हर्षोल्लासीत नावर्यांनो, आधीच सांगतोय शीर्षक वाचून भलते समज करून घेऊ नका. लेख चक्क चक्क बाईक वर आहे. “बाईक 'को' विकल्यावर”. थोडासा आपला हिंदीमिश्रित कोट्या करायचा क्षीण प्रयत्न.
आता काय सांगू कसं सांगू असं झालंय. सुरुवात, “धूम” युगा पासूनच करतो. जो तो आपलं टॅनंनॅ नन नॅनननॅ करत गाड्या उडवू लागला. आमच्या इमारतीतलं एक कार्टं तर शेजारच्या इमारतीत गोट्या खेळायला पण स्कुटी वर जाऊ लागलं. फादरकडे बाईक मागताच त्यांनी मला मुस्काडून “दत्त दाखवायची” महत्वाकांक्षा जाहीर केली. शेवटी अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला असताना मातोश्रींना अगदीच दया आली आणि मला “कमीतकमी फक्त पास तरी हो रे बाबा” या अटीवर नवी कोरी बाईक बहाल केली गेली. पण खरं तर बाईक देण्यामागच मुख्य कारण असं होतं की माझं महाविद्यालय तसं वेशीबाहेरच होतं. आणि अस्मादिक पुणेकर असल्यामुळे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरायचा भ्याडपणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
असो, बाईक घेतल्यावर पहिली अपेक्षा अशी होती की कॉलेजातल्या एखाद्या मृगनयना रसिकमोहिनीने लाडीकपणे रुमालाशी चाळ करत, हळूच नजर चुकवत लिफ्ट मागावी. पण असे आश्चर्य काही घडले नाही. त्या नजरा चुकवीत, भलत्याच्याच बाईकवर चौफेर उधळू लागल्या आणि आमच्यावर मात्र डोक्यावर रुमाल बांधलेल्या रानरेड्यांना लिफ्ट द्यायची वेळ आली.
यथावकाश बाईकची मागील सीट बळकावली गेलीच. अगदीच मृगनयना नाही, पण रसिकमोहिनी मात्र सापडली. आणि मग ‘कोई ना कोई चाहिये प्यार करनेवाला’ म्हणणारा मी, ‘चांदी की सायकल सोनेकी सीट, आओ चले डार्लिंग चले डबल सीट’ असली गोविंदापंथी गाणी म्हणू लागलो. सहसीटधारिणी सोबत लोणावळा-खंडाळाच्या वाऱ्या घडू लागल्या.
असो, परत लायनीवर येतो. बाईक घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीच ती आपटायचा पराक्रमही पार पाडला. कारण पुण्यात बाईक अथवा कार घेतल्यावर ती ३ दिवसांत आपटली नाही तर तो पु.लं.च्या उक्तीनुसार फाउल धरतात. तर झालं असं की रात्री अलका टॉकिझला, ‘सुपरमॅन रीटर्न्स’ नामक सुमारपट पाहिल्यामुळे अर्ध झोपेत टिळक रस्त्यावर बाईक चालवत असताना जरा गुंगी आली आणि मी एका गाढवावर जाऊन आपटलो. आता टिळक रस्त्यावर रात्री १२:३० वाजता गाढव कुठून आले हे विचारू नका. पुण्यात हल्ली अजगर, बिबट्या, गव्यापासनं मगरीपर्यंत काही सापडू शकतं. महानगरपालिकेत तर लांडग्यांचा सुळसुळाट झालाय म्हणतात. हल्ली काय माणसं जंगलात आणि प्राणी शहरात असंच चाललाय. जाऊद्या तर सांगत काय होतो, गाढव बहुदा हुशार असावं, कारण त्याने त्याचे भाई-बंद (पक्षी:मी आणि मागे बसलेला मित्र) ओळखले, म्हणून आम्हाला ‘प्रसाद’ दिला नाही. बाईकला पण काही नव्हते झाले, फक्त बाईकचा आरसा आकाशाकडे वळला होता. आरश्यात बघून, वरून एखादं विमानं येत नाहीयेना याची शहनिशा करून आम्ही मार्गस्थ झालो.
