मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

* कातरवेळची एक आठवण *

अनिरुद्धशेटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
* कातरवेळची एक आठवण * मातीच्या त्या भिन्ती, कुडाची ती घर, मनातुन जात नाहीत, ही आठवणीन्ची फुलपाखर ! बन्गल्यापुढे गेट असते, बान्धकामात असतो आधुनिकतेचा कळ्स, पण अन्गण येथे दिसत नाही, आणी दिसत नाही तुळस ! उडुन गेलेल्या छपरावर आता, उगवु लागली हिरवळ, जात्यावरली गाणी आता, येत नाहीत कानावर ! हरवलेली विट्टी आता, शोधत नाही कुणी भेन्ड्या लावुन येथे कुणी, म्हणत नाहीत गाणी ! सन्गीताला परिस्-स्पर्ष त्याकाळी, होत असे कण्ठाचा, पंण घशातुन गुरगुरणे व धान्गड्घिन्गा हा आत्मा झालाय आजच्या सन्गीताचा ! देवाच्या पायावर डोक ठेवताना पुर्वीसारखा दाटुन येत नाही उमाळा, लवकर पुढे चला ! असा, भट्जी देतो आदेश सोवळा ! एस्.टी.ची वाट पाहण्यात आता, राहिली नाही गावाकड जाण्याची हुरहुर, कातरवेळी लक्षात येत , जीवनातील प्रवासात या माझ घरट राहिलय दुर ! अनिरुद्ध

वाचन 2320 प्रतिक्रिया 0