पाश्च्यातांचे अनुकरण कितपत योग्य ?
In reply to आपण पाश्चात्यांचे अनुकरण करून by मराठीप्रेमी
आणि याच दिवसी १९३१ ला आपल्या देशातील क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी फासी दिली.बाकी या बद्दल काय बोलावे? जरा गुगलवरुन शोध घेतला की कळेल. उगाच कुणी तरी पेटवतो आणि आपण लगेच मशाल असल्याचा अविर्भावात पेटायला लागतो.
In reply to बरोबर आहे तुमचे ! by psajid
In reply to हुतात्मा भगतसिंग, राजगुरू व सुखदेव by सर्वसाक्षी
आज पाश्चात्यांच्या अनुकरणामध्ये आपण सर्व जगात मोठी असणारी आपली संस्कृती हरवत चाललो आहेत.१. आपली संस्कृती म्हणजे कोणाची? २. आपली संस्कृती म्हणजे फक्त हिंदू संस्कृती धरावी का? उत्तर हो असल्यास तसे का? ३. आपली संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती म्हणायचे असल्यास १९४७ मध्ये भारत नावाचा सध्याचा देश अस्तित्त्वात आला. ६० वर्षात अशी कोणती संस्कृती उभी राहिली आहे जी जगात सर्वात मोठी ठरावी? ४. आपली संस्कृती म्हणजे मराठी संस्कृती म्हणाचीये का? मग बैसाखी किंवा ओणम साजरा केल्यावरही तुम्ही असे लेख लिहिणार का? ५. आपल्या संस्कृतीला सर्वात मोठे कशाच्या निकषावर म्हणता आहात? लोकसंख्येच्या असेल तर चीनी संस्कृती सर्वात मोठी ठरेल. या पाचावर आधी बोलु मग बाकीचे प्रश्न मांडतो
In reply to बाकी लेखावर मत देण्याआधी by ऋषिकेश
In reply to जाऊ द्या हो ! by धर्मराजमुटके
In reply to संस्क्रुती by विनायक प्रभू
In reply to नया है वह by कपिलमुनी
ज्यांनी स्वत:च्या प्राणांच बलिदान दिलं, जे आपल्या देशाच्या, आपल्या संस्कृती च्या उन्नती साठी अहोरात्र झटताहेत, लढतायेत, मरतायत किंवा त्या सीमेवर लढणाऱ्या शूर सैनिकांचे जे थंडी, बर्फवृष्टी, ऊन, पाऊस यांची तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावतात ज्यांच्यामुळे आज आपण सुरक्षितता अनुभवू शकतो, संभाजी महाराजांना पं.भीमसेनजी जोशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना २५ - ५० रुपये गुलाबाच्या फुलावर खर्च न करता गरीब सामाजिक भान जपणार्यांना सर्व हयात आणि स्वर्गवासी सजीवांना इश्वराला सर्वांनाचइंग्रजी डे म्हणून नव्हे इश्वर निर्मित कालचक्रातील एक दिवस म्हणून इतर म्हणतात म्हणून नव्हे मला तसे करण्यास खरे तर केव्हाही आवडते म्हणून आदर व्यक्त करण्या साठी कोणतेही फूल न तोडता हे गुलाब छायाचित्र केवळ आदर व्यक्त करण्या साठी लावत आहे. आणि साजीद भाऊंनाही आदराचा प्रणाम .
In reply to ज्यांनी स्वत:च्या प्राणांच by माहितगार
In reply to निदान by विकास
In reply to निदान by विकास
In reply to हो ना. काहीतरी वेगळेच दिसतेय. by पाषाणभेद
In reply to कसली संस्कृती अन कसले काय? by पाषाणभेद
In reply to हो हो.. कं. ज. ना. !!! by गवि
कं. ज. ना.आता हे काय आणि??
In reply to कं. ज. ना. आता हे काय आणि?? by बाळ सप्रे
In reply to कं. ज. ना by स्वच्छंदी_मनोज
In reply to साजीदभाऊंकरता चांगली बातमी by माहितगार
In reply to प्रेमिकांची सोय होते इतकंच.. by मराठी कथालेखक
१४ जाने. ला तिळगूळाच्या निमित्ताने ओळख वाढवावी आणि १४ फेब ला प्रपोज करावेहो... अगदी खरे... असे करता करता बरोबर ९ महीन्यांनी १४ नोव्हेबंर'ला बालदिन साजरा करायचा...हाकानाका ;)
पाश्च्यातांचे अनुकरण कितपत योग्य ?भरपुर...!