कॉलेज संपलं. चुकून अभियंताही झालो. थोडा खुर्दा खिशात खुळखुळू लागला, आणि मग “ट्रेकिंग” नामक एका व्यसनाने पूर्णपणे ताबा घेतला. बाईक आणि ट्रेकिंग ही आपली सचिन-सेहवाग प्रमाणे जोडीच जमली. खाच-खळगे, नदीपात्रात, जंगलात, चिखलात, सगळीकडे मुक्त संचार सुरु झाला. पार गुजरात सीमेवरील साल्हेर-मुल्हेर पासून खाली गोंयपर्यंतचे बरेचसे किल्ले ‘बाईक’दळी भटकून झाले. अभिमानाची गोष्ट अशी की बाईकनी कधी दगा नाही दिला. मित्रांच्या बाईक पंक्चर काय व्हायच्या, बंद काय पडायच्या, घसरायच्या काय, पेट्रोल काय संपायच. भलतीच नाटकं हो.
शेवटी, घरकी मुर्गी दाल बराबर, असंच काहीसं माझ्याबाबतीत घडलं. मित्राची ‘अव्हेंजर’ चालवली आणि देवत्व प्राप्त करण्याची ओढ निर्माण झाली. Tagline आहे हो अव्हेंजरची “Feel Like God”. मी मर्त्य मानव तरी की करणार मग. शेवटी पल्सर देऊन अव्हेंजर आणली. पण ६ वर्षांच्या यशस्वी सहजीवानंतर करती सवरती बाईक विकताना, मनाला थोडी हुरहूर लागून राहायची ती राहिलीच.
सध्या तरी मी अव्हेंजर चालवण्यात रममाण आहे. पण परवाच “थंडरबर्ड”चं नवीन मॉडेल शेजारून धुप्-धुप करत निघून गेलं. जीव वर-खाली झाला हो. आता “थंडरबर्ड”चे वेध लागलेत. ती जर घेतली तर मग अव्हेंजरच्या लेखाची अजून एक जिलेबी पडायला मी मोकळा !!
वाचने
46036
प्रतिक्रिया
164
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा...
In reply to का ओ? by अभ्या..
अहो
In reply to का ओ? by अभ्या..
लेख मस्त... प्रतिसाद जबरदस्त!!
समस्त स्त्रीजातीने केलाय
In reply to लेख मस्त... प्रतिसाद जबरदस्त!! by वडापाव
आणि दुसर्याची बाइक कशीही
In reply to लेख मस्त... प्रतिसाद जबरदस्त!! by वडापाव
हा एक महत्त्वाचा फरक आहे खरे
In reply to आणि दुसर्याची बाइक कशीही by शैलेन्द्र
फरक स्पश्ट करा
In reply to लेख मस्त... प्रतिसाद जबरदस्त!! by वडापाव
फरक स्पश्ट करा
In reply to लेख मस्त... प्रतिसाद जबरदस्त!! by वडापाव
देवा!! वाचव!
In reply to लेख मस्त... प्रतिसाद जबरदस्त!! by वडापाव
ह ह पु वा
शी बै !!
In reply to ह ह पु वा by विटेकर
अ हो
In reply to शी बै !! by सूड
हे बाकी बरोबर हो..
In reply to अ हो by विटेकर
तुमच्या ह्या सुंदर सुंदर
बायकांबद्दल असे वैयक्तिक
In reply to तुमच्या ह्या सुंदर सुंदर by माझीही शॅम्पेन
गप रव मरे !!
In reply to तुमच्या ह्या सुंदर सुंदर by माझीही शॅम्पेन
तुम्ही पुरुष आयडी की स्त्री आ
In reply to तुमच्या ह्या सुंदर सुंदर by माझीही शॅम्पेन
हा हा हा ... उसे की फर्क
In reply to तुम्ही पुरुष आयडी की स्त्री आ by प्यारे१
मस्तच
जबराट धागा..
एकशृंगिणीचा खरेच नाद नै
In reply to जबराट धागा.. by उपास
गडबड झाली राव...
ही आमची गडगडपक्षिणी = थंडरबर्ड
In reply to गडबड झाली राव... by भटक्य आणि उनाड
ब्याटमन आणि अन्य प्रतिभावंत
बुलेट इलेक्ट्रा = विद्युत
In reply to ब्याटमन आणि अन्य प्रतिभावंत by खटपट्या
वर कोणीतरी पल्सर ला धक धक
In reply to बुलेट इलेक्ट्रा = विद्युत by बॅटमॅन
वर कोणीतरी पल्सर ला धक धक
In reply to वर कोणीतरी पल्सर ला धक धक by खटपट्या
हाहाहा रैट्ट. आत्ता फॉक्कन
In reply to वर कोणीतरी पल्सर ला धक धक by प्रचेतस
बुलेट इलेक्ट्रा
In reply to बुलेट इलेक्ट्रा = विद्युत by बॅटमॅन
जबरद्स्त प्रतिसादाचा धागा
अफ्फ्फाट आवडलंय !
