म्या लिवत व्हते. आईशप्पत.
तरीबी गुर्जी म्हन्ले, “आन्जे, शिक्षा तुला. आंगठे धर. ”
म्या चालली बायेर.
तिकडं चिऊतै, खारुतै, मौ, मोत्या असतेत.
पण गुर्जी म्हन्ले, “आन्जे, माझ्यासमोर, वर्गात.”
आदी हाताचेच अंगठे पकाडले.
समदी हसाया लागली.
गुर्जीनी डोळे वटारल्यावर पायाचे.
गुर्जींच ध्यान नाय बगून हळूच भितीला टेकले.
पोरास्नी जीब काडून दावली. पाठ खाजिवली. नखं खाल्ली.
केसं मागे सारली. पैजण काडलं; बशिवलं.
पाय दुखायले.
येक उचलला. मंग तो टेकवून दुसरा.
डोळे पुसले.
मान वाकडी करून बायेर पायलं.
रस्त्यावर मोत्या बसला व्हता. माज्याकडं तोंड करून.
घंटी वाजली.
जौन मोत्याच्या गळ्यात हात टाकला.
मोत्या मला कदीबी शिक्षा देत न्हाई.
शिक्षा फकस्त मान्सं देतेत का?
**
शतशब्दकथा
अन्यत्र पूर्वप्रकाशित
वाचने
12341
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त आतीवास ताई, आवडले.
+१
In reply to मस्त आतीवास ताई, आवडले. by भावना कल्लोळ
समजले नाही!
क्षमस्व!
In reply to समजले नाही! by amit_m
आवडल .
शिक्षा फकस्त मान्सं देतेत का?
'शिक्षा', 'शिक्षा देण्याचा
In reply to शिक्षा फकस्त मान्सं देतेत का? by आयुर्हित
लिहा सवडीने
In reply to 'शिक्षा', 'शिक्षा देण्याचा by आतिवास
आन्जी सॉल्लिड पात्र आहे. टॉम
महत्त्वाकांक्षी
In reply to आन्जी सॉल्लिड पात्र आहे. टॉम by आदूबाळ
सगळ्या आन्जी-कथांचं पुस्तक काढा.फार महत्त्वाकांक्षी कल्पना आहे! बघू, आन्जीत किती जीव आहे त्यावर अवलंबून आहे ते! तुमच्या प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल आभारी आहे.मस्त..
कथा आवडली.
_/\_
अतिशय परिणामकारक!
अतिशय परिणामकारक!
आंजी खोट नाही बोलायची.
आन्जी रॉक्स.
वाचतेय.
आतिवास ताई, तुमची स्वतःचीच ही
निरीक्षण
In reply to आतिवास ताई, तुमची स्वतःचीच ही by कानडाऊ योगेशु
आन्जी
+१११११ लंपन आठवला...
In reply to आन्जी by राजेंद्र मेहेंदळे
मस्तच!
तसं नाय पैसा ताई मोत्या
:-)
In reply to तसं नाय पैसा ताई मोत्या by जयनीत
आभार
ही कथाही आवडली!