उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग २ - अधिक माहितीसह..)
अपेक्षेप्रमाणे एकेरी वाहतूक सुरू होती आणि उजवीकडे टर्न असताना तेथे रस्त्यावरच खुर्ची टाकून बसलेला मामा सर्वांना डावीकडे पिटाळत होता. कानातल्या जीपीएसने दंगा सुरू केला व तरीही चुकीच्याच रस्त्याने जात आहे हे पाहून पुढचा U टर्न दोन किलोमीटरनंतर आहे ही सुवार्ता दिली.
हा टप्पा थोडा वेळखाऊ ठरला पण व्यवस्थित पार पडला.
आता NH-8 व्यवस्थीत सुरू झाला. भला मोठ्ठा तीन लेनचा एका रेषेत आखल्यासारखा सरळ रस्ता आणि एखादे गाव / चौक असेल तर लगेच सुसज्ज उड्डाणपूल. बहुतेक उड्डाणपूलही घसघशीत तीन लेनचे होते.
उड्डाणपूल.
महाराष्ट्र पासींगच्या गाड्या आजूबाजूला दिसत होत्या. त्यांना ढकलल्यासारखे गडबडीने बाजूला करत गुजरात पासींगच्या गाड्याही वेगाने पुढे जात होत्या.
काठेवाडी धाबे, सुसज्ज पेट्रोल पंप आणि टोलनाके ठरावीक अंतरावर दिसत होते. पेट्रोल पंपावर ओझरती नजर फिरवून पंक्चरचे दुकान आहे का हे लक्षात ठेवत होतो आणि किती रिडींग आहे तेही लक्षात ठेवत होतो. गरज भासलीच तर ही माहिती उपयोगी पडणार होती.
रस्ता समतल आणि व्यवस्थीत मेंटेन केलेला होता. ठिकठिकाणी रिफ्लेक्टर्स, पांढरे पट्टे, दिशादर्शक बोर्ड दिसत होते. साधारणपणे कोणत्याही पुलावर दोन बीम जोडण्याच्या ठिकाणी गाडी हमखास आदळते कारण बीमची टोके जुळतात त्या जागेमध्ये रबरासारखा एक पदार्थ भरलेला असतो. तो प्रकारही शाबूत होता. त्यामुळे वेगावर कोणताही फरक न पडता प्रवास सुरू होता.
सुरूवातीपासून ५० किंवा ५५ चा वेग पकडून चाललो होतो. (आत्ता टाईपताना वाटते आहे की त्यावेळी कंटाळा कसा आला नाही??) एक गोष्ट मात्र आवर्जून नमुद करण्याजोगी.. आजुबाजूला मोठ्या गाड्या १०० / १२० ने बघता बघता दिसेनाशा होताना आपण ५० / ५५ लाच टिकून राहणे खरोखरी अवघड जात होते. नकळत वेग वाढत होता. पुन्हा कमी करत होतो. (अर्थात मला गाडीचे माईलेज ही चेकवायचे होते म्हणून एकाच गतीने जात होतो.*)
वाटेत महाराष्ट्र-गुजरात बॉर्डर चेक पोस्ट लागले.
(फोटो अंतर्जालावरून साभार - फोटो प्रपोज्ड प्लॅनमधील वाटत असला तरी प्रत्यक्षात असेच भव्य दृष्य होते)
कमी झोपेमुळे पित्त होवू नये म्हणून पोटात भरपूर पाणी ढकलत होतो. त्यामुळे निसर्गाच्या हाका आणि त्यांना उत्तर देणे क्रमप्राप्त होते. एके ठिकाणी गाडी सुरू करताना गाडीखाली रस्त्यावर एक भलामोठा काळा डाग दिसला. ऑईल सांडल्यावर दिसतो तसा. पाठीवर ओझे असल्याने नक्की काय झाले आहे..? कुठून ऑईल गळते आहे..? हे बघण्याचा आळस केला. तीनेक तास गाडी व्यवस्थीत चालली होती व काहीच प्रॉब्लेम देत नव्हती म्हणून फारशी चिंता केली नाही.
अचानक एका क्षणी वाटले आजचा एकंदर प्रवास जरा ओव्हर कॉन्फीडन्समध्ये चालला आहे.
चुपचाप पहिला धाबा दिसला तेथे गाडी बाजूला घेतली. फ्रेश झालो. चहापान केले. गाडीलाही थोडी विश्रांती मिळाली होती व ऑईलचेही नक्की काय ते बघायचे होते. येथेही तीच गत. पेव्हमेंट ब्लॉकवरती काळे ऑईल होतेच. मात्र ऑईल टँकमधील ऑईल व या ऑईलचा रंग जुळत नव्हता. जळाल्यासारखा काळा रंग येण्याचे कारण कळत नव्हते आणि दोन्ही ऑईलच्या नमुन्यांची कन्सिस्टन्सी जुळत नव्हती. अज्ञानाला शरण गेलो व गप हिरो होंडा सर्व्हीस स्टेशन शोधण्यास सुरूवात केली. एका रस्त्याशेजारच्या मेकॅनीकने "सब खोलके चेक करना पडेगा" असे सांगून फुकटचे टेन्शन दिले. वलसाडला एका चाचाने 'रविवारी सर्विस स्टेशन बंद असते व शेजारीच मेकॅनीक आहेत' म्हणून सांगीतले. दोन पोरसवदा मेकॅनीक गाडी सेंट्रल स्टँडला लावून पार गाडीखाली घुसले व चेनला ऑईलींग केले आहे ते जास्तीचे ऑईल गळते आहे. टेन्शन ची गोष्ट नाही व इंजीन ऑईल आणखी ३००० किमीपर्यंत चालेल असे सांगीतले.
