मिपाकरलक्षणे समास द्वितीय
लेखनविषय:
मिपाकरलक्षणे समास प्रथम
| | श्री मिसळ पाव ||
| डूआयडीलक्षणनाम समास द्वितीय |
मागा सांगितली लक्ष णे | मिपाकरांअंगी बाणे |
आता ऐका सोंग घेणे | असोनी येक आयडी |१ |
तयां नाव डुआयडी |नामे असती बहु फाकडी |
खवतुनी लाडीगोडी | करिती सदा |२|
घेई सोंगे कलह लावण्या | जुने स्कोर सेटल करण्या |
अथवा उगा मजा बघण्या | आयड्यांची |३|
बोली स्त्रीआयडींशी मधुर | मयतरी करण्या अति आतुर |
प्रतिसादी जो बहु चतुर | तो येक डुआयडी |४|
वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस |
कुवत नसता भंकस | करी तो येक डुआयडी |५|
शत्रुआयडीवरी खाय दाढा |संपादकांशी दीन बापुडा |
निर्लज्ज ढोंगी पाषाण कोरडा | तो येक डुआयडी |६|
काव्य साहित्य ना लेख |काथ्या कुटुनी करी राख |
पाकृ चोरी काही येक | दुज्या संस्थळीची |७|
संपादक-शत्रू लेखक-शत्रू | कवी-शत्रू कलाकार-शत्रू |
बल्लव-शत्रू सुगरण-शत्रू | तो येक डुआयडी |८|
आयडीचेनी अष्टगुणे | जया अंगी खोड्या बाणे |
सकळांचे काढी उणे | तो येक डुआयडी |९|
संयम राखो नेणे कदा | चेष्टा करू पाहे सर्वदा |
हसून खिजवी आयडींस सदा | तो येक डुआयडी |१०|
बहुतांचे मनींचे तुटे | उगा करी व्यनी खोटे |
क्षण बरा क्षणां पालटे | तो येक डुआयडी |११|
समस्तांशी मत्सर धरी | बहुतांचे पडीक धागे उकरी |
छद्मनामे स्कोर सेटल करी | तो येक डुआयडी |१२|
आनंदें आयडी बोलत जेथे | करी वटवट जाऊनी तेथे |
खफ आणि खव बळेच मंथे | तो येक डुआयडी |१३|
स्त्री आयडींशी सलगी देणे | कंपुंच्या संनिद्ध बैसणे |
नव आयडींस उगा खिजवणे | तो येक डुआयडी |१४|
काड्या सारुनी कौतुक पाहे | स्मायल्या सोडूनी निवांत राहे |
बाजार उठवूनी आपण नोहे |तया गावीचा |१५|
ऐसी लक्षणे डूआयडींची असती | बोलिली काही येक यथामती |
सावधान असावे श्रोतीं | डूआयडींपासुनी |१६|
पारखावी लक्षणे मनीं | आयडी -डूआयडींची दोनी |
वावरावे संस्थळी धरुनी | खूण गाठ |१७|
ज्ञानार्थ बोलिले लक्षण | असता मिपाकर विचक्षण |
पामरें केले परिक्षण | क्षमा केली पाहिजे |१८|
इति श्री मिपाबोधे लक्षण परिक्षण संवादे
शब्द मेळ साधे समास समाप्त.
वाचने
15317
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
जोरदार चालू आहे ....येउद्या अजून
In reply to झकास by चाणक्य
+१
हाहाहा...
जोरदार बॅटींग
येउ दे अजुन.
झक्कास.
हहपुवा.
भारी
भारीच!
तृतीय समास मिपावर रुसला कोपर्यात बसला अशा आयडींवर पाहिजे.
वाह वाह !! ;)
In reply to वाह वाह !! by सूड
>>शत्रुआयडीवरी खाय दाढा |संपादकांशी दीन बापुडा |
निर्लज्ज डोंगी पाषाण कोरडा | तो येक डुआयडी |६|
हे वाचून मीनाक्षीची आठवण आली. कुठे असेल बिचारी देव जाणे!! *cray2*
आंदो
स्नेहा, सॉलिड अभ्यास दिसतो आहे! :)
डु आयडीची लक्षणे आवडली. आता ज्येष्ठ सभासदांवर येऊ द्या.
मस्त ! और आंदो जल्दी जल्दी !!
ही लक्षणं वाचून आता 'डू आयडी' ओळखता येतोय का ते पाहते :-)
दंडवत!
आपल्याकडून मूळ दासबोध ऐकणे किती सुखद असावे!
डुआय्डीलक्षणनाम द्वितीय समास खूपच आवडला.
