फावल्या वेळेतली फोटोग्राफी….भाग २
फावल्या वेळेतली फोटोग्राफी…भाग १.
===================================================================
पहिल्या भागाला मिळालेला प्रतिसाद बघून अजून काही छायाचित्र प्रकाशित करायच धाडस करतोय.
पण खरच मिपा वर आपली कला सादर करा आणि चकटफू त्याच मुल्यांकन करून घ्या एकदम मस्त प्रकार.
खाली दिलेली छायाचित्रे पण माइक्रोमॅक्स मोबाईलनेच टिपलेली आहेत, ह्या छायाचित्रांमध्ये ऑटो फोकस आणि कॅमेराची क्षमता जाणवते आहे.
सार्वक मिपा सदस्यांनी एकदा हा भाग देखील डोळ्याखालून घालावा हि विनंती.
मुखवटा
माझ्या ऑफीस मध्ये एका सहकारी मुलीच्या टेबलवर हा मुखवटा लावलेला होता, बघता क्षणीच क्लिक करायचा मोह झाला.
फुल
देवाच्या चरणी अर्पण होण्यासाठी तय्यार एक फुल.
ब्याग
सहजच कल्पना सुचली क्लिक करायची हि ब्याग बघून.
काचेवरील ठसे
खिडकीची काच.
कीबोर्ड
किबोर्डचा क्लोझ अप.
आकाश
आकाश जास्त सुंदर आहे कि इमारती?
वाटाणे
हिरवे रसरशीत वाटाणे.
मोकळे आकाश
संधीप्रकाश...
एच डी आर
माझ्या ऑफिस मधून दिसणाऱ्या दृश्याचा "एच डी आर" प्रतीचे छायाचित्र.
पर्णकुटी
खिडकाळीच्या राम मंदिरातील पर्णकुटी..
एसटी बस
चालत्या इंद्रायणी एक्स्प्रेस मधून सकाळी ८ च्या सुमारास काढलेला लोणावळा परिसरातील एसटी बस चा लोभस फोटो. कसा वाटला?
तळटीप: आकार बदलावा लागल्यामुळे काही छायाचित्रांचा मूळ आकार बदलला आहे.
माझ्या ऑफीस मध्ये एका सहकारी मुलीच्या टेबलवर हा मुखवटा लावलेला होता, बघता क्षणीच क्लिक करायचा मोह झाला.
फुल
देवाच्या चरणी अर्पण होण्यासाठी तय्यार एक फुल.
ब्याग
सहजच कल्पना सुचली क्लिक करायची हि ब्याग बघून.
काचेवरील ठसे
खिडकीची काच.
कीबोर्ड
किबोर्डचा क्लोझ अप.
आकाश
आकाश जास्त सुंदर आहे कि इमारती?
वाटाणे
हिरवे रसरशीत वाटाणे.
मोकळे आकाश
संधीप्रकाश...
एच डी आर
माझ्या ऑफिस मधून दिसणाऱ्या दृश्याचा "एच डी आर" प्रतीचे छायाचित्र.
पर्णकुटी
खिडकाळीच्या राम मंदिरातील पर्णकुटी..
एसटी बस
चालत्या इंद्रायणी एक्स्प्रेस मधून सकाळी ८ च्या सुमारास काढलेला लोणावळा परिसरातील एसटी बस चा लोभस फोटो. कसा वाटला?
तळटीप: आकार बदलावा लागल्यामुळे काही छायाचित्रांचा मूळ आकार बदलला आहे.
वाचने
14391
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
फोटो आवडले पण खिडकाळीचे 'राम' मंदिर म्हणजे कल्याण फाट्यावरचे का?
In reply to छान by सचिन कुलकर्णी
हो अगदी अचूक बोललात, माझीच चूक झालीये. सुधारणा करतो.
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
In reply to हो अगदी अचूक बोललात, माझीच by मेघनाद
सही ! क्लास आहेत फोटु :)
In reply to हो अगदी अचूक बोललात, माझीच by मेघनाद
सही ! क्लास आहेत फोटु :)
सुंदर
"काचेवरील ठसे" हा प्रयोग फारच आवडला.
ठसे आणि शेवटचा आवडला.
@निवेदिता-ताई , श्रीरंग_जोशी , यशोधराजी : खुप खुप धन्यवाद
वाह..
अरे वा! पहिल्या भागाच्या तुलनेत खरोखरच ह्या प्रतिमा सुंदर आल्या आहेत. मला कळफलकाची प्रतिमा फार आवडली. तुम्ही या प्रतिमेवर इन-मोबाइल थोडेसे प्रोसेसिंग केले आहे. ते छान जमले आहे. किंचित शार्पनेस वाढवायला हवा मधल्या G च्या आजूबाजूचा.
शेवटचा एसटी बस सुपर्ब. याला पॅनिंग प्रकारचे छायाचित्रण म्हणतात. लवकर जमत नाही असे छायाचित्र काढायला. अगदी डीएस्एल्आर असला तरी. त्यामुळे भ्रमणध्वनीसंचानेही चांगले साधलेले मीटरिंग पाहून छान वाटले. थोडेसे लॉन्ग एक्स्पोजर आहे तरीही हायलाइट्समधील भागही ब्लो-आउट झालेला नाही. मस्तच.
