एप्रिल च्या मध्यास लिहिलेला हा पोस्ट अधिक विचारमंथनाच्या अपेक्षेने मिपाच्या वाचकांबरोबर शेअर करतो आहे.-
आमच्या १५ हुन अधिक वर्षांच्या वैवाहिक वाटचालीत काल प्रथमच सौ. ने माझ्या
व्यावसायिक बुद्धीमत्तेवर थोडासा विश्वास दाखवत असल्याचे दाखवुन स्वतःच्या
बुद्धीमत्तेची चुणुक दाखवली. "सोने खुप खाली आले आहे म्हणे, लोकं घेतायत, तुझे
काय मत आहे??" ह्या तिच्या 'लाखामोलाच्या' प्रश्नाने मी गडबडलो. याशिवाय अपेक्षे्प्रमाणे
क्लायंट्सच्या जवळ्पास प्रत्येक फोनमध्येही हा विषय येत् होताच. खरे तर सोने
हा काही माझ्या आकलनाचा प्रांत नाही पण तरीही जागतिक बाजारांत मागणी पुरवठा
तत्वावर मोठ्या प्रमाणांत व्यवहार होणारी ती एक कमॉडिटी असल्याने मुलभुत नव्हे
पण काही तांत्रिक बाबींचा उहापोह करता येतो का ते पहातो.
एकदा सोने ही कमॉडिटी असल्याचे मान्य केले की भावातील चढ-उतार होतच असणार हे
ओघाने आलेच आणि जेथे तेजी आहे तेथे कधी ना कधी मंदी येणारच, खरे तर हा तर्क
अगदी जन्म आहे म्हणजे मृत्यु असणारच या गृहितकाएवढाच स्पष्ट आहे. पण तरीही आपण
अनेकदा विवेकबुद्धी सोडुन वागतो आणि अडचणींत येतो.
सोने कधीच घसरत नाही.-- अशा अज्ञानमुलक गृहितांच्या पार्श्वभुमीवर बाजाराने
दिलेले असे अनपेक्षित झटके ( ते देणे हे बाजाराचे व्यवच्छेदक लक्षणच आहे) ठळक
मथळ्यांचे विषय होतात. अशा परिस्थितीत माझ्यासारख्या किरकोळ गुंतवणुकदाराने काय
करावे ह्या प्रश्नावरील हा माझा व्यक्तीगत दृष्टीकोण मी सांगणार आहे.
असा रामायणाला सुरवात होते ती काही ना काही कारणाने बाजारांत एखाद्या वस्तुकडे पहाण्याचा
गुंतवणुकदारांचा कल बदलल्याने. त्या कारणांची मीमांसा हा आताच्या लेखनाचा विषय नाही मात्र, येथे सोन्याबाबत तो तेजीकडुन मंदीकदे बदलला आहे एवढेच आपण गृहित धरु या,
बाजारांत विक्रीचा जोर वाढुन भावपातळी खाली जावु लागते. परिस्थितीनुसार अशा
विक्रीची तीव्रता कमी अधिक असते.
कधीतरी भावांतील फरक मोठा असुन भाव नुसते घसरण्याऐवजी गड्गड्ल्यास बाजारांत
प्रमुख दोन प्रतिक्रिया पहावयास मिळतात.
(१) भाव खुप खाली गेल्याने सुरवातीस आक्रमकपणे विक्री करणारे थोडीशी उसंत
म्हणुन का होईना थांबतात अणि (२) स्वस्ताईच्या प्रतिक्षेत असलेले किरकोळ
गुंतवणुकदार खरेदी साठी गोळा होतात. यामुळॅ भावपातळीत सुधारणा होते. खुप मोठ्या
घसरणीनंतर आलेल्या भावांतील अशा उसळीला तांत्रिक परिभाषेंत 'Dead Cat Bounce'
असे म्हटले जाते. ( अगदी मेलेला प्राणीही खुप उंचावरुन खाली आपटल्यास उसळु शकतो
या अर्थी.)
