* कातरवेळची एक आठवण *
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
* कातरवेळची एक आठवण *
मातीच्या त्या भिन्ती,
कुडाची ती घर,
मनातुन जात नाहीत,
ही आठवणीन्ची फुलपाखर !
बन्गल्यापुढे गेट असते,
बान्धकामात असतो आधुनिकतेचा कळ्स,
पण अन्गण येथे दिसत नाही,
आणी दिसत नाही तुळस !
उडुन गेलेल्या छपरावर आता,
उगवु लागली हिरवळ,
जात्यावरली गाणी आता,
येत नाहीत कानावर !
हरवलेली विट्टी आता,
शोधत नाही कुणी
भेन्ड्या लावुन येथे कुणी,
म्हणत नाहीत गाणी !
सन्गीताला परिस्-स्पर्ष त्याकाळी,
होत असे कण्ठाचा,
पंण घशातुन गुरगुरणे व धान्गड्घिन्गा
हा आत्मा झालाय आजच्या सन्गीताचा !
देवाच्या पायावर डोक ठेवताना पुर्वीसारखा
दाटुन येत नाही उमाळा,
लवकर पुढे चला ! असा,
भट्जी देतो आदेश सोवळा !
एस्.टी.ची वाट पाहण्यात आता,
राहिली नाही गावाकड जाण्याची हुरहुर,
कातरवेळी लक्षात येत ,
जीवनातील प्रवासात या माझ घरट राहिलय दुर !
अनिरुद्ध
वाचने
2320
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
अनिरुद्ध राव ,
झकास रे एकदम :) , काय अप्रतिम कविता केली आहेस , गावातल्या घराची आठवण आलि बघ्....लिहित राहा असेच.. म्हणजे आमचि सोय :)
मातीच्या त्या भिन्ती,
कुडाची ती घर,
मनातुन जात नाहीत,
ही आठवणीन्ची फुलपाखर !
हे खुप आवडले.
बन्गल्यापुढे गेट असते,
बान्धकामात असतो आधुनिकतेचा कळ्स,
पण अन्गण येथे दिसत नाही,
आणी दिसत नाही तुळस !
उडुन गेलेल्या छपरावर आता,
उगवु लागली हिरवळ,
जात्यावरली गाणी आता,
येत नाहीत कानावर !
क्या बात है! सुंदर कविता....
तात्या.
In reply to बन्गल्याप by विसोबा खेचर
सुप्रभात,
आताच तुमची प्रतिक्रिया वाचली.
आनंद वाट्ला कारण माझ्या सर्वात आवडीच्या ओळीच तुम्ही पुन्हा एकदा सांगितल्या.
अनिरुद्ध
मस्त कविता..
हरवलेली विट्टी आता,
शोधत नाही कुणी
भेन्ड्या लावुन येथे कुणी,
म्हणत नाहीत गाणी !
हे फारच छान...
मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
कविता छान लिहिली आहे .वाचायला आवडली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
अनिरुद्ध