मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साधा माणुस

चन्द्रशेखर गोखले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
साधा माणुस हे बरं आहे कि लोकं मला साधा म्हणतात साधे असण्याचे बरेच फायदे असतात मी मुद्दामुनच साधा रहातो येडा बनुन बरेच पेढे खातो आहो लोकं माझ्या साध्या बोलण्याला फसतात माझ्या बेशरम कबुलीला ते प्रांजळपणा म्हणतात मी स्वत:वरच टीका करतो लोकं म्हणतात किती प्रामाणिक आहो सांगुन फसवता येतं काय पाहिजे आणिक..? लबाडांचे पाय घेउन मी साधेपणाने वावरतो लबाडांच्या दुनियेत मी असाच रहातो मी असा रहातो म्हणुन पोट भरतो तुम्हिही भरा नाहीतर मरा

वाचने 3000 वाचनखूण प्रतिक्रिया 8

ऋषिकेश Sat, 09/27/2008 - 21:04
:) एकदम भारी.. रचना आवडली -(लबाड) ऋषिकेश