व्हर्गा हा पावसाचा एक प्रकार आहे.. तो जमिनीवर पोचण्याआधीच वाफ होऊन नाहीसा होतो.
व्हर्गासारखं हवेत नाहीसं झाल्याचा भास देणारं मलेशिया एअरलाईन्सचं बोईंग विमान. सगळेजण या विचित्र घटनेविषयी सर्वत्र वाचत आणि ऐकत आहेतच. तरीही काही इतर नाही तरी महत्वाच्या वाटणार्या गोष्टींची एक यादीच का होईना, पण बनवण्यासाठी टंकणं अनिवार झालं.
या फ्लाईटसाठी वापरलेलं विमान म्हणजे बोईंग ७७७ - २०० ई आर. (777-200ER)
ER म्हणजे एकस्टेंडेड रेंज. लांब प्रवासासाठी जास्ती अंतर एका दमात पार करता यावं म्हणून जास्त कपॅसिटीचे फ्युएल टँक्स बसवलेलं. नेहमीच्या 777-200 पेक्षा जवळजवळ चौपन्न हजार लीटर जास्त एव्हिएशन ग्रेड केरोसीन नेण्याची क्षमता. एकूण फ्युएल टँक साईझ एक लाख सत्तर हजार लीटर्सच्या वर.. आणि फुल टँकसहित नॉन स्टॉप उड्डाण चौदा हजार तीनशे किलोमीटर्स, सुमारे.
जास्तीतजास्त टेकऑफ वेट दोन लाख सत्याण्णव हजार किलो म्हणजे जवळजवळ तीनशे टन.
१९९ फूट विंग स्पॅन आणि २०९ फूट लांबी.
हे सर्व वरवरचं झालं. पण याच्या आतल्या सिस्टीम्स ?!
फोटो आभारः विकीमीडिया
बोईंग 777 सीरीजचं हे विमान हवेत अचानक बिघाड होऊन तत्क्षणी कोसळणं हे जवळजवळ अशक्य आहे. यामधे फार फार उच्च दर्जाच्या सिस्टीम्स आहेत. बाकी विमानाची अंतर्गत सुरक्षितता, एका कंट्रोलचं किंवा पार्टचं काम बंद झालं तर अन्य योजना, वायरींची गुंतागुंत टाळणारी आधुनिकता, कॉम्प्युटराईज्ड सिस्टीम मॅनेजमेंट हे सर्व बाजूलाच ठेवू.
त्याखेरीज अनेक संपर्काचे मार्ग या विमानाच्या पायलट्सकडे होते:
-रेडिओवर बोलून कंट्रोल टॉवर आणि मार्गावरच्या अन्य फ्लाईट कंट्रोल सेंटर्सशी संभाषण करण्याचा कॉमन चॅनेल. हा सर्व सेंटर्स आणि परिसरातल्या सर्व विमानांना एकत्र ऐकू येतो. नथिंग पर्सनल अबाउट इट.
-याखेरीज किमान एक खाजगी चॅनेल, पायलट आणि क्रूला आपल्या एअरलाईनच्या ऑफिसशी आणि आपल्या स्वतःच्या ग्राउंड इंजिनियर्सशी बोलण्यासाठी.
बोलण्याचा मार्ग बंद झाला तरी आणखी पर्याय उरतातः
- रडार - प्रायमरी- प्रायमरी रडार हवेत सिग्नल्स पाठवून ते जिथे अडून परत फिरतील त्या त्या ठिकाणी विमाने आहेत असं ओळखतं.यासाठी विमानात काहीही खास उपकरण असण्याची गरज नाही.
