बघता बघता विधानसभा निवडणुका संपल्या, निकाल बाहेर आले आणि निकाल लागले देखील. ह्या धाग्याचा उद्देश हा आधीच्या धाग्यावर निकालांसर्भात चालू झालेल्या चर्चा संदर्भात तुमच्या लेखी/ तुम्ही वाचलेली निरीक्षणे, विश्लेषणे आणि आडाखे एकत्रीत मांडणे हा आहे.
मला वाटलेली आणि मी वाचलेली काही निरीक्षणे: जर काही चुकीचे आढळले अथवा अपडेट्स असले तर अवश्य सांगा.
- या वेळेचे मतदान हे बर्यापैकी भ्रष्टाचाराच्या विरोधातले होते. बर्यापैकी अशासाठी कारण मध्यप्रदेशात काही मंत्र्यांवर आरोप होते तरी देखील भाजपाला जास्तच जागा मिळाल्या. कारण जनतेचा असलेला म.प्र. नेतृत्वावरील आणि त्यांच्या स्वच्छ प्रतिमेवरील विश्वास.
- वरील विधानातून जर मोदींचा प्रभाव नाही असे कोणी अनुमान काढू लागला तर ते तितकेसे बरोबर ठरेल असे वाटत नाही. राजस्थानात वसुंधरा राजे यांचा इतके मोठा प्रभाव नाही की त्यांच्यामुळे भाजपाची लाट यावी.
- त्याव्यतिरीक्त मोदींची इतकी बदनामी करून देखील जनता आता भिक घालत नाही हे स्पष्ट झाले आहे. मी स्वतः मोदींचा अथवा कुठल्याच नेत्याचा आंधळा फॅन नाही. पण मोदींच्या नावाने बागुलबुवा करून डाव्या विचारवंतांनी गेल्या दहावर्षात अक्षम्य अशी सामाजीक फूट पाडली आहे असे माझे स्पष्ट मत आहे. त्यांना यातून धडा मिळाल्यास आनंद नक्की वाटेल.
- राजस्थानात केवळ दोन मुस्लीम आमदार निवडून आले आणि दोन्ही भाजपाचे आहेत.
- मध्यप्रदेशात २२ मुस्लीम बाहुल्य असलेल्या मतदार संघांपैकी २१ ठिकाणी भाजपा अथवा कॉग्रेसेतर उमेदवार जिंकला/ली. फक्त काँग्रेसकडून अरीफ अकील हे पाचव्यांदा जिंकून आलेले मुस्लीम उमेदवार आहेत. त्यांना देखील नंतर म्हणावे लागले आहे की "काँग्रेस आता तरी मुस्लीमांकडे एक व्होटबँक म्हणून पहाणार नाही".
- वनवासी भागात देखील काँग्रेसची मते कमी झालेली आढळलेली आहेत.
- या निवडणुकीत सर्वत्र एकंदरीतच जातीवरून मतदान कमी झाले आहे असे वाटते.
- आपच्या उमेदवारांपैकी १३ उमेदवार हे काँग्रेस अथवा भाजपाकडून तिकीट न मिळालेले बंडखोर उमेदवार होते असे भाजपाचे नेते गोयल म्हणाल्याचे हिंदू मध्ये वाचले. (पण कुणास अधिक माहिती असली तर आवडेल)
- भारतातील आणि अमेरीकेतील डाव्या (कम्युनिस्ट) विचारांच्या टोळ्यांनी आवाज केल्यामुळे ज्या कँडोलिसा राईसच्या अख्त्यारीत मोदींचा व्हिसा रद्द करण्यात आला होता, त्याच राईस आता (एनडीटिव्हीवर) म्हणू लागल्या आहेत की अमेरीकेने आता भूतकाळ विसरायला हवा. (जो भूतकाळ न्यायालयांनी देखील मानला नाही तो होताच कुठे हा वेगळा प्रश्न आहे). जस्ट इन केस मोदी आलेच तर अगदीच फजिती झाली असे वाटायला नको याची अमेरीकेने तयारी चालू केलेली आहे असे वाटत आहे.
