फावल्या वेळेतली फोटोग्राफी….

मेघनाद's picture
मेघनाद in काथ्याकूट
13 Feb 2014 - 6:31 pm
गाभा: 

खाली दिलेली सर्व छायाचित्रे ही मायक्रोमॅक्स A90s मोबाइल च्या ८ मेगापिक्सेल कॅमेरामधून टिपलेली आहेत. हि सर्व छायाचित्रे सर्व मिपा करांना दाखवण्याचा मोह मला आवरला नाही म्हणून हा खटाटोप. काही छायाचित्र थोडीफार सुधारलेली आहेत.

कलादालन श्रेणी मध्ये हा धागा टाकायचा बराच प्रयत्न केला पण काहीतरी समस्या येत होती म्हणून इथे प्रकाशित केला.

सर्व छायाचित्र हि हौशी प्रकारातील असल्याने फार मोठ्या अपेक्षा ठेऊ नयेत हि विनंती, पण ज्याकाही तृटी आढळतील त्या नक्कीच सांगाव्यात.

====================================================================

लक्ष्मी - नारायण

GOD
हे छायाचित्र तिमिर चित्र प्रकारात टिपण्याचा प्रयत्न केला आहे. खूप मेहनत करावी लागली हे छायाचित्र मिळवण्यासाठी.

गुलाब

Rose
विविधरंगी छटांचे गुलाब.

कुंडीत उगवलेले चुकार रोपटे

Bush
हे रोपटे माझ्या घरातल्या मनीप्लांट च्या कुंडीत उगवले होते.

झुंबर

Zunber
हे झुंबराचे छायाचित्र गोव्याच्या शांतादुर्गा मंदिरात टिपलेले आहे. बर्याच जणानी पहिले देखील असेल.

केशरी सुर्यफुल

Flower
एका लग्नात सजावटी साठी वापराल होते हे फ़ुल… कोणी ह्या फुलाच नाव सांगू शकेल का?

वेलीचे कोमल पान

Window
घराच्या खिडकीतून दिसणारे वेलीचे कोवळ पान.

वेलीचे कोमल पान

Butterfly
फुलपाखरू छान किती दिसते. . .

टोमॅटो

Tomatoes
लाले लाल टोमॅटो.

बौद्ध भिक्खू

बौद्ध भिक्खू ची सुंदर मूर्ती
बौद्ध भिक्खू ची सुंदर मूर्ती.

पेन

Pen
काय लिहाव सुचल नाही.

काच मणी

Balls
चमकदार रंगीबेरंगी काच मणी.

काच मणी

Long Road
ही वाट दूर जाते….(राजापूर आणि खारेपाटण दरम्यानचा रस्ता NH-17)

क्रमश: (छायाचित्रणाच्या धाग्यात प्रथमच) :-)

प्रतिक्रिया

दोन नंबर आणि काचमणी आवडले.

गुलाबाच्या फुलात सुरवंट आहे.
त्या फुलाला जरबेरा म्हणतात.
मला वेलीच कोमल पान आवडल.

इरसाल's picture

14 Feb 2014 - 10:59 am | इरसाल

पयल्यांदा काय दिसले नव्हते पुन्यांदा जाउनशिनी बगिटलो. इइइइइइइइइइइइइइइइइइइइइ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2014 - 8:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुन्हा वर स्क्रोलींग करुन पाहावं लागलं. :)

-दिलीप बिरुटे

बाकी इथल्या वाचकांची निरीक्षण शक्ती जोरदार आहे....

सांजसंध्या's picture

26 Feb 2014 - 2:37 pm | सांजसंध्या

मला वाटलं मलाच प्रॉब्लेम येतोय

मुक्त विहारि's picture

13 Feb 2014 - 8:31 pm | मुक्त विहारि

आणि

फुलपाखरू

आवडले....

लक्ष्मी - नारायण ह्या फोटोची कॉपी करू का? जरा अधून मधून डेस्कटॉपवर ठेवीन म्हणतो.