या अशा फसव्या तेजीमुळे वर उल्लेखलेले किरकोळ खरेदीदार त्यांच्या फायदेशीर
सौद्याचा आनंद उपभोगणार, तोच बाजारातील आणखी एक वर्ग या धुमश्चक्रींत सामील
होतो, हा असा वर्ग असतो, ज्याने तेजीचा कल असताना असा वस्तुची खरेदी ( अर्थातच
चढ्या दराने) केलेली असते व नंतर आलेल्या मंदीत वेळीच भाग घेता न आल्याने
घुसमटुन तो बाजार सुधारताच 'बाहेर पड्ण्याच्या' मनस्थितींत असतो. पॉज
घेण्यासाठी थांबलेले आधीचे मंदीवाले व हे घायकुतीला आलेले गुंतवणुकदार विक्रीचे
पुढ्चे आवर्तन सुरु करतात व बाजार अधिक खालची पातळी दाखवु शकतो. ----ह्या
खेळाचे प्रयोग अनेकदा होतात.
असे अनुभवास येते की प्रदीर्घ कालावधीनंतर जेंव्हा बाजारात अशी एखादी मोठी घसरण
येते, तेंव्हा प्रकरण एका भागांत संपत नाही, थोड्या थोड्या अंतराने असे
मंदीचे धक्के बसलेले दिसतात. बाजार विश्लेषकांच्या मते बा्जार कधीच एखाद्या
कारणाने , एखाद-दुसरया दिवसासाठी वगैरे आपला दीर्घकालीन कल बदलत नाही. या बाबत
कारण मीमांसा करताना नेहमीच 'cockroach theory' चा मनोरजक दाखला दिला
जातो.म्हणजेच ज्या प्रमाणे if you see one cockroach in your home, there are
likely many more,----- मंदी्ला कारणीभुत असणारया कारणांचेही काहीसे असेच आहे.
ती ही झुरळांप्रमाणेच एक एक करुन दृष्टॉत्पत्तीस येउ लागतात.
आपण लक्षांत ठेवावयास हवे की भावपातळीचा तळ निश्चित होणे ही एक प्रक्रिया आहे,
घटना नाही. ('Bottom formation is a process, not an event') खरे म्हणजे
गुंतवणुकदाराच्या दृष्टीने खरेदी हा भविष्यकाळाशी निगडित व्यवहार आहे, म्हणजेच
वस्तुची भविष्यकालीन किंमत ही आजच्या किंमतीपेक्षा अधिक असावी हे कोणत्याही
गुंतवणुकीमागील सोपे गृहित आहे पण अनेकदा आपण खरेदी चा संबंध भुतकाळाशी जोडतो.
कालच्या पेक्षा आज स्वस्त आहे,--- केवळ हाच खरेदीचा निकष कसा काय असु शकतो
? --- उद्याचे काय ?? हा प्रश्न माझ्या मते अधिक महत्वाचा आहे
तेंव्हा केवळ वृत्तपत्रीय मथळ्यांकडे पाहुन दिवाळी/दसरा साजरा करण्याची अनाठायी
घाई केल्यास कदाचित शिमगा ह्या सणाचे स्मरण ही नंतर होवु शकेल ह्याची जाणीव असो
द्यावी.
वाचने
71862
प्रतिक्रिया
152
मिसळपाव
प्रतिक्रिया
समजा समस्त स्त्री वर्गाला
घाटपांडे साहेब.......................
सोने
सोन्यात गुतंवणुक माझ्यामते **
+१
In reply to सोन्यात गुतंवणुक माझ्यामते ** by जेपी
http://www.24hgold.com
धन्यवाद.
In reply to http://www.24hgold.com by मारकुटे
सोन्याचे साखळदंड
छान लिहिलंय
>>सगळ्याच नाही तरी आता बर्
In reply to छान लिहिलंय by पैसा
>>>पण कधीच न घेतले तर मात्र
In reply to >>सगळ्याच नाही तरी आता बर् by प्रकाश घाटपांडे
सन २०४०
>>>(तज्ञांनी गणित
In reply to सन २०४० by ज्ञानव
पटले नाही.
In reply to सन २०४० by ज्ञानव
कदाचित
In reply to पटले नाही. by सुबोध खरे
आरे हो एक सांगायचे राहिलेच....
In reply to कदाचित by ज्ञानव
डॉ. खरे यांच्याशी सहमत
In reply to आरे हो एक सांगायचे राहिलेच.... by ज्ञानव
मार्जिन अकौंटला ...
In reply to डॉ. खरे यांच्याशी सहमत by उपाशी बोका
एक सुधारणा...
