(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ)
_____________________________________
मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ. मूर्खपणा टाळलाच पाहिजे
वटवाघुळ मानवास संस्कॄताची उत्तम माहिती असताना, त्याने असे विधान करावे हे सर्वात धक्कादायक आहे.
मननेन त्रायते इति मन्त्रः :- संदर्भ विकी
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।25।।
श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक २५ { जप हा मंत्रांचाच केला जातो}
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः।।35।।
श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक ३५ { गायत्री छन्दात्मक मंत्र आहे हे तर आता सर्वश्रुत आहे.}
मंत्रांचा वापर करुन त्याचा अनुभव, फायदा / तोटा घेणारी मंडळी आजच्या घडीला आहेत, तसेच उध्या ही असतील. अनुभव घेण्यापेक्षा चेष्टा करणे हे अगदी सोपे आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे.
जालावर या संदर्भात वाचन / शोध घेत असताना काही माहिती समोर आली { ही माहिती मी अजुन संपूर्ण वाचली नाहीये.}
वाचकांसाठी त्याचे दुवे खाली देतो :-
An Introduction to the "MantraŚãstra"
MANTRAS
दोन्ही दुवे हे पिडीएफ चे आहेत. ज्या वाचकांना या विषयात रस आहे त्यांनीच हे दुवे अघडुन वाचण्याचे कष्ट घ्यावेत, टिंगल करण्यास विशेष बुद्धी लागत नाही असा माझा समज असल्याने जे हा विषय एक टिंगल / थट्टा म्हणुनच पाहतात त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे !
प्रयत्नाचा एक भाग तुम्ही किंवा अजून कोणी ज्यांनी अनुभव घेतले आहेत त्यांना विचारणे हाही असतो.
वटवाघुळाने अनुभवा विषयी विचारणा केली आहे,म्हणुन जरा टंकन कष्ट घेतो.
मंत्र :- कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
हा मंत्र मला माझ्या तिर्थरुपांकडुन कळाला, ज्या ठिकाणी मी सध्या राहतो आहे ती जागा विकत घेतानाची ही घटना आहे.{अनुभव क्रमांक १}
या जागेचे {जागा विकत घेण्यासंबंधीच्या व्यव्हारांसकट इतर महत्वाची कागदपत्रे ओरिजिनल} सर्व कागदपत्र घेउन माझे वडिल प्रवास करत होते,{मला वाटत दादर स्टेशनहुन ते डोंबिवलीला येण्यासाठी ट्रेन मधे चढत होते.}प्रचंड गर्दी आणि त्यामुळे झालेल्या धक्का-बुक्कीत त्यांच्या हाताला झटका बसुन ती फाईल त्या गर्दीत पडली. वडिल डब्यात होते,डब्यातल्या गर्दीत ती फाईल शोधणेही त्या क्षणी शक्य नव्हते इतकी गर्दी डब्यात होती.जरा गर्दी कमी झाल्यावर वडिलांनी शोध घेण्याचा प्रतय्न केला पण काहीही सापडले नाही.फाईल फलाटावर पडली का ? ट्रॅकवर पडली का ? की डब्यातच कोणाच्या पायाला लागुन ती बाहेर फेकली गेली असेल ? वडिलांनी घरी आल्यावर हे सर्व आम्हाला सांगितले,ते खूप विचारात होते... जागेच्या सर्व व्यव्हारांचे कागद गहाळ झाल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते.थोडावेळ शांत बसले आणि नंतर हातपाय धुवुन झाल्या नंतर त्यांना या वर दिलेल्या मंत्राचे स्मरण झाले ! त्यांनी सात्यत्याने या मंत्राचे उच्चरण अनेक दिवस चालु ठेवले होते आणि अचानक काही दिवसांनी त्यांच्या ऑफिसमधे एका माणसाचा फोन आला, त्याने वडिलांचे नाव विचारले आणि तुमची काही कागदपत्रांची फाईल गहाळ झाली आहे का ? अशी विचारणा केली.वडिलांनी त्या फाईलचे वर्णन केले आणि त्या फाईल चे एकंदर स्वरुप सांगितले,त्यावर त्या माणसाने तुमची फाईल माझ्याकडे आहे, ती घेउन जा असे सांगितले.ती फाइल महत्वाची आहे हे त्या व्यक्तीस त्यातील कागदपत्रांवरुन कळाले होते. शेवटी ती फाइल मिळाली आणि आजवर त्याच फ्लॅटमधे आम्ही राहतोय जिची कागदपत्रे त्या फाइल मधे होती.
