नोकरित होणारा अन्याय
प्रतिक्रिया
In reply to हम्म by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मला असे वाटते....... by ज्ञानव
१) कामापेक्षा नुसत्या तुमच्या बाह्य दिसण्यावर आणि गोड गोड बोलण्यावर सगळे काही अवलंबून असते का?होय. दिसणे हातात नसते परंतु गोड नक्किच असते. त्यामुळे गोड बोलणे अन सोबतिला कश्ट पसुन त्याचा देखावा करता येणे हे कामाच्या ठिकाणी सगळ्यात आवश्यक असते. २) जिथे खूप साऱ्या मुली/बायका असतात तिथे कामापेक्षा इतर गोष्टींकडेच लक्ष दिले जाते का?( माझा आत्ताचा इथला अनुभव तसाच आहे ) होय. विशेषतः कॉल सेंटर. ३) जे कोणी अब्राह्मण senior असतात ते त्यांच्या ब्राम्हण junior सोबत असेच वागतात का ?( हे पण मी माझ्या इथल्या अनुभवावरून लिहित आहे ) अजिबात नाही. पण ज्याचा टक्का जास्त तो हरामखोरपणा करायला धजावतो हे भारतिय कॉर्पोरेट जगातिल वास्तव आहे. अर्थात योग्य बुध्दीभेदाचे कौशल्य हाती असलेस जात हमखास झक मारते हा माझा अनुभव आहे. केस स्टडीसाठी व्यनी केलात तरी चालेल. ४)seniors ने दोन्ही बाजूंचे unbiasdly ऐकून घ्यावे हि अपेक्षा चूक आहे का? होय. अर्थात जर कंपनिचे नुकसान होत नसेल तरच. अन्यथा त्यांना फक्त आपलेच ऐकुन घेता आले पाहिजे हे कौशल्य विकसीत करणे आवश्यक आहे.
In reply to सहकारी बँक by पैसा
मऊ लागेल तिथे कोपराने खणणे हे सगळीकडेच चालते.परंतु लेखिकेची ऑफिसमधील कंपुबाजी पुरेशी ताकतवान भासत नाही. हेच एकमेव माउपणाचे प्रमुख कारण वाटत आहे. नक्किच संख्याबळ कमी आहे.
In reply to बँकींग मधला एखादा अॅडव्हान्स by काळा पहाड
In reply to बँकींग मधला एखादा अॅडव्हान्स by काळा पहाड
In reply to स्टॉप कंप्लेनिंग!! by पिवळा डांबिस
वाटल्यास त्या वेळेस ह्या सर्व वरिष्ठांची शाब्दिक निर्भत्सना करा...मी हा सल्ला देणार नाही. रेफरन्सेस ची गरज कधीही पडू शकते. रिलेशन्स अशा प्रकारे बिघवडणे हा शहाणपणा नव्हे. तुम्ही आपला फायदा बघताय, दुसर्याचा तोटा होतोय का ते पहायची गरज नाही.
In reply to वाटल्यास त्या वेळेस ह्या सर्व by काळा पहाड
In reply to सहमत.. नोकरी सोडताना उगाच by बाळ सप्रे
In reply to वाटल्यास त्या वेळेस ह्या सर्व by काळा पहाड
मी मला continuously सेकंद शिफ्ट जमणार नाही असे सांगून सुद्धातुमच्या सहचारीणीला आणि वरिष्ठांना चांगले ठाऊक आहे की कांही झाले तरी तुम्ही नोकरीचा राजीनामा देणार नाही, तुमची 'वर'पर्यंत पोहोच नाही किंवा/आणि पत नाही. म्हणजेच तुम्हाला त्यांच्या मनाप्रमाणे वाकविण्यास तुम्ही एक 'सॉफ्ट टार्गेट' आहात.
ठीक आहे असे समजून मी ते करायला तयार पण झाले'सॉफ्ट टार्गेट'चा माझा मुद्दा इथे सिद्ध होतो. नोकरी सोडण्याची धमक किंवा कर्मचारी संघटणेचे पाठबळ नसेल तर आपल्या मुद्द्यांना वजन येत नाही.
पण त्या सहकारीचे उद्धट आणि अरेरावीचे वागणे फारच वाढले (तिला first शिफ्ट मिळाल्यानंतर)ह्याला वरील विवेचन, तिचा आत्मविश्वास, वरीष्ठांचे पाठबळ आणि उद्दाम स्वभाव हेच कारणीभूत आहे.
ती माझी आणि तिची branch ला ट्रान्सफर करणार आहेह्या शक्यतेचा तुम्ही तक्रार करण्याआधी विचार करायला हवा होता. संघर्षात, लढाईत नुसते आपल्याजवळ काय काय हत्यारे आहेत ह्याची जाण पुरेशी नसते. शत्रूपक्षाकडे काय काय शस्त्रे आहेत आणि ती वापरली तर आपण स्वतःचे संरक्षण कसे करणार ह्याची परिपूर्ण योजना हाती असावी लागते.
ह्यात मी हे त्या इतर २ सरांना पण विचारले तर ते म्हणाले कि त्यांना काही authority नाहीये त्यामुळे त्यांची फक्त बघ्याची भूमिका आहेहे धोरणी उत्तर आहे. व्यवस्थापनात हे असेच होत असते. स्वतःच्या अंगाला कांहिही लावून न घेता तक्रारकर्त्याला वाटाण्याच्या अक्षता लावणे हे स्वतःचे स्थान सांभाळण्यासाठी त्यांना आवश्यकच असते. तुम्ही सारख्या सारख्या दुसर्यांच्या (अगदी योग्य असल्या तरी) तक्रारी करीत असाल तर ते कावलेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे चर्चेच्या भानगडीत पडून तुम्हाला न्याय देण्याऐवजी तुम्हाला परस्पर पिटाळून लावणे त्यांच्यासाठी कमी श्रमाचे (अधिकार पदावर असल्याने) आणि जास्त सोयीचे असते.
