मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाश्च्यातांचे अनुकरण कितपत योग्य ?

psajid · · काथ्याकूट
आज पाश्चात्यांच्या अनुकरणामध्ये आपण सर्व जगात मोठी असणारी आपली संस्कृती हरवत चाललो आहेत. या गोष्टीने मनास फार दुःख होतंय. आज सगळीकडे पाश्चात दिवसांचे स्तोम माजले आहे, जिकडे पाहावे तिकडे - हा डे - तो डे ह्या इंग्रजी डे ने आपल्या भिंतीवरील दिनदर्शिका अगदी भरून गेली आहे. आता त्या लोकांनी आपण आपल्या जन्मदात्या आईवर वर्षातल्या कोणत्या एका दिवशी ममता करायची, बापाला कोणत्या दिवशी आनंदात ठेवायचे हे ठरवायचे का काय ? त्या लोकांनी प्रेम करण्याचा सुध्दा एक दिवस ठरवून टाकला आहे म्हणे ! ज्याला आज सगळीकडे "व्हेलेण्टाईन डे " म्हणतात. जो उद्याच आहे. इंग्रजी डे साजरा करणाऱ्या या लोकांना आपल्या देशातील महापुरुषांच्या जन्मतिथी माहित नसेल, आपल्या घरातील आई - वडिलांची आपल्यासाठी आपल्या आजारपणामध्ये जागलेली कित्येक रात्री मधील एक रात्र माहित नसेल मात्र हा दिवस मात्र त्यांच्या आठवणीमध्ये असेल. आयुष्यातील किती मोठी शोकांतिका ! आपण आपल्यामध्ये असणारा माणुसकीचा झरा जो पीडितांसाठी, गरिबांसाठी, आपुलकीच्या माणसासाठी वाहतोय हेही विसरत चाललो आहे का ?. ज्याच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो तो "व्हेलेण्टाईन" हा तिसऱ्या शतकातील रोम मधील ख्रिश्चन संत होता, जो सैनिकांच्या लग्नावर बंदी असताना त्या देशातील सैनिकांचे चोरून लग्न लावून द्यायचा, आणि हे जेंव्हा त्या राजाला कळले तेव्हा त्याने त्याला बंदी बनवून १४ फेब्रुवारी २६९ ला मारून टाकले. पण त्या अगोदर त्याला राजाकडून धर्मांतर केलेस तर तुला मुक्त करतो असे सांगण्यात आले होते. मात्र त्याने धर्मांतरास नकार दिला. त्याने रोम च्या राजाची आंधळी मुलगी ला त्याच्या दैवी उपचारांनी ठीक केले होतं. मरण्यापूर्वी त्याने त्या मुलीला एक पत्र लिहले आणि त्याखाली त्याने "From your Valentine" असं लिहलं होतं. त्याने धर्मासाठी आपला जीव दिला. प्रेमासाठी त्याने जीव दिला असा साधा उल्लेखही नाही. आपल्या भारतीय संस्कृती मध्येही संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपले प्राण दिल्याचा उल्लेख आहे. मात्र आपल्या आठवणीमध्ये त्यांचा बलिदान दिवस नाही. हे खरं तर भारतीय इतिहासाचे दुर्दैव म्हणावं लागेल. १४ फेब्रुवारी लाच (१९२२ साली) असणारी गायनातील स्वर्गीय आनंद पं.भीमसेनजी जोशी यांची जन्मतिथी कुणाच्या आठवणीमध्ये आहे ? आणि याच दिवसी १९३१ ला आपल्या देशातील क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी फासी दिली. तुम्ही कोणता दिवस तुमचा आनंद म्हणून साजरा करायचा हे तुम्हाला सांगण्याचा मला अधिकार नाही मात्र तो दिवस साजरा करताना आपल्या वागण्याचा, आपल्या कुटुंबावर, मित्रांवर, संस्कृतीवर आणि देशावरही परिणाम होत असतो हे लक्षात ठेवा. आणि ह्या सगळ्यांसाठी आपलीही काही जवाबदारी, काही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवा. २५ - ५० रुपये गुलाबाच्या फुलावर खर्च करण्यापेक्षा गरीब दुबळ्या अनाथ मुलांना कपडे किंवा अन्न वाटून किंवा दुष्काळात होरपळनाऱ्या, पाण्यासाठी दाहीदिशा टाहो फोडणाऱ्या लोकांसाठी, मुक्या जनावरासाठी पाणी देवून आपल्यामध्ये असणारे सामाजिक भान जपणे गरजेचे आहे, असं मला वाटतं. ज्यांचा आपल्या देशाशी संबंध आहे, आपल्यासाठी ज्यांनी स्वत:च्या प्राणांच बलिदान दिलं, जे आपल्या देशाच्या, आपल्या संस्कृती च्या उन्नती साठी अहोरात्र झटताहेत, लढतायेत, मरतायत किंवा त्या सीमेवर लढणाऱ्या शूर सैनिकांचे जे थंडी, बर्फवृष्टी, ऊन, पाऊस यांची तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावतात ज्यांच्यामुळे आज आपण सुरक्षितता अनुभवू शकतो, त्यांचे विस्मरण हे इंग्रजी डे साजरे करताना होता कामा नये. एवढंच हे इंग्रजी डे साजरं करताना माझं कळकळीचं आणि नम्र सांगणं आहे. - साजीद पठाण

वाचने 13885 वाचनखूण प्रतिक्रिया 67

मराठीप्रेमी गुरुवार, 02/13/2014 - 13:05
आपण पाश्चात्यांचे अनुकरण करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहोत. असे अनुकरण करणे अजिबात योग्य नाही. ही सगळी थेरे बंद झालीच पाहिजेत. आपल्या थोर्थोर संस्कॄतीचा पाईक होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. भले आपल्या संस्कॄतीत एके काळी स्त्रियांना नवर्‍याच्या चितेवर जाळत का असेनात, समाजातील एका मोठ्या घटकाला कायम दुय्यम सामाजिक स्थान का असेना, आमची संस्कॄती थोरच! बाकी तुमची भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या हौतात्म्याची तारीख चुकली. ती २३ मार्च १९३१ आहे.

