मिसळपाववर गाजत असलेला "स्त्रिया आणि ड्रायव्हिंग"चा धागा पाहिला आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या मनावर असलेल्या "ठराविक साच्यांचा" (इंग्रजी शब्द : स्टीरिओटाईप्स) परिणाम किती पक्का आहे ; या पगड्यामुळे आपण कशी घाऊक विधाने करतो ( स्वीपींग स्टेटमेंट्स) करतो याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. अनेक सामाजिक कारणे , पिढ्यानुपिढ्यांचे संस्कार आणि इतर परिस्थितीजन्य कारणे या सगळ्यांचा परिपाक म्हणजे हे साचे. "स्त्रियांना ड्रायव्हिंग न येणे" हा असाच एक साचा. या निमित्ताने असा विचार आला की, असे कितीकिती साचे आपण कुठल्याकुठल्या प्रकारे मनात वागवत असू ?
आज तर या निष्कर्षाप्रत यावेसे वाटते की , ज्या ज्या व्यक्तींनी रूढ असे साचे तोडले, त्यांनीच आपल्याला नवा मार्ग दाखवला आहे. "न स्त्रीं स्वातंत्र्यं अर्हति" , "हे पाय जिथे जातील तोच माझा स्वर्ग , तेच माझे वैकुंठ आणि तोच माझा कैलास" , "पायीची वहाण पायीच बरी" अशा प्रकारची साचेबद्ध विधाने आता हास्यास्पद ठरतात, पण केवळ शंभरच वर्षांपूर्वी हा एक रूढ साचा होता. तीच गोष्ट अशा वर्गाची ज्याला हजारो वर्षांपासून गावकुसाबाहेर ठेवले गेले, पायीच्या वहाणेप्रमाणे वागवले गेले. त्या काळापासून आतापर्यंतच्या काळातला फरक हा असे साचेबद्ध कल्पना धुत्कारून लावलेल्या व्यक्तींमुळे निर्माण झाला. अचानक साक्षात्कार झाल्याप्रमाणे समाज आणि एकूण जग काही बदललेले नाही. असामान्य व्यक्तींच्या धैर्याने आणि नुसत्या धैर्यानेच नव्हे तर रक्ताची, घामाची , अश्रूंची , अथक प्रयत्नांची किंमत देऊन हे साध्य झाले आहे. त्यांनी ज्या अनेकानेक गोष्टी केल्या त्यातली एक ठळक गोष्ट म्हणजे रूढ संकल्पनांना तडा देणे.
काही साच्यांकडे आपण खेळीमेळीच्या नजरेने पाहू शकतो परंतु खेळीमेळीने पहाणे आणि अपमानकारक असे साचे बनवणे यातली सीमारेषा फार फार सूक्ष्म आहे. " स्त्रियांना इतर अनेक हक्क आणि सुविधांप्रमाणे , गाडी चालवण्याची सुविधासुद्धा , अलिकडेच मिळाली आहे. स्त्रियांच्या हातून ही सुविधा वापरताना मला चुका होताना दिसतात. प्रसंगी गमतीदार प्रसंग निर्माण होतात." अशा प्रकारची विधाने आणि "महिला॑ना कार-ड्रायव्हि॑ग येत नाही " यासारखी सरसकट विधाने यात फरक आहे. तो सूक्ष्म आहे पण महत्त्वाचा आहे.
साच्यांची ही कर्मकहाणी आजची नाही ; आणि ती आपल्या देशापुरतीच मर्यादितही नाही. अमेरिकेतल्या शतकापूर्वीपर्यंतच्या गुलामगिरीचा आणि त्यानंतरच्या वंशभेदाचा परिणाम म्हणजे कृष्णवर्णीयांची आर्थिक , सामाजिक स्थिती. आज अमेरिकेत तुम्ही "निग्रो" हा शब्द उच्चारणे म्हणजे आपल्या देशात एखाद्याला "म्हारड्या" म्हणण्यासारखे आहे. "निग्रो" आणि " म्हारड्या" दोन्ही चूकच ; पण शंभर वर्षापूर्वी शेंबडी पोरेही हेच म्हणायची . हीच शिकवण होती; हाच साचा होता.
एक उदाहरणच घ्यायचे झाले तर अशा प्रकारचीच गोष्ट कळत नकळत आपण लैंगिकतेच्या बाबतीत रूढ संकल्पनेपेक्षा वेगळी निवड असणार्या व्यक्तिंच्या बाबतीत करतो आहोत. त्यांची थट्टा उडवणारी विधाने करताना (क्वचित का होईना पण) मिसळपाववरही होताना आपण पहातो. भारतासारख्या देशात अजूनही त्यांचा आवाज क्षीण आहे , अजूनही भारतातले कायदे या बाबतीत अन्यायकारक आहेत. पण माझी खात्री आहे, की या बाबतीत बदल होणार. तो होणे अटळ आहे. कायदे बदलतील , लोकांची या गोष्टींकडे पहाण्याची दृष्टी बदलेल. जे इतर साच्यांच्या बाबतीत झाले तेच याही बाबतीत होईल.