- रडार - सेकंडरी- सेकंडरी रडारमधे विमानातही एक ट्रान्सपाँडर असतो. तो विमानाच्या ठिकाणाची माहिती उलट ट्रान्समिट करत राहतो. त्यामुळे रडारच्या डिस्प्ले स्क्रीनवर विमानाचं नाव, जमिनीपासून उंची, अन्य स्टेटस दिसत राहतं. याच ट्रान्सपाँडरमधून पायलट एक शब्दही तोंडाने न बोलता कॉपपिटवरची बटनं फिरवल्यासारखी करुन नकळत वेगवेगळे कोडस सेट करुन गुपचुप रडारवर आपले मेसेजेस पाठवू शकतो. याला ट्रान्स्पाँडर स्क्वॉक / स्क्वॅक को़ड्स म्हणतात उदा. 7500 सेट केला तर "हायजॅक" असा टॅग विमानतळाच्या रडार स्क्रीनवर विमानाच्या ठिपक्यालगत चमकायला लागतो. 7600 सेट केला तर "आमचा रेडिओ बंद पडला आहे".
- आकार्स ( Aircraft Communications Addressing and Reporting System ) - ही रेडिओ सिस्टीम सर्व महत्वाच्या फ्लाईट इव्हेंट्सच्या वेळी विमानतळाकडे माहिती पाठवत राहते. हे एकतर्फी प्रक्षेपण नाही, तर विमानतळावरुन कंपनी बदललेल्या हवामानाप्रमाणे बदललेला फ्लाईट प्लॅन विमानाच्या सिस्टीममधे या आकार्समार्फत थेट अपलोड करु शकते. शिवाय गरज पडली तर विमानाच्या कंट्रोल्स आणि इंजिनच्या आख्खा स्टेटस लॉग डाऊनलोडवू शकते.
MH370च्या नाहीश्या होण्यातला सर्वात विलक्षण भाग म्हणजे वर म्हटलेल्या या कम्युनिकेशन सिस्टीम्सपैकी एकातर्फेही कोणताही दुरित सिग्नल न येता हे विमान जागीच वाफ व्हावी तद्वत विरलं असं चित्र उभं राहिलं आहे.
बोईंग ७७७ २०० ईआर या विमानाची रोल्स रॉईस इंजिन्स आणि त्यांची कंट्रोल सिस्टीम / एअरफ्रेम पाहिली तर एक गोष्ट नक्की आहे की रिकव्हरीला किंवा संपर्काला अजिबात वाव न देण्याइतकं तातडीचं आणि संपूर्ण फेल्युअर या विमानात होणं तर्कदृष्ट्या अशक्य आहे. कोणतीही महत्वाची सिस्टीम, इतकंच काय, अगदी इंजिन जरी डॅमेज झालं.. दोन्ही इंजिन्स बंद पडली तरी हे विमान ग्लाईड करत बराच काळ हवेत उडत राहू शकतं. या वेळात जमिनीकडे झेपावत राहणं अपरिहार्य असलं तरी हा खाली येण्याचा वेग नियंत्रित करुन खूप लांब पल्ला गाठता येतो. निदान जवळात जवळच्या विमानतळावर, आणि किमान आलो तिथे (क्वालालंपूर) परत जाण्याइतका अवसर इथे नक्कीच मिळायला हवा. आणि अशा वेळी रेडिओवर (ज्यांना वेगळा पॉवर सप्लाय असतो) संभाषण करुन आपली हालहवाल सांगता यायला हवी.
जर विमानाची फ्रेम / पंख / शेपूट इत्यादि तुटून विमान कोसळलं तर ते जवळच तिथल्यातिथे खाली पडतं आणि त्यामुळेच त्याचे अवशेष थोड्याश्या मर्यादित एरियात ढिगार्याच्या रुपात दिसतात. आणि जमिनीवर कोसळो अथवा समुद्रात, असे एकत्रित असलेले अवशेष दिसणं फार सोपं असतं.
या बाबतीत मात्र असे अवशेष दिसलेलेच नाहीत. जे दिसले ते विमानाचे नसल्याचं सिद्ध झालं.