सुनील गुरुवार, 02/13/2014 - 13:17
वॅलेंटाईन डे साजरा करणारांना स्वातंत्र्ययोध्यांविषयी आदरभाव नसतो, हा निष्कर्ष कसा काय काढला? तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागले तर, वर्षाचे सर्व ३६५ दिवस सुतकी चेहेर्‍याने काढावे लागतील! आणि हे पाश्चिमात्यांचे (पाश्चात्यांचे नव्हे) अंधानुकरण फक्त वॅलेंटाईन डेलाच कसे दिसते? आम्ही त्यांची वेषभुषा स्वीकारली, त्यांची भाषा ही कार्यालयीन भाषा म्हणून स्वीकारली, त्यांची कालगणना व्यवहारात स्वीकारली, हे सगळेही सोडून द्यायचे काय? (ड्राय डे सोडून कुठल्याही डेला विरोध नसणारा!) सुनील

गणपा गुरुवार, 02/13/2014 - 13:24
एकांगी लेख. जे जे चांगल असेल ते ते घ्याव.
आणि याच दिवसी १९३१ ला आपल्या देशातील क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी फासी दिली.
बाकी या बद्दल काय बोलावे? जरा गुगलवरुन शोध घेतला की कळेल. उगाच कुणी तरी पेटवतो आणि आपण लगेच मशाल असल्याचा अविर्भावात पेटायला लागतो.

धर्मराजमुटके गुरुवार, 02/13/2014 - 13:49
अहो राजे, कोणी कोणासाठी काम करत नाही. प्रत्येकजण फक्त स्वतःसाठी जगत आहे. त्यातून वेळ मिळालाच तर दुसर्‍याचा विचार करु शकतो. विचार करायला वेळ मिळाला तरच पुढची पायरी. ज्या थोर लोकांची नावे तुम्ही घेतलीत तसे लोक फक्त बोटावर मोजण्यापुरतेच असतात.

गवि गुरुवार, 02/13/2014 - 14:11
आपल्याकडेही वर्षात एकच दिवस बैलपोळा , एकच दिवस गुरुपौर्णिमा , एकच दिवस भाऊबीज , एकच दिवस शस्त्रपूजा ,एकच दिवस तिळगूळ घ्या गोड बोला असे बरेच काही एकेक दिवसच असते. हे सर्व प्रतीकात्मक दिवस आहेत. रोज सर्वानी सर्वांवर प्रेम केले तरी ते 24x7x365सतत दाखवत राहणे शक्य नसते.. पण ते व्यक्त करणे, दाखवणे यासाठी एक सांकेतिक दिवस ठरला असेल तर त्यात काय दुरित? प्रथा पाळण्यात सर्वाना / बहुतांशाना आनंद मिळत असल्यास ती पाळावी की. प्रथेची केवळ उगमदिशा पाहून तिला नावे ठेवू नयेत. सती प्रथा norway त असती तरी ती वाईटच. आणि जे जे अन्य कुठून आलेय ते वाईटच असा पॅरेनोईड विचार करु नये.

दिव्यश्री गुरुवार, 02/13/2014 - 14:28
पाश्च्यातांचे अनुकरण कितपत योग्य ?>>> पाश्च्यात देशांमध्ये सगळ्या वाईटच गोष्टी आहेत का? आपली संस्कृती खूप चांगली आहे का? चांगल्या वाईट प्रथा सगळी कडेच आहेत. पण आपण फक्त वाईट गोष्टीं विषयीच बोलतो नेहमीच कि पाश्च्यात संस्कृती किती वाईट आहे. इथे पायी चालणार्यांना आधी प्राधान्य दिले जाते. स्त्रियांना योग्य मान दिला जातो .कोणी कोणाच्या गोष्टींमध्ये अवाजवी लक्ष घालत नाही.अजून बर्याच चांगल्या गोष्टी आहेत.पण जर नावेच ठेवायची असतील तर मग बोलायलाच नको.

psajid गुरुवार, 02/13/2014 - 14:30
बाकी तुमची भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या हौतात्म्याची तारीख चुकली. ती २३ मार्च १९३१ आहे. बरोबर आहे तुमचे ! या तारखेला फासी झाली नाही तर फेब. ला फाशीची शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले असे म्हणायचे होते. समजून घ्या !

In reply to by psajid

सर्वसाक्षी गुरुवार, 02/13/2014 - 15:55
यांना ७ ऑक्टोबर १९३० रोजी फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि २३ मार्च १९३१ ला ती अमलात आणली गेली. १४ फेबृवारी १९३१ रोजी पं. मदन मोहन मालवीय यांनी आयर्विन यांना सदर देशभक्तांची फाशी माफ करण्यासाठी दयेचा अर्ज सादर केला जो अर्थातच फेटाळला गेला.