धन्स ;)
In reply to अफ्फ्फाट आवडलंय ! by वेल्लाभट
Sunder
.
बुवा आता एक ट्याबलेट पण घ्या
अयायायायाया
In reply to बुवा आता एक ट्याबलेट पण घ्या by मालोजीराव
थंडरबर्ड
थोडी दुरूस्ती...मेघरवी
In reply to थंडरबर्ड by एच्टूओ
लेख भारीचे पण प्रतिसाद अजुन
ब्लॅक ब्युटी आहे म्हणुन
In reply to लेख भारीचे पण प्रतिसाद अजुन by झकासराव
श्यामा/श्यामासुंदरी
In reply to ब्लॅक ब्युटी आहे म्हणुन by झकासराव
श्यामलिनी कशी वाटते रे.
In reply to श्यामा/श्यामासुंदरी by बॅटमॅन
मस्तच रे. (कुठली श्यामलिनी
In reply to श्यामलिनी कशी वाटते रे. by प्रचेतस
पण त्या नावावर आमच्या पहिल्या
In reply to मस्तच रे. (कुठली श्यामलिनी by बॅटमॅन
मान्य, म्हणून तर मध्ये स्पेस
In reply to पण त्या नावावर आमच्या पहिल्या by प्रचेतस
(No subject)
In reply to मान्य, म्हणून तर मध्ये स्पेस by बॅटमॅन
शामलिनी मस्त आहे..
In reply to (No subject) by प्रचेतस
पैसाताईसारखंच झालं... लेख
मस्त लेख....
धूम ४.....
वाह्यात कार्ट
टवाळ दादा sssssssss !!
In reply to वाह्यात कार्ट by टवाळ कार्टा
वा वा...आपल्या आदरयुक्त
In reply to टवाळ दादा sssssssss !! by वाह्यात कार्ट
विषयांतर
कुणाच्या आयडी वरून ?
In reply to विषयांतर by अत्रन्गि पाउस
चुकलास रे भावा ...
जब्बर!
आमची काळीभ्भोर
हि आमची 'यामिनी रावण' -
R-1???
In reply to हि आमची 'यामिनी रावण' - by मम्बाजी सर्वज्ञ
येस!!!
In reply to R-1??? by टवाळ कार्टा
https://www.youtube.com/watch
In reply to येस!!! by मम्बाजी सर्वज्ञ
व्हिडो खाजगी मालमत्ता आहे असं
In reply to https://www.youtube.com/watch by मम्बाजी सर्वज्ञ
व्हिडीओ पब्लिक करण्यात आला
In reply to व्हिडो खाजगी मालमत्ता आहे असं by टवाळ कार्टा
भारतात मिळ्तात हो..
In reply to व्हिडीओ पब्लिक करण्यात आला by मम्बाजी सर्वज्ञ
हे खरं आहे. आत्ताच जालावर चेक
In reply to भारतात मिळ्तात हो.. by टवाळ कार्टा
इत्की नैयै...१०-१५ लाखाच्या
In reply to हे खरं आहे. आत्ताच जालावर चेक by मम्बाजी सर्वज्ञ
बाब्बौ...ही २२ लाखाच्या वर
In reply to इत्की नैयै...१०-१५ लाखाच्या by टवाळ कार्टा
https://www.google.co.uk/?gfe
In reply to इत्की नैयै...१०-१५ लाखाच्या by टवाळ कार्टा
आता विदेओ दिसायला पायजे. मी
In reply to भारतात मिळ्तात हो.. by टवाळ कार्टा
दिस्ला दिस्ला...बाकी ते
In reply to आता विदेओ दिसायला पायजे. मी by मम्बाजी सर्वज्ञ
वर्षभर पिंजर्यात बसून प्रवास
In reply to दिस्ला दिस्ला...बाकी ते by टवाळ कार्टा
मि गाडी शिकलो सातवीत, मैंशी
भारी