आप की बदमाशियोंके....
"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...
वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.
लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.
वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.
असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.
व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.
वाचने
122849
वाचनखूण
प्रतिक्रिया
590
सत्तेत येऊ का नये हे जनतेला
माझ्या प्रतिसादांच सार्थक झालं!
माध्यमातील काही मत
सकाळवरची अत्यंत पटलेली प्रतिक्रिया
खरोखरीच काय आप हे सामान्य माणसांसाठी लढत आहेत?
झाले एकदाचे धरने संपले
In reply to झाले एकदाचे धरने संपले by वेताळ
अंक
In reply to अंक by विकास
अवघड आहे
In reply to अवघड आहे by पैसा
जरा
In reply to जरा by चिरोटा
रोखठोक आणि परखड ?
In reply to अंक by विकास
काही प्रश्न
In reply to काही प्रश्न by हुप्प्या
धन्यवाद
पोलीसाला रजेवर पाठवणार
In reply to पोलीसाला रजेवर पाठवणार by चेतन
दखलपात्र आणि अदखलपात्र
मला एक कळत नाही. इथे लोक
In reply to मला एक कळत नाही. इथे लोक by काळा पहाड
वहाण
काही उत्तरे...
रेल्वेमंत्रालयाजवळील तमाशा आणि अराजकता
- केजरीवालना पाच पोलिसांना बडतर्फ करायचे होते त्या ऐवजी दोन पोलीसांना रजेवर जावे लागले. अर्थातच त्यांचा पगार चालूच आहे पण ते काम करत नसल्याने खात्यामधे दोन पोलीस कमी इतकेच.
- कुठेतरी असे वाटते की केजरीवाल यांना काही करून सत्तेतून बाहेर पडायचे आहे. म्हणून आधी काँग्रेसला २० कलमे मान्य करायला लावून पाहीले. त्यांनी १८ कलमांकडे केजरीवालांची जबाबदारी म्हणत दुर्लक्षच केले (मान्य आहे असे म्हणलेच नाही) आणि विनाशर्त पाठींबा दिला.
- राज्यावर आल्यावर काही गोष्टी केल्या असे दाखवले असले तरी ते अजून झाले आहे अशातला भाग नाही. कारण पैसे खर्च करताना विधीमंडळाची परवानगी लागणार आहे - ते वीजदराबाबत पण आहे आणि पाण्याबाबत ही आहे.
- वीजबिले न भरलेल्यांवरील केसेस मागे घेण्याचा प्रयत्न केला आहे पण तो अंगाशी येण्याचीच शक्यता अधिक आहे कारण कोर्टात ताशेरे मिळू शकतात.
- त्यात भरीस भर म्हणून सोमनाथ भारती २४ तास "दिवे लावण्यात" मग्न झाले. आता एफ आय आर दाखल झाला आहे.
- युगांडा हाय कमिशनच्या संदर्भात खोटे बोलल्याचे समजले आहे.
- थुंकणे-मार देणे वगैरे सारखे दम देऊन झाले आहेत.
- त्यामुळे अजून काही होण्याआधी जर काँग्रेसने पाठींबा काढला तर उत्तम असे वाटू लागले असण्याची शक्यता कमी नाही.
- अर्थात काँग्रेसने कधी नव्हे ते खेळी खेळली आहे. काय वाट्टेल ते करा पण आम्ही तुम्हाला सत्तेवर ठेवू. उद्या चांगले काम केल्याने जर लोकसभेच्या रिंगणात उतरलात तर भाजपाला तोटा आहे. त्यानंतरच्या अधांतरी सरकारानंतर काँग्रेस परत स्थिरसरकारचे वचन देत येऊ शकते असे आडाखे त्यात असण्याची शक्यताच आहे.
- या सगळ्या तमाशामधे आता माध्यमे कधी नव्हे ते वैतागली आहेत, बरेचसे पब्लीक जे भाजपा-काँग्रेसच्या बाजूचे नाही ते देखील बाजूस जायला लागले आहे. चेतन भगतने तर त्यांना "AAP has become the item-girls of politics. AAP has really let me down with their antics..." वगैरे म्हणले आहे.