दागिन्यांचा अकारण सोस
@ज्ञानव
१३) सोने विकताना येणारी घट
In reply to @ज्ञानव by सुबोध खरे
डॉक्टर....तुम्हीसुद्धा
In reply to @ज्ञानव by सुबोध खरे
एक सुधारणा...
In reply to डॉक्टर....तुम्हीसुद्धा by ज्ञानव
चांदीची ऑद्योगिक क्षेत्रात बरीच गरज असते
In reply to डॉक्टर....तुम्हीसुद्धा by ज्ञानव
अगदी बरोबर....
In reply to चांदीची ऑद्योगिक क्षेत्रात बरीच गरज असते by प्रसाद१९७१
@ ज्ञानव - तुम्ही गहाण ठेवुन
In reply to डॉक्टर....तुम्हीसुद्धा by ज्ञानव
आणी सोन्याचा भाव उतरला तर ?
In reply to @ ज्ञानव - तुम्ही गहाण ठेवुन by प्रसाद१९७१
डॉक्टर साहेब - माझा सल्ला
In reply to आणी सोन्याचा भाव उतरला तर ? by सुबोध खरे
सोन्याचा भाव उतरला तरी....
In reply to आणी सोन्याचा भाव उतरला तर ? by सुबोध खरे
काही समजत नाही....
In reply to आणी सोन्याचा भाव उतरला तर ? by सुबोध खरे
उत्तम....
In reply to @ ज्ञानव - तुम्ही गहाण ठेवुन by प्रसाद१९७१
आपल्याच वरील प्रतीसादाप्रमाणे
In reply to उत्तम.... by ज्ञानव
साहेब.....
In reply to आपल्याच वरील प्रतीसादाप्रमाणे by सुबोध खरे
"युनिट्स"
लक्षात घ्या"युनिट्स"
वाढवत राहतो. माझे हि नियम तुमच्या सारखे साधेच आहेत की सोने हि दीर्घ मुदतीची गुंतवणूक आहे. आणि व्याज, कर काहीही ना चुकवता संपूर्ण कायदेशीर...उलट आमच्याच धंद्यात सगळे व्हाईट मध्ये व्यवहार होतात.....पद्धतीने करतो. पण तुम्ही म्हणता ती "बुद्धिवादी चर्चा किंवा गणिते" मला समजत नाहीत मी खरोखर एक अडाणी आहे जो संधी घट्ट धरून ठेवतो कारण सगळ्या प्राण्यांना शेपूट मागे असते "संधी" ह्या प्राण्याला शेपूट डोक्यावर असते ती येताना दिसली कि धरावी नाहीतर ती गेली कि गेली. सोने गहाण ठेवा हि जाहिरात हा माझा क्ल्यू होता मी म्हंटले सगळ्या बँकांना एकदम कसे वेड लागले कि त्या सोने गहाण ठेऊन पैसे देऊ लागल्या? मग थोडी बाजारत फेरी मारली आणि केले सुरु...आता २००६ साली मी हे सुरु केले तर तो योगायोग नाही कारण बँकाही तेव्हाच सोन्यावर कर्ज देऊ लागल्या आणि गम्मत अशी कि किसान विकास पत्र किंवा तत्सम गोष्टी गहाण ठेऊन मी ट्रेड करतच होतो तरी एवढी अक्कल नव्हती की सोनेपण ठेवावे.... असो कदाचित तुम्हाला ते समजाणार नाही कारण प्रत्यक्ष कामाचा तुम्हाला अनुभव नाही पण बँक जर बरोबर असेल आणि एक किंमती वस्तू माझ्याकडे असेल तर त्याला वेग कसा द्यायचा हे मी पूर्ण जाणतो..एक शंका
In reply to उत्तम.... by ज्ञानव
अजून शंका
In reply to एक शंका by उपाशी बोका
थोडी चूक
In reply to अजून शंका by उपाशी बोका
