उत्तरायण २०१४ - काsssssssssssssयपो छेssss (भाग ३)
वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे, प्रकारचे (कागदाचे, प्लॅस्टीकचे पतंग) आणि त्यातही पुन्हा वैविध्य होतेच!!
प्लॅस्टीकचे फॅन्सी पतंग.
दुकानाची पायरी किंवा शटर अशा स्केलने या पतंगाचा साईझ चेकवा.
पतंग साधारणपणे २० च्या प्रमाणात विकले जातात या २० च्या परिमाणाला "कौडी" म्हणतात.
(अमुक अमुक डझन केळी घेतली तस्सेच अमुक अमुक "कौडी" पतंग घेतले. ;) )
पतंग असेल तर मांजाही असणारच! मांजा तयार करण्यासाठी दोर्याची रिळेही विकायला होती.
मांजा तयार करण्याची प्रोसेसही भन्नाट असते.
वरील फोटोमध्ये पाठमोर्या बसलेल्या कारागीराच्या डोक्याच्या डाव्या बाजूला पाहिले तर पांढरे रीळ दिसेल. हेच ते मांजाचे रीळ. पुढ्यात असलेल्या पिवळ्या आणि आसपास असलेल्या लाल, निळ्या रंगांच्या पातेल्यात मांजाचा रंग आहे. सरस, अंडे असे चिकटपणा आणणारे पदार्थ घालून हे मिश्रण बनवले जाते. मांजा त्या पिवळ्या पातेल्यातून समोरच्या मोठ्या चक्रावर गुंडाळला जातो व नंतर वाळत ठेवला जातो. समोरच लाल आणि निळीजांभळी चक्रे वाळत ठेवली आहेत.
हे काम चौकाचौकात सुरू होते.
(हा फोटो थोडा व्यवस्थीत यायला हवा होता.. पण त्यावेळी लक्षात आले नाही.)
या वाळलेल्या चक्रांवरचा मांजा मोटार लावून "फिरकी / चक्री" वर गुंडाळला जातो
एकंदर सगळीकडे जत्रेचा माहौल होता. पिपाण्या, मुखवटे, पतंग उडवताना मांजामुळे बोटांना इजा होवू नये म्हणून चिकटपट्ट्या, गॉगल्स अशा अनेक वस्तू विकायला होत्या.
खरेदी आटोपल्यावर खादाडी मस्ट होती. ;)
पापडीनो लोट
आपल्याकडे पापडाच्या पिठाच्या लाट्या / गोळे असतात तोच प्रकार. तांदुळाचे पीठ / आणखी एका प्रकारच्या पापडाचे पीठ असे वैविध्य होतेच!
या गरम गरम लाट्यांना तेल, मसाला, लोणच्याचा खार आणि चटपटीत मसाले लावून द्रोणातून देतात.
सींग सोडा - फ्लेवर्ड सोड्यामध्ये मीठ+मसाल्याचे शेंगदाणे असतात - एक वेगळा प्रकार.
डोंबिवलीतून आळसवलेल्या अवस्थेत सुरू झालेला दिवस घोडबंदर रोड, ऑईल गळती, उंबाडियू, मॅकडॉनल्ड्स, काठेवाडी धाबे, पोंक असे सगळे नवीन अनुभव घेत पतंग बाजारानंतर संपला.
हे सगळे खूप दिवस लक्षात राहील हे नक्की!!!!!
पुढचा पूर्ण दिवस पतंगाला "किन्ना बांधणे" (आणि खादाडी!) हेच काम होते.
(पतंगाला मांजा बांधण्यासाठी दोरा बांधतात त्याला मराठीत काय म्हणतात..?)
१४ तारीख उजाडली. आकाशभर पतंग पाहताना एकदम भारी वाटते.. शब्दात सांगता येवू शकत नाही इतका वेगळा अनुभव. अक्षरशः वर्णनातीत!!!
संपूर्ण शहर जणू आपापल्या घराच्या गच्चीवर रहायला येते.