- मणीशंकर अय्यर यांनी आपले तोंड उघडले आहे आणि आता ते पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दोष देऊ लागले आहेत तर काही काँग्रेसजन हे पी चिदंबरम ना दोष देऊ लागले आहेत. ते पुढे म्हणाले, " He (म्हणजे राहूल) has revamped student and youth wings, started efforts to integrate panchayati raj representatives in the party system. 24 Akbar Road (Congress headquarters) was the biggest mortuary until he took charge. It is now very active." याचा अर्थ सोनीयांना नावे ठेवली जात आहेत हे त्यांच्या लक्षात आलेले दिसत नाही. मला वाटते काँग्रेसी संस्कृतीस गांधी घराण्याची इतकी सवय आहे की उद्या सोनीया-राहूल हरले तरी ते त्यांच्याच पाया पडण्यात कृतकृत्य होणे मानतील. वास्तवीक काँग्रेसमधे देखील नेतृत्वगुण असलेले कमी आहेत असे नाही पण गांधी कुटूंब एके गांधी कुटूंबच्या सवयीने पुढे काही चालू शकेल असे वाटण्यासारखी परीस्थिती आज तरी नाही.
- सीमांध्रच्या काँग्रेसमधील खासदारांनीच अविश्वासाचा ठराव आणला आहे. पण आजच्या घडीस तरी तो यशस्वी होईल असे वाटत नाही. ममतांनी त्याला विरोध केला आहेच.
- काँग्रेसमधे फूट पडण्याची शक्यता नसली तरी काही उंदीर जहाजातून पळून जाऊ शकतात, त्यात काही आश्चर्य नाही.
- काँग्रेसचे नेते हे पारंपारीक पध्दतीने जिंकण्यात तरबेज आहेत, त्यांना "खोक्या"च्या बाहेरचा विचार करता येतही नाही आणि करवतही नाही. बाहेर घडणार्या बदलाला सामोरे न जाता परत परत तेच करणार - पॉप्यूलीस्ट निर्णय, कुणाची (मोदी, केजरीवाल आणि इतर कोणी) तेहेलका नसेल पण कोब्रापोस्ट वगैरेकडून बदनामी करता आली तर त्यास प्राधान्य, असे कुंपणाच्या आतले खेळच खेळले जातील असे वाटते.
- केजरीवाल आणि त्यांच्या टीमला नक्कीच पॉझिटीव्ह उर्जा मिळाली आहे. त्यातील एकाची मुलाखत बघत असताना त्याचे तरी पाय जमिनीवर दिसले. जर जमिनीवर राहून आणि आदर्शपणाचा आचरट शोऑफ न करता पुढे जायचे ठरवले तर ते अजूनही मोठी शक्ती होऊ शकतील आणि तशी ते झाले तर त्याचे दूरगामी परीणाम चांगले होऊ शकतील. पण अजून बैलामधली बेडकीच असल्याचे भान हवे...
- या निवडणुकांमधे इतर पक्ष नव्हते पण त्यांना देखील आता निर्णय घ्यावे लागतील की आघाडीत जायचे का एकटे राहून नंतरया पाठींब्यामधे घोडेबाजारात पैसा आणि सत्तासंपादन करण्याचा प्रयत्न करायचा.
- भाजपा चा आत्मविश्वास ४ विधानसभांमधे ७०% जागा मिळाल्याने अर्थातच खूपच वाढलेला आहे. एका बातमीत वाचल्याप्रमाणे आता मिशन २९३ जागा मिळवणे हा उद्देश आहे. मध्यप्रदेश आणि गुजरात मधे १००% (लोकसभेच्या) जागा तर महाराष्ट्र आणि वर एकूण ११ राज्यात जास्तीत जास्त मिळवण्याचा चंग बांधला आहे. या बातमीप्रमाणे याची पार्श्वभूमी ही ७७ ला जनतापक्षाने जिंकलेल्या जागा अशी आहे. खालील नकाशा रोचक वाटला म्हणून चिकटवत आहे.
वाचने
17534
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
विधानसभा निवडणुकांचा विचार
टायमिंग राजेश राव टायमिंग !
In reply to विधानसभा निवडणुकांचा विचार by राजेश घासकडवी
तुमचे मुद्दे चुकीचे नाहीत.
In reply to टायमिंग राजेश राव टायमिंग ! by इष्टुर फाकडा
लाट
In reply to तुमचे मुद्दे चुकीचे नाहीत. by राजेश घासकडवी
आमची निरिक्षणे...
कांद्याचे भाव व निवडणूका
In reply to आमची निरिक्षणे... by चौकटराजा
महागाई प्रमाणेच आदर्श
In reply to आमची निरिक्षणे... by चौकटराजा
सहमत/असहमत.