In reply to पाश्चात्य लोक आपले अनुकरण by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to याला अनुकरण म्हणता येईल का? by दिव्यश्री
In reply to पाश्चात्य लोक आपले अनुकरण by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to करी by माहितगार
In reply to करी by माहितगार
In reply to पाश्चात्य लोक आपले अनुकरण by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to पाश्चात्य लोक चांगल्या भारतीय by कल्पक
In reply to टमाटे आणि रक्त by माहितगार
In reply to दुसरीकडे भारताच्या दुसर्या by मदनबाण
In reply to म्हणजे कंडोम न वापरता संबंध by ऋषिकेश
In reply to दुसरीकडे भारताच्या दुसर्या by मदनबाण
In reply to पहिल वर मी इंग्लंडमध्ये त्याच by माहितगार
In reply to आपण दिलेल्या संबंधीत वृत्त by मदनबाण
@ ऋषिकेश कंडोम न वापरता संबंध ठेवणे हे अधिक संस्कृतीरक्षक होईल असं म्हणायचंय का? अच्छा म्हणजे प्रेम दिवसाच्या नावावर हवे तसे संबंध ठेवा,व्यभिचार करा... पण एड्स होणार नाही अशी काळजी घ्या असं म्हणायच का ?१. कंडोम फक्त व्याभिचारी व्यक्ती वापरतात असा (गैर)समज तुमचा का बरे झाला आहे? २. दोन व्यक्तीं स्वेच्छेने सुरक्षित संबंध ठेवत असल्यास त्यास व्याभिचार का/कसे म्हणावे? ३. दोन व्यक्ती स्वेच्छेने संबंध ठेवत असताना त्यांनी नुसता एड्सच नाही तर अनेक एस्टीडीज ची काळजी, किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम वापरले तर संस्कृतीरक्षकांच्या पोटात का दुखावे? बाकी माझे मतः आपल्याला आवडत्या सज्ञान व्यक्तीसोबत त्या व्यक्तीच्या परवनगीने व कोणतीही फसवणूक न करता सुरक्षित संबंध फक्त प्रेमदिनाच्याच दिवशी नव्हेत तर हवे तेव्हा खुशाल ठेवावे. अशा प्रेमीजीवांवर जळणार्या तथाकथित संस्कृतीरक्षकांना कशावर मारायचे हे ठाऊक असेलच!
In reply to ? by ऋषिकेश
आपल्याला आवडत्या सज्ञान व्यक्तीसोबत त्या व्यक्तीच्या परवनगीने व कोणतीही फसवणूक न करता सुरक्षित संबंध फक्त प्रेमदिनाच्याच दिवशी नव्हेत तर हवे तेव्हा खुशाल ठेवावे.तुमच्या घरातील किंवा नातेवाईकांमधील सज्ञान पोरा-पोरींनी लग्नाअगोदर त्यांच्या आवडत्या सज्ञान व्यक्तीसोबत सुरक्षित संबंध ठेवले तर तुम्हाला मान्य आहे का? (ह. घ्या.)
In reply to विचारावे की नको...??? विचारावेच म्हणतो... by शिद
In reply to शेवटी ह घ्या म्हटलंय तरी by ऋषिकेश
In reply to शेवटी ह घ्या म्हटलंय तरी by ऋषिकेश
In reply to आपण दिलेल्या संबंधीत वृत्त by मदनबाण
In reply to आणि अजून एक राहिलंचः by ऋषिकेश
In reply to कंडोम न वापरता संबंध ठेवणे हे by मदनबाण
कॉन्ट्रासेप्टिक पिल्सचा सातत्याने वापरअहो, कॉंट्रासेप्टिक नाही हो, कॉंट्रासेप्टिव्ह. इथे सेप्टिकचा काही संबंध नाही. :) तुमचा प्रतिसाद पुरेसा विनोदी आहे, त्यात विनोदनिर्मितीसाठी आणखीन वेगळं करण्याची काही गरज नाही.
