क्रिस्पी सेसमी प्राँस इन लेट्युस कप्स
साहित्य सॅलॅड:
१/२ वाटी पातळ, उभे चिरलेले गाजर
१/२ वाटी पातळ उभा चिरलेला कोबी
थोडासा पातळ उभा चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कांद्याची पात
१/४ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून लिंबाचा रस
मीठ चिमूटभर
सगळ्याचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे बसवावे.
साहित्य सोया + शेजवान सॉस:
डार्क सोया सॉस
चिंग्स शेजवान चटणी / सॉस
मध
बारीक चिरलेले आले
कांद्याची पात व भाजलेले तीळ
सगळ्याचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे बसवावे.
सर्व्हिंगः
लेट्युसची पाने स्वच्छ धुवून, पुसुन घ्यावी.
त्यात तयार केलेले सॅलॅड घालावे व त्यावर क्रिस्पी सेसमी प्राँस ठेवावे.
थोडासा सॉस त्यावर घालावा किंवा सोया + शेजवान सॉस क्रिस्पी सेसमी प्राँस इन लेट्युस कप्सबरोबर सर्व्ह करा.
वाचन
8566
प्रतिक्रिया
34