराठीरून प्रश्न विचरल्यावर, आपणास हिंदीतून उत्तरे देतात. मित्राचे म्हणणे असे की असे हिंदीतून बोलणे, हे आता गावांतून प्रतिष्ठेचे होऊ लागले आहे.
In reply to अज्ञान? by राही
In reply to बरेचसे प्रतिसाद आवडले by पैसा
या सगळ्या गदारोळात द्रविड भाषा आपले अस्तित्व टिकवून ठेवतील का त्यांचीही अशी सरमिसळ होत आहे?सरमिसळ त्यांच्यातही होत आहे. पण मुळात फरक बराच असल्याने त्यांच्या वेगळ्या अस्तित्वाला तितका फरक पडणार नै. मराठीत हिंदी प्रमाणाबाहेर मिसळली तर कदाचित एक वेगळीच भाषा तयार होईल, पण द्राविडी भाषांची मूळ शब्दसंपदा वेगळी असल्याने तसे होण्याची शक्यता कमीच. अर्थात लाँग रेंजमध्ये काय होईल कुणी सांगावे? मराठीची उत्पत्ती हीच मुळात प्राकृत + द्राविडी भाषांचे मिश्रण म्हणून झाली असे म्हंटात. तसेही होईल.
In reply to बरेचसे प्रतिसाद आवडले by पैसा
In reply to अज्ञान? by राही
In reply to बरीच चर्चा झाली. पण इथे नवीन by कौशिक लेले
मला इंटरनेट कनेक्शनला जो मराठी म्हणून संस्कृतनिष्ठ जालंजोडणी ,हा शब्द वापरतात..त्याऐवजी येक सहजशब्द सुचला!!!
जोडजाळं
अता या शब्दावर माझा कॉपिराइट हां!!!In reply to काही नवीन शब्द by प्रसाद गोडबोले
In reply to काही नवीन शब्द by प्रसाद गोडबोले
मान्यता नसलेली बोली फक्त प्रमाणेतर.
व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध.
अशुद्ध हा शब्द भाषेबाबतीत पूर्णपणे निषिद्ध नाहीये.
आशयाशी सहमत. पण खालील फरकासहः
प्रमाणित भाषा: सांविधिक संस्थेने (statutory body) मान्यता दिलेल्या नियमाप्रमाणे वापरलेली वापरलेली भाषा.
अप्रमाणित भाषा: प्रचलित असलेली पण प्रमाणित भाषेशी सुसंगत नसलेली भाषा.
अशुद्ध भाषा: सांविधिक संस्थेने मान्यता दिलेले नियम पाळण्याचा प्रयत्न/दावा करून त्या बाबतीतल्या चुका असलेली भाषा.
या संदर्भात माझे दोन पैसे:
१. बोलीभाषा
बोलीभाषा ही रोजच्या वापरातली आणि म्हणून अत्यंत प्रवाही असते. ती वापरली जाण्यार्या लोकांत रुजलेल्या सवयी, तत्कालीन प्रचलित आवडी-निवडी (इन थिंग,फॅड, इ); बोलण्याच्या सवयी (हेल, च/ज इ उच्चारण्याच्या पद्धती,इ); इ ने प्रचंड प्रभावित असते. या सर्व गोष्टी काळाबरोबर सतत बदलत असतात आणि त्यामुळेच बोलीभाषा प्रवाही (सतत बदलत राहणारी) होते. एक प्रकारे बोली भाषा ही सतत चालू अवस्थेतले काम (वर्क इन प्रोग्रेस) आणि त्याबरोबर होणारा प्रत्येक बदल त्वरित वापरात आणणारे काम असते. लोकांना पसंत पडलेले / उपयोगी वाटणारे बदल प्रचारात राहतात आणि तसे नसलेले आपोआप कमी कमी वापर झाल्याने प्रचारातून निघून जातात.