२)अनुभव २:- एकदा नरसोबाच्या वाडीला मी नदीत अंघोळ करत होतो, ३ -४ पायर्या खाली,ज्यांनी नरबाच्या वाडीला कॄष्णेत स्नान केले असेल त्यांना नदीच्या प्रवाहाचा अंदाज येइल.माझ्या गळ्यात साधे कसलेसे तांब्याचे लॉकेट होते, ते मैल्यवान नव्हते की कुठल्याही इतर गोष्टींसाठी उपयुक्त नव्हते,पण मी या मंत्राचा उपयोग सुरु करताच जवळपास १० मिनीटाच एका पोहणार्याला ते सापडले आणि तिथेच हे कोणाचे आहे अशी विचारणा सुरु केली,मी ते माझे आहे असे सांगताच ते त्यांनी मला दिले,पण नदीच्या प्रवाहात पोहताना गेलेले लॉकेट परत मिळाले यावर माझाच बराच वेळ विश्वास बसला नव्हता.
३}घरात अनेकदा मला न मिळणार्या,दॄष्टीस न पडणार्या ,भरपुर शोध घेउन न सापडणार्या वस्त्यु या मंत्राने आम्हाला मिळाल्या आहेत, हो आइच्या हातुन घराची किल्ली हरवली तेव्हा ती या मंत्रानेच परत मिळाली.
४)अगदी आत्ताची गोष्ट सांगतो... मी नविन पल्सर घेतली, त्याला मी पेट्रोल लॉक बसवुन घेतले,पण त्या लॉकची मुव्हमेंट घट्ट आहे,त्यामुळे व्हॉल्व ऑन्/ऑफ करताना किल्लीवर दाब येत होता, एका प्रयत्नात ती तुटली,पण त्याची अजुन एक चावी माझ्याकडे होती. मी जवळच्याच चावीवाल्याकडे जाउन तशीच अजुन एक चावी बनवुन घेतली.ती मी माझ्या बॅगेत ठेवली,व एक चावी कीचेनला अडकवली. ऑफिसात आलो...कामाला लागलो,चाव्या पॅटच्या डाव्या खिश्यात ठेवल्या होत्या,काही वेळाने त्या बाहेर काढुन बॅगेतच ठेवावा असा विचार आला,तेव्हा चाव्या खिशातुन बाहेर काढल्या,पण ल़़क्षात आले की पेट्रोल लॉकची चावी कीचेनला नाही ! ती पडली होती ! माझ्या बॅगेत आधीच चावी वाल्याकडुन तयार केलेली चावी होती,त्यामुळे घाबरायचे कारण नव्हते,पण कीचेन मधली चावी पडली होती ते शोधणे तर गरजेचेच होते.मी परत एकदा खिसा तपासला,त्याच्यातच तर राहिली नसेल ना ? मग ज्या ज्या ठिकाणी मी गेलो होते त्या त्या ठिकाणी मी परत गेलो, ज्या मार्गाने ऑफिसात गेलो होतो त्याच मार्गाने उलट फिरुन कंपनीच्या आवारात जिथे बाइक पार्क केली होती तिथे गेलो,पण चावी काही सापडली नाही ! मग नेहमीचाच वरील उपाय केला,ऑफिसात परत जाताना मी सिक्युरिटी गार्डला सांगुन ठेवले की माझी अश्या अश्या प्रकारची चावी हरवली आहे ती सापडली तर मला कळवा,तो पर्यंत मनात अनेकदा वरील मंत्राचा प्रयोग करुन झाला होता,आणि मला चावी मिळणार याची खात्री आधीच झाली,संध्याकाळी कामावरुन घरी निघताना परत सिक्युरिटी गार्डला प्रश्न केला मेरी चाबी मिली ना ! खर तर हा प्रश्न नव्हताच ते अध्यारुतच होते माझ्यासाठी, त्यावर तो म्हणाला साब एक चाबी मिला है, आप चेक करलो वोह आपकी है क्या. मी मेमगेटवर जाउन विचारणा केली.चावी त्यांच्याकडे जमा झालेली होती. ऑफिसच्या एव्हढ्या मोठ्या कँपस मधे हरवलेली चावी परत मिळण्याची ही माझी दुसरी घटना {या आधीही एकदा चावी गहाळ झाली होती},दोन्ही वेळेला चावी मला परत मिळाली.
