लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य
In reply to टिळक दलितांबद्दल अधिकृतरित्या काय म्हणायचे by arunjoshi123
उस डोंगा परी रस नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा ||
In reply to टिळकांचे एकूण वागणे by अवतार
In reply to प्रतिसादांचे स्थान आणि औचित्यपूर्णता ;कृ.विषयांतर थांबवूयात ? by माहितगार
In reply to मिपावर विषयांतर होण्याची by अवतार
In reply to धन्यवाद by माहितगार
In reply to गीतारहस्य अजून वाचले नाहीये by प्रचेतस
In reply to अर्धवटरावांशी सहमत. टिळकांचे by Atul Thakur
In reply to गीतारह्स्य हे गीतेचे कर्म करा by मारकुटे
कुणाला गीतेत काहीही नाही हे प्रतिपादन करतांना मुक्ती मिळेल..असंही होऊ शकतं हा विचारच आला नाही कधी. ;) वल्लीशेठ, गीतरहस्य तुम्ही वाचत नसाल तर आम्हाला दया आधी वाचयला. :)
In reply to कुणाला गीतेत काहीही नाही हे by धन्या
In reply to गीतारह्स्य हे गीतेचे कर्म करा by मारकुटे
In reply to घरी एक जुनी कॉपी आहे. त्यात by कवितानागेश
In reply to असेच by विकास
In reply to माहितीपुर्ण प्रतिसाद by माहितगार
In reply to घरी एक जुनी कॉपी आहे. त्यात by कवितानागेश
घरी एक जुनी कॉपी आहे. त्यात या प्रकाशनाबद्दल, पानांबद्दल बघते आणि लिहिते.मिपा सदस्य जयंत कुलकर्णींकडून काही माहिती आली आहे.तरीही जेवढी अधिक माहिती मिळेल तेवढी हवीच आहे.
मला तरी काही वर्षांपूर्वी वाचताना भाषा क्लिष्ट वाटली, त्यामुळे पूर्ण वाचलं नाही.काळा सोबत भाषिक बदल होतात,लेखकाच्या लेखनात आलेल्या तत्कालीन संदर्भांची आपणास कल्पना नसण्याचीही शक्यता असते.टिळकांना आणि इतर अनेक लेखकांना गीतेचे अनुवाद आणि भाष्य अनेक वेळा लिहावे लागले. त्यामुळे समिक्षा/भाष्य ग्रंथ आणि अशा चर्चा ग्रंथ समजून घेण्यास साहाय्यभूत होतात. बर्यापैकी मिपाकरांकडे घरी गीतारहस्याची आवृत्ती आहे.पुर्ण गीतारहस्य आंतरजालावर कुणाकडून चढवून मिळेल त्याच्या युनिकोडीकरणात कोणकोण सहभागी होईल ते माहित नाही म्हणून मी प्रत्येकास विनंती करतो आहे.या चर्चेच्या निमीत्ताने ही कामेही मार्गी लागल्यास गीतारहस्याच्या शतकपुर्तीपूर्वी मिपाकरांच्या मुकूटात एका चांगल्या कामाचा मानाचा तूरा खोवला जाईल असा आशावाद आहे. पुढील प्रतिसादाची प्रतिक्षा असेल. धन्यवाद
In reply to माझ्याकडे एक बहुदा प्रथम by जयंत कुलकर्णी
In reply to माझ्याकडे एक बहुदा प्रथम by जयंत कुलकर्णी
>>सदरील ग्रंथात गीतेचे अंतरंगपरीक्षण तसेच बहिरंगपरीक्षण समाविष्ट आहे. ह्या ग्रंथाच्या स्वरूपाने मराठी भाषेमध्ये प्रथमच गीतेचे ’बहिरंगपरीक्षण’ केले गेले.अशी माहिती मराठी विकिपीडियावर आहेयातील अंतरंगपरीक्षण तसेच बहिरंगपरीक्षण म्हणजे काय किंवा याचा संदर्भ काय असावा ? प्रथमच गीतेचे ’बहिरंगपरीक्षण’ केले गेले म्हणजे नेमके काय या बद्द्ल अधिक जाणून घेण्याची सुद्धा उत्सुकता आहे. प्रतिसादांकरता धन्यवाद
