ब्लॅक अँड व्हाईट-एक फसव द्विभाजन आणि (अर्धे) भरलेले ग्लास
ग्लास रिकामाच आहे अथवा भरलेलाच आहे या ह्ट्टांची टोकांची लोकानुनयाने मांडणी करत टोकाची नेतृत्व पुढे येतात. अनुयायांच्या नशिबाने टोकाची का होईना भूमिका मांडणारे दोन्ही परस्पर विरुद्ध टोकाची बाजू मांडणार्या नेतृत्वात समंजसपणा असेल तर ते वस्तुस्थिती लक्षात घेऊन तडजोडीचा मार्ग निवडतात. या प्रकारात निष्पक्ष नेतृत्व मागे पडत पण काही का होईना टोकाच्या भूमिका असणार्यांमध्ये सख्य झालतर किमान शांतता तरी नांदते. (अशी शांतता न्याय्य असतेच असे नाही; पण मराठीत एक वाक्प्रचारआहे ''पादा पण नांदा'' ती अंशतः लागू पडते का ?) पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे टोकाची भूमीका घेणारी परस्पर विरुद्ध ध्रूवावरील दोन नेतृत्व प्रत्यक्षात संमजस असणे अपवादानेच घडते. तोपर्यंत संघर्षरत समुदायांच्या नशिबाला ससेहोलपटच लिहिलेली असते यात पिढ्याच्या पिढ्याही बरबाद होताना दिसून येतात. त्यातही संशयवाद आला तर नेतृत्वाला माघार तरी घ्यावी लागते किंवा निर्णय घ्यायचाच झालातर बर्याचदा त्यांच्या संशयग्रस्त पाठीराख्यांकडून किंवा अंतर्गत संघर्षातून जीवावर बेतण्यापर्यंतही प्रसंग होताना दिसतात.
ससे होलपट टाळण्याच्या दृष्टीने कमीतकमी संघर्षातून तडजोडी साधावयाच्या असतील अथवा दोन्ही बाजूंचे (खरे) निष्पक्ष नेतृत्व पुढे आणावयाचे असेल तर त्याला तर्कसुसंग मांडणी करण्याचे कौशल्य अवगत असणे, स्वहीत अथवा समुहाच्या हिताची काळजी घेण्याच्या दृष्टीने काही वेळा भूमीकेतील तार्कीक उणीवांची कबूली दोन्ही बाजू देत नाहीत तरीपण किमान पक्षी/प्रसंगी दोन्ही बाजूंच्या तार्कीक उणीवा पद्धतशीरपणे दाखवून ठेवणे भावी काळात तोडग्यावर सहमती घेण्याच्या दृष्टीने उपयूक्त ठरणारे असू शकते. म्हणून तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवांचा पद्धतशीर अभ्यास सर्वांच्याच हिताचा असू शकतो.
काळा आणि पांढरा, आयुष्यात केवळ दोनच रंग? (छायाचित्रे १ आणि २ सौजन्य विकिमीडिया कॉमन्स)
जटील समस्या सोडवण्यातील मोठ्या अडथळ्यातील एक म्हणजे, समस्यांकडे केवळ काळ्या किंवा पांढर्या या दोन रंगांशिवाय पहाण्याची तयारी नसणे. असे लोक अधिक पर्याय उपलब्ध असतांना देखील त्यातील खरे तर आपल्याला हवा असलेला एकच पर्याय पाहू इच्छितात. दुसरा पर्यायाचा एकच गट केलेला असतो तो म्हणजे अस्विकार्ह पर्यायांचा. हे उपलब्ध पर्यांयांना चुकीच्या पद्धतीने दुभागणे असते.
चुकीच्या दुभाजनाची निष्पत्ती चुकीच्या निष्कर्षात होते. 'जर पर्याय 'अ' चुकीचा असेल तर पर्याय 'ब' बरोबर असलाच पाहीजे.' ;एखाद्याचा दृष्टीकोण 'क्ष' नसेल तर तो 'ज्ञ' असलाच पाहीजे.
