मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'आणि मिळवा एक चित्र' चा निकाल

चित्रगुप्त · · जनातलं, मनातलं
संदर्भः http://www.misalpav.com/node/26057 निकालास बराच उशीर होत असल्याबद्दल क्षमस्व. आमच्या विनंतीस मान देऊन मिपाकरांनी प्रेमाने उतमोत्तम, अभ्यासपूर्ण प्रतिदाद दिले, त्याबद्दल सर्वांचे आभार. सर्वच प्रतिसाद मननीय आहेत, त्यात डावे उजवे ठरवणे अवघड. तरी त्यातल्या त्यात निवड करणे क्रमप्राप्त असल्याने (एकाच्या ऐवजी) तीन विजेत्यांना मी चित्र देणार आहे: वल्ली, पैसा आणि प्रसाद गोडबोले. वल्ली यांनी तात्कालीन राजकारण, शत्रु-मित्र राज्ये, भूगोल इ. च्या अभ्यासातून यथायोग्य मार्ग काढला, पैसा ताईंनी त्या स्त्रियांची 'अबला' या कल्पनेतून सुटका करून त्यांना धीर देऊन, प्रशिक्षण देऊन त्यांचे सबलीकरण केले, तर प्रसाद गोडबोले यांनी समुद्राचा मार्ग मुकरर केला, हे सर्व फार भावले. चित्रे पाठवणे वगैरे बद्दल व्यनितून संपर्क करू. अभिनंदन.

वाचने 8299 वाचनखूण प्रतिक्रिया 31

शशिकांत ओक Tue, 12/10/2013 - 07:38
चित्रगुप्त, आपल्याला ही धन्यवाद. एक अनोखा पायंडा निर्माण केल्या बद्दल. अन विचारांना चालना देणारा धागा टाकल्या बद्दल. त्यातून महाभारत कालीन इतिहासातील घटनांचा भौगोलिक, सामाजिक आढावा घेणारे विचार मिसळपाव वर सादर करता आले म्हणून.

प्यारे१ Tue, 12/10/2013 - 16:45
वल्ली, पैसा आणि गिरिजात्मक गोडबोले (तेव्हा 'प्रसाद' मिळाला नव्हता ना? ;) ) ह्या विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! मिसळपाववर असं मूर्त स्वरुपातलं काही करण्याच्या मा. श्री. चित्रगुप्त ह्यांच्या पुढाकाराबद्दल त्यांचंही मनःपूर्वक अभिनंदन नि आभार.

शशिकांत ओक Wed, 12/11/2013 - 12:24
चित्रगुप्त, आपल्या चित्रांची बक्षिस योजना राबताना - विजेत्यांना निवडीची मुभा द्यावी ही विनंती. त्या निमित्ताने आपल्या कलागुणांची पारख करायला मिपाकरांना वाव मिळेल. काहींना त्यातून विकत घ्यायला ही प्रेरणा मिळेल वा आवडेल. चित्रांच्या आणणावळीची काय व्यवस्था असेल ते ही समजले तर वाहतूक खर्चाची तयारी करायला विजेत्यांना बरे पडेल. नाही का....

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चित्रगुप्त काका, बाकी या प्रश्र्णाचे उत्तर जरा जपुनच द्या हो. बरेच जण उत्तरा वर डोळा ठेउन बसले असतील.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सुखी Fri, 12/13/2013 - 16:06
:D :D :D अहो तो "चित्रगुप्त काका"न्चा अधिकार आहे ना, त्यान्ना मी direct मला चित्रे विका म्हनुन तर नाही ना सान्गु शकत ;)

प्रचेतस Sat, 02/08/2014 - 18:03
अतीव धन्यवाद काका. तीनही चित्रे आज सुखरूप घरी पोचली. लवकरच त्यांचे फोटो येथे अपलोड करेनच. @पैसाताई, प्रसाद गोडबोले: तुम्ही इतक्यात पुण्यात येणार आहात काय? तुमची चित्रे तुम्हाला कशी पाठवू? पुनरेकवार अतिशय धन्यवाद ह्या सुरेख भेटीबद्दल.

In reply to by प्रचेतस

पैसा Sat, 02/08/2014 - 19:11
१५ एक दिवसात बहुतेक पुण्याला येणार आहे. तेव्हा तुझ्याकडून घेते. चित्रगुप्तांना असंख्य धन्यवाद!