रणधुमाळीनंतरची निरीक्षणे, विश्लेषणे आणि आडाखे
- या वेळेचे मतदान हे बर्यापैकी भ्रष्टाचाराच्या विरोधातले होते. बर्यापैकी अशासाठी कारण मध्यप्रदेशात काही मंत्र्यांवर आरोप होते तरी देखील भाजपाला जास्तच जागा मिळाल्या. कारण जनतेचा असलेला म.प्र. नेतृत्वावरील आणि त्यांच्या स्वच्छ प्रतिमेवरील विश्वास.
- वरील विधानातून जर मोदींचा प्रभाव नाही असे कोणी अनुमान काढू लागला तर ते तितकेसे बरोबर ठरेल असे वाटत नाही. राजस्थानात वसुंधरा राजे यांचा इतके मोठा प्रभाव नाही की त्यांच्यामुळे भाजपाची लाट यावी.
- त्याव्यतिरीक्त मोदींची इतकी बदनामी करून देखील जनता आता भिक घालत नाही हे स्पष्ट झाले आहे. मी स्वतः मोदींचा अथवा कुठल्याच नेत्याचा आंधळा फॅन नाही. पण मोदींच्या नावाने बागुलबुवा करून डाव्या विचारवंतांनी गेल्या दहावर्षात अक्षम्य अशी सामाजीक फूट पाडली आहे असे माझे स्पष्ट मत आहे. त्यांना यातून धडा मिळाल्यास आनंद नक्की वाटेल.
- राजस्थानात केवळ दोन मुस्लीम आमदार निवडून आले आणि दोन्ही भाजपाचे आहेत.
- मध्यप्रदेशात २२ मुस्लीम बाहुल्य असलेल्या मतदार संघांपैकी २१ ठिकाणी भाजपा अथवा कॉग्रेसेतर उमेदवार जिंकला/ली. फक्त काँग्रेसकडून अरीफ अकील हे पाचव्यांदा जिंकून आलेले मुस्लीम उमेदवार आहेत. त्यांना देखील नंतर म्हणावे लागले आहे की "काँग्रेस आता तरी मुस्लीमांकडे एक व्होटबँक म्हणून पहाणार नाही".
- वनवासी भागात देखील काँग्रेसची मते कमी झालेली आढळलेली आहेत.
- या निवडणुकीत सर्वत्र एकंदरीतच जातीवरून मतदान कमी झाले आहे असे वाटते.
- आपच्या उमेदवारांपैकी १३ उमेदवार हे काँग्रेस अथवा भाजपाकडून तिकीट न मिळालेले बंडखोर उमेदवार होते असे भाजपाचे नेते गोयल म्हणाल्याचे हिंदू मध्ये वाचले. (पण कुणास अधिक माहिती असली तर आवडेल)
- भारतातील आणि अमेरीकेतील डाव्या (कम्युनिस्ट) विचारांच्या टोळ्यांनी आवाज केल्यामुळे ज्या कँडोलिसा राईसच्या अख्त्यारीत मोदींचा व्हिसा रद्द करण्यात आला होता, त्याच राईस आता (एनडीटिव्हीवर) म्हणू लागल्या आहेत की अमेरीकेने आता भूतकाळ विसरायला हवा. (जो भूतकाळ न्यायालयांनी देखील मानला नाही तो होताच कुठे हा वेगळा प्रश्न आहे). जस्ट इन केस मोदी आलेच तर अगदीच फजिती झाली असे वाटायला नको याची अमेरीकेने तयारी चालू केलेली आहे असे वाटत आहे.
- मणीशंकर अय्यर यांनी आपले तोंड उघडले आहे आणि आता ते पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दोष देऊ लागले आहेत तर काही काँग्रेसजन हे पी चिदंबरम ना दोष देऊ लागले आहेत. ते पुढे म्हणाले, " He (म्हणजे राहूल) has revamped student and youth wings, started efforts to integrate panchayati raj representatives in the party system. 24 Akbar Road (Congress headquarters) was the biggest mortuary until he took charge. It is now very active." याचा अर्थ सोनीयांना नावे ठेवली जात आहेत हे त्यांच्या लक्षात आलेले दिसत नाही. मला वाटते काँग्रेसी संस्कृतीस गांधी घराण्याची इतकी सवय आहे की उद्या सोनीया-राहूल हरले तरी ते त्यांच्याच पाया पडण्यात कृतकृत्य होणे मानतील. वास्तवीक काँग्रेसमधे देखील नेतृत्वगुण असलेले कमी आहेत असे नाही पण गांधी कुटूंब एके गांधी कुटूंबच्या सवयीने पुढे काही चालू शकेल असे वाटण्यासारखी परीस्थिती आज तरी नाही.