तेव्हा मित्रांनो आणि मैत्रिणींनो , तुम्ही थट्टेने सुरू केलेला एखादा विषय पटकन एखाद्याच्या युगानुयुगांच्या अन्यायाच्या जखमेवर बोट ठेवल्यासारखा होऊ शकतो. सरसकट विधाने करताना थोडी सावधानता बाळगा हेच मी तुम्हाला सुचवतो आहे. आपण आपल्यातले फरक जे आहेत ते साजरे करायला हवेतच. किंबहुना , भिन्न लिंगांच्या , जातिधर्माच्या माणसांचा आवाज जितका मुख्य प्रवाहात येईल तितके आपण समृद्धच होऊ. या प्रक्रियेत आपण त्या त्या गटाची वैशिष्ट्ये , गमतीदार गुणधर्म याचा सुद्धा आनंद घेऊच. पण कुठल्याही एका गटाला अपमानास्पद वाटेल असे बोलणे/वागणे आपण सोडायला हवे.
वाचने
35785
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
पटले तुमचे
असेच म्हणतो
In reply to पटले तुमचे by यशोधरा
सहमत
अगदी लै
मलाही पटले तुमचे विचार!
बरोबर आहे आजी
In reply to मलाही पटले तुमचे विचार! by ३_१४ विक्षिप्त अदिती
फुलपाखरु ते सुरवंट
In reply to मलाही पटले तुमचे विचार! by ३_१४ विक्षिप्त अदिती
सुरवंट आणि फुलपाखरू
In reply to फुलपाखरु ते सुरवंट by विजुभाऊ
लेख आवडला...
>>> हे मात्र
In reply to लेख आवडला... by ऋषिकेश
हं
In reply to >>> हे मात्र by मुक्तसुनीत
हम्म
In reply to हं by ऋषिकेश
मुक्तसुनीत....
उत्तम स्फुट
योग्य
In reply to उत्तम स्फुट by गणा मास्तर
कळीचा मुद्दा
अगदी योग्य विचार
आडून आडून वार
In reply to अगदी योग्य विचार by प्रियाली
आडून वार??
In reply to आडून आडून वार by मुक्तसुनीत
हायजॅक
In reply to आडून वार?? by प्रियाली
छान
मुद्देसूद
लेख पटला.
टाळ्या !!!!!!!
In reply to लेख पटला. by नीधप
आंगाश्शी!!!!!!
In reply to लेख पटला. by नीधप
सहमत.
प्रकाटाआ
मुक्तराव, च
सहमत
In reply to मुक्तराव, च by विसोबा खेचर
नाना ,
In reply to सहमत by अवलिया
आपल्यासार
In reply to सहमत by अवलिया
सहमत
In reply to आपल्यासार by नीधप
आगं बाबो ....
In reply to सहमत by प्रकाश घाटपांडे
अरे ए
In reply to आगं बाबो .... by टारझन
ब्रोकबॅक माऊंटन
In reply to आपल्यासार by नीधप
असहमत आहे
In reply to सहमत by अवलिया
तात्यांशी
In reply to मुक्तराव, च by विसोबा खेचर
माझे मत
In reply to मुक्तराव, च by विसोबा खेचर
समलैंगिकता ..
In reply to माझे मत by मुक्तसुनीत
परन्तु,
In reply to समलैंगिकता .. by सुनील
सहमत आहे
In reply to समलैंगिकता .. by सुनील
मी माझ्या
In reply to माझे मत by मुक्तसुनीत
थोडा फरक
In reply to मी माझ्या by विसोबा खेचर
"समर्थन"
In reply to मी माझ्या by विसोबा खेचर
बहुतांशी
In reply to "समर्थन" by मुक्तसुनीत
पटले..
Never hate in plurals
>> त्यावर तो
In reply to Never hate in plurals by सुनील
योग्य
आपल्याकडच्या समाजरचनेबाबत बोलता
उत्तम प्रतिसाद
In reply to आपल्याकडच्या समाजरचनेबाबत बोलता by चतुरंग
उत्तम प्रतिसाद
In reply to आपल्याकडच्या समाजरचनेबाबत बोलता by चतुरंग
छान लेखन मुक्तराव.
प्राजूप्र
तात्याच्या मताशी अगदी १००% सहमत
>>तसेच
In reply to तात्याच्या मताशी अगदी १००% सहमत by वेताळ
...निसर्गात
साचे
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to उत्तम by नंदन
छान लेख!
समलैंगिकता.
लेख वाचला...
In reply to समलैंगिकता. by नारायणी
लेख.
उद्धार
स्त्रीपुरुष समानता