मास्तर, जरा नैतिकतेने र्हावा....!!!
रामराम मंडळी. मंडळी काल रात्री ठरवलं होतं की रविवारच्या सकाळ पर्यंत विनाअडथळा मस्त ताणून द्यायची.. पण हाय रे दुर्दैव. पहाटे चारलाच डोळे उघडले. अर्थात तसं व्हायला दोन कारणं होती पैकी एक खासगी होतं आणि दुसरं खासगी आठवणीला जोडून पतंगाच्या शेपटीसारखं दुसरं एक सरकारी कारण चिकटलं होतं. आता मनात आलेल्या विचारांचं शेअरींग केलं की मनावरचं ओझं कमी होतं, काही एक उत्तम विचार आपल्या देता घेता येतो, असे म्हणतात म्हणून मास्तर, जरा नैतिकतेने राव्हाची ही एक गोष्ट.
मंडळी, महाराष्ट्र सरकारच्या उच्चशिक्षण विभागाने एक परिपत्रक काढलं आहे. शिक्षक आणि प्राध्यापकांनी आपल्या चांगल्या नैतिक वर्तणुकीचे 'हमीपत्र' देण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०१३ च्या पहिल्या (अर्थसंकल्पीय) अधिवेशनात विधानपरिषदेत देण्यात आलेली जी आश्वासने होती त्यात शिक्षण खात्याला एक विनंती करण्यात आली होती त्यावरुन शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढले आहे. (दि.२०-१२-२०१३)
शिक्षण विभागाचं पत्र काय म्हणतं पाहा ''विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकांना आदराचे स्थान असते. शिक्षकांकडून विद्यार्थीनीवर होणा-या अत्याचारामधे दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. शिक्षकांना गुरु म्हटले जाते. शिक्षकाकडून अशा गोष्टी घडू नयेत अशी समाजाची अपेक्षा असते. विद्यापीठ अनुदान आयोगाने वर्तनुकीबाबत नियम घालून दिले आहेत. (परिनियम पाहा वगैरे)
शिक्षकांनी विहित केलेल्या आचारसंहितेचा भंग केल्यास मुलींच्या, महिलांच्या व महिला शिक्षकांच्या बाबतीत नियमबाह्य वर्तन केल्यास त्या शिक्षकाविरुद्ध प्राचार्यांनी , विद्यापीठांनी, संस्थाचालकांनी त्वरित कार्यवाही करावी.मूळात शिक्षकांनी नैतिक मुल्यांच्या बाबतीत संवेदनशील राहून अनुपालन करावे, अशी प्राचार्यांमार्फ़त सर्व अध्यापकांना जाणीव करुन द्यावी व त्यांची स्वाक्षरी घ्यावी”
मंडळी, अशी काही स्वाक्षरी (हमीपत्र) करुन देण्यास कोणाचीही ना नसावी, नाहीच. विद्यापीठ कायद्यात ४३१ प्रमाणे नैतिक अध:पतन झालेल्या व गैरवर्तणूक करणा-या शिक्षकाला निलंबित करण्याची व सेवासमाप्तीची तरतूद आहे. मंडळी, समाजव्यवस्थेत अनेक चूकीचं घडतं तसं इथेही काही चूकीचे असेल तर ते थांबेल, यासाठीच असा आदेश आहे शिक्षण हे ज्ञानदानाचं पवित्र क्षेत्र आहे. त्याचं पावित्र्य टीकलं पाहिजे याच्याशी सर्वच सहमत होतील.
मंडळी वरील पत्रावरुन काही प्रश्न पडले आहेत.
१] गैरवर्तणूक करणा-या शिक्षकांवर कार्यवाही व्हावीच. परंतु ''शिक्षकांकडून विद्यार्थीनीवर होणा-या अत्याचारामधे दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे'' हा निष्कर्ष शासनाने कोणत्या विदाद्वारे काढला असावा ?
२] प्राध्यापक, शिक्षक यांचा विद्यार्थी-विद्यार्थीनीशी मुक्त संवाद असतो त्या संवादाला या मुळे बाधा येईल का ?
३] महाविद्यालयात येणारे विद्यार्थी सज्ञान असतात त्यांना जे वाटतं ते थेट आता निर्भिडपण बोलतात, तेव्हा अजूनही अशा घटना घडतातच का ?
४] विद्यार्थीनीमधे आत्मविश्वास वाढावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्या ऐवजी अशा पत्रकांमुळे विद्यार्थीनीची आणि शिक्षकांची एकमेकांकडे पाहतांना दृष्टी निकोप राहील का ?
५] शिक्षक-प्राध्यापक यांच्यावर संस्कार असले पाहिजेत, नैतिकतेने ते वागले पाहिजेत तेव्हा अशी ही नैतिकता अशा शासकीय फतव्यांनी येत असते का ?
६] सर्वच शिक्षक थोर नसतील पण, समाजासमोर शिक्षकांबद्दल गैरसमज तर या निमित्ताने पसरवल्या जात नाहीत ना ?
अजून काही राहीलं असेल तर...मंडळी, होऊ द्या सविस्तर चर्चा .