- सीमांध्रच्या काँग्रेसमधील खासदारांनीच अविश्वासाचा ठराव आणला आहे. पण आजच्या घडीस तरी तो यशस्वी होईल असे वाटत नाही. ममतांनी त्याला विरोध केला आहेच.
- काँग्रेसमधे फूट पडण्याची शक्यता नसली तरी काही उंदीर जहाजातून पळून जाऊ शकतात, त्यात काही आश्चर्य नाही.
- काँग्रेसचे नेते हे पारंपारीक पध्दतीने जिंकण्यात तरबेज आहेत, त्यांना "खोक्या"च्या बाहेरचा विचार करता येतही नाही आणि करवतही नाही. बाहेर घडणार्या बदलाला सामोरे न जाता परत परत तेच करणार - पॉप्यूलीस्ट निर्णय, कुणाची (मोदी, केजरीवाल आणि इतर कोणी) तेहेलका नसेल पण कोब्रापोस्ट वगैरेकडून बदनामी करता आली तर त्यास प्राधान्य, असे कुंपणाच्या आतले खेळच खेळले जातील असे वाटते.
- केजरीवाल आणि त्यांच्या टीमला नक्कीच पॉझिटीव्ह उर्जा मिळाली आहे. त्यातील एकाची मुलाखत बघत असताना त्याचे तरी पाय जमिनीवर दिसले. जर जमिनीवर राहून आणि आदर्शपणाचा आचरट शोऑफ न करता पुढे जायचे ठरवले तर ते अजूनही मोठी शक्ती होऊ शकतील आणि तशी ते झाले तर त्याचे दूरगामी परीणाम चांगले होऊ शकतील. पण अजून बैलामधली बेडकीच असल्याचे भान हवे...
- या निवडणुकांमधे इतर पक्ष नव्हते पण त्यांना देखील आता निर्णय घ्यावे लागतील की आघाडीत जायचे का एकटे राहून नंतरया पाठींब्यामधे घोडेबाजारात पैसा आणि सत्तासंपादन करण्याचा प्रयत्न करायचा.
- भाजपा चा आत्मविश्वास ४ विधानसभांमधे ७०% जागा मिळाल्याने अर्थातच खूपच वाढलेला आहे. एका बातमीत वाचल्याप्रमाणे आता मिशन २९३ जागा मिळवणे हा उद्देश आहे. मध्यप्रदेश आणि गुजरात मधे १००% (लोकसभेच्या) जागा तर महाराष्ट्र आणि वर एकूण ११ राज्यात जास्तीत जास्त मिळवण्याचा चंग बांधला आहे. या बातमीप्रमाणे याची पार्श्वभूमी ही ७७ ला जनतापक्षाने जिंकलेल्या जागा अशी आहे. खालील नकाशा रोचक वाटला म्हणून चिकटवत आहे.
In reply to विधानसभा निवडणुकांचा विचार by राजेश घासकडवी
In reply to टायमिंग राजेश राव टायमिंग ! by इष्टुर फाकडा
In reply to तुमचे मुद्दे चुकीचे नाहीत. by राजेश घासकडवी
In reply to आमची निरिक्षणे... by चौकटराजा
कांद्याचे भाव व निवडणूका यांचे काही को रिलेशन असावे काय ? " राज बब्बर यानी शंका व्यक्त केली आहे. निकालानंतर कांद्याचे भाव उतरत आहेत.दरवर्षी थंडीत कांदा स्वस्त होतोच.. माझ्या माहितीनुसार यावर्षी नैसर्गिक स्थितीमुळे कांद्याचे उत्पादन कमी झाले होते.
In reply to आमची निरिक्षणे... by चौकटराजा
महागाई प्रमाणेच आदर्श घोटाळ्याचा अहवाल दाबून ठेवणे, कलमाडीना बरराज काळ अभय देणे, लालू प्रसादना वाचविण्यासाठी लोकसभेचा वापर करायचा प्रयत्न करणे, ई अनेक कारणांमुळे काँग्रेस म्हणजे गुंडाना अभय देणारा पक्ष असे चित्र समोर येत आहे. त्याचा ही परिणाम मतांवर झाला आहे.हे मात्र मान्य.