पण मी वर प्रतिसादात एक वाक्य
In reply to एक शंका by उपाशी बोका
"युनिट्स"
गोळा करतो आहे.त्यामुळे माझ्याकडचे सोन्याचा भाव अवरेज करून वेगवेगळा झाला आहे. माझा ब्रेक इव्हन पोइंत येऊन गेला आहे. मी एक पद्धत मांडली जी फूल प्रुफच आहे कारण वेळेत घेतलेला निर्णय कमावून देतोच. पण आता तुम्हाला माझ्या पद्धतीच्या ट्रेडिंगची सायकल परत मिळण्यासाठी थांबावे लागेल नुसतेच वाचले आणि ठरवले कि घ्या सोने असे तर नाही ना? आता तुम्हाला १८-२०००० पर्यंत भाव येण्याची वाट पहावी लागेल पण माझ्याकडे युनिट्स वाढल्याने मी मात्र मला हवा तसा ट्रेड करू शकतो. (व्याजाचे भान ठेऊन निर्णय घेत घेत.) बाकी तुमचा हिशोब बरोबर ३०००० ने घेतलेल्या सोन्यावर आता काय मिळणार? कदाचित माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल.सिस्टीम
In reply to पण मी वर प्रतिसादात एक वाक्य by ज्ञानव
बाकी तुमचा हिशोब बरोबर. ३०००० ने घेतलेल्या सोन्यावर आता काय मिळणार?leverage किती घातक ठरू शकतो, एव्हडेच मला इतरांना उदाहरणाने पटवून द्यायचे होते. माझा हिशोब बरोबर आहे, हे सांगितल्याबद्दल आभारी आहे. भाव ८,००० वरून १२,००० नंतर २५,००० आणि नंतर ३४,००० झाला, त्यामुळे तुमचे अॅव्हरेज कॉस्ट कमीच असणार. त्यामुळे ही सिस्टीम फूलप्रूफ आहे, असे तुम्हाला वाटणे सहाजिक आहे. माझ्या मते हा भ्रम आहे. (fallacy). जर ८००० किमतीवरून १२,००० जाण्याऐवजी किंमत ६५०० वर गेली असती, तर वर म्हटल्याप्रमाणे नुकसान झालेच असते.आता तुम्हाला माझ्या पद्धतीच्या ट्रेडिंगची सायकल परत मिळण्यासाठी थांबावे लागेल नुसतेच वाचले आणि ठरवले कि घ्या सोने असे तर नाही ना? आता तुम्हाला १८-२०००० पर्यंत भाव येण्याची वाट पहावी लागेलतुमच्या सिस्टीमप्रमाणे २५,०००ला (च) का थांबलात किंवा १८-२०,०० पर्यंत का थांबायचे, ते जरा स्पष्ट करू शकाल का?गुंतवणूक किंवा ट्रेड हयाची वेळ हि तितकीच महत्वाची आहे.तुमच्या मते, तुमची सिस्टीम हा गुंतवणूकीचा प्रकार आहे की ट्रेडिंगचा?माझी सिस्टम
In reply to सिस्टीम by उपाशी बोका
वासावरून चव ओळखण्याचे कसब
In reply to माझी सिस्टम by ज्ञानव
धन्यवाद
In reply to वासावरून चव ओळखण्याचे कसब by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हा विरोधाभास आहे.
In reply to उत्तम.... by ज्ञानव
मग तेव्हढा
In reply to हा विरोधाभास आहे. by प्रसाद१९७१
डॉक्टर साहेब - तुमचे एकदम
In reply to @ज्ञानव by सुबोध खरे
सोन्याचा भाव
माधवराव....
In reply to सोन्याचा भाव by मारकुटे
रावच शेपुट नका लावू...