वरचं सर्व कम्युनिकेशन सोडा, विमान कोसळल्यानंतरही त्याचा ब्लॅक बॉक्स खुद्द पडल्या जागेवरुन स्वतःच्या रेडिओमार्फत डिस्ट्रेस सिग्नल ट्रान्समिट करत राहतो. शिवाय ऐकू येतील असे आवाजी सिग्नल्सही फेकत राहतो.. किमान काही दिवस.. अगदी पाण्याखालूनही.. हे आवाजी सिग्नल अर्थातच फार दूर जात नाहीत.. पण रेडिओ सिग्नल तुलनेत सहज मिळतात. यावरुन तो ब्लॉकबॉक्स कुठे आहे ते शोधायला मदत होते.
कोणताही मागमूस न ठेवता हे दोनशे एकूणचाळीस जिवांना घेऊन अंधारात झेपावलेलं अजस्त्र यंत्र डोळ्याआड गेलं, आणि तीन दिवस झाले तरी कोणाला कसलाच अंदाज येत नाहीये.
रडारच्या रेकॉर्डवरुन हे विमान नाहीसं होण्यापूर्वी क्वालालंपूरकडे उलट फिरलं असल्याची लक्षणं दिसली आहेत.
अधिकृतरित्या आणि निश्चित कोणीच सांगू शकत नाहीये की नेमकं काय झालंय. पण जे दिसतंय त्यावरुन फार थोड्या शक्यता उरतातः
शक्यतासंच एकः
- जे काही झालं ते फार वेगाने आणि क्षणार्धात झालं आहे.
- विमान जागच्याजागी बारीक तुकड्यात विभागलं गेलं आहे (डिसइंटिग्रेट). त्यामुळे एका जागी अवशेष एकवटलेले नाहीत.
- अर्थातच यामुळे पायलट्सना बोलण्याची संधी न मिळणं आणि सर्व चॅनेल एकदम बंद होणं हेही यात एक्सप्लेन होतंय. (रडार सिग्नल, अन्य उपरोक्त सिग्नल्स एकदम थांबणं)
- हे सर्व प्रचंड तीव्र स्फोट किंवा तत्सम टार्गेटेड हल्ल्यामुळे होऊ शकतं. विमानातल्या आपोआप उद्भवणार्या दोषामुळे नाही.
शक्यतासंच दोनः
-या दुबळ्या शक्यतेनुसार विमान अद्याप सहीसलामत असेल हायजॅक झालं असेल. धाकाने सर्व कम्युनिकेशन (ट्रान्सपाँडर, रेडिओज इत्यादि)बंद करुन पायलटवर बलप्रयोग केलेला असू शकतो, किंवा स्वतःकडे फ्लाईटचा ताबा घेऊन एखाद्या अज्ञात ठिकाणाकडे अत्यंत कमी उंचीवरुन उडवत (प्रायमरी रडारपासून सुटका) घेऊन जाणे असा प्रकार झालेला असू शकतो. हे ठिकाण बर्यापैकी लांब असलं तरी एक्स्टेंडेड रेंज फ्युएल टँक्सचा इथे हायजॅकर्सना फायदा होऊ शकतो.
पण कोणत्याही मार्गाने थांगपत्ता लागू न देता इतकं अजस्त्र धूड कुठेतरी नेऊन लपवणं हे अशक्य नसलं तरी बरंच अवघड आहे. यासाठी असं कृत्य करणारा इसम विमानविषयक सर्व शास्त्रांमधला पोचलेला माणूस असायला हवा.
या थिअरीप्रमाणे विमान अपेक्षित ठिकाणापासून दूर गेलेलं असणं हा अँगल एक्सप्लेन होतो.
कदाचित दोन्ही शक्यतांचं कॉम्बिनेशनही असू शकेल.. म्हणजे मूळ फ्लाईटपाथकडून भरकटवून हे विमान पळवून नेण्यात येणं आणि कुठेतरी दूर अनपेक्षित जागी पोचून फ्युएल स्टार्व्हेशनने कोसळणं.. अर्थातच सध्या जिथे शोध चालू आहे तिथे ते नसू शकेल.
.........
जोपर्यंत हाती काही लागत नाही तोपर्यंत केवळ अंदाजाखेरीज कोणीच काही करु शकत नाही.