In reply to खरेच भाग्यवान by माहितगार
In reply to अंतरंगपरिक्षण म्हणजे हे by जयंत कुलकर्णी
In reply to माझ्याकडे एक बहुदा प्रथम by जयंत कुलकर्णी
In reply to हायला आमच्याही घरी हीच १९१५ by बॅटमॅन
In reply to अभिनंदन, सोबत ऑनलाईन उपलब्धता by माहितगार
In reply to कर्मपर गीता by Atul Thakur
In reply to म्हणजे काय... by अर्धवटराव
In reply to विद्वत्ता दाखवण्याकरता आक्षेप ? by माहितगार
In reply to किमान पातळीची प्रज्ञा by अर्धवटराव
असं बरच काय काय आहे गीता रहस्यात. म्हणुनच म्हणतो... एकदा तरी अवश्य वाचावा हा ग्रंथ. आणि तब्बेतीने वाचावा. त्याची मोहिनीच वेगळी.जेवढा भाग वाचला त्यावरून मलाही तसेच वाटले म्हणूनच उर्वरीत भागही आंतरजालावर उपलब्ध करण्यात चहात्यांनी पुढाकार घ्यावा असे वाटते.लोकमान्यांच लेखनाची अभ्यासपूर्णता त्यांच्या चाहत्यांनाच नाही तर टिकाकारांकरताही मोहवणारी अशीच होती.
In reply to मुळ संस्कृत श्र्लोक व त्याचे by जयंत कुलकर्णी
In reply to गीतारहस्याबद्दल थोडेसे... by Atul Thakur
शंकराचार्यांच्या अभिमान्यांकडून त्यांना प्रखर टीकेला तोंड द्यावे लागले. गीता कर्मपर नसुन संन्यासपर आहे असे प्रतिपादन करणार्यांचा हा गट होता. आचार्यांचे मत खंडन करण्याचं धारिष्ट्य दाखवणार्या टिळकांवर सनातन्यांनी टिकेची झोड उठवली.टिळकांचे लेखन अभ्यासतो तेव्हा टिळक परांपरागत तसेच आधूनिक दोन्ही संदर्भांचा समन्वय आणि अभ्यास करत लेखन करत.न.र.फाटकांनी वर दिलेली माहिती पाहता टिळकांचे केवळ कोणत्याही एकाच बाजूने चित्रण करणे योग्य होत नाही. न.स.फाटकांच्या विवेचना बद्दल डॉ.यशवंत रायकरांचे पुढील प्रतिपादनही सोबतच लक्षात घेता येईल
गीतारहस्याची काही वैशिष्टय़े न. र. फाटक यांनी चांगली मांडली आहेत. गीतेच्या आकलनासाठी महाभारताचा उपयोग कसा होतो हे टिळकांनीच प्रथम दाखवून दिले. गीताभ्यासाची दिशा त्यांनी बदलून टाकली. गीतार्थ समजून घ्यायचा तर आधी भौतिक शास्त्रांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे निदर्शनास आणून दिले. या ग्रंथामुळे नीतिशास्त्रावर मराठीत लेखन करण्याची उमेद अभ्यासक्रमांमध्ये निर्माण झाली. पण एरवी परखड मते देणारे न. र. फाटक येथे टिळकांचे पक्षपाती होतात. गीतारहस्याला युगप्रवर्तक ग्रंथ म्हणणे ठीक पण त्याची तुलना डार्विनच्या ‘ओरिजिन ऑफ स्पीसीज्’शी करणे म्हणजे अति झाले. शंकराचार्याचा पक्ष मांडणारे सनातनी बुरसट विचाराचे असतील तरी त्यांची कुत्सित टिंगळ करणारा मजकूर सात पाने व्यापतो, पण विष्णु वामन बापटशास्त्र्यांनी गीतारहस्याचे खंडन नेमके कसे केले हे पुस्तकात येत नाही.