In reply to कंडोम न वापरता संबंध ठेवणे हे by मदनबाण
कुठलाही सण असो त्याच्या दुष्परिणांमांकडे लक्ष न-देणे ही चूक कोणीही करु नये ! मग तो गणपती उत्सव असो,नवरात्र असो वा रंगपंचमी.हे मान्यच आहे. पण इथे भारतीय संस्कृतीवर पाश्चात्यांच्या हल्ल्याचा/अनुकरणाचा संबंध कसा आला हे सांगायची कृपा कराल काय?
In reply to आपण दिलेल्या संबंधीत वृत्त by मदनबाण
अच्छा,मग याच दिवशी विवाहित लोक जास्तीचे प्रेम करतात, असा निष्कर्ष काढता येइल का ?की इतर दिवशी वेळ मिळत नसावा म्हणुन त्याची कसर या दिवशी भरुन काढली जाते ? असा विचार करायचा ?मी व्हॅलेंटाईन डे साजरा करत नाही पण बर्याच 'फॅमिलीज' आजकाल घरी केक बिक कापून व्यवस्थीत व्हॅलेंटाईन डे साजरा करतात त्यामुळे त्या दिवशी विवाहित लोक जास्तीचे प्रेम करू शकतात का? च उत्तर शक्य आहे पेक्षा तीच शक्यता जास्त वाटते. विवाहीत जोडप्याने इतर दिवशी प्रेम करून विशेष दिवशी अधिक प्रेम करणे यात मला तरी काही वावगे आढळत नाही. भारतीय तरूणाई पाश्चात्य गोष्टींची नक्कल करावयास लागली आहे यात तथ्य असल तरी या बाबतीत आजही बहुतांष कंझर्वेटीव्ह आहे असे वाटते. माध्यमांना श्रोते मिळतात तर काही एनजीओंना परदेशातन डोनेशन्सही हवी असतात त्यामूळेही वेगेळी चित्र रंगवण्याच काम सरसकट नाही पण अंशतः होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
In reply to आजही बहुतांश भारतीय तरूणाई कंझर्वेटीव्ह by माहितगार
पाश्च्यातांचे अनुकरण कितपत योग्य ? भारतियांनी सर्वप्रथम अशी सरसकटीकरणाची मानसिकता सोडली पाहिजे.
त्याऐवजी, "कोणाचेही (पाश्च्यात्यांचे किंवा पौर्व्यात्यांचे किंवा अगदी भारतियांचेही) अंधानुकरण कितपत योग्य?" हा प्रश्न जास्त योग्य ठरेल.
चांगले-वाईट-पणा हा पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर या दिशांवर अवलंबून नसतो. त्यामुळे जे काही चांगले, हितकारक आणि पुरोगामी आहे ते स्विकारावे, ते तसे नसले तर टाळावे... कुठल्या दिशेने ते येत आहे हे महत्वाचे नाही.
आपण अनेकदा मोठ्या मोठ्या गोष्टींच्या गप्पा मारतो, जुन्या काळाचे मोठे दाखले देतो आणि स्वतः मात्र 'सिस्टीम'ला दोष देऊन बेलाशक त्याविरुद्ध वागतो असे खूपदा दिसते. त्याविरुद्ध पाश्च्यांत्यांच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्या भारतियांनी उचलणे अत्यंत आवश्यक आहे... हे वरील "कल्पक" यांच्या प्रतिसादातील काही उदाहरणांवरून सहज ध्यानात येईल.
पाश्च्यांत्यांची 'दुसर्यांच्या चांगल्या गोष्टी शास्त्रिय आणि सारासारविवेक बुद्धीवर तोलून त्या स्विकारण्याच्या' सवयीचे भारतियांनी अनुकरण करणे अत्यंत आवश्यक आहे
तसेच
भारतियांनी केवळ स्वार्थासाठी सत्य, विवेक आणि सामाजिक फायदा धाब्यावर बसवून दिशाभूल करणारे "राजकारणी" वागणे-बोलणे (जे सर्व विकसित देशांतील बहुसंख्य नागरीक त्याज्य समजतात आणि बर्याचदा ते कायद्याने दंडनीयही असते *) सोडणे अत्यंत आवश्यक आहे.
* : हा एक देश / समाज विकसित असण्याचा मानदंड समजला जातो.
नेमेची येतो पावसाळा...