उन्हापासून संरक्षणासाठी आडोसे / छत्र्या, पतंगांसाठी लागणार्या सगळ्या गोष्टी (कात्री, चिकटपट्टी, सेलोटेप, फेव्हीकॉल - हे फाटलेले पतंग उडवण्यासाठी!) आणि वेगवेगळ्या प्रकारची चिक्की, मिठाई, पापडपोहे, नमकीन्स हे खाद्यपदार्थ.. अशा सर्व तयारीसह पतंग उडवणे सुरू असते. ढिकचिक ढिकचिक करणारे डीजेही प्रत्येक ठिकाणी होतेच!
उजव्या कोपर्यात घराच्या गच्चीवर छत्री दिसत आहे.. दोन मोठ्ठे काळे चौकोन हे स्पीकर्स आहेत. दुसर्याचा पतंग काटला गेला की आपोआप त्या गच्चीवरून "हे ऽ ऽ ऽऽ ऽ ऽ ऽ य!!" असा आवाज येत होता. डीजेच्या आवाजाच्या वरताण करत ओरडणे.. पतंगांची चुरस, काटल्या गेलेल्या पतंगाचा मांजा परत मिळवण्यासाठी सुरू असलेली मांजाची ओढाओढ, मधुनच होणार्या एखाद्या प्रसंगामुळे उसळणारा हशा, डीजेवर थिरकणारे पाय असा उत्साही माहौल बनला होता.
आणखी एक मुद्दा - साधारण ४ ते ५ वेगवेगळ्या घरांना भेटी दिल्या व तेथे जावून पतंग उडवले. प्रत्येक घराच्या गच्चीवरच स्पीकर्स / गाणी यांच्या सोयीसाठी मुद्दाम इलेक्ट्रीक पॉईंट्स केले होते. गच्चीवर थोडातरी आडोसा होईल अशी सोय केली होती. याचे कारण विचारले तर.. हे सर्व उत्तरायणसाठी (बांधकामाच्यावेळीच!) केलेले असते असे कळाले.
उत्तरायणचे दोन दिवस गच्चीवरच राहणारे शहर!
संपूर्ण कुटूंब मिळून सण साजरा करतात.. आम्ही पतंग उडवताना ( मला पतंग उडवायला फारसे जमले नाही ;) ) भाभी आणि इतर स्त्रीवर्ग खाण्यापिण्याची काळजी घेणे, किन्ना बांधणे, मांजाची फिरकी धरणे अशा स्वरूपात मदत करत होत्या. थोड्यावेळाने मांजाची फिरकी स्टँडला अडकवून ते सर्वजण आम्हाला सामील झाले. :)
संध्याकाळ झाली आणि पतंगाचा भर थोडा ओसरू लागला.. आता सर्वजण "गुब्बारे" - बलून उडवण्यासाठी तयार झाले.
फोटोवरून आकाराचा अंदाज येईलच! हा कागदाचा फुगा असतो, आणि तळामध्ये प्रकाश दिसत आहे तेथे कापूर + मेण अशा मिश्रणाची एक वडी असते. कापरामुळे ती पेट घेते आणि मेणामुळे पेटतच राहते. या दरम्यान ज्योतीमुळे आजुबाजूची हवा गरम होवून फुग्यात भरते व फुगा हवेत उडतो - हॉट एअर बलूनचेच तत्त्व!
आरडाओरडा / दंगा करत गुब्बारे उडवण्यातही मजा येत होती.
संध्याकाळ झाल्यानंतर पतंगाचा भर थोडा कमी झाला आणि सगळे आकाश गुब्बार्यांनी व्यापून गेले.
(कॅमेर्याची काहीतरी सेटींग चुकले आहे - तज्ञांनी मार्गदर्शन करावे!)
आकाशात हळू हळू एक एक दिवा झेप घेत होता आणि अशा एक एक दिव्यांनी बघता बघता सर्व आकाशात जणू रोषणाई केली - हा क्षण टिपण्याचा प्रयत्नही केला नाही कारण तो अवर्णनीय अनुभव होता.. शब्दातीत!!!