In reply to माधवराव.... by ज्ञानव
"सोने खुप खाली आले आहे म्हणे,
"सोने खुप खाली आले आहे म्हणे, लोकं घेतायत, तुझे काय मत आहे??" ह्या तिच्या 'लाखामोलाच्या' प्रश्नाने मी गडबडलो.मी तर स्वतःच (बायकोने विचारायच्या आधीच) तिला म्हणतो "अग, जरा सोने घेतो तुझ्यासाठी." पण नवर्यावर "पूर्ण विश्वास" असल्याने तिला लगेच शंका येते, मग तीच म्हणते "जाऊ दे, मी कुठे वापरते कधी. नाहीतरी बँकेतच पडून राहाणार ना". मी लगेच आज्ञाधारकपणे "बरं" म्हणतो. याला म्हणतात "साप भी मरे और लाठी भी ना टूटे". ती इथे मिपावर येत नाही, म्हणून बरे, नाहीतर काही खैर नाही. :)एक महत्वाची गोष्ट :
साहेब मी ट्रेड
In reply to एक महत्वाची गोष्ट : by डॉ सुहास म्हात्रे
वरचा प्रतिसाद अजून स्पष्ट
In reply to साहेब मी ट्रेड by ज्ञानव
सुरक्षीतता व व परतावा ह्या
In reply to एक महत्वाची गोष्ट : by डॉ सुहास म्हात्रे
युनिट ६४
In reply to सुरक्षीतता व व परतावा ह्या by प्रसाद भागवत
१. तुमचे मत बँकेच्या
In reply to सुरक्षीतता व व परतावा ह्या by प्रसाद भागवत
सर, आपल्या पतिपादनाशी मी
In reply to १. तुमचे मत बँकेच्या by डॉ सुहास म्हात्रे
१. तांत्रिक्द्रुष्ट्या काहीही
In reply to सर, आपल्या पतिपादनाशी मी by प्रसाद भागवत
तांत्रिक्द्रुष्ट्या काहीही असले तरी युनिट ट्रस्ट ची स्थापना केंद्रसरकारनेच आपल्या अन्य मध्यस्थांकरवी केली होती. त्यावर सरकारचे अप्रत्यक्ष पणाने पण पुर्ण नियंत्रण होते हे विसरता येणार नाही. आत्ता आपणास या . पी पी एफ् योजनेबद्दल असलेला विश्वास अनेकांना अगदी आपण सांगत असलेल्या मुद्द्यांमुळेच त्यावेळी युनिट ट्रस्ट बद्दल होता, ही वस्तुस्थिती आहे. तेंव्हा या दोघांची तुलना करणे अपरिहार्य आहे.ही केवळ तांत्रिक नाही पण बाजारी व्यवस्थेतील पूर्ण सत्य आहे. यु टी आयला मदत करणे हा १००% राजकिय फायद्याचा / नाईलाजाचा निर्णय होता तो कायद्याने जरूर नव्हता; जसा अमेरिकन पेन्शन फंड सांभाळणार्या वित्तसंस्थांना अमेरिकेने जागतिक आर्थिक संकटाच्या सुरुवातीला केला होता अगदी तसाच. राजकीय भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या सरकारला कधी पैसा कमी पडला आहे?... आणि शेवटी हा सगळा पैसा जनतेने दिलेल्या करांतून अथवा देशाच्या नावावर कर्ज घेऊन अथवा देशाच्या नोटा छापूनच उभा केला जातो ! आर्थिक संकटाच्या वेळी अमेरिकेवर १० पेक्षा जास्त ट्रिलियन डॉलरचे कर्ज होते तरी २ ते ३ ट्रिलियन डॉलर कर्ज ज्यांनी बेजबाबदारपणे अर्थव्यवस्था बुडवली त्या अर्थसंस्थाना जवळ जवळ शून्य व्याजदराने दिले गेले. आता ते कर्ज १७ ट्रिलियनच्याही वर गेले आहे आणि दर क्षणाला वाढत आहे. तरी क्वांटिटेटिव्ह इझिंगच्या नावाखाली अर्थव्यवस्थेत पैसा छापून ओतणे आजही चालूच आहे. ते जरी मार्च २०१४ ला बंद करू म्हटले असले तरी ते होण्याची खास लक्षणे नाहीत असाच तज्ञांचा अंदाज आहे. येथे डोकावा आणि गम्मत पहा. सरकारचे यु टी आयवरचे नियंत्रण आणि ५१% शेअर असलेल्या वैयक्तीक भागधारकाचे लिमिटेड कंपनीवरचे नियंत्रण यात शब्दशः काही फरक नाही. पूर्वी १००% टक्के सरकारी असलेल्या पण आत्ता डायव्हेस्ट केलेल्या आणि शेअरमार्केटवर नोंदवलेल्या कंपन्यांवर सरकारचे बहुमताचे नियंत्रण आहे आणि त्यांच्याकडून आपले बहुमत वापरून सरकार शक्य तेवढा आणि हवा तेवढा डिव्हिडंड