या सर्व वाईट प्रकाराला जो मानवी अँगल आहे त्यात मी फार शिरत नाही कारण तो मनात अत्यंत खळबळ करणारा प्रकार आहे. ते सर्व वाट पाहणारे नातेवाईक.. तीन दिवस लाल अक्षरात MH 370 च्या पुढे सतत "Delayed" असं फ्लाईट स्टेटस दाखवणारा तो बैजिंग विमानतळावरचा बोर्ड.. आणि खरंच फ्लाईट उशीरा येत असल्याचं स्वतःला बजावत बसलेले सर्व प्रवाश्यांचे ते आप्तेष्ट.
केवळ पार्थिव देह दिसला नाही, म्हणून आशा सोडता सोडवत नसलेले अत्यंत अभागी जीव.
आपण त्यात नाही हा केवळ योगायोग.. यू नेव्हर नो.
फोटो आभारः विकीमीडिया.
वाचने
80613
प्रतिक्रिया
265
मिसळपाव
प्रतिक्रिया
या दुव्यावर विमान
मराठीत अपडेट्स इथेच वाचायला
संवाद - पायलट आणि कंट्रोल टॉवर मधला
विमान crashed म्हणून जाहीर
हम्म..
In reply to विमान crashed म्हणून जाहीर by सचिन कुलकर्णी
अपघात नव्हे घातपात
In reply to हम्म.. by माहितगार
+१
In reply to हम्म.. by माहितगार
३० दिवस
In reply to +१ by सखी
ब्लॅक बॉक्स..
आजच्या पुढे गेलेल्या
In reply to ब्लॅक बॉक्स.. by उपास
शंका वर वर जरूर रास्त वाटते
In reply to ब्लॅक बॉक्स.. by उपास
अनेक कंपन्या एवढा किंवा ह्या पेक्षा कमी जास्त
In reply to शंका वर वर जरूर रास्त वाटते by डॉ सुहास म्हात्रे
एक चांगला प्रतिसाद
In reply to अनेक कंपन्या एवढा किंवा ह्या पेक्षा कमी जास्त by सुहासदवन
+१ अनुमोदन..
In reply to अनेक कंपन्या एवढा किंवा ह्या पेक्षा कमी जास्त by सुहासदवन
मी केवळ फक्त सद्य
In reply to अनेक कंपन्या एवढा किंवा ह्या पेक्षा कमी जास्त by सुहासदवन
मेमरी इज चिप..
In reply to मी केवळ फक्त सद्य by डॉ सुहास म्हात्रे
उपास, तुमचा काहीतरी गैरसमज
In reply to मेमरी इज चिप.. by उपास
एक्क्का काका,
In reply to उपास, तुमचा काहीतरी गैरसमज by डॉ सुहास म्हात्रे
हा प्रतिसाद मला आहे का? पण मी
In reply to मी केवळ फक्त सद्य by डॉ सुहास म्हात्रे
नथिंग पर्सनल अबाउट इट !
In reply to हा प्रतिसाद मला आहे का? पण मी by स्वप्नांची राणी
माझा विमानव्यवसायाशी
In reply to नथिंग पर्सनल अबाउट इट ! by डॉ सुहास म्हात्रे
Beyond all reasonable doubts.
नेट वर चाललेला एक भन्नाट
अजुनही मुळ प्रश्न कायम आहे...
जर विमानाने आपली आल्टिट्यूड
In reply to अजुनही मुळ प्रश्न कायम आहे... by आत्मशून्य
घोस्ट फ्लाईट बद्दल एक शंका
In reply to जर विमानाने आपली आल्टिट्यूड by गवि
लिंक..
In reply to जर विमानाने आपली आल्टिट्यूड by गवि
लोकसत्ता मधील एक अतिशय उत्तम आणि माहितीपुर्ण लेख....
हा लेख आल्यापासून सतत अपडेट्स
विमान पाण्यात पडल्या नंतर,
विमान पाण्यात पडल्या नंतर,
In reply to विमान पाण्यात पडल्या नंतर, by देशपांडे अमोल
पण जर ते विमान समुद्रात जरी
प्रमोद साहेब....