In reply to गीतारहस्याबद्दल थोडेसे... by Atul Thakur
"त्यापैकी सर्वात गंभीर मधुमेह त्यांनी आहारावर संयम करुन ताब्यात ठेवला होता"
काश !!! आजकालचे डॉक्टर/मधुमेह तज्ञ कधी याला खूप महत्व देतील? मधुमेह ताब्यात ठेवता येतो ह्याचा एक चांगला प्रत्यय. धन्यवाद कळावे, गोडवा असावा, आपला लाडका : आयुर्हीतIn reply to मधुमेह : विषयांतर पण तरी आजही महत्त्वाचा असणारा मुद्दा by आयुर्हित
In reply to पण एरवी परखड मते देणारे न. र. फाटक येथे टिळकांचे पक्षपाती होतात. by Atul Thakur
In reply to पण एरवी परखड मते देणारे न. र. फाटक येथे टिळकांचे पक्षपाती होतात. by Atul Thakur
In reply to पोच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पोच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अजून एक by माहितगार
In reply to सहा की सात ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to एक लिंक by सुधीर
In reply to पिडिएफ उघडता आल्या नाहीत by माहितगार
In reply to काही महिन्यांपूर्वी by सुधीर
In reply to स्वामी विवेकानंद by आशिष दा
In reply to पृष्ठसंख्येतील फरक मेळ घालण्यात साहाय्य हवे by माहितगार
In reply to पृष्ठसंख्येतील फरक मेळ घालण्यात साहाय्य हवे by माहितगार
In reply to पृष्ठसंख्येतील फरक मेळ घालण्यात साहाय्य हवे by माहितगार
In reply to चांगभलं by अर्धवटराव
In reply to +१ by मूकवाचक
In reply to पृष्ठसंख्येतील फरक मेळ घालण्यात साहाय्य हवे by माहितगार
In reply to ... by आशु जोग
तुम्हाला हा श्लोक अपेक्षित आहे काय ??क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति । कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥९- ३१॥
लोकमान्यांनी नुसता कर्मयोग नव्हे तर भगवद्गीतेत ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे असे सांगितले
जन्मभर टिळक जे आचरण करीत आले, त्याचे तात्त्विक स्पष्टीकरण करण्याचा योग मंडालेच्या तुरुंगवासामुळे आला. लोकमान्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला. या गीतेच्या सूक्ष्म व्यासंगामुळे गीतेचे प्रतिपाद्य कर्मयोग आहे, या निर्णयावर ते आले असा प्रकार नाही. खरा प्रकार असा आहे की, ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग लोकमान्य जन्मभर आचरणात आणीतच होते. योग आला म्हणून गीताभाष्य त्यांनी लिहिले. गीतेवरील रहस्य भाष्य न लिहिता ‘माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान’ या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला असता तरी त्या ग्रंथात तीच भूमिका आली असती. भगवद्गीता हे निमित्त आहे. कर्मयोगाचे प्रतिपादन हा खरा हेतू!हे कुरंदकरांच्या मता बद्दल आपली मते काय आहेत हे जाणून घ्यावयास आवडेल. समीक्षा संदर्भा करिता कुरुंदकरांच्या भाषणाचा थोडा अधिक भाग : गेल्या हजार-बाराशे वर्षांत गीतेचे जे अलौकिक भाष्यकार होऊन गेले त्यात ज्ञानमार्गाचे नेते म्हणून शंकराचार्य, भक्तिमार्गाचे नेते म्हणून ज्ञानेश्वर आणि कर्ममार्गाचे नेते म्हणून लोकमान्य टिळक हे तीन भाष्यकार सर्वात महत्त्वाचे मानले पाहिजेत. भगवद्गीतेत ज्ञान, भक्ती आणि कर्म या तीनही सूत्रांचे प्रतिपादन आहे. शंकाराचार्याना कर्म आणि भक्ती यांचे