कामापेक्षा नुसत्या तुमच्या बाह्य दिसण्यावर आणि गोड गोड बोलण्यावर सगळे काही अवलंबून असते का?ह्या वाक्यातून तुमचे वैफल्य दिसून येते बाकी काही नाही. एकूण प्रसंगात ह्या विधानाला/प्रश्नाला कांहीच अर्थ नाही. उलट तुम्ही लढाई लढण्या आधीच 'हार' स्विकरल्याचे संकेत देत आहात.
जे कोणी अब्राह्मण senior असतात ते त्यांच्या ब्राम्हण junior सोबत असेच वागतात का ?मला नाही वाटत. पण तुमच्या कचेरीत ब्राह्मण-अब्राह्मण वाद जोरात असेल आणि तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून हिरीरीने ब्राह्मणांच्या बाजूने वादात उतरला असाल तर तुम्हाला टार्गेट केले जाणे शक्य आहे. अशा परिस्थितीत तुमचे मरण तुम्ही स्वतःच ओढावून घेतले आहे. नोकरीत असताना (किंवा इतर परिस्थितीतही) तोंड बंद ठेवून सतत परिस्थितीचे अवलोकन करणे आणि आपल्या प्रत्येक वाक्याचा आजूबाजूच्या माणसांच्या विचारसरणीवर काय परिणाम होणार आहे, आपल्याबद्दल काय मत होऊ शकते ह्याचा विचार करूनच तोंड उघडणे महत्त्वाचे असते.
seniors ने दोन्ही बाजूंचे unbiasedly ऐकून घ्यावे हि अपेक्षा चूक आहे का?दुर्दैवाने ह्याचे उत्तर 'होय' असेच आहे. वरीष्ठ धोरणी असतात. स्वतःची खुर्ची ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असते. हाताखालच्या लोकांचा न्याय-अन्याय ह्याच्याशी त्यांना कांही घेणं-देणं नसतं. आता माझी नोकरीतील कैफियत मांडतो. इथे आखातात आमच्या कचेरीत मलबार्यांचे वर्चस्व होते. त्यात त्यांचा शिवसेवरचा आणि मराठी माणसावरचा राग मला पहिल्या आठवड्यातच अनुभवास आला. २९ जणांच्या कचेरीत २ मँगलोरी, १ सिंधी आणि मी एक मराठी बाकी सगळे (२६) मलबारी असे प्रमाण होते. नोकरी टिकविणं ही जेंव्हा माझी गरज होती तो पर्यंत न्याय-अन्यायाचा विचार न करता मी सर्वांशी दोस्ती करून राहिलो. (मराठीबाणा जपत, तो सोडला नाही). जेंव्हा माझी नोकरी सोडण्याची तयारी (मनाने) झाली होती तेंव्हाच वरीष्ठांसमोर प्रमोशनची विनंती मांडून ती पूर्ण न झाल्याने शांतपणे नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आपली उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून ती साध्य होई पर्यंत आवश्यक त्या तडजोडी स्विकाराव्या लागतात. एकदा उद्दिष्ट साध्य झालं की आपला दगडाखालचा हात मोकळा होतो आणि आपण समोरच्याच्या कानाखाली भडकवायला मोकळे होतो. त्यामुळे उगीच त्रागा, तणतण करून आपली असहाय्यता सर्वांसमोर उघडी करून हसं करून घ्यायचं नाही. दुसरी नोकरी शोधायची (तिथेही राजकारणं असणारच आहेत हे लक्षात घेऊन) आणि पहिल्यानोकरीवर तत्त्वाच्या मुद्द्यावर (त्याची त्या वेळी जाहिरात करून), लाथ मारून बाहेर पडायचं. प्रत्येकाची वैयक्तिक परिस्थिती, जबाबदार्या वेगळ्या असतात. तेंव्हा मी म्हणतो आहे ते सर्वच लागू होईलच असे नाही. पण मतितार्थ लक्षात घेऊन, आपल्या परिस्थितीशी साजेशी कारवाई करावी.
In reply to कचेरीतली राजकारणं.. by प्रभाकर पेठकर
In reply to कचेरीतली राजकारणं.. by प्रभाकर पेठकर
एकदा उद्दिष्ट साध्य झालं की आपला दगडाखालचा हात मोकळा होतो आणि आपण समोरच्याच्या कानाखाली भडकवायला मोकळे होतो.तुमच्या सर्व विधानांशी सहमत, हे एक सोडून. कानाखाली भडकवण्यात शक्ती खर्च करणे म्हणजे शक्तीचा अपव्यय. सचिन तेंडुलकर चे पहा. सर्व हल्ल्यांना तो बॅटने उत्तर देतो.
In reply to एकदा उद्दिष्ट साध्य झालं की by काळा पहाड
In reply to कचेरीतली राजकारणं.. by प्रभाकर पेठकर
In reply to कचेरीतली राजकारणं.. by प्रभाकर पेठकर
In reply to कचेरीतली राजकारणं.. by प्रभाकर पेठकर
In reply to कचेरीतली राजकारणं.. by प्रभाकर पेठकर
In reply to कचेरीतली राजकारणं.. by प्रभाकर पेठकर
ण्डार्?