क्रिस्पी सेसमी प्राँस इन लेट्युस कप्स
साहित्य सॅलॅड:
१/२ वाटी पातळ, उभे चिरलेले गाजर
१/२ वाटी पातळ उभा चिरलेला कोबी
थोडासा पातळ उभा चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कांद्याची पात
१/४ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून लिंबाचा रस
मीठ चिमूटभर
सगळ्याचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे बसवावे.
साहित्य सोया + शेजवान सॉस:
डार्क सोया सॉस
चिंग्स शेजवान चटणी / सॉस
मध
बारीक चिरलेले आले
कांद्याची पात व भाजलेले तीळ
सगळ्याचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे बसवावे.
सर्व्हिंगः
लेट्युसची पाने स्वच्छ धुवून, पुसुन घ्यावी.
त्यात तयार केलेले सॅलॅड घालावे व त्यावर क्रिस्पी सेसमी प्राँस ठेवावे.
थोडासा सॉस त्यावर घालावा किंवा सोया + शेजवान सॉस क्रिस्पी सेसमी प्राँस इन लेट्युस कप्सबरोबर सर्व्ह करा.
वाचने
8568
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
दंडवत....
आयला इथे आम्हाला एक फोटो धड काढता येत नाही आणि इथे ह्या ताई सुरेख फोटो काढतातच शिवाय ह्यांची पा.क्रु. कधी बिघडत पण नाही...
असो...
परत एकदा त्रिवार दंडवत....
In reply to खल्लास.... by मुक्त विहारि
+११११११
लई भारी....
जबरदस्त कलरफुल फोटो आणि तिळ+प्रौन्झची एक आगळीवेगळी पाककृती
धन्यवाद.
किती निगुतीने केली आहे पाकृ. जबरदस्त.
दिसायला भन्नाटच आहे, पण हे खायचं कसं? कुरकुरीत कोलंबी आधी खाऊन नंतर खालचा मसाला पानासारखा तोंडात घालायचा? का कोलंबी लेट्युसमध्ये गुंडाळूनच खायची? ते जरा विचित्र नाही का वाटत, म्हणजे बुरखा घातलेल्या तरुणीचे चुंबन घेण्यासारखं??
In reply to दिसायला भन्नाटच आहे, पण हे by चिन्मय खंडागळे
च्यामारी, ह्यातलं नेमकं काय खायचं असतं आणि काय पानात टाकायचं असतं बरं?
बादवे, नेहमीप्रमाणेच नादखुळा... आणि बॅकलायटिंग चा ह्याही छायाचित्रांमध्ये मस्त वापर.
In reply to येईच्च पूछता है by एस
हे असच्या असचं खायचं असतं (लेट्युस कप्ससकट- शेवटी ते सॅलॅडच), जबराट लागतं.
In reply to हे असच्या असचं by सानिकास्वप्निल
सर्व्हिंगः
लेट्युसची पाने स्वच्छ धुवून, पुसुन घ्यावी. त्यात तयार केलेले सॅलॅड घालावे व त्यावर क्रिस्पी सेसमी प्राँस ठेवावे. थोडासा सॉस त्यावर घालावा किंवा सोया + शेजवान सॉस क्रिस्पी सेसमी प्राँस इन लेट्युस कप्सबरोबर सर्व्ह करा.
हॅपी वॅलेंटाइन डे,सानिके ;)
एकदम जबरदस्त !!!!!
उगाच इंग्रजी नाव टाकलं म्हणजे चांगला स्वयंपाक येतो असे नाही
लय भारी !!
फोटो आवडले.
जीवघेणे आहे ...
सुर्रेख!
खूप मस्त रेसिपी सानिका.
खल्लास सादरीकरण.
_/\_ घ्या पामराचा.
क्लासच दिसत आहेत ग,
स्वाती
सुंदर दिसत आहेत. अॅज युज्वल!
ग्रेट दिसतायत. रंगीबेरंगी पाकृ!
एखाद दुसरे खाऊन काय होणार? एकावेळी पोट भरण्यासाठी सुमारे ३०-४० तरी खावीत का? म्हणजे ते करणे आले...
अतिशय गहन प्रश्न आहे !!!
(विचारमग्न)!!!
In reply to एकंदर by अत्रन्गि पाउस
३० -४०?? मग पोट सांभाळा!
In reply to एकंदर by अत्रन्गि पाउस
अहो ते स्टार्टर म्हणून खायचे.
In reply to अहो ते स्टार्टर म्हणून खायचे by सानिकास्वप्निल
;) जरा अतीच आकडा लिहिला नही का?
फोटो क्लास आलेत.
मश्तू!!
कोळंबी तर जीव का प्राण. कसले जबरा फोटो आलेत... पाककृती ही अल्टीमेट.... :) :)
देवा मला सानिकाचा नवरा कर.. प्लिझ प्लिझ प्लिझ..
In reply to देवा मला सानिकाचा नवरा कर.. by पिलीयन रायडर
तथास्तु.
आणी मग सानिकाला पिलीयन रायडरचा........ठीक है !
अप्रतिम.... यम्म्म्म्म्म दिसतय एकदम.
नेहमीप्रमाणेच मस्त.
(कालच मनसोक्त खापी हादडलेला)सौंदाळा
एकदम नजाकती ने केलेली पाकृ... झक्कास्स...
चिकन बिकन पेक्षा मत्स्य पाकॄ पाहिली की मला कधी तरी मी मासळी खाईनच ही भिती वाटते ! :)
शेवटच्या फोटु पाहिल्यावर हे प्राँस चांगलेच कुरकुरीत लागत असणार असं वाटतय ! :)
खल्लास....