वरच्या वस्थुस्थितीमुळे कोणतीही बोलीभाषा नियमांच्या एका चौकटीत बसवणे शक्य नाही ... तो एक निष्फळ प्रयत्न आहे. लोक तुमचे मत ऐकतील न ऐकतील, पण त्यांना सोयीचे / आवडेल तसेच बोलतील/ लिहितील. म्हणूनच,
अ) बोलीभाषा दर २०-३० किलोमीटरवर वेगळी असते. (याचा अर्थ ती नकाश्यांवर आखलेल्या रेषांच्या पुढेमागे एकदम बदलत नाही, तर एकीतून दुसरीत लोकांच्या गरजेनुरूप सहजपणे रूपांतरित होत जाते.) तसेच,
ब) ती कोणत्याही एका स्थानावरही कालप्रवाहाबरोबर सतत बदलत जाणारी असते.
क) एवढेच काय तर एकाच स्थानावर (उदा गाव, शहर, भौगोलिक विभाग, इ) आणि एकाच काळी वेगवेगळ्या लोकसमूहातली बोलीभाषा वेगळी असणे सामान्य आहे. हे जाती-धर्माच्या विविधतेने भरलेल्या भारतात प्रकर्षाने दिसत असले तरी तितकीशी विविधता नसलेल्या इतर ठिकाणीही फार अभावाने आहे असे नाही.
२. प्रमाण भाषा
ही एखाद्या भाषेसाठी नेमलेल्या सांविधिक संस्थेने सद्य काळाकरिता नक्की केलेले नियम वापरून लिहिली-बोललेली स्थिर भाषा असते. याची काही प्रमाणात सॉफ्टवेअर प्रणालीच्या व्हर्शनशी तुलना होऊ शकते. आज जाहीर केलेले व्हर्शन त्यापुढचे व्हर्शन जाहीर होईपर्यंत स्थिर असते. याचा अर्थ भाषेची बदलण्याची प्रक्रिया थांबली असे नाही... ती सतत चालूच राहते. काही काळाने, बहुसंख्य लोकांनी बदललेल्या लिहिण्याच्या-बोलण्याच्या सवयींप्रमाणे झालेले बदल जेव्हा लक्षणीय प्रमाणात होतात तेव्हा प्रमाणित भाषेचे नवीनं व्हर्शन बनविणे भाग पडते. हे मराठीसकट सर्व वापरात असलेल्या भाषांच्या बाबतीत घडले आहे, घडत राहील.
उदा. मराठीतले बदललेले र्हस्व-दीर्घ आणि अनुस्वारांचे नियम. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीच्या गेल्या काही दशकांतील आवृत्त्या नजरेखालून घातल्या तरी इंग्लिश मध्ये झालेल्या अनेक बदलांचा पुरेसा पुरावा मिळेल.
३. भाषेचा वापर
कशासाठी भाषा वापरली जाते यावर कोणती बोलीभाषा / प्रमाणित भाषा वापरायची आणि त्यांचे कोणते (प्रमाणित / अप्रमाणित) व्हर्शन वापरायचे हे बहुतेक वेळा नैसर्गिकपणे ठरते... आणि तेच योग्य आहे. उदा: कट्ट्यात मित्रांबरोबर गंमत म्हणून अप्रमाणित गावरान मराठी वापरणारा माणूस वरिष्ठ अधिकार्याबरोबर मराठी बोलताना प्रमाणित मराठी बोलला नाही तर आश्चर्य वाटेल नाही का?
साधारणपणे भाषेच्या वापराचे खालील प्रमाणे दंडक आहेत / असावेतः
अ) शासकीय / औपचारिक लेखन / बोलणे : प्रमाणित भाषा.
ब) खाजगी / अनौपचारिक लेखन / बोलणे : योग्य परिणाम साधण्यासाठी आवश्यक ती बोलीभाषा अथवा प्रमाणित भाषा.