In reply to by सर्वसाक्षी

तुषार काळभोर गुरुवार, 02/13/2014 - 16:56
म्हणजे १४ फेब्रुअरीला काहीतरी झालं ना.... काय झालं ते जाऊ द्या, काही तरी झालं ते महत्वाचं!

ऋषिकेश गुरुवार, 02/13/2014 - 14:50
बाकी लेखावर मत देण्याआधी तुम्ही या विषयातील तज्ञ दिसताय त्यामुळे बरेच दिवस मनात असलेले थोडे शंका निरसन करावे ही विनंती: आधी तुमचे पहिलेच विधान पाहू
आज पाश्चात्यांच्या अनुकरणामध्ये आपण सर्व जगात मोठी असणारी आपली संस्कृती हरवत चाललो आहेत.
१. आपली संस्कृती म्हणजे कोणाची? २. आपली संस्कृती म्हणजे फक्त हिंदू संस्कृती धरावी का? उत्तर हो असल्यास तसे का? ३. आपली संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती म्हणायचे असल्यास १९४७ मध्ये भारत नावाचा सध्याचा देश अस्तित्त्वात आला. ६० वर्षात अशी कोणती संस्कृती उभी राहिली आहे जी जगात सर्वात मोठी ठरावी? ४. आपली संस्कृती म्हणजे मराठी संस्कृती म्हणाचीये का? मग बैसाखी किंवा ओणम साजरा केल्यावरही तुम्ही असे लेख लिहिणार का? ५. आपल्या संस्कृतीला सर्वात मोठे कशाच्या निकषावर म्हणता आहात? लोकसंख्येच्या असेल तर चीनी संस्कृती सर्वात मोठी ठरेल. या पाचावर आधी बोलु मग बाकीचे प्रश्न मांडतो

विकास गुरुवार, 02/13/2014 - 17:30
पाश्चात्यांनी चालू केलेल्या विकिपिडीयामधे पौर्वात्य भारतीयांनी लिहीलेल्या माहितीप्रमाणे पं. भीमसेन जोशी यांचा जन्म ४ फेब्रुवारीस झाला आहे, १४ फेब्रुवारीस नाही. (टाईम्स ऑफ इंडीयात पण ४ च तारीख आहे, १४ नाही). बाकी चालूंदेत.

विनायक प्रभू गुरुवार, 02/13/2014 - 17:55
ऊदर को बायको बहुत आदर से बात करना पडता है. घर मे भोत सारा काम करना पडता है. लफडा ़ किया तो जी. पी.एल. मिलता है.

माहितगार Fri, 02/14/2014 - 07:56
ज्यांनी स्वत:च्या प्राणांच बलिदान दिलं, जे आपल्या देशाच्या, आपल्या संस्कृती च्या उन्नती साठी अहोरात्र झटताहेत, लढतायेत, मरतायत किंवा त्या सीमेवर लढणाऱ्या शूर सैनिकांचे जे थंडी, बर्फवृष्टी, ऊन, पाऊस यांची तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावतात ज्यांच्यामुळे आज आपण सुरक्षितता अनुभवू शकतो, संभाजी महाराजांना पं.भीमसेनजी जोशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना २५ - ५० रुपये गुलाबाच्या फुलावर खर्च न करता गरीब सामाजिक भान जपणार्‍यांना सर्व हयात आणि स्वर्गवासी सजीवांना इश्वराला सर्वांनाच
इंग्रजी डे म्हणून नव्हे इश्वर निर्मित कालचक्रातील एक दिवस म्हणून इतर म्हणतात म्हणून नव्हे मला तसे करण्यास खरे तर केव्हाही आवडते म्हणून आदर व्यक्त करण्या साठी कोणतेही फूल न तोडता हे गुलाब छायाचित्र केवळ आदर व्यक्त करण्या साठी लावत आहे. आणि साजीद भाऊंनाही आदराचा प्रणाम . gulab

In reply to by पाषाणभेद

माहितगार Fri, 02/14/2014 - 09:29
आम्ही कधी कुणाला गुलाब तसा दिला नव्हता आणि केवळ आदरच व्यक्त करावयाचा आहे त्यामुळे छायाचित्र लावताना बारकाईने बाकी विचार केला नाही गुलाबाचेच छायाचित्र आहे. डोळ्या समोर गुलाबच येऊ यावा म्हणून अजून एक छायाचित्रही दिले आहे. प्रतिसादा करिता धन्यवाद