या सर्व घटनांमध्ये वस्तु परत मिळण्याची प्रोबॅबिलीटी किती यावर तुम्ही विचार करु शकता, याला कोणी योगायोग किंवा इतर काहीही म्हणा... माझ्यासाठी हे प्रमाणित अनुभवच आहेत.
या मंत्राचा संदर्भ तुम्हाला :- बोध दत्तमाहात्याचा अध्याय ४ था मधे मिळेल. {लेखक :- डॉ. वासुदेव व्यंकटेश देशमुख}
जाता जाता :- गुगलुन हा मंत्र जालावर सापडतोय का ते पाहण्याचे सुद्धा प्रतय्न केले तरी माझी हरकत नाही. जे अनुभव आजवर या मंत्रा संबंधी घेतले ते तसेच लिहले आहेत. हा अनुभव मी ठाण्याच्या कट्ट्याला देखील गप्पांच्या ओघात कथन केला होता.
वाचने
114026
प्रतिक्रिया
322
मिसळपाव
प्रतिक्रिया
मन्त्र शब्दाची व्याख्या
बाकी दोन श्लोकांत अमुक एक
In reply to मन्त्र शब्दाची व्याख्या by बॅटमॅन
कृष्ण तुमच्यासाठी भगवंत असेल
In reply to बाकी दोन श्लोकांत अमुक एक by मदनबाण
कृष्ण तुमच्यासाठी भगवंत असेल
In reply to कृष्ण तुमच्यासाठी भगवंत असेल by बॅटमॅन
ठीक.
In reply to कृष्ण तुमच्यासाठी भगवंत असेल by मदनबाण
पण मंत्रामुळे ज्या
In reply to ठीक. by बॅटमॅन
आपल्याला पटत नाही या
In reply to पण मंत्रामुळे ज्या by मदनबाण
सांगतो. मी किती मंत्र
In reply to आपल्याला पटत नाही या by बॅटमॅन
शंका आली तर त्याचे उत्तर
In reply to सांगतो. मी किती मंत्र by मदनबाण
वाल्याचा वाल्मिकी झाला तो याच
In reply to शंका आली तर त्याचे उत्तर by बॅटमॅन
माझ्या आठवणीप्रमाणे वाल्या
In reply to वाल्याचा वाल्मिकी झाला तो याच by प्रचेतस
शंका विचारणार्याला मूर्खात
In reply to शंका आली तर त्याचे उत्तर by बॅटमॅन
बाकी राहूदे
In reply to शंका विचारणार्याला मूर्खात by मदनबाण
तुम्हाला शंका विचारली याचा
In reply to बाकी राहूदे by बॅटमॅन
Yes... Madanbaan...I'm
In reply to सांगतो. मी किती मंत्र by मदनबाण
मी न वाचलेला एक जुना धागा वर
In reply to Yes... Madanbaan...I'm by मृगनयनी
मृग्गा, तुझ्या प्रतिसादाने
In reply to Yes... Madanbaan...I'm by मृगनयनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सुंदरी... :- Sanju Rathod Ft. Yashika Jatav | G-Spark |निव्वळ त्या अक्षरात काहीही नसते असे माझे मत आहे
In reply to आपल्याला पटत नाही या by बॅटमॅन
हे कसे ते ऐकायला आवडेल. बाकी
In reply to निव्वळ त्या अक्षरात काहीही नसते असे माझे मत आहे by अर्धवटराव
भाषाशास्त्र दृष्टीकोनातुन ते बरोबर आहे.
In reply to हे कसे ते ऐकायला आवडेल. बाकी by बॅटमॅन
काय प्रतिक्रिया आहे?
In reply to भाषाशास्त्र दृष्टीकोनातुन ते बरोबर आहे. by अर्धवटराव
अक्षरे ही केवळ प्रतीके आहेत.