In reply to आमची निरिक्षणे... by चौकटराजा
In reply to सहमत/असहमत. by llपुण्याचे पेशवेll
In reply to अमान्य by चौकटराजा
In reply to सहमत/असहमत. by llपुण्याचे पेशवेll
"१ कोटीचा फ्लॅट घेत आहात तर २.५ लाख स्टॅम्पड्युटी, रजिस्ट्रेशन भरायला जड आहे का?"
आत्ता सध्ध्या पुण्यामधे १०.३५% tax भरावा लागतो. म्हणजे १ कोटीचा फ्लॅट साठी १०,३५,००० रुपडे tax भरावा लागतो. आणी ही रक्कम खुप जास्त आहे.In reply to "१ कोटीचा फ्लॅट घेत आहात तर २ by सुखी
In reply to धन्यवाद सुखी. म्हणजे इतका by llपुण्याचे पेशवेll
In reply to अहो महाराष्ट्र सरकार एव्हड by सुखी
In reply to १)कॉंग्रेस नको या मुख्य by कंजूस
मतमोजणीवेळी एकेक पेटीचे मतदान दाखवतात ते बंद करायला हवे . त्यामुळे छोट्याछोट्या ब्लॉकचे मतदान पक्षांना कळते . त्याऐवजी सर्व पेट्या जोडून झाल्यावर एकत्रित मतदान दाखवले पाहिजे .खरच आहे.. अहो त्या आकड्यांच्या जोरावर उमेदवाराने वाटलेले पैसे परत मागितलेले पण मी पाहिलेत. "तुझ्या ब्लॉकमच्ये मते मिळाली नाहीत. तेव्हा माझे पैसे परत दे."
In reply to जनतेला ३ रा पर्याय मिळाल्यास by मदनबाण
In reply to सरकार स्थापन करायच असेल तर by अनुप ढेरे
In reply to ध्रुवीकरण by llपुण्याचे पेशवेll
कम्युनल व्हायोलंस बिलयाची अजून फार 'हवा' झालेली वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर तरी दिसत नाही. त्यामुळे ध्रुवीकरणाचं ते कारण असेल असं आत्ता तरी वाटत नाही.
In reply to सरकार स्थापन करायच असेल तर by अनुप ढेरे
In reply to ह्म्म by इष्टुर फाकडा
In reply to तू थोडे पैसे खा पण by चौकटराजा
नागरिकात देखील ६० टक्के दागी आहेत.ऑफीसात भरपूर लोक बघीतलेत की जे खोटी मेडीकलची बिले, LTA साठी खोट्या पावत्या असे अनेक छोटे भ्रष्टाचार करत असतात.
In reply to सहमत आहे by अनुप ढेरे
In reply to तू थोडे पैसे खा पण by चौकटराजा
In reply to चौरा .. असहमत by विटेकर
In reply to तू थोडे पैसे खा पण by चौकटराजा
In reply to ह्म्म by इष्टुर फाकडा
In reply to +१ by क्लिंटन
In reply to +१ by क्लिंटन
In reply to चोख विश्लेषण by प्रदीप
१. दिल्लीतील वीज कंपन्यांचे ऑडीट करून, त्या वीजग्राहकांना देत असलेल्या भरमसाट बिलांना पायबंद घालण्यात येईल व वीजग्राहकांचा वीजेखर्च ५० % नी कमी करण्यात येईल.दिल्लीमध्ये खासदार, माजी मंत्री, झोपडपट्या, शिकल्या-सवरलेल्यांची घरे,उद्योगधंदे इत्यादी सगळीकडे वीजेची चोरी मोठ्या प्रमाणावर चालते हे लपून राहिलेले नाही.दिल्लीमध्ये वीजेचे दर जास्त आहेत ते याच कारणामुळे.ते जर अर्ध्यावर आणले तर वीजेच्या distribution कंपन्यांना तोटा होईल. त्यावर योगेन्द्र यादव म्हणतात की ज्या कंपन्या या ऑडीटसाठी तयार होणार नाहीत त्यांना बंद करण्यात येईल. . दिल्लीतल्या वीजेच्या distribution कंपन्या खाजगी आहेत.अशा प्रकारच्या पावलांमुळे खाजगी गुंतवणुकदारांचा नक्कीच विश्वास उडेल. आआपने या सगळ्या वीजचोरांना (सानथोर सगळ्यांना) वठणीवर आणून वीजेचे दर कमी केले जातील असे म्हटल्याचे ऐकिवात नाही.आणि ते तसे म्हणतील तरी का?ही वीजचोरी करणारेच त्यांचे मतदार मोठ्या प्रमाणावर असतील तर आआप कशाला असे काही म्हणेल?तरी द्या वीज अर्ध्या किंमतीत.मधला फरक कोण भरणार?त्याची चिंता आपण का करा?आपल्याला भरावे लागणार नाही ना मग झाले.