एचडीआर, मोकळे आकाश ह्या सामान्य वाटल्या. मुखवटाही ठीक. डोळ्यांच्या खाचांवर चटकन लक्ष जात नाही कारण त्यावरील ब्लो-आउट झालेला पांढरा भाग. आजूबाजूच्या काळसर पार्श्वभूमीच्या तुलनेत तो जास्तच ठसतोय. ह्या छायाचित्रात एचडीआर कदाचित थोडी जान आणू शकेन.
रच्याकने हा पेनिन्सुला आयटी पार्क, परळ आहे का?
In reply to वाह.. by एस
अरे वाह खूप आनंद झाला प्रतिक्रिया वाचून…
परळ मधील पेनिन्सुला सेंटर आहे ते…जो भाग छायाचित्रात दिसतोय ते क्लब हाउस आहे अशोका टावरचे. बाजूलाच माझ ऑफिस आहे "मिड-डे".
सर्वच फोटू छान
बस आणि एचडीआर खूप आवडले.
बोलती बंद केली आहे .
योग्य आणि सुंदर फोटोग्राफी .
कल्पना ,कोन सर्वोत्तम
जे फोटोग्राफरकडे असावे लागते .
हा फोटो मी का काढला
आणि असाच का काढला
हे फोटो काढणाऱ्याला
फोटोतून सांगायचे असते
ते पोहोचले .
या नेहमीच्याच वस्तुंकडे
असे इथे पाहा हे तो सांगतो .
(बैगची चेन आणि काचेवरचे
ठसे ).
बाकीचे काम
त्या यंत्राचे आहे आणि ते
वेगवेगळे येते .
त्या अनुषंगाने येणारे दोष हे गौण आणि दुर्लक्ष करायचे
असतात .
बसचा फोटो काढतांना कैमरा थोडासा रेल्वेगाडीच्या धावण्याच्या
दिशेने धरला आहे त्यामुळे
झाडे वेगाने पुढे सरकत
आहेत पण बस रे च्याच
वेगाने जात असल्याने स्थिर
आली आहे .आपोआपच
"पैनिंग " साधले आहे .
इमारती आणि आकाश छान .
जवळचे फोटो काढतांना
सर्वच चांगले कैमरेही फसतात अथवा एखादा
मोठा उजेडाचा धब्बा येतो .
कैमरा बहुतेक ८ एमपि आहे .फोटो किती केबि /एमपि चा साठवला जातो ?
In reply to बोलती बंद केली आहे . by कंजूस
मनापासून दिलेली दाद वाचून फार छान वाटल….
"पैनिंग " बाबतीत तुमचं म्हणण काहीस बरोब्बर आहे, होय कॅमेरा ८ एमपी चाच आहे.
फोटोची साधारण साईझ ३. ते ३. एमबी पर्यंत जाते.
वाहव्वा!
आम्हाला त्यातलं काही कळत नाही. पण बस, कीबोर्ड आणि ठसे आवडले.
पॅनिंग छान जमले आहे :)
आणि ते एचडीआर काय आहे ?
In reply to आणि ते एचडीआर काय आहे ? by कंजूस
एच डी आर म्हणजे "हाई डायनामिक रेंज". ह्या प्रकारात साधारण ३ फोटो घेतले जातात आणि मग ते सर्व फोटोस कंबाइन करून अंतिम छायाचित्र तय्यार केल जाते, त्या छायाचित्रात प्रखर उजेडापासून ते अगदी मंद उजेडापर्यंतच्या प्रकाश लहरी टिपल्या जातात (हे सर्व मी माझ्या आकलन क्षमतेनुसार सांगितलं आहे.)
तज्ञ अजून खोलात सविस्तर सांगू शकतील.
तोपर्यंत हा दुआ बघावा: HDR
In reply to एच डी आर म्हणजे "हाई by मेघनाद
दुआ वाचला .
हे एक फोनमध्ये अगोदरच ठेवलेले कैमरा अॅप आहे .
आकाशाच्या पाश्र्वभूमीवर लाल रंगाची
वस्तु(जास्वंदिचे फूल)
अथवा
कौसानी वगैरे ठिकाणाहून
हिमालयातील सकाळची सोनेरी शिखरे यांचे फोटो
काढतांना सोनेरी ,निळा ,पांढरा भाग घेता येईल .
पेनिन्सुला! तरीच वाटत होतं हे दृश्य पाहिल्यासारखं का वाटतंय...
फोटो एकदम मस्त! बस आणि कीबोर्ड विशेष आवडले. स्वॅप्स यांची प्रतिक्रिया पण आवडली.
एवढे छान छान प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे अतिशय धन्यवाद……… *DANCE* :dance:
बॅगचे छायाचित्र अतिशय आवडले... वेगवेगळी टेक्स्चर्स सुरेख टिपली आहेत. एक वेगळे कॉम्पोझिशन. की बोर्ड आणि ठ्श्यांच्या क्ल्पना आवडल्या.
In reply to बॅगचे छायाचित्र अतिशय आवडले.. by इन्दुसुता
खूप खूप आभार...अगदी अचानक टिपलेला फोटो आहे तो. वाटलही नव्हत एवढा छान दिसेल.
तुमच्या कंपनीत हाऊसकिपींगवाले किबोर्डवरची धुळ साफ करत नाहीत का? :P
बशीचा फोटू लै आवडला.
@किसनजी: नेमका हाच कीबोर्ड सोडला मेल्याने......हा हा हा
कप बशीच्या पुढे एक सुंदर फुल पण आहे हो.....बाकी तुमची प्रतिसाद देण्याची पद्धत आवडली बॉ.
छान