स्पा's picture

13 Feb 2014 - 8:58 pm | स्पा

ठीक ठाक

अती इफेक्ट दिलेत, जे एका क्लिक वर हल्ली मिळतात, पहील्या फोटोत काय मेहनत केलीत ते समजले नाही.

मेघनाद's picture

13 Feb 2014 - 10:19 pm | मेघनाद

@यशोधरा: धन्यवाद :-)

@aparna akshay: फुलाच नाव भारीच आहे एकदम.

@मुक्त विहारि: हो सर, बिनधास्त करा कॉपी, वाटल्यास मी तुम्हाला मुळ प्रत पण पाठवतो, तुमचा आईडी व्यनि करा.

मुक्त विहारि's picture

15 Feb 2014 - 1:46 pm | मुक्त विहारि

अरे बाबा सर नको म्हणूस सरळ मुविच म्हण...

इथे सगळे मला त्याच नावांने ओळखतात.

@स्पा: हो इफेक्ट आहेतच, ह्या पुढे अती होणार नाहीत हि काळजी घेइन.

मेहनत करावी लागली कारण मोबाइलची विजेरी वापरून मूर्तीच्या समोर उभा राहून सावलीच छायाचित्र घेतलय तेही मोबिल वरच.
माझ्यासारख्या नवशिक्यांना एवढी कसरत पुरेशी आहे.

पुढे अजून काही फोटो दाखवणार आहे त्यासाठी पण आपणा सारख्या तज्ञांचे मार्गदर्शन नितांत गरजेचे आहे.

पैसा's picture

13 Feb 2014 - 10:36 pm | पैसा

मग छानच आहेत की! त्यातून मायक्रोमॅक्सचे कॅमेरे एवढे चांगले नाहीत म्हणतात पण ही खूपच चांगली चित्रे मिळवलीत तुम्ही. ब्राईटनेस जरा जास्त वाटला. मिपावर स्वॅप्सने फोटोग्राफीवर अतिशय सुंदर मालिका लिहिली आहे तिचा अभ्यास करा आणि वल्ली प्रोसेसिंग अजिबात न करता नैसर्गिकरीत्या आलेले फोटो इथे देतो तेही बघा. मला वाटतं घराबाहेर या कॅमेर्‍यावर फोटो चांगले येत असावेत.

आयुर्हित's picture

14 Feb 2014 - 1:32 am | आयुर्हित

मनी प्लांट आवडला! पोपटी पाने पार्श्वभाग पूर्ण काळा पांढरा आहे त्यामुळे उठून दिसतात.

ते फुलपाखरू नव्हे तर पतंग आहे.
पतंगाचे पंख तपकिरी/राखाडी असतात व तो नेहमी पंख पसरवून बसतो,
तर फुलपाखरू हे नेहमी विविध रंगी पंखाचे असते व पंख मिटून(एकमेकावर चिकटवून) बसते.

खटपट्या's picture

14 Feb 2014 - 2:40 am | खटपट्या

सर्वच चित्रे अप्रतिम.
तीन नंबर च्या चित्रात तुळस वाटतेय

अर्धवटराव's picture

14 Feb 2014 - 2:51 am | अर्धवटराव

हे महाराज फुल दाखवत आहेत आणि मला ते फुल धरणार्‍याचा हात आणि सॅण्डल दिसते आहे. गुलाबाची फुलं सुकलेली दिसताहेत. झुंबर ब्लर दिसतय, फुलपाखरु भितीदायक वाटतय. टॉमॅटोत "त्यात काय विशेष" वाटतय तर तो पेन कुठल्याच एंगलनी पेन वाटत नाहि. ति वाट देखील अगदीच सामान्य दिसतेय.
बिक्खु आणि काचमणी तेव्हढे बरे वाटले.

इन्दुसुता's picture

14 Feb 2014 - 7:45 am | इन्दुसुता

वेलीचे कोमल पान अतिशय आवडले

पाषाणभेद's picture

14 Feb 2014 - 10:13 am | पाषाणभेद

बरं झालं तुम्ही प्रत्येक फोटोवरती त्याची माहीती दिलीत ते.