दिल्लीसारख्या मोठ्या शहरातही निवडून येऊन, भरीव कार्य करण्यासाठी अनेकस्तरीय पक्षबांधणी व्हावी लागते, असल्या जुनाट कल्पना ह्या पक्षाने मोडीत काढलेल्या दिसतात. आता काहीही बांधणी नसलेला हा पक्ष, मुंबईतूनही निवडणूका पुढील सहा महिन्यातच लढवणार आहे, आणि जनता त्यांना अशीच भरघोस मतांनी विजयी करणार आहे. तेव्हा आता ह्या पक्षाकडे, लोकहो, आपण डोळे लावून बसूया. तो रामराज्य आणणार आहे, कधी/ कसे, वगैरे चौकश्या नकोत!:(
In reply to चोख विश्लेषण by प्रदीप
नागरिकात देखील ६० टक्के दागी आहेत.
आपले राजकारणी भ्रष्टाचारी का आहेत याचे हे कटु उत्तर आहे..!
आपले राष्ट्रीय चारित्र्य अत्यंत वाईट आहे आणि त्यासाठी राजकारण नसून समाजकारण बदलायला हवे ! सत्ताधीश येतील आणि जातील, खरा बदल हा समाजच्या मानसिकतीत व्हायला हवा !शिवाजी महाराज,गांधीजी असे अनेक महापुरुष आले आणि गेले, समाज पुन्हा मूळपदावर !
अश्या किती पिढ्या आपण " अवतारांवर " अवलंबून राहणार ? आपली "समाजाची" म्हणून काही धारणाशक्ती आहे की नाही ? समाज म्हणून आपले काही अस्तित्व आहे की नाही ? (दुसर्या महायुद्धात जपान अथवा जर्मनी ज्या पद्धतीने नामशेष झाली होती , तशी अवस्था दैववशात आपल्यावर आली तर आपण जगाच्या नकाशावरुन पुसले जाऊ!!! कारण राखेतून उभे राहण्याची फिनिक्स वृत्ती आपल्या समाजात नाहीच आहे. गेल्या ६५ वर्षात काय दिवे लावले आपण ? इंचा-इंचाने आपण आपली जमिन पाक आणि चीन ला देत आहोत !)
आणि समाज म्हणून आपण उभे राहयचे असेल तर शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल करून किमान नव्या पिढिमध्ये तरी राष्ट्र भावना निर्माण होईल असे स्वाभिमानी शिक्षण द्यायला हवे ! सैनि़की शिक्षण / सेवा सक्तिच्या करायला हव्यात. जुन्या उच्च-परंपरेचा आणि सुवर्ण काळाचा इतिहास समोर मांडायला हवा .. .. पण लक्षात कोण घेतो ? असे विषय बोलले की इतिहासाचे भगवीकरण होते .. सांप्रदायिकता वाढते !
आणि दुर्दैवाने समाजकारण हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजँड्यावर नाही ,येन केन प्रकारेण ( निवडून नाही आलो तर घोडे बाजार करुन ) सत्तेत येणे हाच प्रत्येक पक्षाचा एकमेव अजँडा आहे आणि सत्तेत आल्यावर ओरपून ओरपून पैसा खाणे हा छुपा अजेंडा आहे !
या असल्या देशघातकी पक्षांकडून कसलाही अमूलाग्र बदल होणार नाही ! औषध आयुर्वेदिक की होमिओपथी याद्वारे रुग्णाची प्रकृती पूर्ण सुधारणार नाही , खाली वर होत राहील फारतर....! सुदृढ शरीर असणे हेच आरोग्याचे लक्षण आहे.
असो मूळ धाग्यापासून विषय खूप भरकटला !
बाकी हे विश्लेषण आणि तदानुषंगिक प्रतिसाद आवडले .. लोक खूप अभ्यास करुन मत मांडत आहेत आणि बर्यापैकी समतोल आहेत ही विशेष आनंदाची बाब नोंद घेण्याजोगी !
