मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही फोटोग्राफी प्रयत्न

राजो · · कलादालन
मिसळपाव संकेतस्थळावर प्रथमच काही फोटो शेअर करत आहे. स्वॅप्स आणि इतर जाणकार या चित्रांतील गुणदोष दाखवतील अशी अपेक्षा. खालील चित्रांमध्ये कोणतेही पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही gandhijis3 krishna Reflection jaswand unknown flower Light Flag slow shutter speed (कलादालनामध्ये पोस्ट करताना काही एरर येत आहे)
लेखनविषय:

वाचने 24859 वाचनखूण प्रतिक्रिया 13

कंजूस 02/03/2014 - 06:45
पाच फोटो जवळचे आहेत त्यात काही खास नाही .झेंड्याचा का काढला ?तो कशावर आहे ?झाडे आणि पाण्यातले प्रतिबिंब समजले आणि पटले .अमुक एक फोटो मला का काढावासा वाटला ते फोटोच बोलला पाहिजे .थोडे वेगळे विषय येऊ द्यात .कैमरा बदलता येत नाही पण विषय नक्कीच बदलता येतात .

In reply to by कंजूस

राजो 05/03/2014 - 08:24
धन्यवाद कंजूस, नक्कीच वेगळे विषय घेण्याचा प्रयत्न करेन. सध्या कॅमेर्‍याच्या तांत्रिक बाबी समजून घेणे चालू आहे. तसा कॅमेरा घेऊन ६-७ महिने झाले आहेत, पण पुरेसा वेळ नाही मिळू शकला (कि आळस :)) कॅमेर्‍यावर हात साफ करण्यासाठी.

पहिल्या फोटोमध्ये कॅमेरा उंचावर न धरता बाहुल्यांच्या समोर धरला असता (जमीन दिसणार नाही असा) तर अधिक परिणामकारक वाटले असते असा अंदाज आहे. खालील फोटो मी बर्‍याच वर्षांपूर्वी काढला आहे. त्यावेळी कॅमेरा बाहुलीच्या चेहर्‍याच्या रेषेत धरला असता तर हाच फोटो अधिक चांगला वाटला असता... Portrait

एस 07/03/2014 - 12:16
प्रतिक्रिया व्यनिद्वारे कळवली आहे. सॉरी, धाग्यात माझे नाव मी आधी वाचलेच नव्हते :-)