केवळ काळ्या किंवा पांढर्या दोनच रंगांशिवाय इतर पर्याय विचारात घेण्याबद्दल अनिच्छा अथवा नकारार्थी दृष्टीकोणामागे बहूधा, समस्येस निश्चित एकमेव उत्तरांचा अभाव, आणि समस्येतून उद्भवणारी अनिश्चित संदीग्ध स्थिती हाताळण्यातील अक्षमता, ही संभाव्य कारणे असतात.एखादी गोष्ट स्पष्ट अथवा माहित नसण्यातून, येणारी संदीग्धता अथवा अनिश्चितीते बद्दल असंयम, (उणीवयुक्त) निष्कर्शाप्रत पोहोचण्याची घाई, हि सत्याप्रती असलेल्या उत्सुकतेचा भाग नसून, कम्फर्ट हवी असल्याने हा उताविळपणा घडतो.
जेव्हा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देता येत नाही (अनएक्स्प्लेन्ड) तेव्हा ती 'अनएक्सप्लेन्ड' आहे, किंवा असेच इतर लेबल लावण्याची घाई न करता,"माहिती उपलब्ध नाही 'अनएक्सल्पेन्ड' आहे"[मराठी शब्द सुचवा], एवढेच तथ्य स्वीकारता आले पाहीजे.
चुकीचे कारण सांगण्यातील घाई चुकीच्या अर्थबोधास कारणीभूत होण्याची शक्यता असते. वरवरचे धागे जुळवून शितावरून भात म्हणत, सुतावरून स्वर्ग गाठला जाऊ शकतो, आणि साप साप म्हणून भुई थोपटली जाऊ शकते.
ज्यात वैध शक्यता अंतर्भूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा पर्यायी कारण मीमांसा, सर्व शक्यता पुरेसा अवधी न दिला जाताच बाद केल्या जातात. ग्राह्य शक्यता कोणत्या आहेत ते सुस्पष्ट होण्यापूर्वीच, त्यांची शक्यता नाकारणे म्हणजेच मनाला चारी बाजूने झापडे लावून बंद करणे अथवा क्लोज माइंडेड असणे होय.
*'क्ष' गोष्टीची कारण मीमांसा उपलब्ध नसणे, हा 'ज्ञ' गोष्ट बरोबर असल्याचा पुरावा नसतो. -हा विरोधाभास एक तार्किक उणीवेचा प्रकार आहे.
*माझ्याकडे क्ष गोष्टीची कारण मीमांसा उपलब्ध नाही = माझ्याकडे कारण मीमांसा उपलब्ध आहे,हे दोन्ही परस्पर विरोधी दावे एकदम केल्यासारखे आहे.
*"ज्या गोष्टीची कारण मीमांसा उपलब्ध नसते" ="त्याची कारण मीमांसा उपलब्ध नसते" एवढे आणि एवढेच त्या पलीकडे काही नाही.
जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की मी 'क्ष' गोष्टीवर विश्वास नाही म्हणजे त्याला 'क्ष' सत्य असूच शकत नाही असे म्हणायचे असते असे नाही; क्ष सत्य असूच शकत नाही म्हणत असेल तर तो झाला क्लोज माइंडेडनेस; पण विश्वास नाही पण तर्कसुसंगत पुरावे आल्यास विश्वास ठेवेन हा झाला मनाचा खुलेपणा (ओपन माइंडेडनेस).
*मि.पा. धागे:
** मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ?
** सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक
** बौद्धिक कृष्णविवर
*-क्रिटीकल थिंकींग (इंग्रजी)हे युट्यूब सादरीकरण
* चिकित्सामक विचार कसा करावा
**(येथील चर्चा मराठी विकिप्रकल्पात वापरावयाची असल्यामुळे आपले या धाग्यावरील चर्चेतील लेखन कॉपीराईट्फ्री होते आहे असे गृहीत धरून चालतो)
** खासकरून विषय समजण्यास सोपा करता यावा म्हणून विषयास अनुसरून चांगली उदाहरणे; संबंधीत वाक्प्रचार आणि म्हणी व्यंगचित्रे (कॉपीराईट फ्री) उपलब्ध असल्यास हवे आहे.