थोडक्यात भारतीय राजकारणात एक विचित्र खेळी खेळली गेली आहे... ज्यात बहुमत नसलेल्या सत्ताधिशांना सत्तेतून बाहेर पडायचे आहे पण त्यांचे विरोधक बाहेरच पडू देत नाहीत. आणि एक आंदोलनाशिवाय बाकी काही करण्याची सवय नसलेल्या या नेतृत्वाची लोकप्रियता पण धोक्यात येऊ लागली आहे आणि पुढच्या महत्वाकांक्षा देखील गोत्यात जाऊ लागल्या आहेत... मराठीत म्हणतात ना, "गाढव ही गेले आणि ब्रम्हचर्यही गेले!" तसेच काहीसे. असो.In reply to रेल्वेमंत्रालयाजवळील तमाशा आणि अराजकता by विकास
तुमच्या या दोनही प्रतिसादांशी
In reply to तुमच्या या दोनही प्रतिसादांशी by मराठीप्रेमी
मी देखील ९०% सहमत.
आआपचं वलय
In reply to आआपचं वलय by अर्धवटराव
धन्यवाद +/-
चेतन भगतचा त्रागा...
In reply to चेतन भगतचा त्रागा... by विकास
कोण चेतन भगत? चीप थर्डक्लास
In reply to कोण चेतन भगत? चीप थर्डक्लास by बॅटमॅन
कोण चेतन भगत?
In reply to कोण चेतन भगत? चीप थर्डक्लास by बॅटमॅन
कोण चेतन भगत?
राष्ट्रीय प्रश्नांच्या बाबतीत अधीक जबाबदार पणा हवा
In reply to राष्ट्रीय प्रश्नांच्या बाबतीत अधीक जबाबदार पणा हवा by माहितगार
+१
कजरीचे वर समर्थन करणार्या लोकांची किव येते...
हेतू शुद्ध होता हे नक्की
In reply to हेतू शुद्ध होता हे नक्की by संजय क्षीरसागर
संजय्जी किती धाडस,किती कर्तबगारी,वाह..जणु प्रेषित धरतीवर अवतरला
In reply to हेतू शुद्ध होता हे नक्की by संजय क्षीरसागर
संजय्जी किती धाडस,किती कर्तबगारी,वाह..जणु प्रेषित धरतीवर अवतरला
In reply to हेतू शुद्ध होता हे नक्की by संजय क्षीरसागर
संक्षी, प्लीझ..
In reply to संक्षी, प्लीझ.. by आनन्दा
संक्षी, प्लीझ..
In reply to संक्षी, प्लीझ.. by संजय क्षीरसागर
निर्रथक मागणी
In reply to निर्रथक मागणी by सुनील
सहमत!!!
In reply to निर्रथक मागणी by सुनील
किंचित अजून
In reply to किंचित अजून by विकास
अघोषित याचा अर्थ अनडिक्लेअर्ड असा होतो
केजरीवाल सध्या जे करत आहेत तो
मला असं वाटतं की...
In reply to मला असं वाटतं की... by चौकटराजा
हलकासा प्रयत्न..
In reply to हलकासा प्रयत्न.. by चिगो
"परेड होऊ देणार नाही" हा तर
In reply to हलकासा प्रयत्न.. by चिगो
शिंदे यांचे वर्तन कसे असते ?
In reply to शिंदे यांचे वर्तन कसे असते ? by चौकटराजा
+१
In reply to शिंदे यांचे वर्तन कसे असते ? by चौकटराजा
हेतू खूप चांगला आहे. पण..
In reply to हेतू खूप चांगला आहे. पण.. by माहितगार
आपचा धागा काढला गेला हेच भूषण
In reply to शिंदे यांचे वर्तन कसे असते ? by चौकटराजा
शिंदे वि. केजरीवाल..
In reply to हलकासा प्रयत्न.. by चिगो
चिगो, मी केजरीवालांची न्यूज सतत ट्रॅक करत होतो
In reply to चिगो, मी केजरीवालांची न्यूज सतत ट्रॅक करत होतो by संजय क्षीरसागर
संक्षी, पुन्हा बघा..
In reply to संक्षी, पुन्हा बघा.. by चिगो
चिगो, थोडं मतांतर होईल पण पाहा :