मराठी कथालेखक Fri, 02/14/2014 - 12:24
Valentine हा कोण कुठला , आणि त्याच्या नावाने दिवस का साजरा करावा हा प्रश्न मलाही (आता) पडतो , म्हणून मी तो दिवस साजरा करीत नाही (पैसे ही वाचतात ना)..पण कॉलेजच्या दिवसांत असा प्रश्न पडत नसे. अहो एखादा मुलगा एखाद्या मुलीला पसंत करत असतो (किंवा त्याउलट) , ते त्याला व्यक्त करायचे असते. आता या दिवशी तो एखादे भेटकार्ड, फूल देवून सहज ते व्यक्त करु शकतो इतकेच. मुलीलाही उगाच उठसूट अचानकपणे कोणत्याही दिवशी कुणीतरी प्रपोज करत राहिले तर वैताग येईल ना..म्हणजे या दिवशी प्रेम व्यक्त करण्याची, प्रपोज करायची सोय होते. आता अशीच काही सोय आपल्या संस्कृतीत उपलब्ध असती तर लोकांनी नसतेही लक्ष दिले वॅलेंटाईन कडे...संक्रात च्या तिळगूळ ची कल्पना काहीशी जवळ जाणारी आहे पण Exacly same नाही. १४ जाने. ला तिळगूळाच्या निमित्ताने ओळख वाढवावी आणि १४ फेब ला प्रपोज करावे, म्हणजे दोन्ही संस्कृती साज-या करण होईल .. बाकी गुलाब काही आपण आयात करत नाही त्यामुळे गुलाबावर खर्च केलेले पैसे आपल्याच देशातच फिरतात..सिग्नलवर गुलाब विकणारे रिलायन्स वा तत्सम मोठ्या देशी वा विदेशी कंपनीचे कर्मचारी नक्कीच नसतील , गरीब वगैरे म्हणु शकतो आपण त्यांना...

In reply to by मराठी कथालेखक

शिद Fri, 02/14/2014 - 14:48
१४ जाने. ला तिळगूळाच्या निमित्ताने ओळख वाढवावी आणि १४ फेब ला प्रपोज करावे
हो... अगदी खरे... असे करता करता बरोबर ९ महीन्यांनी १४ नोव्हेबंर'ला बालदिन साजरा करायचा...हाकानाका ;)

बाबा पाटील Fri, 02/14/2014 - 12:36
तुम्हाला इतिहासाला मास्तर कोन होते वो,मला जरा त्यांचा चरणस्पर्श करायचे आहेत्,म्हणुन विचारल....!

प्यारे१ Fri, 02/14/2014 - 13:34
>>>पाश्च्यातांचे हे काय आहे नेमकं? पण >>>तुम्ही कोणता दिवस तुमचा आनंद म्हणून साजरा करायचा हे तुम्हाला सांगण्याचा मला अधिकार नाही मात्र तो दिवस साजरा करताना आपल्या वागण्याचा, आपल्या कुटुंबावर, मित्रांवर, संस्कृतीवर आणि देशावरही परिणाम होत असतो हे लक्षात ठेवा. आणि ह्या सगळ्यांसाठी आपलीही काही जवाबदारी, काही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवा. ह्याबाबत विरोध नसावा कुणाचाच!

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

दिव्यश्री Fri, 02/14/2014 - 15:04
हो .......करतात की...आमच्या शहरामध्ये एक जर्मन कुटुंब पुण्यातील आयुर्वेदिक वैद्याचे उपचार घेतात.पण याला अनुकरण म्हणता येईल का? बाकी माझी एक जर्मन मैत्रीण साडी नेसते आणि हिंदी पण बोलते .( माझ्या पेक्षा छान बोलते हिंदी ) :)

In reply to by दिव्यश्री

माहितगार Fri, 02/14/2014 - 15:21
एका परदेशी स्टोअर मध्ये एक जर्मन कुटूंब मुलाबाळांसोबत खरेदीस आल होत. मला शॉप असिस्टंट (चूकीने) समजून मुलांकरता स्वीट्स विचारत होत आणि मी त्या दुकानाच्या शेल्फवरची सोनपापडी त्यांना आनंदाने कचकून खपवली.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

माहितगार Fri, 02/14/2014 - 15:16
युनायटेड किंगडमातील लोकांना सध्या भारतीय पा.कृ.तीतील करी म्हणजे रस्सा भाज्या आवडतात असे ऐकुन आहे. एरवी पिझ्झे आणि नुडल आवडीने खाऊन सुद्धा इतालवी आणि चिन देशांपासून सावधानता बाळगणारा आणि भारतावरच प्रेम करणारा-

In reply to by माहितगार

मराठी कथालेखक Fri, 02/14/2014 - 15:23
माझ्या UK स्थित एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार तिथे Indian Restaurants ची एकूण मिळकत ही तिथल्या English वा British Restaurants च्या एकूण मिळकती पेक्षा जास्त आहे कारण अनेक British लोक सुद्दा Indian Restaurants मध्ये खाणे तसेच पार्टी करणे अधिक पसंत करतात.

In reply to by माहितगार

दिव्यश्री Fri, 02/14/2014 - 15:33
जर्मन लोकांना भारतीय जेवणाचं,पेहरावाच आणि बॉलिवूडच खूपच आकर्षण आहे.आमचे घरमालक फ्रेड काका यांना जिंजर टी खूप आवडतो.ते आले की मी चहा करतेच.अजून त्यांना बाकी कशाची टेस्ट दिली नाहीये. ;) :D एकदा त्यांना भारतीय खानावळीत ( Hotel ) मध्ये नेले होते सगळ जेवण झाल्यावर गुलाबजाम मागवले तर अगदी चाटून पुसून साफ केला बोल आणि आम्ही दोघे चाटच पडलो. :D ऑस्ट्रिया मध्ये एक शा. खा.ची चाहती आहे. तिची documentary आहे U Tube वर मस्त आहे .मला शा.खा. आवडत नाही पण ती क्लिप आवडली. :)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