घेते. पण त्याचा अर्थ असा नाही की उद्या जर त्या कंपन्या बुडीत निघाल्या तर सरकार भागधारकांना त्यांचे पैसे आताच्या शेअरच्या किंमतीप्रमाणे परत करेल. कंपनीची सगळी देणी देऊन उरलेली रक्कम (जर उरलीच तर) प्रत्येक भागधारकाला त्याच्या भागांच्या समप्रमाणात वाटली जाईल. मात्र कंपनी लिमिटेड असल्याने भागधारकाला कंपनी न फेडू शकलेल्या कर्जाचा भार उचलावा लागणार नाही हीच काळ्या ढगाची रुपेरी कडा ! पी पी एफ् हे कायद्याने स्वतः भारत सरकारने प्रत्येक ठेवीधारकाकडून स्वतंत्रपणे घेतलेले कर्ज आहे. त्यामूळे ते भारत सरकारची तडक जबाबदारी आणि सरकारच्या बाजारातल्या पतीशी तडक जुळलेले आहे.त्यामुळे जर कोणी ते दोन्ही एकच समजले तर तो एक फार मोठा आणि कदाचित महागडा ठरणारा केवळ गैरसमज होता/आहे.२. सब्सीडीबाबतच्या भारत सरकारच्या भुमिके बद्दल कृपया गैरसमज ठेवू नका. गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये) बालीत झालेल्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गॅनायझेशनच्या सभेत (ब्राझील वगैरेंनी सर्व देशांनी माघार घेतल्यानंतरही) एकट्या भारताने हट्ट धरून सब्सीडी कायम ठेवण्याचा क्लॉज मंजूर करून घेतलेला आहे. नुकताच मंजूर केलेला अन्न सुरक्षा कायदा हा भारतात या ना त्या कारणाने सब्सिडी पुढची अनेक वर्षे चालूच राहणार याची ढळढळीत साक्ष देत आहे. हे दोनच पुरावे येथे पुरे ठरावेत. असो. इथे खूप झाले. प्रत्यक्ष भेट आवडली असती. पण मी सद्या भारतात नसल्याने अधिक चर्चा खरड वही / व्यनीवर करायला आवडेल.फक्त अजून एकच महत्वाचे आणि
In reply to सर, आपल्या पतिपादनाशी मी by प्रसाद भागवत
एकेकाळी अशा योजनांतुन पैसे गोळा करणे ही अर्थव्यवस्थेची गरज होती कारण तुलनात्मक रित्या ते स्वस्तच पडत असत. मात्र अलिकडे वा भविष्यात परिस्थिती तशी रहिलेली नाही.पी पी एफ चे पैसे सरकारी योजनांत वापरात येत असले तरी विनातरण कर्ज मिळवणे हा तिचा दुय्यम हेतु आहे. मुख्य हेतू सर्वसामान्य लोकांना निवृत्तिच्या काळात आर्थिक सुरक्षा देणे आहे. याच कारणासाठी तिच्या नावात "प्रॉव्हिडंड" हा शब्द आहे. आणि म्हणूनच आर्थिक झळ सोसूनही ही योजना सरकार अधिकाधिक आकर्षक ठेव॑त आलेले आहे. १५ वर्षे लॉक इन ही अट जाचक असली तरी ती प्रॉव्हिडंड फंड या कल्पनेशी मिळतीजुळती आहे आणि तो पैसा विनाकारण सर्वसामान्य कारणासाठी वापरला जाण्याची शक्यता काही अंशी कमी करते. अर्थात त्यामुळे सरकारला हा पैसा जास्त काळासाठी वापरायला मिळतो हा एक दुय्यम फायदा (जादा व्याज देऊनच मग) मिळतो.१. तुमचे मत बँकेच्या
In reply to सुरक्षीतता व व परतावा ह्या by प्रसाद भागवत
एक महत्त्वाची गोष्ट्
काय डॉक्टर साहेब....
In reply to एक महत्त्वाची गोष्ट् by सुबोध खरे
माझ्या म्हणण्याचा साधा सरळ
In reply to काय डॉक्टर साहेब.... by ज्ञानव
माझ्या म्हणण्याचा साधा सरळ
In reply to काय डॉक्टर साहेब.... by ज्ञानव
या उक्तीप्रमाणे साहेब माझा
या उक्तीप्रमाणे साहेब माझा वैद्यकाचा धंदा चालतो आहे तो सोडून हा सटोडियाचा धंदा करणे नाही. आधी प्रपंच करावा नेटका+११०० टक्के सहमत
(१) सोन्याचा भाव जो आज ३२०००
२५००० काय २०००० होईल
In reply to (१) सोन्याचा भाव जो आज ३२००० by प्रसाद भागवत
अहो ज्ञानव सर, "कसा हो वाचतो
In reply to २५००० काय २०००० होईल by ज्ञानव
म्हणजे केवळ कर....