In reply to हे कसे ते ऐकायला आवडेल. बाकी by बॅटमॅन
अक्षरे ही केवळ प्रतीके आहेत. त्यांना काहीएक अर्थ आहे तो फक्त आपण दिलेला आहे.+१ अक्षरं नसणार्या काही थीम ऐकल्या तरी BP बदलतं. बाईक चालवताना 'धूम्-धूम' ऐवजी 'कहीं दीप जले कही दिल' ऐकलं तर काय होइल? गीतरामारणातले "जोड झणिं कार्मुका सोड रे सायका मार ही त्राटिका, रामचंद्रा" ऐकल्यावर खुद्द रामाला स्फुरण चढेल. शब्दांपेक्षा सूर्,ताल,लय ही महत्वाचे आहेत. बाकी प्रत्येकाचे मनाचे खेळ. मी सकाळी गडबडीत आवरताना चाची ४२० मधील "दौडा दौडा भागा भागा सा" हे गाणं म्हणतो, (मला) फायदा होतो.:) पण याचा अर्थ असा नक्कीच नाही की ह्या मंत्रात काही 'पावर' आहे. बाकी इथे चाल्लेली मजा पाहून आज खात्री झाली, अजुन बर्याच निर्मल बाबांना स्कोप आहे. ;) दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिये!!! जाता-जाता: या काही व्यक्ती हरवल्या आहेत. कोणता मंत्र म्हणता येईल?? :))@ मदनबाण,
सापशिडीतला ठोकळा फेकताना ६
In reply to @ मदनबाण, by प्यारे१
>>>मंत्रांचा व्याव्हारिक
In reply to सापशिडीतला ठोकळा फेकताना ६ by मदनबाण
>>माझ्या मते प्रामाणिकपणं
In reply to @ मदनबाण, by प्यारे१
पण प्यारेकाका बोलतायेत ते
In reply to >>माझ्या मते प्रामाणिकपणं by सूड
मदनबाणजी, आधीची चर्चा मी
सहमत.. जेव्हा परिणामावरुन
In reply to मदनबाणजी, आधीची चर्चा मी by आदूबाळ
सहमत.
In reply to मदनबाणजी, आधीची चर्चा मी by आदूबाळ
माझ पाकिट ४/५ हजार रु.
In reply to सहमत. by थॉर माणूस
मंत्रशक्ती बद्द्ल माहित नाही
In reply to माझ पाकिट ४/५ हजार रु. by आनंद
हेच अन असेच म्हणतो.
In reply to मंत्रशक्ती बद्द्ल माहित नाही by आनंद
अगदी सहमत. कशाचा संबंध कशाला
In reply to मंत्रशक्ती बद्द्ल माहित नाही by आनंद
गुरू मेहरबान तो रावण नाम भी
उत्तम लेख
आधि धागा बुकमार्क करतो
अरेरेरे, असे हरवू नका.
In reply to आधि धागा बुकमार्क करतो by जेपी
गमतीदार चर्चा!
+१
In reply to गमतीदार चर्चा! by कवितानागेश
अर्थातच.
In reply to +१ by प्रचेतस
बाकी या मंत्रचळाला भुलणार्या
In reply to अर्थातच. by बॅटमॅन
जो जे वांछिल ते तो. अर्थात
In reply to बाकी या मंत्रचळाला भुलणार्या by प्रचेतस
ते बाकी खरे.
In reply to जो जे वांछिल ते तो. अर्थात by बॅटमॅन
>>> हिरीरीने हवेत सिंहगड
In reply to जो जे वांछिल ते तो. अर्थात by बॅटमॅन
कुठल्या मुद्द्यावर नकार देताय
In reply to >>> हिरीरीने हवेत सिंहगड by प्यारे१
सिद्ध करायचं म्हणजे नेमकं काय
In reply to कुठल्या मुद्द्यावर नकार देताय by बॅटमॅन
नक्की दावा काय आहे हे समजून
In reply to सिद्ध करायचं म्हणजे नेमकं काय by प्यारे१
ते आव्हान नाही स्वीकारत का मग
In reply to नक्की दावा काय आहे हे समजून by बॅटमॅन
कसलं चोरीचं?
In reply to ते आव्हान नाही स्वीकारत का मग by प्यारे१
>>>त्या अक्षरात किंवा नामात
In reply to कसलं चोरीचं? by बॅटमॅन
ओह ते!