कल्पक Tue, 02/18/2014 - 12:07
पाश्चात्य लोक चांगल्या भारतीय गोष्टी, सवयी, मुल्ये आत्मसात करताना दिसतात. बरेच अमेरिकन लोक नियमित योगा आणि ध्यान करताना आढळले. भारतीय हॉटेलांमध्ये अमेरिकन लोक आवडीने मसालेदार पदार्थ खाताना दिसले. भारतीय पदार्थ, चहा घरी कसा करायचा असे विचारताना दिसले. माझ्या एका अमेरिकन सहकाऱ्याने ख्रिसमसला सगळ्या कुटुंबाला गाजर हलवा तयार करून खाऊ घातला आणि सगळ्यांना चक्क आवडला. आणखी एक निरीक्षण म्हणजे अमेरिकेत ३१ डिसेंबरला लोक कोणताही गोंधळ गोंगाट करत नाहीत, रस्त्यावर दारू पिउन तमाशा करणारे तरुण तरुणी दिसत नाहीत, इतरांना त्रास न होऊ देता, कायदे न मोडता, घरे सजवून शांतपणे नवीन वर्षाचे स्वागत करतात. कुठेही पोलिस बंदोबस्त लावावा लागत नाहीत. दुर्दैवाने भारतात हे प्रकार खूप दिसतात.

माहितगार Fri, 02/14/2014 - 21:01
दिल्लीच्या राजकारणात जनलोकपाल बिलावरून आणि तेलंगाणावरून रक्त आटवल जात असताना; भारताच्या काही भागात काहींनी आजचा व्हेलेंटाईन डे प्रेमीयुगूलांवर टमाटे फेक करून साजरा केल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे भारताच्या दुसर्‍या टोकाला प्रेमीयुगूलांनी व्हेलेंटाईन डे रक्तदान करून साजरा केल्याचे वृत्त आहे. आम्ही या चर्चा धाग्यावर गुलाब फुल लावून समस्त सजीवसृष्टी बद्दल आदर व्यक्त केला. तुम्ही आज काय काय केले ?

In reply to by माहितगार

मदनबाण Tue, 02/18/2014 - 12:33
दुसरीकडे भारताच्या दुसर्‍या टोकाला प्रेमीयुगूलांनी व्हेलेंटाईन डे रक्तदान करून साजरा केल्याचे वृत्त आहे. यांचे अभिनंदन करायला हवे ! सामाजिक जाणिव,भान ठेवुन अश्या प्रकारे दिवस साजरा केल्यास उत्तम. हे सर्व होत असताना एक दुसरं चित्र सुद्धा पहायला मिळाले... व्हॅलेंटाईन्स डेला फुलं आणि भेटवस्तूंपेक्षा कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांची अधिक विक्री मागच्या वर्षी याच दिवशी स्नॅपडील या साईट वरुन दीड लाख कंडोम विकले गेले होते ! त्यामुळे हा इंपोर्टेड सण नक्की काय वाटचाल करतोय याची कल्पना येइल.

In reply to by ऋषिकेश

ळॉळ ह्यावरुन एक जोक आठवला वडील आपल्या आठवीतल्या मुलाची सॅक चेक अकरत असतात , त्यात त्यांन्ना कंडोम चे पाकिट सापडते वडील ( प्रचंड रागाने ) : अरे कारट्या ह्या वयात हे हे तुझ्या सॅक मधे ? काही लाज नाही का वाटत ?? मुलगा ( शांतपणे) : ओ बाबा , उगाच इश्श्यु करु नका , ह्या वयात आजोबा झालात तर तुम्हालाच लाज वाटेल म्हणुन ठेवलय मी ते =)))

In reply to by मदनबाण

माहितगार Tue, 02/18/2014 - 13:31
पहिल वर मी इंग्लंडमध्ये त्याच दिवशी सिंगल्स एकटे जीव सदाशिव अँटी व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करतात याच्या वृत्ताचा दुवा दिला आहे. सोबतच एका कॅथॉलीक चर्चच्या भूमीकेचाही दुवा दिला आहे. दुसरीकडे मिपावरच्याच याच विषया संबंधाने असलेल्या दुसर्‍या धाग्यावर फुलं आणि भेटीं या सोडून इतर बाबतीत डोक लढवणारी डोकी भारतीय असण्यावर बोट ठेवल. तेच मी आपल्या प्रतिसादास उत्तर देतानाही म्हणेन. भारतीय डोक्यांनी विवेक राखला नसेल तर दिवस इम्पोर्टेड असण्या बद्दल खापर फोड कितपत सयूक्तीक ठरते. आपण दिलेल्या संबंधीत वृत्त दुव्यातील ऑनलाईन खरेदी बाबत दिलेली आकडे साशंकीत करणारे वाटतात संबंधीत वेबसाईट स्वतःची या निमीत्ताने जाहीरात तर करून घेत नाहीएना अशी जराशी शंका वाटली. दिवस भारतीय परंपरेला अनुसरून राहील या बद्दल जागरूकता निर्माण करण्यास हरकत नाही आणि बहुतांष भारतीय आजही जपतातच. आकडेवारी खुपत असेल तर ब्लड डोनेशन सारखे अधिक सकारात्मक उपक्रम तरूणाईला देण्यास हरकत नाही. अर्थात आकडेवारीबद्दल निष्कर्ष सुद्धा जराशी सावधानता बाळगण्यास हरकत नाही. व्हॅलेंटाईनडेच्या दिवशी विवाहीत लोकही अधिक प्रेम करू शकत असतात आणि तस असून भारताची लोकसंख्या वाढू नये म्हणून खबरदारी घेत असतील तर ठिक असेल किंवा कसे.