हुश्श करून परत वाटेला लागलो.
वाटेत एका ठेल्यावर मलई पाणीवाले शहाळे फस्त केले. झोप आता एकदम पळाली होती. फ्रेश वाटत नसले तरी बडोद्याला आजच पोहोचणे शक्य वाटत होते.
सुरत अजूनही दोनेक तास दूर होते. अचानक "उंबाडियु" चे बोर्ड, भाजत ठेवेलेले काळे हंडे.. अशी तयारी दिसू लागली.
त्या मडक्यांमध्ये कसलासा पाला भरून रताळे, बटाटे, घेवडा आणि रतालू (याचे मराठी नाव मलाही माहिती नाही!) यांचे काप करून त्याला आंबेहळदीची चटणी लावून भाजले होते. वजनावर विकत होते. पाव किलो उंबाडियुवर ताव मारला.
कच्चे जिन्नस. रताळे आणि बटाटा सोडून तिसरे सुरणासारखे दिसते आहे तेच ते रतालू.
आंबेहळदीचा एक तुकडा टाईमपास म्हणून चघळायला घेतला व पुन्हा मार्गी लागलो..
तीन साडेतीनच्या दरम्यान अचानक हायवेच्या बाजूलाच हे साहेब बसले होते.
अर्धा तास थांबून गाडीला विश्रांती दिली. थंडगार पाणी, थम्सअप-फ्लोट व एक बर्गर खाल्ला.
इतका वेळ दबकत दबकत गाडी चालवत होतो आता वेग थोडा वाढवला.
अचानक रस्त्याच्या बाजूला कसले तरी ठेले दिसू लागले. पोंक असे लिहिले होते मात्र पोंक म्हणजे काय हे माहिती नव्हते.
हुरडा होता. मात्र बनवायची पद्धत भारी होती. फोटोमध्ये भट्टी दिसत आहेच. मांडी घालून बसलेला माणूस ज्वारीची कोवळी कणसे भाजत आहे.. मातीमध्ये!!!! रेती सारखी दिसत असली तरी ती अतीतलम माती आहे, त्यात भाजलेली कणसे खुर्चीवर बसलेले दोन जण पिशवीत टाकत होते आणि पिशवी काठीने बडवून भाजलेल्या कणसांपासून दाणे वेगळे काढत होते.
अत्यंत टेस्टी कोवळे लुसलुशीत दाणे. कोणताही फ्लेवर नसल्यानेच बहुदा.. पण जाम भारी टेस्ट होती!!
(हे दाणे ५०० रू किलो होते. इतके महाग का ते माहिती नाही.)
संध्याकाळी ७ ला बडोद्यामध्ये प्रवेश केला. सरळ शहरात न जाता अहमदाबाद रोड व नंतर रिंग रोडने शहरात प्रवेश केला.
जीपीएसवर डेस्टीनेशन खूप आधी सेव्ह केल्याने ते सेव्हड आहे हेच विसरलो व चुकत चुकत घरी पोचलो. ;)
सकाळपासून १२ तासांत ४४० किलोमीटर रनींग झाले होते. गाडीने विनातक्रार सोबत केली होती.
दोन तीन दिवसांपासून असलेला ताण एकदम कमी झाला. सुरक्षीतपणे पोहोचलो होतो. सलग असा एकट्याने केलेला पहिलाच इतका मोठा प्रवास. त्यामुळे थोडे टेन्शन होतेच.. ते सपशेल गेले.
घरी पोहोचून टेकतो न टेकतो तोच मितेशजींनी बाँब टाकला.. "अपने को आज रातकोही पतंग बजार में जाना हैं!"
(क्रमशः)
***************************************
* - पुणे ते बडोदा संपूर्ण प्रवासात ६८ चे माईलेज मिळाले.
***************************************In reply to लय भारी by अर्धवटराव
In reply to पतंग बाजी ... ? by चौकटराजा
मोदक स्वत: च एक पतंग आहेखरंय... हा पतंग बरेच दिवस कुठेच लहरताना दिसेना म्हणुन शोधाशोध केली तर समजलं की साहेब बडोद्यात लहरत होते!! हा ही भाग मस्त झाला आहे मोदका..! मी कधीही "मॅकडोन्ल्डस" च नाव दुसर्या भाषेत आणि एवढ्या मोठ्या साईझ मध्ये लिहीलेलं पाहिलं नव्ह्तं.. भारी वाटलं.. आणि हुरडा पाहुन जी जळजळ झाली आहे ती नंतर सावकाशीने ख.व मध्ये व्यक्त करण्यात येईल..
