गेल्या आठवड्यात पहिल्यांदा इथे भाजी मार्केटमध्ये अळूचं पान पाहिलं तेही कचरर्यात पडलेलं. इथले लोक अळूच्या पानांना काय म्हणतात ते माहित नसल्याने मग त्याच्याकडे बोट दाखवून विक्रेत्याला विचारलं की ही पानं कुठेशी मिळतील? त्यावर म्हणाला ही आम्ही विकत नाही कोथिंबीरीसारख्या भाज्या ने-आण करताना पॅकिंग म्हणुन वापरतो. मग त्याला विचारलं पुढल्यावेळी माझ्यासाठी थोडी वेगळी आणशील का? तर त्याने शुक्रवार पर्यंत थांबायला सांगीतल. त्याचा फोन नंबर घेऊन ठेवला आणि गुरुवारी त्याला पानं आणण्याची आठवण करुन दिली. परवा त्याने कबुल केल्या प्रमाणे पानं आणुन दिली. आपल्याकडे तशी ही बारामाही असणारी पानं पावसाळ्याच्या आस पास बाजारात सर्रास दिसतात. गावाला मात्र घरी अंगणात-परसदारी मोकळी जागा असल्यानं वडीचं आणि भाजीचं अळू नेहमी असतं.
शुक्रवारी पानं मिळतीलच ही खात्री होती म्हणुन फदफदं करायचा बेत फिक्स होता. दोन दिवस आधीच वाल भिजत घातले होते. शनिवार पर्यंत मोडही आलेले. आईला फोन करुन एकादा पाककृतीची उजळणी करुन घेतली. हो आयत्यावेळी पोपट नको व्हायला काय? ;)
साहित्य :
१ वाटी/बाऊल बिरडं. (सोललेले वाल)
१ नग मध्यम आकाराचा कांदा
५-६ अळूची पानं देठां सकट
१-२ हिरव्या मिरच्या
वाल नसले तर चणे/ चणाडाळ ही चालेल.
फोडणीसाठी : तेल, मोहरी, हिंग, असल्यास कडीपत्याचं पान.
१/२ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, २ पेर दालचीनी, १ १/२ चमचा आलं-लसुण पेस्ट.
चिंच-गुळ, मीठ स्वादानुसार.
कृती :
अळूची पानं बारीक चिरुन घ्यावी. देठाची सालं काढून त्याचे ही बारीक तुकडे करुन घ्यावे.
मिरच्यांना उभा चर देऊन तुकडे करुन घावे. कांदा मध्यम,लांब-उभा चिरुन घ्यावा.
मोहरी, मिरची, कडीपत्ता, हिंग यांची फोडणी करुन त्यात कांदा, हळद टाकुन परतावं.
नंतर त्यात अळूचे देठ आणि चिरलेली पानं घालावी. लाल तिखट, किंचीत मीठ भुरभुरुन एकत्र करावं.
अळूची पानं थोडी बसली की मग त्यात आलं-लसुणाची पेस्ट टाकावी, गरम मसाला, दालचीनीची वाटुन टाकावी.
नंतर त्यात बिरडं घालुन हलक्या हातानं सगळं एकत्र करुन घ्यावं. चवी नुसार मीठ घालावं.
थोडंस पाणी टाकून, वर झाकण आणि त्यात पाणी ठेऊन मंद आचेवर भाजी शिजत ठेवावी. (चणा असेल तर कुकरला लावली तरी चालेल, पण बिरड्याचं अगदीच पीठ होऊन जातं तेव्हा शिट्या घेताना काळजी घ्यावी.)
वाल संपुर्ण शिजले की मगच त्यात चींचेचा कोळ आणि गुळ टाकुन पुन्हा उकळी आणावी. रस भाजी हवी असल्यास गरजे नुसार पाणी वाढवावं किंवा मग आटवावं.
पराठा अन वाफाळत्या भातासोबत ताट वाढलय. आज साधाच बेत आहे, या जेवायला. :)
वाचने
36198
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहीच..!!
ओय होय!
दैव योगे अळू खाजरं निघालं
In reply to ओय होय! by पैसा
@तशीही खाण्याची खाज इतकी होती
In reply to दैव योगे अळू खाजरं निघालं by गणपा
>>नसतील तर तुला आता अळूवड्या
In reply to ओय होय! by पैसा
माझा अंदाज
In reply to >>नसतील तर तुला आता अळूवड्या by सूड
हे अळू मिळालं म्हणजे तेही होत
In reply to माझा अंदाज by पैसा
उत्तम
In reply to हे अळू मिळालं म्हणजे तेही होत by गणपा
वडीचं अळू जरा दाट हिरव्या
In reply to उत्तम by विटेकर
हेच म्हणणार होतो. फोटोतल्या
In reply to वडीचं अळू जरा दाट हिरव्या by गणपा
धन्य रे तुझी!
In reply to हेच म्हणणार होतो. फोटोतल्या by सूड
वडीचा अळू आणि भाजीचा अळू.
In reply to उत्तम by विटेकर
वेगळी पद्धत
फक्त ते 'बिरडं' सोलणं सोडून!