अमोल केळकर's picture

14 Feb 2014 - 10:13 am | अमोल केळकर

सुंदर :)

अमोल केळकर

मेघनाद's picture

14 Feb 2014 - 10:25 am | मेघनाद

सर्वच मिपा सदस्यांनी एवढी दखल घेतलेली पाहून केलेल्या खटाटोपाचे सार्थक झाले असे वाटतेय. सर्व सुचना नक्कीच लक्षात ठेवीन.

उघडपणे केला जाणारा "उहापोह " हि च तर मला खासियत वाटते मिपा ची. त्यायोगे मला देखील माझ्या चुका लक्षात आल्या आहेत. :-)

अजून काही छायाचित्र आहेत ती शक्यतो सुधारणा न करता प्रदर्शित करेन.
मनापासून दाद देणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार.

आपण काढलेल्या छायाचित्रांमागील विचार आवडला. भ्रमणध्वनी संचाने चांगल्या दर्जाची छायाचित्रे टिपता येणे तसे अवघड असते. खूपच मर्यादित डायनॅमिक रेन्ज, रंगअचूकतेचा अभाव, कुचकामी फ्लॅश, मर्यादित मॅन्युअल कंट्रोल, खूपच विशाल चित्रणकक्षा (डेप्थ ऑफ फिल्ड) आणि इतरही अनेक मर्यादांमुळे चांगल्या दर्जाचा भ्रमणध्वनी संच नसेल तर प्रतिमा हव्या तशा येत नाहीत. विशेषत: मायक्रोमॅक्स सारख्या ब्रॅण्डने प्रतिमा नीट येत नाहीत.

तरीपण मोबाइल किंवा इतरही कॅमेर्‍यांच्या मीटरिंग व इतर स्वयंचलित प्रणालींना थोड्या सरावाने फसवून त्यांच्या क्षमतेचा सर्वोच्च दर्जा गाठता येऊ शकतो. उदा. फोकस लॉक ची सुविधा नसतानाही शटर लॅगचा फायदा घेत 'रीफ्रेमिंग' करत कॉम्पोजिशन पटकन बदलता येते. माझ्या छायाचित्रण भाग ८. रचनाविचार (कॉम्पोझिशन) ह्या ले़खातील काही छायाचित्रे कॉर्बी सारख्या संचाने आणि पॉइन्ट-अ‍ॅण्ड्-शूट कॅमेर्‍याने घेतली आहेत.

आणि पोस्टप्रोसेसिंग फक्त गरजेपुरतेच केल्यास ते प्रतिमेचे सौंदर्य खुलवते. पोस्टप्रोसेसिंगलाच काही लोक इमेज एडिटिंग असा चुकीचा शब्दप्रयोग वापरतात. असो. फक्त इतकंच लक्षात ठेवा की पोस्टप्रोसेसिंग हे जेवणातल्या मिठासारखे असते. अतिशय आवश्यक, पण जास्त झाले की जेवण खारट होते... :-)

तुमच्या छायाचित्रणातील प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा...

जेपी's picture

14 Feb 2014 - 1:24 pm | जेपी

कल्पना आवडली .

कंजूस's picture

14 Feb 2014 - 6:57 pm | कंजूस

छान कल्पना सुचताहेत हे फोटोग्राफी शिकणाऱ्याच्या बाबतीत सर्वात महत्वाची बाजू तुमच्याकडे आहे .

तुम्हाला याच मोबाईलच्या कैमेऱ्याने फोटो काढायचा विचार आहे का तुमच्याकडे
दुसरा कैमरा आहे पण या
A90S चे काम बघायचे आहे ते कळू द्या .

तुम्ही दिलेल्या फोटोंमध्ये
रस्त्याचा फोटो वगळून (तो देखील चालू गाडीतून घेतला आहे का ?) बाकी
चार फुटांवरून स्थिर स्थितीतले आहेत .त्यामुळे
ऑटोफोकस किती कमी अंतरावर आणि कसा काम करतो ते कळत नाही .पेपराचा फोटो टाका .आणि इमारतींचा टाका .रेल्वेतूनही घ्या .पोट्रेटसाठी पुतळा चालेल .