In reply to पतंग बाजी ... ? by चौकटराजा
In reply to पतंग बाजी ... ? by चौकटराजा
In reply to मस्तच ! by विटेकर
महाराष्ट्राच्या मानाने गुजरातमधील रस्ते अधिक सुंदर आणि टोल कमी आहेत.
टोलबाबत माहिती नाही पण रस्त्याबाबत ही तक्रार अनेकदा अनेक ठिकाणी ऐकली आहे.
कागलनंतर कर्नाटकात रस्ता चांगला आहे..
वापीनंतर गुजरातमध्ये रस्ता चांगला आहे..
मुदलात गोल्डन क्वाड्रीलॅट्रल हा NHAI चा प्रोजेक्ट आहे आणि NHAI चे काम केंद्रसरकारच्या अखत्यारीत असताना असा प्रादेशीक भेदभाव नक्की आहे का..? असल्यास का आहे..?
मला तरी NH-8 घोडबंदर रोडपासून (बडोद्यापर्यंतच!) चांगला वाटला. बडोद्यापुढे रूंदीकरण सुरू आहे आणि तो रस्ता एकेरी / क्वचित दोन लेनचा आहे.
एकपदरी रस्त्यांविषयी.. अशा रस्त्यावर गाडी चालवायला मला आवडते. ते वेगळेच 'टशन' असते. आणखी ५ / १० वर्षांनी कदाचित मत वेगळे असेल पण सध्यातरी 'शिंगल लेन' रोडला गाडी चालवायला मिळाली तर वेगळाच आनंद मिळतो.In reply to सकाळी सहा ते संध्याकाळी by मोदक
In reply to कागलनंतर कर्नाटकात रस्ता चांगला आहे... by दाते प्रसाद
गुजरातेत अमदाबाद -बडोदा हायवे झकास आहे (spped limit 100 kmph official).
एक शंका.
याही एक्प्रेस हायवेवर दुचाकी वाहनांना बंदी आहे का..?
नकाशात आणंद पर्यंत NH-8 दिसतो आहे.. परंतु आणंद नंतर एक्प्रेस हायवेच्च आहे.
रच्याकने - NH-8 जेथे एक्प्रेस हायवेला मिळतो तेथे (अनिमेश स्वामी पार्कजवळ) एक झकास इंटरसेक्शन (मराठी?) आहे. मॅप्सवरूनही त्याची भव्यता लक्षात येते.In reply to गुजरातेत अमदाबाद -बडोदा हायवे by मोदक
In reply to कागलनंतर कर्नाटकात रस्ता चांगला आहे... by दाते प्रसाद
In reply to हीच शंका by पैसा
In reply to हा भाग थरारक झालाय. by बॅटमॅन
In reply to तो कंद by राही
In reply to माहितीबद्दल आभार्स.. कोनफळ by मोदक
In reply to झकास ! पुभाप्र. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to "उंबाडियु" म्हणजे कोकणातली by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एकदम बरोबर……. by रुस्तम
In reply to भांबुर्डीचा पाला म्हणजे नक्की by मोदक
In reply to ही वनस्पती कोकणात माळरानांवर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to भांबुर्डीचा पाला म्हणजे नक्की by मोदक

In reply to एकदम बरोबर……. by रुस्तम
In reply to "उंबाडियु" म्हणजे कोकणातली by डॉ सुहास म्हात्रे
In reply to भोपाळच्या एन आय टी ला by कैलासवासी सोन्याबापु
घ्या बडोद्याच्या संक्रांतिचा संध्याकाळचा फोटोIn reply to जमले तर बडोद्याच्या " मकरपुरा by विजुभाऊ
In reply to उधिओचा भाऊ by मोक्षदा
In reply to वडोदर्याला पोहोचलात ना? by सुधांशुनूलकर
In reply to परवानगी नाही by संतोषएकांडे
In reply to राजवाडा म्हणजेच लक्ष्मी विलास by मोदक
In reply to होय by संतोषएकांडे
In reply to चांगली माहिती by पैसा
In reply to म्यूझिअम by राही
In reply to "सयाजी बाग" त्या म्युझीयमचे by मोदक
In reply to त्या म्यूझियममध्ये एक १२०० by बॅटमॅन
In reply to नाही पाहिला. व्हेलच्या by मोदक
In reply to शंका बरोबर. by बॅटमॅन
In reply to अगदी दोनेक फूट नसली, तरी अडीच by बॅटमॅन
तस्मात दगडाचे टेन्शन नाही.
लिंक बद्दल धन्स. नवीन माहिती मिळाली. :)
शक्य असेल. जुन्या लोकांबद्दल ज्या अचाट गोष्टी ऐकतो त्यानुसार हे अगदीच अशक्य नाही.In reply to म्यूझिअम by राही
In reply to म्यूझिअम by राही
लय भारी