** चर्चा सहभाग, प्रतिसाद, तसेच विषयांतर टाळण्यासाठी आपणा सर्वांना आणि मिपा प्रशासनास धन्यवाद
In reply to छान छान.... by मारकुटे
In reply to समजा बिअर ने अर्धा भरलेला by प्रकाश घाटपांडे
In reply to समजा बिअर ने अर्धा भरलेला by प्रकाश घाटपांडे
समजा बिअर ने अर्धा भरलेला ग्लास आहे व तुम्हाला अजून बिअर हवी असेल तर उरलेला अर्धा भरायचा. आहे तेवढी बिअर समजा पुरेशी असेल तर तो अर्धा संपवून टाकायचा. हाय काय नाय काय!ग्लास अर्धा भरलेला असताना तो पूर्ण भरण्याचा अट्टाहास अथवा त्याला रिकामा करण्याचा अट्टाहास ग्लास अर्धा आहे हे स्विकारुच नका असा केवळ काळा अथवा पांढरा प्रकारचा असतो. ग्लासपूर्ण भरलेला आहे अथवा रिकामाच आहे अस म्हणण्याचे टोकाचे अट्टाहासी समर्थन पुन्हा पुन्हा करत रहाणे एक प्रकारची नशाच नाही का ? अर्ध्या ग्लासाचे विकिमिडिया कॉमन्सवर तसेही दुसरे कॉपीराईट फ्री छायाचित्र मी शोधू शकलो नव्हतोच पण एनी वे अशा ग्लासाचे चित्र मिळाले ज्याने मला मुद्दा अधिक स्पष्ट करणे सोपेच जाणार होते म्हणून ते वापरले. पण चौकटी बाहेरच्या शंकाही विचारल्या न गेल्यामुळे स्वतःहून स्पष्टीकरण. आणि घाटपांडेजींच्या वाक्यातला बहुतांश लोकांनी उपरोध न लक्षात घेता, वाच्यार्थाने घेतल असण्याची शक्यता अधिक वाटते म्हणून वाक्यात विषयास अनुसरून (मला) दिसलेला लक्ष्यार्थ नमुद करून ठेवतो.
जेव्हा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देता येत नाही (अनएक्स्प्लेन्ड) तेव्हा ती 'अनएक्सप्लेन्ड' आहे, किंवा असेच इतर लेबल लावण्याची घाई न करता,"माहिती उपलब्ध नाही 'अनएक्सल्पेन्ड' आहे"[मराठी शब्द सुचवा], एवढेच तथ्य स्वीकारता आले पाहीजे.सहमत आहे. बाकी लोकांना द्विमितीत गोष्टी बसवायला सोपे जाते. काळे किंबा पांढरे, राम किंवा रावण, चांगले किंवा वाईट. जेव्हा काळे पांढरे असे दोन च पर्याय लोक विचारात घेतात तेव्हा त्यातील ग्रे एरियाचा विचार करत नाहीत मला तर पुढे असे वाटते कि ग्रे तरी का? रंगीत पट्टाचा विचार का नको. एन डायमेन्शन तयार होतील. असो जास्त विचार केला तर बुलियन अल्जेब्रा कालबाह्य होईल.
In reply to जेव्हा एखाद्या गोष्टीचे by प्रकाश घाटपांडे
In reply to जेव्हा एखाद्या गोष्टीचे by प्रकाश घाटपांडे
In reply to निर्णय प्रक्रीयेतील एक महत्वाचा मुद्दा by माहितगार
फिशर यांच्या मते; सदोष तर्कांचे समर्थन करताना आपण इतरांना भ्रमात टाकत आहात याची भिती नसते, तर स्वत:लाच भ्रमात टाकू याची असते.जर टु बी ऑर नॉट टुबी हे एकमेव शाश्वत वास्तव तर्काचे समर्थन करणारी व्यक्ती अमान्य असेल तर फिशर यांची भिती अतिशय वास्तव आहे /ठरतेच.