In reply to >>>त्या अक्षरात किंवा नामात by प्यारे१
आता व्हिलनचं पक्कं झालं का
In reply to ओह ते! by बॅटमॅन
मनोनिग्रह असेल तर जप होतो
In reply to आता व्हिलनचं पक्कं झालं का by प्यारे१
हहहहहहह्ह! असोच!
In reply to मनोनिग्रह असेल तर जप होतो by बॅटमॅन
असो! तुमची तयारी नाही ना, जौ
In reply to आता व्हिलनचं पक्कं झालं का by प्यारे१
चोरलेल्या गोष्टी मिळतील काय?
चोरलेल्या वस्तू या (किंवा
In reply to चोरलेल्या गोष्टी मिळतील काय? by योगी९००
मदनबाण'जी... अत्यंत सुन्दर
In reply to चोरलेल्या वस्तू या (किंवा by मदनबाण
कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत
In reply to मदनबाण'जी... अत्यंत सुन्दर by मृगनयनी
तेच म्हणतो. पुराणांत वाईट
In reply to कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत by प्रचेतस
रावणरक्षास्त्रोत्र
In reply to तेच म्हणतो. पुराणांत वाईट by बॅटमॅन
आयला जबरीच =))
In reply to रावणरक्षास्त्रोत्र by प्रचेतस
अगागगगगगगा =)) काय रे हे
In reply to आयला जबरीच =)) by बॅटमॅन
ही ही ही धन्स रे
In reply to अगागगगगगगा =)) काय रे हे by प्रचेतस
आधुनिक मंत्र का?
In reply to आयला जबरीच =)) by बॅटमॅन
स्त्रॉत्र मंजरी हा कविता
In reply to रावणरक्षास्त्रोत्र by प्रचेतस
शिवतांडव स्तोत्र फेमस आहेच.
In reply to स्त्रॉत्र मंजरी हा कविता by प्रकाश घाटपांडे
तो त्याच्य सहस्त्र हातांनी ती
In reply to कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत by प्रचेतस
कार्तवीयोर्जुनो नाम राजा
In reply to तो त्याच्य सहस्त्र हातांनी ती by स्पंदना
गुलाम असा डायरेक्ट नाही, पण
In reply to कार्तवीयोर्जुनो नाम राजा by बॅटमॅन
स्तुती नसली तरी अन्यत्र
In reply to गुलाम असा डायरेक्ट नाही, पण by स्पंदना
कोणतेही एक नाम जर सतत घेत
In reply to मदनबाण'जी... अत्यंत सुन्दर by मृगनयनी
कार्तवीयोर्जुनो नाम राजा
तुमचा नामस्मरणावर विश्वास
In reply to कार्तवीयोर्जुनो नाम राजा by मदनबाण
एक प्रश्न . हा मंत्र कंसातिल
कार्तवीयोर्जुनो नाम राजा
In reply to एक प्रश्न . हा मंत्र कंसातिल by जेपी
धन्यवाद मदनबाणजी , मला ते
In reply to एक प्रश्न . हा मंत्र कंसातिल by जेपी
सहज विचारतेय.
योगी९०० यांच्याकडे जाउन एकदा
In reply to सहज विचारतेय. by कवितानागेश
ठीकेय. जा. कर चोरी.
In reply to योगी९०० यांच्याकडे जाउन एकदा by बॅटमॅन
हॅ हॅ हॅ
In reply to ठीकेय. जा. कर चोरी. by कवितानागेश
व्हिलनकडं सुद्धा साधनेची ताकद
In reply to हॅ हॅ हॅ by बॅटमॅन
म्हणजे कोण व्हिलन कोण हीरो
In reply to व्हिलनकडं सुद्धा साधनेची ताकद by प्यारे१
आखिर कहना क्या चाहते हो!
In reply to म्हणजे कोण व्हिलन कोण हीरो by बॅटमॅन
कुठल्या कन्स्ट्रक्टीव्ह
In reply to आखिर कहना क्या चाहते हो! by प्यारे१
आ...!!
In reply to ठीकेय. जा. कर चोरी. by कवितानागेश
मदनबाण : तुम्हाला आता बहुतेक
In reply to आ...!! by योगी९००
:) अवांतर....
In reply to मदनबाण : तुम्हाला आता बहुतेक by मदनबाण
बाकी तो कायदा मात्र खरोखर सुरेख आणी अभ्यासुन केला आहे...!
In reply to :) अवांतर.... by आत्मशून्य