महत्त्व मान्यच असते; पण त्यांच्या मते ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. टिळकांचीसुद्धा पद्धती हीच आहे. आपण लोकमान्यांनी गीतेचा अर्थ कर्मयोगपर लावला आहे, असे म्हणतो. स्थूलपणे ते खरेही आहे. पण टिळकांचे नेमके म्हणणे मात्र वेगळ्या भाषेत सांगावे लागेल. त्यांच्या मते भगवद्गीतेत ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे. लोकमान्यांचे हे ‘गीताभाष्य’ त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात प्रकाशित झाले आहे. लोकमान्यांच्या सार्वजनिक जीवनाला स्थूलमानाने सांगायचे तर त्यांच्या पंचविशीपासून आरंभ होतो. या सार्वजनिक जीवनाची पंचविशी पूर्ण होतात न होतात तोच त्यांना मंडालेच्या तुरुंगात दीर्घकाळ राहण्याचा योग आला. जन्मभर टिळक जे आचरण करीत आले, त्याचे तात्त्विक स्पष्टीकरण करण्याचा योग मंडालेच्या तुरुंगवासामुळे आला. लोकमान्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला. या गीतेच्या सूक्ष्म व्यासंगामुळे गीतेचे प्रतिपाद्य कर्मयोग आहे, या निर्णयावर ते आले असा प्रकार नाही. खरा प्रकार असा आहे की, ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग लोकमान्य जन्मभर आचरणात आणीतच होते. योग आला म्हणून गीताभाष्य त्यांनी लिहिले. गीतेवरील रहस्य भाष्य न लिहिता ‘माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान’ या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला असता तरी त्या ग्रंथात तीच भूमिका आली असती. भगवद्गीता हे निमित्त आहे. कर्मयोगाचे प्रतिपादन हा खरा हेतू! या कर्मयोगाचे स्वरूप आपण नीट समजून घेतले पाहिजे. कोणते तरी कर्म करीत राहा, कारण माणसाने कर्म केले पाहिजे, इतका एकेरी ढोबळ विचार लोकमान्यांनी कधी मान्य केला नसता. लाकूडफोडय़ा, मजूर जन्मभर कर्म करीतच असतो. आपल्यासारख्या गरीब देशात कोटय़वधी माणसांचे जीवन जन्मभर कोणते तरी काम करीतच जाणारे असते. ‘बाबा रे, आळशी बसून राहू नकोस, कोणते तरी काम कर’ हा उपदेश निराळा आणि कर्मयोग निराळा. तो स्वत: कर्मयोगी आहे. माणूस जेव्हा स्वत:च्या अस्तित्वासाठी, स्वत:च्या हितासाठी, लाभासाठी कर्म करतो तो कर्मयोग नव्हे. व्यक्तिगत स्वार्थ आणि हित या परिघाबाहेर जाऊन समूहाच्या कल्याणात स्वत:च्या स्वार्थाचा लोप जेव्हा करतो, त्या वेळी कर्म ही साधना आणि उपासना होते. कर्मयोगात स्वार्थाचा लोप हा गृहीत आहे म्हणून तर काबाडकष्ट असा शब्दप्रयोग न करता ‘कर्मयोग’ म्हणायचे. हे कर्म अज्ञानाने करून चालणार नाही. समाजाची गरज काय, राष्ट्राची गरज काय? भोवतालची परिस्थिती कोणती, त्या परिस्थितीत शक्य काय, अशक्य काय इ. विचार केलाच पाहिजे. म्हणून कर्मयोगात जे कर्म अपेक्षित आहे ते ज्ञानमूलक आहे. सर्वसामान्यपणे टिळकांच्या भूमिकेवर जो आक्षेप घेण्यात येतो त्याचा आरंभ या ठिकाणी आहे. फळाची अपेक्षा न ठेवता जर कर्म करायचे असेल तर मग कर्म बरोबर की चूक हे ठरविण्याची कसोटीच शिल्लक राहणार नाही, असे आक्षेपकांचे म्हणणे असते. हा आक्षेप घेणारी मंडळी एक मुद्दा विसरूनच जातात. लोकमान्य कर्माला फळ नसते असे म्हणत नाहीत. कर्माला फळ असते हेच त्यांचे म्हणणे आहे. जर कर्माला फळच नसते तर मग कर्म कोणतेही केले तरी बिघडले नसते. कर्माला फळ असते म्हणूनच कर्म ज्ञानमूलक असायला हवे. हा आपला देश इंग्रजांच्या ताब्यात होता. भारत स्वतंत्र असणे अगर स्वतंत्र नसणे दोन्ही बाबी सारख्याच, असे जर टिळकांचे मत असते तर त्यांना कुणी लोकमान्य म्हटलेच नसते. टिळकांना भारत स्वतंत्र हवा होता. ते स्वातंत्र्यात जन्मले असते तर ते म्हणाले असते, ‘स्वतंत्र भारत बलवान आणि स्वावलंबी झाला.’ हा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच सारे काम चालणार आहे. आपण ज्या मार्गाने जात आहोत तो लोकजागृतीचा व लोकसंघटनेचा आहे हे त्यांना कळतच होतं. आजोबाच्या कष्टाचे फळ नातवाला मिळणार असते. कर्माला फळ आहे; फक्त ते आज नाही, या जन्मी नाही; आणि स्वातंत्र्यलढय़ाच्या दर चळवळीला अपयश कसे ठरल्याप्रमाणे येत असते. सर्व अपयश पचविण्यासाठी आपल्या पिढय़ा पायाभरणीत संपणार आहेत हे जाणूनही चिकाटी चालू ठेवण्यासाठी नुसता नि:स्वार्थीपणा पुरत नाही; फळाची आशासुद्धा सोडावी लागते. अशा वेळी आपण जे कर्म करतो आहोत ते बरोबर आहे की नाही हे कसे ठरणार? म्हणूनच निष्काम कृतीला भक्तीची गरज लागते. लोकमान्य निष्काम कर्मयोग सांगतात याचे कारण कर्माला फळ नसते हे नाही, तर कर्माला फळ असते हेच निष्काम कर्मयोग सांगण्याचे खरे कारण आहे. जन्मभर टिळकांचा ज्ञानमूलक भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग चालूच होता. ते त्यांच्या जन्मभराच्या उद्योगाचे सूत्र होते. हे सूत्रच गीतेच्या आधारे त्यांनी सांगितले. आपले कर्तव्य कोणते हे ठरविण्यासाठी ज्ञानाची उपासना हे कर्तव्य ठरतात, भक्तिपूर्वक आचरण हा या कर्मयोगाचा पूर्वार्ध समजावयाचा आणि सततचे अपयश पचवून पुन:पुन्हा कामाला लागायचे, हा या योगाचा उत्तरार्ध समजावयचा. पारतंत्र्याच्या काळी समोर कोणतीही आशा नसताना आपल्याच अंतरंगातून प्रेरणा घेऊन जळतच जन्म काढीत असताना टिळकांचे तत्त्वज्ञान हा आधार असतो. टिळकांचे जीवन हे या तत्त्वज्ञानाचे उदाहरण असते, तर स्वातंत्र्याच्या युगात या तत्त्वज्ञानाचे महत्त्व कमी होत नाही. सर्व मोह डोळ्यासमोर दिसत असताना आपण निष्काम कर्मयोग विसरलो, तर स्वार्थाच्या या सार्वजनिक जीवनात दुसरे काही दिसणारच नाही. मग कर्मयोगही कुठे उरणार नाही. म्हणूनच लोकमान्य टिळकांसारख्या कर्मयोग्याचे जीवन व चिंतन पिढय़ान् पिढय़ा राष्ट्राला पोषक देणारे ठरते असे म्हणायचे.
In reply to टिळकांचे जीवन,कर्मयोग आणि गीतारहस्य - कुरुंदकरांचा दृष्टीकोण by माहितगार
In reply to टिळकांचा कर्मयोग. by अर्धवटराव
गीतारहस्य म्हणजे टिळकांचे स्वतःचे जीवन विषयक सूत्र आहे हे खरच आहे. आयुष्यभर टिळक हेच तत्वज्ञान जगले. गीतेत त्यांना त्याचीच अनुभूती यावी हे ही सहाजीक आहे.या गोष्टीशी सहमत.पण कुरुंदकरांच्याकडून टिळकांच्या एका बाजूच उदात्तीकरण होताना त्यांच्या व्यासंगाची बाजू नकळत गौण तर होत नाहीएना.तुम्ही म्हणता तसे गीतेच लोकमान्यांकडून वाचन झाल तेव्हाच गीतेतून कर्मयोग पूर्ण आयूष्याची प्रेरणा मिळाली.