In reply to अहो ज्ञानव सर, "कसा हो वाचतो by प्रसाद भागवत
श्रीमान ज्ञानवजी,
In reply to म्हणजे केवळ कर.... by ज्ञानव
साहेब,
In reply to म्हणजे केवळ कर.... by ज्ञानव
एक शंका....
In reply to साहेब, by सुबोध खरे
साहेब
In reply to एक शंका.... by ज्ञानव
साहेब हे फार मोघम होतंय....
In reply to साहेब by सुबोध खरे
तुम्ही सात वर्षे कुठून
In reply to साहेब हे फार मोघम होतंय.... by ज्ञानव
जरा वाद बाजूला ठेऊन अवांतर....
In reply to तुम्ही सात वर्षे कुठून by सुबोध खरे
साहेब,
In reply to जरा वाद बाजूला ठेऊन अवांतर.... by ज्ञानव
पण आठव्या वर्षी सरळ लिहिता
In reply to साहेब, by सुबोध खरे
मूळ मुद्द्याला फाटा फोडून
In reply to पण आठव्या वर्षी सरळ लिहिता by ज्ञानव
ग्रेट
In reply to मूळ मुद्द्याला फाटा फोडून by सुबोध खरे
कोणतीही 'टान्स्फर'
In reply to एक शंका.... by ज्ञानव
तारण
In reply to साहेब, by सुबोध खरे
आयडिया....
In reply to साहेब, by सुबोध खरे
माझ्या बालबुद्धीनुसार उत्तर
In reply to आयडिया.... by ज्ञानव
@उपाशी बोका - जर तुम्ही
In reply to माझ्या बालबुद्धीनुसार उत्तर by उपाशी बोका
प्रतिसादांमधून उत्तम माहिती
ही गुंतवणूक म्हणजे फारच कटकट
होय, त्या रकमेतील मिळालेले
In reply to ही गुंतवणूक म्हणजे फारच कटकट by प्रकाश घाटपांडे
वास्तविक ह्याचे लॉजिक वर दिले आहे...पण
श्रीमान ज्ञानवजी,
*** करसवलत मिळविण्यासाठी
In reply to श्रीमान ज्ञानवजी, by प्रसाद भागवत
शब्दाचा अथवा कायद्याचा कीसच
In reply to *** करसवलत मिळविण्यासाठी by ज्ञानव
आपण एक एक मुद्दा घेऊ
बापरे बाप!
+१००%
In reply to बापरे बाप! by साती
मी पण.
In reply to +१००% by ज्ञानव
हो
In reply to मी पण. by साती
(No subject)
In reply to मी पण. by साती
=))
In reply to मी पण. by साती
सुखवस्तु गरिबांनी सुखवस्तु
अत्यंत मार्मिक...
In reply to सुखवस्तु गरिबांनी सुखवस्तु by नगरीनिरंजन
गुंतवणूक आणि ट्रेड
In reply to अत्यंत मार्मिक... by ज्ञानव
नक्कीच....
In reply to गुंतवणूक आणि ट्रेड by उपाशी बोका
100
बातमी
फार कन्फ्युजन आहे.. मला एक
तुम्हाला जेंव्हा कधी पैसे परत
In reply to फार कन्फ्युजन आहे.. मला एक by काळा पहाड
पी पी एफ.....मी प्रिफर करीन.
In reply to फार कन्फ्युजन आहे.. मला एक by काळा पहाड
SECTIONS 80C TO 80U SPECIFIES
जेथे "कर" माझे जुळती....