ऐकता ड्वायडीची लक्षणे
कुश्चिळ आणि विलक्षणे
मारोन फाट्यावर विचक्षणे
निद्रेसि भजावे /१/
अथवा घ्यावा तोचि छंद
स्वताशी हासोन मंद मंद
डुआयडी घेओन स्वच्छंद
मिपावरी धुडगुसावे /२/
ऐसा निश्चयो जाहला
डुआयडी पाहिजे घेतला
तरी योजावे कोणत्या नामाला
कळेना जाले /३/
श्रोते पुसती कोण नाम
घेता साधेल अवघे काम
वाचकासि फुटेल घाम
कोण्या नामे /४/
आता असो हे बोलणे
सत्वर दुआयडीस घेणे
क्रियेवीण काही बोलणे
वाचाळता /५/
स्त्रिआयडींची त्सुनामी
वर्णिली चित्रगुप्ते नामी
दुवा दिला येईल कामी
'इथे' पहावा /६/
http://www.misalpav.com/node/24707
In reply to इथे पहावा by चित्रगुप्त
लगे रहो चित्रगुप्तभौ !
लै भारी! थांबू नको. लिहीत रहा!!
फर्स्ट क्लास!!!!
अगाईगं. च्यायला त्या अमेरिकेचा जीडीपी कितीही होवो, जोपर्यंत चित्रगुप्त साहेबांसारखे लोक आमच्या देशात आउटपुट देताहेत तोपर्यंत आमचेच जीवनमान उच्च.
__/|\__
आफाट मारलय धरून!
पहिले सहा बाण तर इतके बेकार खोल मारलेत की क्या केहेने?
रक्तबंबाळ..रक्तबंबाळ केलय अगदी!
रक्तबंबाळ..रक्तबंबाळ केलय अगदी!मस्त. मजा येतेय वाचायला.
ए अजून अजून.... =))
:D :))
खतरनाक. आता दृष्ट्रांत येवूद्यात.
वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस |
कुवत नसता भंकस | करी तो येक डुआयडी |५|
या आणि ईतर रचना म्हणजे:
वेचूनी शब्द किमान| आशय फेडे तुमान|
टवाळ घुसखोरांचा पर्दाफाश |डु-आयडींचा परामर्श ठायी ठायी |
लगे रहो चित्रगुप्तभौ !+१झकास्स्स !
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद..!!
( हॅ हॅ हॅ )
In reply to धन्यवाद.. by गवि
धन्यवादासाठी मा. संपादकांचे धन्यवाद ! 

दंडवत ___/\___
*clapping*
झकासच
मस्त !
वा वा... वा वा
अगो.... सांभाळून हो!
(परिक्षण अम्मळ गंडलंय. खर्या आयडींची लक्षणं देऊन डुआयडी म्हणताय काय? ;) )
In reply to अगो.... सांभाळून हो! by प्यारे१
खर्या आयडींची लक्षणं देऊन डुआयडी म्हणताय काय?नै रे प्यारेभौ, ते डुआयडी मेले अगदी बेमालूम आहेत बघ !
हाही भाग जबरीच!!!
पण काही थोडं रिपिटिशन दिसतंय, हा डुआयडीचा परिणाम तर न्हवे ;)
डुआय्ड्या लै वेंजॉय करत्यात काय?? म्या बी एक ऐडी घेतुच आता... ;)
जरा एकदा दत्तोबांवर पण लिहा
In reply to जरा एकदा दत्तोबांवर पण लिहा by मारकुटे
तो अधिकार हभप प्यारेमहाराजांचा !
(ते एकटेच हात धुवून मागे लागलेत तर दत्तगुरु परेशान झालेत. आम्ही लागलो तर गुप्तच व्हायचे...)
In reply to श्री गुरुदेव दत्त ! by सस्नेह
दत्त दत्त
In reply to श्री गुरुदेव दत्त ! by सस्नेह
१४ नुकतंच उजाडलंय. का त्रास देताय गरीबाला? ३६३ दिवस जायचेत अजून.
In reply to १४ नुकतंच उजाडलंय. का त्रास by प्यारे१
जातील जातील दिवसच ते जातील
मुळात प्यारे१ हा हभप बाबा सातारकर महाराजांचा ड्यु आयडी आहे ;)
In reply to मुळात प्यारे१ हा हभप बाबा by सुहास..
नामा, नामा... असं कसं बोलतोस रे????
हम्म्म! कळ्ळं का काय सांगितलं त्ये?
बाबामहाराजांची काय ती रसाळ वाणी महाराजा. एकदा ऐकावं नि ऐकतच रहावं.
राम क्रिष्ण हरि|
मस्स्स्स्स्त!!!!
झकास