मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपाकरलक्षणे समास द्वितीय

सस्नेह · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मिपाकरलक्षणे समास प्रथम | | श्री मिसळ पाव || | डूआयडीलक्षणनाम समास द्वितीय | मागा सांगितली लक्ष णे | मिपाकरांअंगी बाणे | आता ऐका सोंग घेणे | असोनी येक आयडी |१ | तयां नाव डुआयडी |नामे असती बहु फाकडी | खवतुनी लाडीगोडी | करिती सदा |२| घेई सोंगे कलह लावण्या | जुने स्कोर सेटल करण्या | अथवा उगा मजा बघण्या | आयड्यांची |३| बोली स्त्रीआयडींशी मधुर | मयतरी करण्या अति आतुर | प्रतिसादी जो बहु चतुर | तो येक डुआयडी |४| वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस | कुवत नसता भंकस | करी तो येक डुआयडी |५| शत्रुआयडीवरी खाय दाढा |संपादकांशी दीन बापुडा | निर्लज्ज ढोंगी पाषाण कोरडा | तो येक डुआयडी |६| काव्य साहित्य ना लेख |काथ्या कुटुनी करी राख | पाकृ चोरी काही येक | दुज्या संस्थळीची |७| संपादक-शत्रू लेखक-शत्रू | कवी-शत्रू कलाकार-शत्रू | बल्लव-शत्रू सुगरण-शत्रू | तो येक डुआयडी |८| आयडीचेनी अष्टगुणे | जया अंगी खोड्या बाणे | सकळांचे काढी उणे | तो येक डुआयडी |९| संयम राखो नेणे कदा | चेष्टा करू पाहे सर्वदा | हसून खिजवी आयडींस सदा | तो येक डुआयडी |१०| बहुतांचे मनींचे तुटे | उगा करी व्यनी खोटे | क्षण बरा क्षणां पालटे | तो येक डुआयडी |११| समस्तांशी मत्सर धरी | बहुतांचे पडीक धागे उकरी | छद्मनामे स्कोर सेटल करी | तो येक डुआयडी |१२| आनंदें आयडी बोलत जेथे | करी वटवट जाऊनी तेथे | खफ आणि खव बळेच मंथे | तो येक डुआयडी |१३| स्त्री आयडींशी सलगी देणे | कंपुंच्या संनिद्ध बैसणे | नव आयडींस उगा खिजवणे | तो येक डुआयडी |१४| काड्या सारुनी कौतुक पाहे | स्मायल्या सोडूनी निवांत राहे | बाजार उठवूनी आपण नोहे |तया गावीचा |१५| ऐसी लक्षणे डूआयडींची असती | बोलिली काही येक यथामती | सावधान असावे श्रोतीं | डूआयडींपासुनी |१६| पारखावी लक्षणे मनीं | आयडी -डूआयडींची दोनी | वावरावे संस्थळी धरुनी | खूण गाठ |१७| ज्ञानार्थ बोलिले लक्षण | असता मिपाकर विचक्षण | पामरें केले परिक्षण | क्षमा केली पाहिजे |१८| इति श्री मिपाबोधे लक्षण परिक्षण संवादे शब्द मेळ साधे समास समाप्त.

वाचने 15315 वाचनखूण प्रतिक्रिया 50

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिपक.कुवेत गुरुवार, 01/02/2014 - 12:14
सॉल्लीड....अजुन येउ द्या (ओरीजनल आयडिचा) दिपक

आदूबाळ Wed, 01/01/2014 - 17:50
भारीच! तृतीय समास मिपावर रुसला कोपर्‍यात बसला अशा आयडींवर पाहिजे.

In reply to by सूड

सूड गुरुवार, 01/02/2014 - 14:53
>>शत्रुआयडीवरी खाय दाढा |संपादकांशी दीन बापुडा | निर्लज्ज डोंगी पाषाण कोरडा | तो येक डुआयडी |६| हे वाचून मीनाक्षीची आठवण आली. कुठे असेल बिचारी देव जाणे!! *cray2*

तिमा Wed, 01/01/2014 - 18:03
डु आयडीची लक्षणे आवडली. आता ज्येष्ठ सभासदांवर येऊ द्या.

राही Wed, 01/01/2014 - 19:31
डुआय्डीलक्षणनाम द्वितीय समास खूपच आवडला.

चित्रगुप्त Wed, 01/01/2014 - 19:53
ऐकता ड्वायडीची लक्षणे कुश्चिळ आणि विलक्षणे मारोन फाट्यावर विचक्षणे निद्रेसि भजावे /१/ अथवा घ्यावा तोचि छंद स्वताशी हासोन मंद मंद डुआयडी घेओन स्वच्छंद मिपावरी धुडगुसावे /२/ ऐसा निश्चयो जाहला डुआयडी पाहिजे घेतला तरी योजावे कोणत्या नामाला कळेना जाले /३/ श्रोते पुसती कोण नाम घेता साधेल अवघे काम वाचकासि फुटेल घाम कोण्या नामे /४/ आता असो हे बोलणे सत्वर दुआयडीस घेणे क्रियेवीण काही बोलणे वाचाळता /५/ स्त्रिआयडींची त्सुनामी वर्णिली चित्रगुप्ते नामी दुवा दिला येईल कामी 'इथे' पहावा /६/ http://www.misalpav.com/node/24707

पैसा Wed, 01/01/2014 - 20:07
लै भारी! थांबू नको. लिहीत रहा!!

arunjoshi123 Wed, 01/01/2014 - 21:20
अगाईगं. च्यायला त्या अमेरिकेचा जीडीपी कितीही होवो, जोपर्यंत चित्रगुप्त साहेबांसारखे लोक आमच्या देशात आउटपुट देताहेत तोपर्यंत आमचेच जीवनमान उच्च.

नाखु गुरुवार, 01/02/2014 - 10:25
वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस | कुवत नसता भंकस | करी तो येक डुआयडी |५| या आणि ईतर रचना म्हणजे: वेचूनी शब्द किमान| आशय फेडे तुमान| टवाळ घुसखोरांचा पर्दाफाश |डु-आयडींचा परामर्श ठायी ठायी |

In reply to by प्यारे१

सस्नेह गुरुवार, 01/02/2014 - 14:40
खर्‍या आयडींची लक्षणं देऊन डुआयडी म्हणताय काय?
नै रे प्यारेभौ, ते डुआयडी मेले अगदी बेमालूम आहेत बघ !

In reply to by मारकुटे

सस्नेह गुरुवार, 01/02/2014 - 14:44
तो अधिकार हभप प्यारेमहाराजांचा ! (ते एकटेच हात धुवून मागे लागलेत तर दत्तगुरु परेशान झालेत. आम्ही लागलो तर गुप्तच व्हायचे...)

In reply to by सुहास..

प्यारे१ गुरुवार, 01/02/2014 - 17:44
नामा, नामा... असं कसं बोलतोस रे???? हम्म्म! कळ्ळं का काय सांगितलं त्ये? बाबामहाराजांची काय ती रसाळ वाणी महाराजा. एकदा ऐकावं नि ऐकतच रहावं. राम क्रिष्ण हरि|