आणखी एक प्रकार बघायला मिळाला. पतंगबाजीतले अतीउत्साही शौकीन आता पांढरे पतंग उडवू लागले होते.. मिट्ट काळोखात पांढरे पतंग बिनविरोध लहरत होते.. आणि ते ही "कंदील" सह.
तलम कागदाचा आणि तळाशी जाड कागद असलेला कंदीलाच्या काचेच्या आकाराचा एक प्रकार. यात मेणबत्ती लावून आणि तो कंदिल मांजाला बांधून आकाशात सोडला जातो. वरील फोटोच्या मध्यापासून उजवीकडे खाली एका रेषेत चार दिवे दिसत आहेत.. हेच ते कंदील!
(कंदील आणि गुब्बार्यांमुळे अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडतात.. त्यामुळे यावर्षी त्यांवर बंदी होती मात्र अचानक बंदी उठवली गेली असावी किंवा पब्लीकने बंदी न जुमानता सण साजरा केला.)
दिवसभर इतके विविध प्रकार पाहिल्यानंतर सुखद धक्का देत रात्र पडल्यावर जणू दिवाळी सुरू झाली. नजर जाईल तेथे दिसणारे शोभेचे फटाके आणि गुब्बारे!!!!
रात्री नऊ साडेनऊ वाजून गेले तरी रोषणाई सुरूच होती.
२०१४ चे उत्तरायणही बरेच दिवस विसरले जाणार नाहीच!!
(क्रमशः)
***************************
या लेखमालेतील सर्व फोटो मोबाईल कॅमेर्याने काढले आहेत.
***************************In reply to मस्त by स्मिता श्रीपाद
मंगळसुत्र पण म्हणतात ना ?
कोणत्या भागात म्हणतात..?
बादवे.. हा शब्दप्रयोग म्हणजे "सिंबॉलीक द्वेष!!!! सिंबॉलीक द्वेष!!!!" म्हणत दंगा करायला फुल्ल वाव आहे. ;)
ह.घ्या.
In reply to मंगळसुत्र पण म्हणतात ना ? by मोदक
In reply to मंगळसुत्र पण म्हणतात ना ? by मोदक
In reply to मळसूत्र हा खरा शब्द आहे. by रेवती
In reply to मळसूत्र हा खरा शब्द आहे. by रेवती
In reply to मंगळसुत्र पण म्हणतात ना ? by मोदक
(पतंगाला मांजा बांधण्यासाठी दोरा बांधतात त्याला मराठीत काय म्हणतात..?)आम्ही तरी 'कणी' बांधणे म्हणतो... :) बाकी वॄत्तांत एकदम झकास आहे.
In reply to कणी.. by उपास
In reply to उत्तम. by चित्रगुप्त
In reply to रच्याकाने... by अर्धवटराव
तिळगूळ आणी पतंग 'एकसाथ'In reply to पतंग महोत्सव by नितीन पाठक
सुरत ते परत पूणे याचे सुध्दा प्रवास वर्णन येउ द्यात.
नक्की..!!In reply to लै लै भारी फोटोंबद्दल आभारी by अत्रुप्त आत्मा
हेच्यामंदी येक र्हायलं.. त्ये असं की त्या पातेल्यामदी सरस/अंड च्या बरोबर वस्त्रगाळ क्याल्याली काचेची पूड बी मिसळल्याली असतीया
असे करतात ते माहिती आहे.. परंतु प्रत्यक्ष बघायला मिळाले नाही.In reply to हेच्यामंदी येक र्हायलं.. by मोदक
In reply to हेच्यामंदी येक र्हायलं.. by मोदक
सरस, अंडे असे चिकटपणा आणणारे पदार्थ घालून हे मिश्रण बनवले जातेगुजरातेत वेज्/जैन मांजा मिळत नाही का?
In reply to पतंगा ला बांधायचा धागा , by कैलासवासी सोन्याबापु
In reply to __/\__ व्यासंगास सलाम. by मोदक
In reply to पतंगा ला बांधायचा धागा , by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मांजा क्रुती परफेक्ट! आंम्ही by अत्रुप्त आत्मा
पतंगाला मांजा बांधण्यासाठी.......