In reply to जेव्हा एखाद्या गोष्टीचे by प्रकाश घाटपांडे
In reply to माहितगार by आत्मशून्य
[But such flawlessness is boring so good to get back messy anyway Wink ]हम्म.. समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. :)
In reply to fuzzy logic ला मराठीत काय म्हणता येईल ? by माहितगार
In reply to अस्पष्ट, मोघम हे तसं बरोबर भाषांतर आहे. by आत्मशून्य
व्याख्या: मोघम तर्क (फजी लॉजीक-Fuzzy Logic) म्हणजे, 'अनेकमुल्य' असलेल्या ओव्हरलॅप[मराठी शब्द सुचवा] करणाऱ्या श्रेणी; अथवा 'संदिग्ध गृहीत' असलेलेला तर्क होय; ज्यास तर्कशास्त्रात मात्रा,अंश इत्यादीच्या संचाच्या प्रमाणात व्यक्त करण्याचा प्रयास केला जातो.या निमीत्ताने आपल्या सर्वांसाठी हा वाफाळलेला चहा :
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवादIn reply to सोप्या उदाहरणांमुळे समजण्यास सोपे गेले by माहितगार
In reply to ओह सॉरी आपले वाक्य प्रतिसादात आले नाही. by माहितगार
In reply to मोघम तार्किकता. फ़जी लोजिक. by आत्मशून्य
In reply to फजी स्वरूप वास्तवहि असू शकेल by माहितगार
फजी स्वरूप वास्तवहि असू शकेल हे समजलनॉट एट ऑल. ज्याला आपण "वास्तव" म्हणतो ते नेहमी फजी स्वरुपात सामोरे येत असते. इट्स अ वन वे थिंग. थोडक्यात फजी(मोघम ) स्वरूप वास्तव बनुच शकत नाही पण वास्तव मात्र मोघम(फजी) स्वरुपात सामोरे येते. आणी ते संकल्पेनेतुन सुधा याच प्रकारे सम्जुन घेतले पाहिजे. आता आपण संख्यांचे उदा. घेउया दशमान पध्दती... किती परफेक्ट वैज्ञानीक वास्तव आहे. प्रथम विचार करता यात काही फजी आहे वाटत नाही पण हे फजीच आहे, मोघम आहे पण सवयिचे झाले आहे म्हणून वास्तव वाटते इतकेच. हे फजी का ? कारण हाताला विस बोटेअसती तर गणीत करायला सोपे जावे , आपोआप सवयीचे व्हावे म्हणुन १ ते १९ या एक अंकी संख्या मानल्या असत्या व २० ही पहिली संख्या गणली गेली असती ज्यामधे एकक व दशक अशा दोन संख्या आहेत. म्हणजे १९ पर्यंत मोजणी फक्त एकक संख्येने ठरवली गेली असती. मला वाटते फजीनेस कशी एक पॅरलल सिस्टम उभे करतो जे वास्तवच आहे असे गणले जाउ शकते याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. कारण फक्त आकडेमोडच करायची असेल तर ० व १ या दोन संख्याच कितीतरी पुरेशा आहेत. फजी स्वरूप कधीच वास्तव असत नाही, पण वास्तव मात्र फजी स्वरुपातच सामोरे येते, जसे पडद्यावरील हिरो पडद्याबाहेर येउ शकत नाही पण पडद्याबाहेरील हिरो पडद्यावर पाहिजे तेंव्हा जाउ शकतो... वन वे ओन्ली, कारण फजिनेस इज अॅट कोअर... फजिनेस आपल्या मनाच्या अस्तित्वाचा प्रमुख गुणधर्म आहे... फजिनेस बायपास केला तर मनाचे अस्तित्व लयाला जाते.
In reply to नाही.नाही.नाही. फजी स्वरूप वास्तव नसते. ती मायाच.... by आत्मशून्य
In reply to :D भेटल्यावरच बोलु कधीतरी... by आत्मशून्य
In reply to वर संबोधिलेल्याया पुस्तकाचं by kurlekaar
In reply to वर संबोधिलेल्याया पुस्तकाचं by kurlekaar
In reply to चांगला लेख by विटेकर
In reply to चांगला लेख by विटेकर
In reply to खूप छान आहे.. वीकांताला करून by भडकमकर मास्तर
In reply to खूप छान आहे.. वीकांताला करून by भडकमकर मास्तर
In reply to खूप छान आहे.. वीकांताला करून by भडकमकर मास्तर
फार छान