मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कॉकटेल लाउंज : क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail)

सोत्रि · · पाककृती
‘कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail) पार्श्वभूमी: Crabby ह्या शब्दाचा Crabbie असा अपभ्रंश करून, मात्र त्याचा अर्थ तोच घेऊन, हे कॉकटेल बनले आहे. खरेतर मी घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीतून Mixology मधला काहीतरी प्रयोग करायला गेलो आणि त्या प्रयोगाचे कॉकटेल ऑलरेडी अस्तित्वात होते हे आंजावर शोध घेता कळले, तेच हे क्रॅबी कॉकटेल. मालिबू रम हा ह्या कॉकटेलचा आत्मा आहे. मालिबू रमचे अंग म्हणजे 'एक मखमली' टेक्स्चर आणि चवही तितकीच भन्नाट! तिचे अननसाच्या रसाबरोबर जुळणारे सूत हे कॉकटेला एक वेगळीच 'उंची' देऊन जाते.
प्रकार व्हाइट रम आणि मालिबू बेस्ड कॉकटेल
साहित्य
व्हाइट रम १ औस (३० मिली)
मालिबू २ औस (६० मिली)
संत्र्याचा रस १ औस (३० मिली)
अननसाचा रस १ औस (३० मिली)
बर्फ
ग्लास मॉकटेल ग्लास
कृती: कॉकटेल शेकरमध्ये बर्फ भरून घ्या. त्यानंतर त्यात अनुक्रमे व्हाइट रम, संत्र्याचा रस, मालिबू आणि अननसाचा रस ओतून घ्या. सर्व घटक एकजीव होतील असे शेकर मध्ये शेक करुन घ्या. कॉकटेल शेकरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे. शेक केलेले मिश्रण मॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या. झक्कास आणि क्रॅबी चवीचे 'क्रॅबी कॉकटेल' तयार आहे :)

वाचने 10314 वाचनखूण प्रतिक्रिया 24

In reply to by गणपा

सोत्रि 27/12/2013 - 15:23
हे ह्या विकांतासाठीचे कॉकटेल आहे. न्यु इयर पेश्शल मंगळवारी टाकणार आहे. :D - (साकिया) सोकाजी

In reply to by सोत्रि

वसईचे किल्लेदार 31/12/2013 - 16:27
ते पेश्शल कॉकटेल ...

वेताळ 27/12/2013 - 18:27
आता गणपाशेठ तुमचा पण उप्वास सुटला असेल तर एकादी न्युईयर पाकृ येवु दे.

मुक्त विहारि 27/12/2013 - 18:33
नॉट स्टर्ड.. काय बरोबरना, सोत्रि गुर्जी.... बाय द वे, मंगळवारची आतुरतेने वाट बघत आहे.... (व्हिस्कीचे एखादे कॉकटेल असेल तर उत्तम...)

विनोद१८ 27/12/2013 - 20:12
............*new_russian* \m/ \M/........*drinks* *DRINK* :drink:.....
....सोमरसतज्ञ..वारूणीमहर्षी..श्रीमान सोकजीरावाना धन्यवाद, बर्‍याच दिवसाचा असलेला सोकाट आता नक्कीच जाइल.
विनोद१८

आनंदी गोपाळ 27/12/2013 - 20:31
मालिबूमधे व्हाईट रम टाकून फॉर्टीफाय करायची आयडिया छानेय. बाकी मग संत्र्/अन्नसाला फाटा दिला तरी चालून जाईल ;) बाकी ३१ तार्खेला प्यायला बसाल तर शक्यतो आपल्याच घरी बसा. पिऊन गाडी चालवू नका. आन सर्वात म्हत्वाचे, आपल्या लाडक्या दारू दुकानदाराकडून १ दिवसाचे प्यायचे लायसन काढून घ्या. म्हंजी पोलिसाने पकडून फुगा फुगवाया लावलाच, तरी प्राब्लेम येनार न्हाई. म्हारास्ट्र सर्कारी क्रूपेने देशीदारू साठी रु २ व विदेशीसाठी रुपये ५ खर्चून दारू पिण्याचे १ दिवसाचे परमिट मिळते.

In reply to by मुक्त विहारि

डॉ सुहास म्हात्रे 27/12/2013 - 22:19
कायद्याची माहिती असली म्हणजे, काय द्यायची माहिती नसली तरी चालले...लै झ्याक ! :)

वाटाड्या... 27/12/2013 - 22:15
सोत्रीशेठ.. व्हाईटाऐवजी रेड रम टाकल्यास चालेल का? हे बनवल्यावर उसाचा रस समजुन कुणी पिऊ नये म्हणजे झालं *fool* :-| :| =| :-|

अमेय६३७७ 28/12/2013 - 06:57
झकास कॉकटेल. आता न्यू इयर पेशलच्या प्रतीक्षेत.

In reply to by भटक्य आणि उनाड

सोत्रि 28/12/2013 - 12:44
बेलीज आयरीश क्रीम वापरली तर चालेल?
अननस आणि ऑरेंज ज्युस असल्याने आयरीश क्रीम चालणार नाही. - (साकिया) सोकाजी