In reply to by माहितगार

मदनबाण Tue, 02/18/2014 - 13:47
आपण दिलेल्या संबंधीत वृत्त दुव्यातील ऑनलाईन खरेदी बाबत दिलेली आकडे साशंकीत करणारे वाटतात संबंधीत वेबसाईट स्वतःची या निमीत्ताने जाहीरात तर करून घेत नाहीएना अशी जराशी शंका वाटली. ह्म्म... ते वॄत्त एबीपी माझा या वॄत्तवाहिनीने त्यांच्या संकेतस्थळावर दिले आहे,एखादी वॄत्तवाहिनी विनाकारण आकड्यांचे गणित चुकीचे देइल असे वाटत नाही. आकडेवारी खुपत असेल तर ब्लड डोनेशन सारखे अधिक सकारात्मक उपक्रम तरूणाईला देण्यास हरकत नाही. आपण माझा प्रतिसाद नीट वाचला असेल तर मी त्यात :- दुसरीकडे भारताच्या दुसर्‍या टोकाला प्रेमीयुगूलांनी व्हेलेंटाईन डे रक्तदान करून साजरा केल्याचे वृत्त आहे. यांचे अभिनंदन करायला हवे ! सामाजिक जाणिव,भान ठेवुन अश्या प्रकारे दिवस साजरा केल्यास उत्तम. असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. व्हॅलेंटाईनडेच्या दिवशी विवाहीत लोकही अधिक प्रेम करू शकत असतात आणि तस असून भारताची लोकसंख्या वाढू नये म्हणून खबरदारी घेत असतील तर ठिक असेल किंवा कसे. अच्छा,मग याच दिवशी विवाहित लोक जास्तीचे प्रेम करतात, असा निष्कर्ष काढता येइल का ?की इतर दिवशी वेळ मिळत नसावा म्हणुन त्याची कसर या दिवशी भरुन काढली जाते ? असा विचार करायचा ? @ ऋषिकेश कंडोम न वापरता संबंध ठेवणे हे अधिक संस्कृतीरक्षक होईल असं म्हणायचंय का? अच्छा म्हणजे प्रेम दिवसाच्या नावावर हवे तसे संबंध ठेवा,व्यभिचार करा... पण एड्स होणार नाही अशी काळजी घ्या असं म्हणायच का ?

In reply to by मदनबाण

ऋषिकेश Tue, 02/18/2014 - 14:19
@ ऋषिकेश कंडोम न वापरता संबंध ठेवणे हे अधिक संस्कृतीरक्षक होईल असं म्हणायचंय का? अच्छा म्हणजे प्रेम दिवसाच्या नावावर हवे तसे संबंध ठेवा,व्यभिचार करा... पण एड्स होणार नाही अशी काळजी घ्या असं म्हणायच का ?
१. कंडोम फक्त व्याभिचारी व्यक्ती वापरतात असा (गैर)समज तुमचा का बरे झाला आहे? २. दोन व्यक्तीं स्वेच्छेने सुरक्षित संबंध ठेवत असल्यास त्यास व्याभिचार का/कसे म्हणावे? ३. दोन व्यक्ती स्वेच्छेने संबंध ठेवत असताना त्यांनी नुसता एड्सच नाही तर अनेक एस्टीडीज ची काळजी, किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम वापरले तर संस्कृतीरक्षकांच्या पोटात का दुखावे? बाकी माझे मतः आपल्याला आवडत्या सज्ञान व्यक्तीसोबत त्या व्यक्तीच्या परवनगीने व कोणतीही फसवणूक न करता सुरक्षित संबंध फक्त प्रेमदिनाच्याच दिवशी नव्हेत तर हवे तेव्हा खुशाल ठेवावे. अशा प्रेमीजीवांवर जळणार्‍या तथाकथित संस्कृतीरक्षकांना कशावर मारायचे हे ठाऊक असेलच!

In reply to by ऋषिकेश

शिद Tue, 02/18/2014 - 16:38
ऋषिकेश साहेब, तुमच्या मताबद्दल आदर आहे पण खालील प्रश्न विचारावासा वाटतोय, कृपया राग मानू नये ही विनंती.
आपल्याला आवडत्या सज्ञान व्यक्तीसोबत त्या व्यक्तीच्या परवनगीने व कोणतीही फसवणूक न करता सुरक्षित संबंध फक्त प्रेमदिनाच्याच दिवशी नव्हेत तर हवे तेव्हा खुशाल ठेवावे.
तुमच्या घरातील किंवा नातेवाईकांमधील सज्ञान पोरा-पोरींनी लग्नाअगोदर त्यांच्या आवडत्या सज्ञान व्यक्तीसोबत सुरक्षित संबंध ठेवले तर तुम्हाला मान्य आहे का? (ह. घ्या.)