In reply to वेगळी पद्धत by राही
फक्त ते 'बिरडं' सोलणं सोडून!मागेही एकदा बिरडं सोलण्याबद्दल बर्याच कॉमेंट्स वाचल्या होत्या म्हणून माझे दोन शब्दः १. वाल जेवण्यात वापरण्याच्या आधी तीन दिवस अगोदर पूर्ण बुडतील इतक्या पाण्यात एका पातेल्यात झाकून ठेवा. २. पहिल्या २४ तासांनंतर दोनतीनदा पाण्याने नीट धुवून नंतर सर्व पाणी काढून टाका आणि एका फडक्यात बांधून टांगून ठेवा (किंवा त्याच पातेल्यात झाकून ठेवा) ३. पुढच्या ४८ तासांत दर ८ ते १२ तासांनी वाल बांधलेले फडके न सोडता तसेच पाण्यात पूर्ण बुडवून परत टांगून ठेवा (किंवा वाल पातेल्यात ठेवले असल्यास दोनदा पाण्याने धुवून पाणी पूर्ण निथळून परत झाकण ठेवा) ४. तीन दिवसांत वालांना १ ते ५ मीमी लांब मोड येतात (लेखातल्या पहिल्या चित्रात दिसतात तसे) आणि इतपत मोड आलेले वाल मोड न आलेल्या वालांपेक्षा जास्त चवदार लागतात. मोड अती मोठे झाल्यास वालांची चव कमी होते, तेव्हा ते टाळावे. ५. वालांची साले काढण्याआधी ते १०-१५ मिनीटे कोमट पाण्यात ठेवा. साली एकदम सहज निघून येतात. बोटांना अजिबात त्रास होत नाही. इतर काही महत्वाचे: अ. मोड येण्याचा काल हवामानवर अवलंबून असतो. उन्हाळ्यात कमी तर हिवाळ्यात जास्त वेळ लागतो. आ. वरच्या १ ते ३ या पायर्यांत वाल भिजवायला साध्या ऐवजी कोमट पाणी वापरले तर मोड कमी वेळात येतात. इतकं लिहून मी "बिरडं सोलणे" या विषयावरचे माझे दोन शब्द संपवतो :) --- (बिरड्याच्या प्रेमात आकंठ बुडालेला) इए+१
In reply to फक्त ते 'बिरडं' सोलणं सोडून! by डॉ सुहास म्हात्रे
आमच्या कडे अळूची भाजी
In reply to +१ by गणपा
आईशपथ....किती विषयांमधे
In reply to फक्त ते 'बिरडं' सोलणं सोडून! by डॉ सुहास म्हात्रे
हायला ! हा साधा बेत? किती
छान दिसतय
अळू..
अरे मस्त च!
येस्स प्यारे.....अळुची भाजी खालील प्रकारे करता येईल
In reply to अरे मस्त च! by प्यारे१
देठी..
In reply to येस्स प्यारे.....अळुची भाजी खालील प्रकारे करता येईल by दिपक.कुवेत
अळूची देठी
In reply to देठी.. by स्वाती दिनेश
दिपकराव जिथं मैला गणीक भाषा
In reply to येस्स प्यारे.....अळुची भाजी खालील प्रकारे करता येईल by दिपक.कुवेत
ज्जे बात गणपाभौ....
In reply to दिपकराव जिथं मैला गणीक भाषा by गणपा
अळूच्या फदफदयाने भूक चाळवली,
धन्यवाद.
मस्तच
आळुचं फद्फदं म्हणुन पुणेरी
आळुचं फद्फदं म्हणुन पुणेरी
देखणे प्रेझेंटेशन !
सही दिसतेय
In reply to देखणे प्रेझेंटेशन ! by सस्नेह
ब्येत लई झ्याक आहे बरं!
ज ह ब ह री _/|\_
नविन पद्धत...
नविन श्टाइल नवा फ्लेवर
आह्हाहा! किती दिवसांनी आवडती
ऐग्गग्ग्गं! मुळ्याचे काप
In reply to आह्हाहा! किती दिवसांनी आवडती by रेवती
गणपा शेठची नेहमीप्रमाणे लै झकास तोंपासु पाककृती
In reply to ऐग्गग्ग्गं! मुळ्याचे काप by रेवती
नवीन प्रकारचे फतफते
खल्ल्लास पाकृ झालीय.
फदफद
ग्रेट गंपा.
अळूचं फदफदं
+१... असेच म्हणतो..
In reply to अळूचं फदफदं by सुधीर
कधी काम्दा आलं लसूण घालून
कधी कधी
In reply to कधी काम्दा आलं लसूण घालून by कवितानागेश
अति सुंदर!
गणपा ,सादरीकरण फारच आवडले .
सोनखत आणि शेणखत.
In reply to गणपा ,सादरीकरण फारच आवडले . by कंजूस
कौतुक करायला शब्द अपुरे पडतील
चांगली पाककृती
आमाचे मामा यात उकडलेला मका घालायचे त्यानेही खुप छान चव येते.
ऋषीचं अळू
In reply to चांगली पाककृती by प्रमोद देर्देकर
ऋषीची भाजी
In reply to ऋषीचं अळू by सुधीर
धन्यवाद!
In reply to ऋषीची भाजी by राही
(No subject)
मस्तच !!
मस्त !
फदफद(दे)
मायबाप वाचक आणि प्रतिसादकर्ते
ह्याचं स्लरी टाईप टेक्स्चर अन
काही बाकीच नाही ठेवलंत हो
जा ! माझ सगळं लिखाण तुझ्या
वॉव
नाय ओ!
In reply to वॉव by इरसाल
खरं आहे.
In reply to नाय ओ! by पैसा
सॉलिड फोटोज...
भारी फोटो आणि पाकृ.
भा हा री ही!
मस्त....
घरीच लावलेला अळू चांगलाच पोसल