उत्तर
In reply to जेथे "कर" माझे जुळती.... by ज्ञानव
बाकी आपण सी ए आहात का ? ह्या साध्या शब्दात आणि तर्कशुद्ध भाषेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले असते तर आवडले असते.तुम्ही उगीचच फार काथ्याकूट करताय, असं माझं मत झालंय. तुमच्या या अट्टाहासाखातर मी माझ्या सी.ए. मित्राशी बोललो. तो म्हणाला, पीपीएफ गुंतवणुकीवर टॅक्स वाचतो, withdrawals आणि व्याज हे टॅक्स-फ्री असतात. जर किमान १ लाख वार्षिक उत्पन्न असेल, तर तुम्ही किमान ५०० आणि कमाल १ लाखपर्यंत पीपीएफमध्ये भरू शकता (तुम्ही withdrawal घेतले किंवा नाही घेतले तरी). आता तुमचे समाधान झाले का? नसेल झाले, तर "तुमच्या" सी.ए.बरोबर बोला.बाकी माहीर तर मी आहेच.या बाबतीत मी सहमत नाही, असं खेदाने म्हणावे लागेल. तुम्ही स्वतः सी.ए. नाही, CFP पण नाही, तरी आर्थिक सल्लागाराचे काम करताय, म्हणजे आश्चर्यच आहे. तुमचे क्लायंट तुमच्यावर विश्वास ठेवत असतील, पण मी ठेवणार नाही, हे मात्र नक्की. कोणावरही आंधळा विश्वास ठेऊ नये, असे माझे स्पष्ट मत आहे.१००% सहमत
In reply to उत्तर by उपाशी बोका
ज्ञानवजी
बाळासाहेब,,,,,,
In reply to ज्ञानवजी by आदूबाळ
.
सुधारणा.....
In reply to बाळासाहेब,,,,,, by ज्ञानव
आजकी ताजा खबर!!!
अरे फिर ....
In reply to आजकी ताजा खबर!!! by आयुर्हित
काय ठरलं मग?
सो गया ये जहां, सो गया आसमां!
सध्या काय परिस्थिती आहे?
१) सामान्य माणसाने , वा
६) शेवटी सर्वात महत्वाचे,
In reply to १) सामान्य माणसाने , वा by जयन्त बा शिम्पि
"लिमिट का ठेवली?
In reply to ६) शेवटी सर्वात महत्वाचे, by प्रकाश घाटपांडे
मग सरकार नेहमी कर्जबाजारीच का
In reply to "लिमिट का ठेवली? by पगला गजोधर
दोन चार टक्क्यांनी कोण
In reply to मग सरकार नेहमी कर्जबाजारीच का by प्रकाश घाटपांडे
प्रतिसाद नंतर वाचला.
In reply to दोन चार टक्क्यांनी कोण by सुबोध खरे
सरकारला जागतिक बँकेकडून किंवा
In reply to ६) शेवटी सर्वात महत्वाचे, by प्रकाश घाटपांडे
सरकार ३९% (पर्यंत) (९ टक्के
In reply to सरकारला जागतिक बँकेकडून किंवा by सुबोध खरे
साहेब
In reply to सरकार ३९% (पर्यंत) (९ टक्के by प्रसाद भागवत
असहमत....सरकार देत असलेली कर
In reply to साहेब by सुबोध खरे
असहमत....सरकार देत असलेली कर
In reply to साहेब by सुबोध खरे
करसवलत हे अल्प व्याजाने
In reply to असहमत....सरकार देत असलेली कर by प्रसाद भागवत
असहमत....सरकार देत असलेली कर
In reply to साहेब by सुबोध खरे
ओह.. पोस्ट्च्या पुनुरुक्ती
In reply to साहेब by सुबोध खरे
प्रसाद साहेब
In reply to ओह.. पोस्ट्च्या पुनुरुक्ती by प्रसाद भागवत
चक्रवाढ दराने सात हजाराचे
In reply to प्रसाद साहेब by सुबोध खरे
डॉ.साहेब, एखाद्या गुंतवणुकीवर
In reply to प्रसाद साहेब by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब, हे जरी खरे असले
In reply to सरकारला जागतिक बँकेकडून किंवा by सुबोध खरे
तीव्रतेने असहमत...मात्र हा
In reply to १) सामान्य माणसाने , वा by जयन्त बा शिम्पि
आणी सोन्याचा भाव उतरला तर ?
सरकारला जागतिक बँकेकडून
सोने हा आतबट्ट्याचा व्यवहार
नुकतीच सरकारने लाँच
सोने आपल्याकडॅ हवेच कारण ते
In reply to नुकतीच सरकारने लाँच by मार्मिक गोडसे
तुमचे सोने सरकारकडे ठेवा
Gold monetisation scheme
In reply to तुमचे सोने सरकारकडे ठेवा by प्रकाश घाटपांडे
सोने आपल्याकडॅ हवेच
सोन्यासोबत फार भावना असतात हो
In reply to सोने आपल्याकडॅ हवेच by मार्मिक गोडसे
जर पी पी एफ ला मर्यादा ठेवली
सोने को कभी ना मत कहो ;)