In reply to by शिद

ऋषिकेश गुरुवार, 02/20/2014 - 11:42
शेवटी ह घ्या म्हटलंय तरी प्रश्न शिरेस आहे असे समजून उत्तर देतो: पोर-पोरी सज्ञान झाल्यावर माझ्या मान्यतेचा प्रश्न येतोच कुठे? सज्ञान व्यक्तीने त्यांनी लग्नाआगोदर/नंतर काय करायचे ते त्यांनी त्याच्या संभाव्य कायदेशीर परिणामांना सामोरे जायची तयारी ठेऊन, विचार करून करावे. पालक म्हणजे शासक नव्हे. आणि थेट उत्तर द्यायचं तर होय, जोवर त्या दोघांचीही अनुमती आहे व त्यांची संभाव्य कायदेशीर गुंत्याला सामोरे जायची तयारी आहे तर मला अश्या संबंधात काहीही वावगे वाटणार नाही.

In reply to by ऋषिकेश

मराठी कथालेखक Fri, 02/21/2014 - 11:37
आजकाल शिक्षण, उच्च शिक्षण, करियर ई मुळे लग्नाचे वय वाढले आहे (३०+ नंतर लग्न हे अनेकदा पहायला मिळेल). पण म्हणुन तोपर्यंत मुलांनी (म्हणजे मुलींनीहि) जीवनातील एका आनंदास मुकावे असे मला वाटत नाही. समजून, उमजून योग्य व्यक्तीसोबत शारिरिक संबंध वा थोडे पुढे जावून लिव-इन-रिलेशनशिप चा आनंद, अनुभव घेणे योग्य आहे असे मला वाटते. तसेच अशा अनुभवातुन प्रगल्भता, निर्णयक्षमता, माणूस ओळखण्याची क्षमता यांचा विकास होवू शकतो. पुर्वी अपत्यप्राप्तीच्या शक्यतेमुळे असे संबंध असू नये हा नियम होता, त्याचे नैतिक बंधन होते. पण आता गर्भनिरोधक साधनांमुळे मिळालेले स्वातंत्र्य उपभोगण्यास काहीच हरकत नसावी..

In reply to by मदनबाण

ऋषिकेश Tue, 02/18/2014 - 14:23
आणि अजून एक राहिलंचः नवरात्रीच्या नऊ दिवसांतही कंडोम/आयपील्सचा खप कित्येक पटिंत वाढतो. आता नवरात्र म्हणजेसुद्धा पाश्चात्यांकडून भारतीय संस्कृतीवर हल्ला आहे म्हणायचे असेल तर म्हणा बापडे!

In reply to by ऋषिकेश

मदनबाण Tue, 02/18/2014 - 14:46
कंडोम न वापरता संबंध ठेवणे हे अधिक संस्कृतीरक्षक होईल असं म्हणायचंय का? १. कंडोम फक्त व्याभिचारी व्यक्ती वापरतात असा (गैर)समज तुमचा का बरे झाला आहे? २. दोन व्यक्तीं स्वेच्छेने सुरक्षित संबंध ठेवत असल्यास त्यास व्याभिचार का/कसे म्हणावे? ३. दोन व्यक्ती स्वेच्छेने संबंध ठेवत असताना त्यांनी नुसता एड्सच नाही तर अनेक एस्टीडीज ची काळजी, किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम वापरले तर संस्कृतीरक्षकांच्या पोटात का दुखावे? व्यभिचार करताना या गोष्टीचा वापर केला जात नाही का ? व्यभिचाराची व्याख्या माहित आहे का ? गर्भधारणा टाळण्यासाठी कॉन्ट्रासेप्टिक पिल्सचा सातत्याने वापर केल्यास स्त्री शरिरास याचे दुष्परिणाम भोगायला लागतात हे माहित आहे का ? कंडोम वापराने एसटीडी आणि एड्स होण्याचा धोका कमी करता येतो,पण तो पूर्णपणे टाळता येत नाही हे ठावुक आहे का ? कुठलाही सण असो त्याच्या दुष्परिणांमांकडे लक्ष न-देणे ही चूक कोणीही करु नये ! मग तो गणपती उत्सव असो,नवरात्र असो वा रंगपंचमी. जाता जाता :- ज्यांना वारंवार कशावरही मारलेले कळत नाही त्यांच्याकडे मी फक्त दुर्लक्ष करतो.

In reply to by मदनबाण

राजेश घासकडवी Tue, 02/18/2014 - 23:25
कॉन्ट्रासेप्टिक पिल्सचा सातत्याने वापर
अहो, कॉंट्रासेप्टिक नाही हो, कॉंट्रासेप्टिव्ह. इथे सेप्टिकचा काही संबंध नाही. :) तुमचा प्रतिसाद पुरेसा विनोदी आहे, त्यात विनोदनिर्मितीसाठी आणखीन वेगळं करण्याची काही गरज नाही.

In reply to by मदनबाण

ऋषिकेश गुरुवार, 02/20/2014 - 11:45
कुठलाही सण असो त्याच्या दुष्परिणांमांकडे लक्ष न-देणे ही चूक कोणीही करु नये ! मग तो गणपती उत्सव असो,नवरात्र असो वा रंगपंचमी.
हे मान्यच आहे. पण इथे भारतीय संस्कृतीवर पाश्चात्यांच्या हल्ल्याचा/अनुकरणाचा संबंध कसा आला हे सांगायची कृपा कराल काय?