ती तशी गीतेतून मिळालेली नसती तर कुरुंदकर स्वतःच म्हणतात तसे "लोकमान्यांनी, गीतेवरील रहस्य भाष्य न लिहिता ‘माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान’ या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला असता." पण त्यांना तसा गीते बद्दल लिहावा वाटला म्हणजे त्यांना गीतेचा व्यासंग होता. वर मिपा सदस्य विकास यांनी टिळकांची विवेकानंदांसोबतचे वर्णन केले आहे त्यातही,विवेकानंद कोण आहेत याची कल्पना नसताना त्यांच्याशी चर्चा झाली आहे तरीही, विवेकानंदांच्या इतर विचारांपेक्षा गीतेची कर्मयोगपरता हाच विषय टिळक उचलून धरतात ह्यातून त्यांचा व्यासंग आणि जीवन दृष्टीकोण दोन्हीही प्रगट होते आहे. कुरुंदकर कर्मयोग हा ज्ञानमुलक असावाच लागतो सोबत श्रद्धा अथवा भक्ती हवीच नुसते कर्म हा कर्मयोग नव्हे हा कुरुंदकरांचा दृष्टीकोण आणि टिळकांच्या दृष्टीकोणाशी जुळतो का वेगळा आहे ह्यावर जाणकारांनी/अभ्यासकांनी प्रकाश टाकावयास हवा. दुसरे असे कि जर कुरुंदकर विचारांनी समाजवादी होते तर ते स्वतः उपरोल्लेखीत कर्मयोग योगाची त्यांचीच व्याख्या आणि समाजवाद यांची सांगड कशी घालत. हा कुरुंदकरांशी संबंधीत तसा वेगळा मुद्दा आहे. पण टिळक त्यांच्या उत्तरकाळात बोल्शेवीकांबद्दलही चर्चा करत होते तर तेही त्यांचीही कर्मयोग व्याख्या कुरुंदकरी शैलीचीच असेल तर साम्यवादाशी सांगड कशी घालत असावेत अशा काही शंका मनात उपस्थित होतात. पुढेचालून असेही म्हणता येऊ शकते का की टिळकांच्या श्रद्धेचा भक्तीचा परीघ हा भारत आणि भारताय राजकीय स्वातंत्र्याच प्राधान्य असा होता.नवीन वर्षाच २०१४च स्वागत करताना एक मराठी विचारवंत त्यांच्या अनुदिनीवर म्हणतात कि एकाच प्रश्नास प्राधान्य देण हे इतर प्रश्नांच अजाणता घडणार सपाटीकरण अथवा अतीसुलभीकरण कि ज्यात इतर तत्कालीन प्रश्न गौण गृहीत धरले जातात. कदाचित तत्कालीन समाज सुधारंकाचे आक्षेप येण्याची जागा इथे असावी या कडे कुरंदकर ओझरता उल्लेख करताना भाषणात म्हणतात "...म्हणून कर्मयोगात जे कर्म अपेक्षित आहे ते ज्ञानमूलक आहे. सर्वसामान्यपणे टिळकांच्या भूमिकेवर जो आक्षेप घेण्यात येतो त्याचा आरंभ या ठिकाणी आहे." या कुरुंदकरांच्या विश्लेषणाकडे आपण कसे बघतो ?
In reply to सहमत by माहितगार
In reply to टिळकांचा कर्मयोग. by अर्धवटराव
In reply to उत्तम काम by विटेकर
In reply to प्रोत्साहनाकरिता धन्यवाद by माहितगार
In reply to प्रोत्साहनाकरिता धन्यवाद by माहितगार
In reply to गीतारहस्यातील "अथ समर्पणम" चा अनुवाद हवा आहे by माहितगार
In reply to उत्तम काम by विटेकर
In reply to उपक्रम बंद आणि भोग मिपाला by सुहास..
In reply to अभिनंदन. by राही
In reply to कापूस, रेशीम व जर by माहितगार
In reply to मस्तच! by विकास
In reply to कापूस, रेशीम व जर by माहितगार
In reply to गीता, कोहिनूर, आणि लोकमान्य by श्रीनिवास टिळक
In reply to गीता, कोहिनूर, आणि लोकमान्य by श्रीनिवास टिळक
In reply to विकिस्रोत वरिल by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अथ समर्पणम् ची टंकन खात्री आणि अनुवाद हवा आहे by माहितगार
In reply to ओ साहेब, धाग्यावरचे प्रतिसाद by बॅटमॅन
In reply to पुरता अगदी अगदी .. by माहितगार
In reply to अनुवाद पूर्णपणे मुक्त आहे, by बॅटमॅन
In reply to अथ समर्पणम् ची टंकन खात्री आणि अनुवाद हवा आहे by माहितगार
In reply to अथ समर्पणम् ची टंकन खात्री आणि अनुवाद हवा आहे by माहितगार
In reply to एक राहिले. प्रत्नान् by राही

टिळकांचे एकूण वागणे