In reply to पण जर ते विमान समुद्रात जरी by प्रमोद देर्देकर
हे सगळे...
In reply to पण जर ते विमान समुद्रात जरी by प्रमोद देर्देकर
प्रमोदजी, ज्या भागात हे विमान
In reply to पण जर ते विमान समुद्रात जरी by प्रमोद देर्देकर
हा व्हिडीओ तुम्ही काढुन टाकला
In reply to प्रमोदजी, ज्या भागात हे विमान by सुहास झेले
http://youtube.com/watch?v
In reply to प्रमोदजी, ज्या भागात हे विमान by सुहास झेले
हो... मी नव्हता अपलोड केलेला.
In reply to http://youtube.com/watch?v by नांदेडीअन
आणखी एक शंका....
"एमएच 370' या विमानातील प्रवाशांना श्रद्धांजली
पुढे आलेल्या काही संभाव्य थेअरीज -
ही माहिती फारच उशिरा आली!
डॉप्लर इफेक्ट प्रकरण....
In reply to ही माहिती फारच उशिरा आली! by आयुर्हित
भीषण
मला वाटतय...
In reply to भीषण by पैसा
सहमत. +१
In reply to मला वाटतय... by आत्मशून्य
+१
In reply to मला वाटतय... by आत्मशून्य
हि लिन्क
मीही..........
रूस की खुफिया एजेंसी का दावा,
अतिशय अवघड आहे विश्वास ठेवायला...
In reply to रूस की खुफिया एजेंसी का दावा, by मंदार कात्रे
बेपत्ता विमानाचा शोध जमिनीवर?
माहितीपूर्ण
मति
खरं तर जेव्हा ही बातमी कळली
Goodnight Malaysian 370
एक मत
आणखी एक विमान बेपत्ता
भयंकर प्रकार आहे.
In reply to आणखी एक विमान बेपत्ता by अर्धवटराव
हाच लेख शोधत होतो , पुन्हा
आत्तापर्यंत दिसलेल्या
विजय देवधरांनी अनुवाद
एक वर्ष...
यआच
In reply to एक वर्ष... by योगी९००
बॅटरीज
In reply to यआच by स्पंदना
धन्यवाद!! सगळी माहिती समजली.
In reply to बॅटरीज by श्रीरंग_जोशी
मलेशियन एअर ट्रॅफिक
एक माहितीपूर्ण लेख
अजुन एक
.सतरा महिन्यांनंतर पहिला
विंडोज् , कुशन्स पण सापडल्या
In reply to .सतरा महिन्यांनंतर पहिला by गवि
हे सगळं सापडलं?
In reply to विंडोज् , कुशन्स पण सापडल्या by विकास
नाही वाटत तसं
In reply to हे सगळं सापडलं? by अर्धवटराव
विमानाचे अवशेष मोझाम्बिक मध्ये सापडले
अपडेटबद्दल धन्यवाद.
In reply to विमानाचे अवशेष मोझाम्बिक मध्ये सापडले by मंदार कात्रे
ब्लेन गिब्सन
In reply to विमानाचे अवशेष मोझाम्बिक मध्ये सापडले by मंदार कात्रे
आत्ताच वाचलं
सर्व मृत व्यक्तींना
वर काढतो आहे!
नेमके काय झाले (असावे)?
In reply to वर काढतो आहे! by हणमंतअण्णा शंक…
व्हिडिओ संभ्रमजनक आहेत. पण
In reply to नेमके काय झाले (असावे)? by हणमंतअण्णा शंक…
ता.क. दिवाळी अंकातील
In reply to व्हिडिओ संभ्रमजनक आहेत. पण by गवि
खूप खोल आहे हे ससेबिळ
In reply to व्हिडिओ संभ्रमजनक आहेत. पण by गवि
खाचाखोचा
In reply to खूप खोल आहे हे ससेबिळ by हणमंतअण्णा शंक…
(आधी पाहिला नसल्यास) National Geographic चा