वाचने
19203
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
१] गैरवर्तणूक करणा-या
In reply to १] गैरवर्तणूक करणा-या by मारकुटे
अरेच्या ! संपादन करण्यासारखं
In reply to अरेच्या ! संपादन करण्यासारखं by मारकुटे
आनि ज्या अर्थी आमचा काही भाग
In reply to १] गैरवर्तणूक करणा-या by मारकुटे
प्रतिसादाबद्दल धन्स. :)
In reply to प्रतिसादाबद्दल धन्स. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>आमचं काय आम्हीबी माणूस आहोत
In reply to >>आमचं काय आम्हीबी माणूस आहोत by मारकुटे
एक अवांतर. प्रतिसाद 'अवलिया' साठी.
In reply to एक अवांतर. प्रतिसाद 'अवलिया' साठी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेराचा मराठीत अर्थ दिला तर
>>राव्हा....!!!
>>>विचारांचं शेअरींग
In reply to >>>विचारांचं शेअरींग by मारकुटे
आपलं बरोबर आहे.
In reply to आपलं बरोबर आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा खरा हाडाचा शिक्षक. सतत
In reply to हा खरा हाडाचा शिक्षक. सतत by मारकुटे
१००
In reply to १०० by विनायक प्रभू
पूर्ण १०० बाकी.
In reply to हा खरा हाडाचा शिक्षक. सतत by मारकुटे
हाड
प्राध्यापक साहेब.....
जरूर का भासावी ?
३) ज्या व्यक्ती आचरण नैतीक
In reply to ३) ज्या व्यक्ती आचरण नैतीक by माहितगार
+१
In reply to +१ by पियू परी
+२
In reply to +२ by पैसा
सरकारी कागदाची किंमत कमी लेखू
In reply to सरकारी कागदाची किंमत कमी लेखू by आनंदी गोपाळ
१०००००००%
In reply to सरकारी कागदाची किंमत कमी लेखू by आनंदी गोपाळ
मग अश्या गोष्टींनी घाबरून
In reply to मग अश्या गोष्टींनी घाबरून by डॉ सुहास म्हात्रे
महोदय,
In reply to महोदय, by आनंदी गोपाळ
माझा रोख सरकारी कागद नाचवून
In reply to ३) ज्या व्यक्ती आचरण नैतीक by माहितगार
पोच
In reply to पोच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संदर्भांचा अभाव आणि तार्कीक विसंगती
In reply to संदर्भांचा अभाव आणि तार्कीक विसंगती by माहितगार
अबब किती मोठ्ठं भाषण...
In reply to अबब किती मोठ्ठं भाषण... by मारकुटे
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
In reply to संदर्भांचा अभाव आणि तार्कीक विसंगती by माहितगार
प्रतिसाद आवडला!
In reply to प्रतिसाद आवडला! by पैसा
धन्यवाद
In reply to संदर्भांचा अभाव आणि तार्कीक विसंगती by माहितगार
जियो...!
नैतिकतेची व्याख्या काय?
In reply to नैतिकतेची व्याख्या काय? by जेपी
गुड क्क़ेश्च्न
In reply to नैतिकतेची व्याख्या काय? by जेपी
नैतिकता एक सामाजिक नियंत्रण
In reply to नैतिकता एक सामाजिक नियंत्रण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नैतिक कि अनैतिक......सब माया है |
एक भंपक पत्रक बाबूजी( सरकारी
हमीपत्र दिलं काय आणि नाही काय
१)माहीतगार यांचा प्रतिसाद
बर झाले धागा काढलात ते ..
आपल्या समाजाची नैतिक मुल्ये
पटत नाही.
आक्षेप फक्त वापरलेल्या भाषेवर
दिलं का हमीपत्र लिहून?
In reply to दिलं का हमीपत्र लिहून? by मारकुटे
.
शिक्षक-प्राध्यापक यांच्यावर
In reply to शिक्षक-प्राध्यापक यांच्यावर by पिशी अबोली
चिमुटभर मीठ
In reply to चिमुटभर मीठ by माहितगार
सहमत.
In reply to चिमुटभर मीठ by माहितगार
तुम्हाला भारतात संघटनेच
In reply to तुम्हाला भारतात संघटनेच by पिशी अबोली
आपली एक बाजू झाली...
In reply to आपली एक बाजू झाली... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विद्यार्थीनीही कुठे चूकत तर
In reply to विद्यार्थीनीही कुठे चूकत तर by पिशी अबोली
+१
In reply to विद्यार्थीनीही कुठे चूकत तर by पिशी अबोली
एक अजून
In reply to एक अजून by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विद्यार्थिनी शिक्षकांच्या
In reply to तुम्हाला भारतात संघटनेच by पिशी अबोली
प्रतिसाद भाग १ (चांगला श्रोता )
In reply to प्रतिसाद भाग १ (चांगला श्रोता ) by माहितगार
दोन्ही बाजूंनी चर्चा झालेली
In reply to तुम्हाला भारतात संघटनेच by पिशी अबोली
प्रतिसाद भाग २
In reply to तुम्हाला भारतात संघटनेच by पिशी अबोली
प्रतिसाद भाग ३
धाग्याचा मूळ विषय
In reply to धाग्याचा मूळ विषय by पैसा
ही चांगल्या वर्तणुकीची हमी
ऑनलाईन संगणक प्रणालींचे उपयोग