अखाडा - गझल
लोकहो !
बरेच दिवसांनी गझल लिहून झाली. तात्या, चित्तरंजन, मिलिंद, केशवसुमार आणि इतर मित्र फार मागे लागले होते गझल लिही, गझल लिही. मला लिहिते करण्यात त्यांचा वाटा आहे. म्हणून ही गझल या मित्रांना अर्पण.
केश्या,
आता या गझलेचे झकास विडंबन टाक पाहू ! तुला कच्चा माल दिला आहे. काफियाही विडंबनाला अनुकूल आहे. काहीतरी झणझणीत विडंबन येऊ दे. मिसळपावला शोभेल असं.
झ== हाही काफिया विडंबनात तुला वापरता येईल. गझलेवर असलेल्या बंधनांमुळे मी तो वापरू शकलेलो नाही. पण विडंबनात तो फिट बसतो. असो.
तर गझल अशी आहे:-
जिंदगी झाली अखाडा
रोज खस्ता, रोज राडा
गारवा नाही मिळाला
सोसला नुसता उकाडा
दु:खितांचे गीत माझे
हा न धेंडांचा पवाडा
सूर्य क्रांतीचा उगवला
खोल रे आता कवाडा !
काय मी मेलो कळेना?
भोवती पडला गराडा
हासतो माझ्यासवे मी
पाहुनी माझा चुराडा
वेदना शब्दात आली
तूच गझले कर निवाडा
--- धोंडोपंत
वर्गीकरण
मस्त गजल!
In reply to मस्त गजल! by प्रमोद देव
धन्यवाद प्रमोदराव
"काय मी
In reply to "काय मी by राजे (verified= न पडताळणी केलेला)
राजे
मस्त/एक प्रयत्न
In reply to मस्त/एक प्रयत्न by नंदन
वा!
In reply to मस्त/एक प्रयत्न by नंदन
वा वा वा वा
In reply to मस्त/एक प्रयत्न by नंदन
हाहा
In reply to मस्त/एक प्रयत्न by नंदन
खासच
In reply to मस्त/एक प्रयत्न by नंदन
मस्त रे !
मस्त !!!
In reply to मस्त !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद प्राध्यापक साहेब
सुंदर..
तात्या
वाहव्वा
मस्त
वा!
वा, पंत
चुराडा !!!
छान
फक्कड
सुंदर / सुंदर गझल