In reply to by मदनबाण

माहितगार Tue, 02/18/2014 - 15:38
मी व्यक्तीशः प्रत्येक आणि सर्वच वृत्तसंस्थांची वृत्ते चिमुटभर मिठा सोबतच वाचतो (खासकरून पेडन्यूज हा प्रकार कसा काम करतो ह्याची कल्पना असल्यानुळे अधिकच) पन्नास हजाराच्यावर भारतीय लोक एका दिवसात एकाच वेबसाईटवर ऑनलाईन क्रेडीट कार्ड वापरून अशा गोष्टीच्या शॉपींग साठी भारतीय लोक खरेदी करत असतील हि जरा... अतिशयोक्ती आणि म्हणून जाहीरातबाजी अथवा स्पेक्यूलेशन वाटते. इतर प्रत्यक्ष दुकान दारांषी चर्चा करून दिलेल्या आकडेवारी बद्दल मोठा आक्षेप असण्याच कारण नाही. यांचे अभिनंदन करायला हवे ! सामाजिक जाणिव,भान ठेवुन अश्या प्रकारे दिवस साजरा केल्यास उत्तम.>> हे वाचल आणि सहमत आहे. क्रिटीसिझम आणि निगेटीव्ह मार्केटींग या बाबई भिन्न आहेत. निगेटीव्ह पब्लिसिटी अल्सो इज अ पब्लिसिटी आपल्याला एखादी गोष्ट गंभीरपणे नको असेल तर आपण त्याच निगेटीव्ह मार्केटींग करत नाही आहोत ना हे गंभीरपणे तपासावयास हव. म्हणूनच चार चांगले पर्याय सूचवण हे अधिक रचनात्मक ठरू शकत किंवा कस.
अच्छा,मग याच दिवशी विवाहित लोक जास्तीचे प्रेम करतात, असा निष्कर्ष काढता येइल का ?की इतर दिवशी वेळ मिळत नसावा म्हणुन त्याची कसर या दिवशी भरुन काढली जाते ? असा विचार करायचा ?
मी व्हॅलेंटाईन डे साजरा करत नाही पण बर्‍याच 'फॅमिलीज' आजकाल घरी केक बिक कापून व्यवस्थीत व्हॅलेंटाईन डे साजरा करतात त्यामुळे त्या दिवशी विवाहित लोक जास्तीचे प्रेम करू शकतात का? च उत्तर शक्य आहे पेक्षा तीच शक्यता जास्त वाटते. विवाहीत जोडप्याने इतर दिवशी प्रेम करून विशेष दिवशी अधिक प्रेम करणे यात मला तरी काही वावगे आढळत नाही. भारतीय तरूणाई पाश्चात्य गोष्टींची नक्कल करावयास लागली आहे यात तथ्य असल तरी या बाबतीत आजही बहुतांष कंझर्वेटीव्ह आहे असे वाटते. माध्यमांना श्रोते मिळतात तर काही एनजीओंना परदेशातन डोनेशन्सही हवी असतात त्यामूळेही वेगेळी चित्र रंगवण्याच काम सरसकट नाही पण अंशतः होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by माहितगार

मदनबाण Tue, 02/18/2014 - 15:44
माध्यमांना श्रोते मिळतात तर काही एनजीओंना परदेशातन डोनेशन्सही हवी असतात त्यामूळेही वेगेळी चित्र रंगवण्याच काम सरसकट नाही पण अंशतः होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओक्के... आपला मुद्दा / विचार समजला,पटला. माझही हेच मतं आहे की चांगल ते घ्याव, अयोग्य ते सोडुन द्याव आणि ते कोणत्याही गोष्टीला लागु आहे.

पाश्च्यातांचे अनुकरण कितपत योग्य ? भारतियांनी सर्वप्रथम अशी सरसकटीकरणाची मानसिकता सोडली पाहिजे. त्याऐवजी, "कोणाचेही (पाश्च्यात्यांचे किंवा पौर्व्यात्यांचे किंवा अगदी भारतियांचेही) अंधानुकरण कितपत योग्य?" हा प्रश्न जास्त योग्य ठरेल. चांगले-वाईट-पणा हा पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर या दिशांवर अवलंबून नसतो. त्यामुळे जे काही चांगले, हितकारक आणि पुरोगामी आहे ते स्विकारावे, ते तसे नसले तर टाळावे... कुठल्या दिशेने ते येत आहे हे महत्वाचे नाही. आपण अनेकदा मोठ्या मोठ्या गोष्टींच्या गप्पा मारतो, जुन्या काळाचे मोठे दाखले देतो आणि स्वतः मात्र 'सिस्टीम'ला दोष देऊन बेलाशक त्याविरुद्ध वागतो असे खूपदा दिसते. त्याविरुद्ध पाश्च्यांत्यांच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्या भारतियांनी उचलणे अत्यंत आवश्यक आहे... हे वरील "कल्पक" यांच्या प्रतिसादातील काही उदाहरणांवरून सहज ध्यानात येईल. पाश्च्यांत्यांची 'दुसर्‍यांच्या चांगल्या गोष्टी शास्त्रिय आणि सारासारविवेक बुद्धीवर तोलून त्या स्विकारण्याच्या' सवयीचे भारतियांनी अनुकरण करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच भारतियांनी केवळ स्वार्थासाठी सत्य, विवेक आणि सामाजिक फायदा धाब्यावर बसवून दिशाभूल करणारे "राजकारणी" वागणे-बोलणे (जे सर्व विकसित देशांतील बहुसंख्य नागरीक त्याज्य समजतात आणि बर्‍याचदा ते कायद्याने दंडनीयही असते *) सोडणे अत्यंत आवश्यक आहे. * : हा एक देश / समाज विकसित असण्याचा मानदंड समजला जातो.