Skip to main content

साधा माणुस

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 27/09/2008 या दिवशी प्रकाशित केले.
साधा माणुस हे बरं आहे कि लोकं मला साधा म्हणतात साधे असण्याचे बरेच फायदे असतात मी मुद्दामुनच साधा रहातो येडा बनुन बरेच पेढे खातो आहो लोकं माझ्या साध्या बोलण्याला फसतात माझ्या बेशरम कबुलीला ते प्रांजळपणा म्हणतात मी स्वत:वरच टीका करतो लोकं म्हणतात किती प्रामाणिक आहो सांगुन फसवता येतं काय पाहिजे आणिक..? लबाडांचे पाय घेउन मी साधेपणाने वावरतो लबाडांच्या दुनियेत मी असाच रहातो मी असा रहातो म्हणुन पोट भरतो तुम्हिही भरा नाहीतर मरा
लेखनविषय:

वाचने 3001
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मस्त! :) आपला, (साधा!) तात्या.

मस्त लिहिलं आहेत (साधीसरळ) अदिती

15. झकास :) -दिलीप बिरुटे (साधा भोळा )

:) एकदम भारी.. रचना आवडली -(लबाड) ऋषिकेश

साधे पणातील लबाड पणा आवडला :)