In reply to ह्म्म... by विटेकर
In reply to निकालोत्तर निरिक्षणे by ऋषिकेश
In reply to +१ by विकास
In reply to आडवाणी by llपुण्याचे पेशवेll
In reply to आजच वाचले. २०१४ च्या by श्रीगुरुजी
याच जाळ्यात सचिन तेंडुलकर अडकून खासदार झाला. पण नंतर प्रचारासाठी त्याचे नाव यायला लागल्यावर तो सावध झाला व अजून खोलात रूतला नाही.सचिनचे नाव मध्य प्रदेशात प्रचार करण्यासाठी वापरणार होते काँग्रेसवाले. ८ डिसेंबरला निकाल बघून आपण प्रचाराला गेलो नाही हा किती योग्य निर्णय होता हे त्याला कळले असेल :)
आजच वाचले. २०१४ च्या निवडणुकासाठी काँग्रेस नंदन निलेकणींना बंगळूर मधून उभे करून त्यांचे नाव भावी पंतप्रधान म्हणून जाहीर करणार आहे म्हणे. मोदींना टक्कर द्यायला त्यांच्यासारखा स्वच्छ चेहरा उपयोगी पडेल म्हणे.मनमोहन सिंहांचे काँग्रेस पक्षाने ज्या पध्दतीने पोतेरे करून टाकले ते बघून निलेकानी या फंदात पडले नाहीत तर चांगले होईल. जे काही चांगले झाले असेल त्याचे श्रेय गांधी घराण्याचे आणि वाईट झाले असेल त्याचा दोष इतरांचा ही मायलेकरांची (विशेषतः लेकाची) रित लपून राहिलेली नाही.युपीए सरकारच्या कारिकिर्दीतल्या भ्रष्टाचाराचे खापर मनमोहनसिंहांवर फोडून ही मंडळी नामानिराळी राहणार हे बघून निलेकानी यात पडले नाहीत तर ते नक्कीच चांगले होईल.
In reply to +१ by क्लिंटन
In reply to मनमोहन सिंगाना कोणी सांगितले होते ? by चौकटराजा
आपण सी डी देशमुख हे नाव आठवून पहा ! मनमोहन सिंग यांच्या कडे जर खरोखरच काही व्हिजन होती तर त्यानी कधीच राजीनामा द्यावयास हवा होता.+१.अर्थातच पोतेरे होऊ देण्यात त्यांना काही आक्षेप नसेल तर त्यांचे पोतेरे व्हायचेच.
नीलेकेणी यांनी संचलित केलेला आधार कार्डाचा कार्यक्रमच अत्यंत बेशिस्तीचा उत्तम नमुना होता.आधार कार्ड हे बँक खाते आणि बोटांचे ठसे लिंक करणे याबरोबरच ओळख, जन्मतारीख आणि पत्ता या तीनही गोष्टींसाठी एकत्र प्रूफ असणार असे सुरवातीला सांगितले होते.पण मग त्यात पूर्ण जन्मतारीख न लिहिता केवळ जन्मवर्ष द्यायचे प्रयोजन समजले नाही.तसेच त्या आधार कार्डाच्या फॉर्मवर पत्ता व्यवस्थित लिहायला जागा नाही--उदाहरणार्थ डॉ.रामकृष्ण परमहंस मार्ग यासारखे रस्त्याचे नाव पूर्णपणे त्या फॉर्मवर मावणे जरा कठिणच.तसेच "I have no objection to the UIDAI sharing information provided by me to the UIDAI with agencies engaged in delivery of welfare services" हा प्रश्न आणि त्याचे yes आणि no हे दोन पर्याय मनात थोडासा गोंधळ निर्माण करतातच. असो
In reply to आजच वाचले. २०१४ च्या by श्रीगुरुजी
In reply to महाराष्ट्रात तरी राष्ट्रवादी by विजुभाऊ
In reply to किंवा... by अर्धवटराव
In reply to तर ... by चौकटराजा
In reply to महाराष्ट्रात कॉंग्रेस by सचीन
In reply to काँग्रेसचे आत्मचिंतन ! by हुप्प्या
In reply to काँग्रेसचे आत्मचिंतन ! by हुप्प्या
कॉंग्रेस ही गांधी घराण्याने चालवलेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याचा भास होतो आहे.सहमत... येणाऱ्या निवडणुकांमध्ये " पप्पू " आणि " राणीसाहेब "काय दिवे लावतात ते पाहणे intresting असणार आहे
In reply to खूशमस्कर्या खुर्शिदची बातमी अजून एक by हुप्प्या
In reply to काही त्रुटी आणि काही आशा by रमेश आठवले
In reply to झि २४ तास वाहिनिचा आजचा सवाल by देव मासा
In reply to मोदींनी मतदानयंत्रात फेरफार केले म्हणून काँग्रेसचा पराभव by क्लिंटन
In reply to छ्या! वर केलेल्या by ऋषिकेश
In reply to राजकीय चाल by विकास
विधानसभा निवडणुकांचा विचार