In reply to आमची निरिक्षणे... by चौकटराजा
अमान्य
In reply to सहमत/असहमत. by llपुण्याचे पेशवेll
थोडेसे स्पष्टीकरण
In reply to अमान्य by चौकटराजा
"१ कोटीचा फ्लॅट घेत आहात तर २
In reply to सहमत/असहमत. by llपुण्याचे पेशवेll
"१ कोटीचा फ्लॅट घेत आहात तर २.५ लाख स्टॅम्पड्युटी, रजिस्ट्रेशन भरायला जड आहे का?"आत्ता सध्ध्या पुण्यामधे १०.३५% tax भरावा लागतो. म्हणजे १ कोटीचा फ्लॅट साठी १०,३५,००० रुपडे tax भरावा लागतो. आणी ही रक्कम खुप जास्त आहे.धन्यवाद सुखी. म्हणजे इतका
In reply to "१ कोटीचा फ्लॅट घेत आहात तर २ by सुखी
अहो महाराष्ट्र सरकार एव्हड
In reply to धन्यवाद सुखी. म्हणजे इतका by llपुण्याचे पेशवेll
चुकीचा समज..
In reply to अहो महाराष्ट्र सरकार एव्हड by सुखी
वाचतोय
सध्यातरी
दिल्ली संदर्भात एक रोचक माहिती
१)कॉंग्रेस नको या मुख्य
मतमोजणीवेळी एकेक पेटीचे मतदान
In reply to १)कॉंग्रेस नको या मुख्य by कंजूस
जनतेला ३ रा पर्याय मिळाल्यास
किंचित अवांतर आणि सहमत.
In reply to जनतेला ३ रा पर्याय मिळाल्यास by मदनबाण
रोचक मुद्दे
मस्त
येथील कॉग्रेस समर्थकांचे मत
अति महत्वाचा फॅक्टर.
सरकार स्थापन करायच असेल तर
ध्रुवीकरण
In reply to सरकार स्थापन करायच असेल तर by अनुप ढेरे
कम्युनल व्हायोलंस बिल
In reply to ध्रुवीकरण by llपुण्याचे पेशवेll
महाराष्ट्र
In reply to सरकार स्थापन करायच असेल तर by अनुप ढेरे
ह्म्म
तू थोडे पैसे खा पण
In reply to ह्म्म by इष्टुर फाकडा
सहमत आहे
In reply to तू थोडे पैसे खा पण by चौकटराजा
ऑफीसात भरपूर लोक बघीतलेत की
In reply to सहमत आहे by अनुप ढेरे
चौरा .. असहमत
In reply to तू थोडे पैसे खा पण by चौकटराजा
तो पुळका नाहीच ...
In reply to चौरा .. असहमत by विटेकर
ऐकावे ते नवलच. तुमचि म्हायती
In reply to तू थोडे पैसे खा पण by चौकटराजा
+१
In reply to ह्म्म by इष्टुर फाकडा
+ १०००...०
In reply to +१ by क्लिंटन
चोख विश्लेषण
In reply to +१ by क्लिंटन
खरं आहे
In reply to चोख विश्लेषण by प्रदीप
?
In reply to चोख विश्लेषण by प्रदीप
ह्म्म...
नागरिकात देखील ६० टक्के दागी आहेत.आपले राजकारणी भ्रष्टाचारी का आहेत याचे हे कटु उत्तर आहे..! आपले राष्ट्रीय चारित्र्य अत्यंत वाईट आहे आणि त्यासाठी राजकारण नसून समाजकारण बदलायला हवे ! सत्ताधीश येतील आणि जातील, खरा बदल हा समाजच्या मानसिकतीत व्हायला हवा !शिवाजी महाराज,गांधीजी असे अनेक महापुरुष आले आणि गेले, समाज पुन्हा मूळपदावर ! अश्या किती पिढ्या आपण " अवतारांवर " अवलंबून राहणार ? आपली "समाजाची" म्हणून काही धारणाशक्ती आहे की नाही ? समाज म्हणून आपले काही अस्तित्व आहे की नाही ? (दुसर्या महायुद्धात जपान अथवा जर्मनी ज्या पद्धतीने नामशेष झाली होती , तशी अवस्था दैववशात आपल्यावर आली तर आपण जगाच्या नकाशावरुन पुसले जाऊ!!! कारण राखेतून उभे राहण्याची फिनिक्स वृत्ती आपल्या समाजात नाहीच आहे. गेल्या ६५ वर्षात काय दिवे लावले आपण ? इंचा-इंचाने आपण आपली जमिन पाक आणि चीन ला देत आहोत !) आणि समाज म्हणून आपण उभे राहयचे असेल तर शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल करून किमान नव्या पिढिमध्ये तरी राष्ट्र भावना निर्माण होईल असे स्वाभिमानी शिक्षण द्यायला हवे ! सैनि़की शिक्षण / सेवा सक्तिच्या करायला हव्यात. जुन्या उच्च-परंपरेचा आणि सुवर्ण काळाचा इतिहास समोर मांडायला हवा .. .. पण लक्षात कोण घेतो ? असे विषय बोलले की इतिहासाचे भगवीकरण होते .. सांप्रदायिकता वाढते ! आणि दुर्दैवाने समाजकारण हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजँड्यावर नाही ,येन केन प्रकारेण ( निवडून नाही आलो तर घोडे बाजार करुन ) सत्तेत येणे हाच प्रत्येक पक्षाचा एकमेव अजँडा आहे आणि सत्तेत आल्यावर ओरपून ओरपून पैसा खाणे हा छुपा अजेंडा आहे ! या असल्या देशघातकी पक्षांकडून कसलाही अमूलाग्र बदल होणार नाही ! औषध आयुर्वेदिक की होमिओपथी याद्वारे रुग्णाची प्रकृती पूर्ण सुधारणार नाही , खाली वर होत राहील फारतर....! सुदृढ शरीर असणे हेच आरोग्याचे लक्षण आहे. असो मूळ धाग्यापासून विषय खूप भरकटला ! बाकी हे विश्लेषण आणि तदानुषंगिक प्रतिसाद आवडले .. लोक खूप अभ्यास करुन मत मांडत आहेत आणि बर्यापैकी समतोल आहेत ही विशेष आनंदाची बाब नोंद घेण्याजोगी !+१००
In reply to ह्म्म... by विटेकर
सहमत.
In reply to +१०० by राही
नागरिकात देखील ६० टक्के दागी आहेत.
निकालोत्तर निरिक्षणे
+१
In reply to निकालोत्तर निरिक्षणे by ऋषिकेश
आडवाणी
In reply to +१ by विकास
गंमत अशी आहे की आडवाणी
In reply to आडवाणी by llपुण्याचे पेशवेll
आजच वाचले. २०१४ च्या
+१
In reply to आजच वाचले. २०१४ च्या by श्रीगुरुजी
मनमोहन सिंगाना कोणी सांगितले होते ?
In reply to +१ by क्लिंटन
+१
In reply to मनमोहन सिंगाना कोणी सांगितले होते ? by चौकटराजा
+१
In reply to आजच वाचले. २०१४ च्या by श्रीगुरुजी
महाराष्ट्रात तरी राष्ट्रवादी
किंवा...
In reply to महाराष्ट्रात तरी राष्ट्रवादी by विजुभाऊ
तर ...
In reply to किंवा... by अर्धवटराव
हा हा हा ,.......काहिहि सम्भव
In reply to तर ... by चौकटराजा
महाराष्ट्रात कॉंग्रेस
महाराष्ट्रात भाजपा सेना
In reply to महाराष्ट्रात कॉंग्रेस by सचीन
अडवाणींना ‘मोदी लाट’ अमान्य
काँग्रेसचे आत्मचिंतन !
बापरे...
In reply to काँग्रेसचे आत्मचिंतन ! by हुप्प्या
कॉंग्रेस ही गांधी
In reply to काँग्रेसचे आत्मचिंतन ! by हुप्प्या
खूशमस्कर्या खुर्शिदची बातमी अजून एक
हे अस का ?
In reply to खूशमस्कर्या खुर्शिदची बातमी अजून एक by हुप्प्या
काही त्रुटी आणि काही आशा
(No subject)
In reply to काही त्रुटी आणि काही आशा by रमेश आठवले
झि २४ तास वाहिनिचा आजचा सवाल
टाईम पास
In reply to झि २४ तास वाहिनिचा आजचा सवाल by देव मासा
दिल्लीतले विजय आणि लोकसभेच्या जागा.
खुपच छान धागा अमोल केळकर
मोदींनी मतदानयंत्रात फेरफार केले म्हणून काँग्रेसचा पराभव
छ्या! वर केलेल्या
In reply to मोदींनी मतदानयंत्रात फेरफार केले म्हणून काँग्रेसचा पराभव by क्लिंटन
दारू कशाला?
In reply to छ्या! वर केलेल्या by ऋषिकेश
राजकीय चाल
अहो कसलं काय.
In reply to राजकीय चाल by विकास