@कंजूस: नाही हो सध्या तरी हाच एकमेव कॅमेरा आहे माझ्याकडे. ऑटो फोकस तसा बरा आहे मोबाईलचा, माझ्याकडे अजून बरेच फोटो आहेत.

बाकी तुम्ही दिलेली आयडिया खूप छान आहे तसे काही फोटो पण आहेत माझ्याकडे, ह्याच धाग्याचा दुसरा भाग म्हणून ते फोटो प्रदर्शित करायचा विचार आहे.

प्रसाद गोडबोले's picture

15 Feb 2014 - 12:28 pm | प्रसाद गोडबोले

छान !!

मेघनाद's picture

16 Feb 2014 - 5:20 pm | मेघनाद

@जेपी : धन्यवाद

@प्रसाद गोडबोले: धन्यवाद

@स्वॅप्स: अतिशय छान माहिती दिली आहेत तुम्ही अख्या मालिकेत. तुमचे "छायाचित्रण भाग ८. रचनाविचार (कॉम्पोझिशन) " वाचून तर अजून काही प्रयोग करावेसे वाटतायत.
पहिले ४ भाग वाचून काढले पण

कंजूस's picture

16 Feb 2014 - 6:46 pm | कंजूस

मेघनाद छान .

प्रत्येक कैमरा अमुक एक अंतरावर आणि प्रकाशात चांगले फोटो घेत असतो ते जाणून घेण्यासाठी वेगवेगळे फोटो काढायचे .(उदा:सैमसंग डयुऔस ७५६२ मध्ये पेपराचा फोटो येत नाही ,फोकस होत नाही )

काही प्रिंटस पण काढून पाहा 4X6 ,5X7 साईज .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2014 - 8:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडलेत फोटो आणि कारागिरी. देखनेका नजरिया आहे तुम्हाला.
लगे रहो.

-दिलीप बिरुटे

वेल्लाभट's picture

16 Feb 2014 - 9:59 pm | वेल्लाभट

असाच कधीतरी काढलेला एक फोटो मिळाला

aa

श्रीरंग_जोशी's picture

16 Feb 2014 - 11:48 pm | श्रीरंग_जोशी

चतुरभ्रमणध्वनीच्या कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोंतली आपली प्रयोगशीलता आवडली.

माझ्या ब्लॅकबेरी झेड १० या चतुरभ्रमणध्वनीने काढलेल्या फोटोजचे हे सरकचित्रदर्शन. मोठ्या आकारात बघायचे असल्या हा दुवा उघडावा.

मस्त ! सर्व कल्पना छान आहेत. :)
मला सर्वात जास्त बौद्ध भिक्खू आवडला. :)
जसा वेळ मिळेल तसा एखादा चांगला कॅमेरा घ्या आणि फोटोग्राफीचा आनंद लुटा आणि इथेही शेअर करा. :)

मेघनाद's picture

17 Feb 2014 - 12:54 pm | मेघनाद

@बिरुटे सर, @मदनबाण: आपले प्रतिसाद उत्साहवर्धक आहेत माझ्यासाठी.

@वेल्लाभट: तुम्ही दिला आहेत तसाच काहीसा फोटो आहे माझ्याकडे, तुमचा फोटो पण छान ऑटो फोकस्ड आहे.
@श्रीरंग_जोशी: धन्यवाद, तुम्ही टिपलेली छायाचित्र तर अप्रतिम आहेत. कुठला देश म्हणायचा हा?

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2014 - 7:32 pm | श्रीरंग_जोशी

खालील चेपू पान छायाचित्रणात रस असणार्‍यांसाठी फार उपयुक्त आहे.

https://www.facebook.com/LearnPhotography

सुहास..'s picture

24 Feb 2014 - 7:28 pm | सुहास..

आवडले आहे ...और भी आने दो !!

आपल्याला पुढचा भाग वाचायचा असेल तर हा दुवा बघा. : फावल्या वेळेतली फोटोग्राफी….भाग २

आज पहाटे चंद्र शुक्र अगदी
जवळ आले होते .