क) साहित्य : योग्य परिणाम साधण्यासाठी आवश्यक तसे बदल करत बोलीभाषा अथवा प्रमाणित भाषा. उदा. जुन्या संस्कृत नाटकांत सामान्य पात्रांच्या तोंडी (संस्कृत नाही तर) प्राकृत भाषा आहे... तसे नसते तर ते हास्यास्पद वाटले असते. कारण जगात कोणत्याही काळी कोणत्याही प्रदेशात १००% लोक प्रमाणित भाषा वापरत नव्हते / नाहीत / नसतील. तसेच ग्रामीण कादंबरीतल्या अशिक्षित पात्रांच्या तोंडी संस्कृतप्रचुर / प्रमाणित भाषा अवास्तविकच वाटेल.
३. परकीय भाषेचा हल्ला
परकीय भाषेचा आपल्या भाषेवर हल्ला ही बहुदा "कोल्हा आला रे सारखी" आवई असते. मात्र या आवईमुळे काहीही फरक पडत नाही... तिचे महत्त्व फुसका समस्तरिय दबाव (इनइफेक्टीव्ह पियर प्रेशर) पेक्षा फार जास्त नाही.
अ) आज इंग्लिश जगभरात ताकदवान भाषा म्हणून प्रचारात आहे ती तिचे उत्तम विपणन केल्यामुळे नाही किंवा तिच्या संरक्षणासाठी भाषामार्तंडांची फौज असल्यामुळे नाही तर तिच्या योग्य वापरामुळे होणार्या निर्विवादी आर्थिक-सामाजिक-व्यावसायिक फायद्यांमुळे आहे. जर उद्या मराठीच्या बाबतीत असेच झाले तर मराठीच्या प्रचारासाठी दुसरे काही विशेष करणे जरूरीचे नसेल.
ब) परक्या भाषेतले शब्द / शब्दरचना आपल्या भाषेने अंगीकृत करण्यात सारासारविवेकबुद्धी वापरणे नक्कीच आवश्यक आहे, पण हा मुद्दाही इतर काहीपेक्षा भावनिकच जास्त आहे. भाषा-भाषा प्रक्रिया सर्व भाषांत सर्वकाळ होत आलेली आहे व आर्थिक-सामाजिक-व्यावसायिक फायद्यांच्या वस्तुस्थितीवर आधारितच ती सर्वस्वी अवलंबून आहे. दुसर्या भाषेमुळे आपली भाषा मलिन होईल हा दावाही तसा फोल आहे. कारण भाषा ही ती भाषा वापरणार्या लोकांची मालमत्ता आणि ती कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी त्यांचाच आहे. एखाद्या अनिष्ट गोष्टीची काही काळासाठी "हवा" तयार होऊ शकते. पण सर्वसाधारणपणे, ना लोक त्यांना अयोग्य वाटणारे बदल स्वीकारतील, ना कोणी त्यांच्यावर ते लादू शकेल... लोकांना आवडतील / फायद्याचे असतील तेच बदल जीव धरतील / फोफावतील / शिल्लक राहतील.
क) आजच्या जगतील कोणतीच भाषा स्वयंभू असल्याचा दावा करू शकणार नाही. जिला अनभिषिक्त जागतिक भाषा असे समजले जाते, त्या इंग्लिश भाषेत ८०% पेक्षा जास्त शब्द परकीय भाषांतून आलेले आहेत आणि त्यामुळे तिला "उधार-उसनवार भाषा (borrowed language) असे म्हटले जाते.
cola (कोला) हा सर्वव्यापी आणि सर्वमान्य शब्द इंग्लिशने पश्चिम आफ्रिकेतील Temne (kola) आणि Mandinka (kolo) या भाषांतून उचलेला आहे.
आश्चर्यचकित व्हायचे असेल तर, पुढचा दुवा नुसता वरवर चाळून पहा : इंग्लिशमध्ये उसने घेतलेले शब्द आणि त्यांचा मूळ भाषा इथे सापडतील.In reply to मान्यता नसलेली बोली फक्त by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मान्यता नसलेली बोली फक्त by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मान्यता नसलेली बोली फक्त by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मान्यता नसलेली बोली फक्त by डॉ सुहास म्हात्रे
चांगला उपक्रम !!!